पाकिस्तानच्या अस्तीत्वाची चर्चा पुन्हा एकदा
नाही, हि जीनांच्या ए एम यु मधील फोटोची चर्चा नाही. हुसेन हक्कानी नावाचे , सध्या पाकिस्तानातून बेदखल झालेले, मुळचे कर्मठ पण संधीसाधू पणे जरासे आमेरीका धार्जीणे विचार व्यक्त करणारे अगदी थोडीशी वर्षे पाकीस्तानचे आमेरीकेतील अल्पकालीन माजी राजदूत आणि पाकीस्तानात जे कुणी सत्तेत असेल त्याच्यासाठी थोडे थोडे काम केलेले माजी पत्रकार अशी यांची त्रोटक ओळख आहे. सध्या बेदखल झाल्यामुळे परदेशात राहून जरासे लिबरल झाले आहेत . त्यांचे एक नवे म्हणजे एप्रिलात प्रकाशित झालेले पुस्तक सध्या Reimagining Pakistan: Transforming a Dysfunctional Nuclear State ईग्रजी वृत्त माध्यमातून थोडे फार चर्चेत आहे . गूगल बुक्सवर त्याची पहिली एकदोन प्रकरणे वाचता येतात आणि त्यांनी भारतीय माध्यमांना बर्या पैकी मुलाखती दिल्याने , उर्वरीत मांडणीची थोडी फार माहिती त्यातून मिळते.
त्यांचे मुख्य मुद्दे पाकीस्तानची समस्या हि तो देश आकारणीस येण्या पुर्वीच झाली , आपणही सर्व हेच मानतो पण हुसेन हक्कानींनी असे काही होईल असे प्रेडीक्ट करणारे तेव्हाच्या फाळणीच्या आधीच्या मुस्लीम आणि इतर लेखकांचे संदर्भ दिले आहेत ते रोचक आहे.
अगदी देशाच्या निर्मिती पासूनच देशाच्या आर्थीक क्षमते पेक्षा मोठी फौज इनहेरीटन्समध्ये ब्रिटीशांकडून मिळणे आणि मग फौजेचा खर्च चालवायचा तर पैशासाठी बाहेर मदत मागितली पाहिजे आणि त्यासाठी भारता सोबतच्या समस्या वाढवून दाखवल्या पाहिजेत . म्हणून भारता सोबत व्हिक्टीम कार्ड खेळले पाहीजे यात पुन्हा नवीन काही नाही फक्त त्यांच्याच देशातला माजी अमुक तमुक आकडेवारी देऊन संगतवार मांडतो .
पाकीस्तानातल्या आतंकवाद, आर्मी आय एस आय , आणि आयडियालॉजीकल प्रॉब्लेम स्विकारतो. तसेच पाकीस्तानने बेल्जियम प्रमाणे आयडीयालॉजीकल प्रॉब्लेम बाजूला ठेवावेत आणि केवळ टेरीटोरीअल स्टेट म्हणून रहावे, भारता सोबतच्या काश्मिर प्रश्नावर जसेच्या तसे स्थिती राहू देऊन व्यापार संबंध वाढवावेत अशी काहीशी थेअरी यातून दिसते. पाकीस्तानी लोक स्वतःच्या वेगळ्या ओळखीवर अजून तरी विश्वास ठेऊन आहेत तेव्हा पाकीस्तानला तोडण्याचा अथवा विसर्जीत केला जाण्याचा विचार करु नये असे त्यांचे मत आहे.
आता माझे मत, पाकिस्तानींनी त्यांचा देश फेल्यूअर आहे म्हणून स्विकारले तरी भारतीयांना हुरळून जाण्यासारखे काही नाही . पाकीस्तानच्या फेल्युअरच्या भिती ने नेमकी त्यांना कोणत्या न कोणत्या देशाची मदत मिळत रहाते . एक अण्वस्त्र सज्ज देश अगदीच टॉपच्या पूर्ण लेव्हलवरुन आपल्या गुप्तचर यंत्रणेला फोडता आला तरच त्यांच्या अण्वस्त्रांना निकामी करता येईल पण हे अगदी कमी शक्यता असलेली केस असेल. किंवा मग आपली युद्ध विषयक टेक्नॉलॉली अशा लेव्हल ला जावयास हवी कि त्यांची अण्वस्त्रे सहज निकामी करता येतील. पाकीस्तानपेक्षा भारत टेक्नॉलॉजीत पुढे असला तरी तेवढ्यावरच भारतीय समाधानी असतात अफलातून वेगळे काही करुन पाकीस्तानला पूर्ण नेस्तनाबूत करावे अशी पूर्ण क्षमतेचा ही अभाव आहे. अजूनही बर्याच मोठ्या