(दाराआडची आई)

पेरणा...अर्थातच एक आई दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर? कॉलनीच्या बाहेर, ग्राऊंडच्या पार जिथे एक मुलगा खेळतो आहे मुग्ध.... करत असेल का तो तिचा काही विचार? येत असेल का तो ही खेळण्यातून बाहेर, ग्राऊंडच्या अलीकडे? आईला दाराआडून बाहेर यायचं नाही... मग ती वेताची काठी हळूच चाचपते, ती काठी पाठीत घेऊन मुलगा अविश्रांत कोकलत राहतो.... काठी सापडलेली आई सताड उघडलेल्या दाराआडून सुतत राहते... सुततच राहते.... -चमचमचांदन्या

आकाशाची मोतीमाळ – कन्या (उत्तरा फाल्गुनी, हस्त व चित्रा नक्षत्रे)

लेखनविषय:
लेखनप्रकार
भारतीय नक्षत्रांच्या यादीमध्ये पुर्वा व उत्तरा फाल्गुनी नंतर येणारे नक्षत्र म्हणजे हस्त त्यानंतर चित्रा व त्यानंतर आहे स्वाती. लक्षात असुद्या नक्षत्र म्हणजे चंद्राचे घर. २७ नक्षत्रे आपण मानतो व ही २७ नक्षत्रे म्हणजे चंद्राची आकाशातील स्थाननिश्चिती करण्यासाठी योजलेली त्याचे घरे मानली आहेत. वैदिक कालापासुनच या सा-या नक्षत्रांना (हस्त, चित्रा व स्वाती नक्षत्रे) विशेष मानले गेले आहे. प्रत्येक नक्षत्र ऋतुमानातील बदलांचे सुचक आहेत. जसे ऋतुमानातील बदल आहेत तसेच, त्याच बदलांवर आधारीत कृषि संस्कृतीशी जोडलेले कृषिचक्र देखील आहेच.

सांस्कृतिक एकात्मिकरण आणि कट्टरता निर्मुलनाचा चिनी प्रयोग

इस्लामिक कट्टरतावादाची समस्येस विवीध देश विवीध पद्धतींनी तोंड देत आहेत. चीनमध्ये दहा च्या आसपास मुस्लिम समुह आहेत त्यापैकी उघ्युर बहुल झिंजीयांग प्रांत मुस्लिम बहुल समजला जातो. समजला जातो हा शब्द प्रयोग यासाठी कि चिनी कम्युनीस्ट क्रांती नंतर मुख्य चिनी हान वंशांचे चीनच्या सर्व प्रभागात मोठ्या प्रमाणावर स्थानांतर करण्यात आले त्यामुळे आता झिंजीयांग प्रांतात देखिल मोठ्या प्रमाणावर हान चायनीज लोकही रहातात. चिनमध्ये सुरवातीपासूनच चीन बाह्य धार्मिक प्रभावांच्या स्थानिकीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे.

मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग ४.

यापूर्वीचे कथानक: मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग १,२,३ https://www.misalpav.com/node/43228 लोरेंझो जेरार्दिनीची रोजनिशी : किल्ल्याच्या दिशेने मी निघालो खरा, परंतु मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याला तोंड देत अंधारातील अनोळखी, निसरड्या पायवाटांवरून चालणे शक्य नव्हते.

अंक, वेंक, अंग, वेंग, वेंगुर्ले, वेंगसर, बेंगलूर, वेंकटेश

लेखनविषय:
लेखनप्रकार
लेखाचा मुख्य विषय महाराष्ट्र : वेंगसर, वेंगणी (पालघर-ठाणे) , वेंगगाव, वेंग गाव , वेंगरुल, वेंगुर्ले यात वेंग म्हणजे काय ? बेंगलूर, वेंकटेश या शब्दांच्याही व्युत्पत्ती संबंधीत असू शकतील का ? लेखात नव्याने मांडण्याचा प्रयत्न केलेली थेअरी * मराठीत वेंघणें To climb : also to mount or ascend (विदर्भात येंगणे चढणे अशा अर्थाचा शब्द आहे .

कोंडा, कोंडाणा; कोंड, कोंडके, कोंडदेव

लेखनविषय:
लेखनप्रकार
आंध्र तेलंगांणातली कोंडा शब्द असलेली स्थल नावे चटकन आठवता, गोळकोंडा, नागार्जुन कोंडा अजून बरीच आहेत. पण महाराष्ट्रातपण बरीच आहेत हे माहित नव्हते. महाराष्ट्राचा डाटाबेस धुंडाळल्या नंतर अनेक मिळाले आणि नंतर कोंडाणा आठवले. ईंग्लिश आल्फाबेट सर्च असला की कोंढवा सारखाही शब्द सूटत नाही. मग कोंडके आणि कोंडदेव हे पण मिळतात . अर्थात 'कोंडदेव' साठी जरासे लांब आणि जरासे अधिक जुन्या ईतिहासापर्यंत पोहोचावे लागेल. समुद्र किनारी आंध्रप्रदेशाचा गोदावरी मुख ते कृष्णा नदी मुखा दरम्याच्या पट्ट्यातील प्रदेशास वेंगीनाडू म्हणत.

फुलांचा फोटो

लेखनप्रकार
‘ती आज येईल, तेव्हा तिला सांगेन,’ मनोहर कॅमेऱ्याची लेन्स पुसता पुसता स्वतःशीच म्हणाला. ‘तिला कळत नसेल, असं नाही, पण तिच्या लक्षात आलं नसेल. आपल्यातरी कुठं लक्षात आलेलं आधी!?’ सोनेरी फ्रेममधून त्याने बाहेर नजर टाकली. पाचगणीचा table land सकाळच्या कोवळ्या उन्हात फार लोभस दिसत होता. आज या batchला घेऊन जायचं होतं. आधी या मैदानावरून एक चक्कर, मग दऱ्याखोऱ्यात , जंगलात .....निसर्गाची प्रत्येक फ्रेम सुंदर, कशाचेही फोटो काढा! .... अठरा मुलंमुली, वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या. आज तिसरा, उद्या शेवटचा दिवस. उद्या संध्याकाळी सगळे पांगतील. पुन्हा गाठ पडतील, न पडतील.... मनोहरला हे नवे नव्हते.

पाकिस्तानच्या अस्तीत्वाची चर्चा पुन्हा एकदा

लेखनविषय:
नाही, हि जीनांच्या ए एम यु मधील फोटोची चर्चा नाही. हुसेन हक्कानी नावाचे , सध्या पाकिस्तानातून बेदखल झालेले, मुळचे कर्मठ पण संधीसाधू पणे जरासे आमेरीका धार्जीणे विचार व्यक्त करणारे अगदी थोडीशी वर्षे पाकीस्तानचे आमेरीकेतील अल्पकालीन माजी राजदूत आणि पाकीस्तानात जे कुणी सत्तेत असेल त्याच्यासाठी थोडे थोडे काम केलेले माजी पत्रकार अशी यांची त्रोटक ओळख आहे. सध्या बेदखल झाल्यामुळे परदेशात राहून जरासे लिबरल झाले आहेत .

तप्त झाली धारा सारी , दहाही दिशा त्या पेटल्या

तप्त झाली धरा सारी दहाही दिशा त्या पेटल्या दिनकराशी हात मिळवुनी उग्र होऊनि परतल्या ॥ मरूत व्यस्त, घाले गस्त थैमान चहूकडे माजले पशु, प्राणी, झाडे, पक्षी नद्या नाले भाजले ॥ रुक्ष झाले वृक्ष सारे सावलीपण महाग ती यत्र तत्र वणवा पेटला स्वस्त झाली आग ती ॥ कोपला तो, झोपला तो भक्ती कमी जी जाहली मोह मायेत प्राण सारे म्हणुनी झाली काहिली ॥ {{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}

Dear Camera

Dear Camera, देवाने आम्हाला दोन डोळे दिले, पण त्यात एकच लेन्स बसवली. तू आलास, आणि मला तिसरी, चौथी, पाचवी.... कितवी तरी लेन्स मिळाली. जग तुला तिसरा डोळा म्हणते. मी म्हणत नाही. कारण तिसरा डोळा उघडला कि हाहाकार माजतो. मी तुला अंतर्चक्षु म्हणते. आतले डोळे. तू आलास, आणि मी एकटी चालायला शिकले. दूरदूर. चालण्याचा परीघ विस्तारला कि थांबण्याचा केंद्रबिंदू समृद्ध होतो. तुझी सोबत असली, कि नेहमीचे रस्ते नकोसे वाटतात. आडवळण अपोआप प्रिय होते. घरापासून चालत दूर गेले , मनाच्या जवळ बसता येते. मनाच्या जवळ बसले, कि तुझ्याबरोबर खेळणे चालू होते. आजूबाजूचा प्रचंड विस्तार, सुबक होतो.
Subscribe to भूगोल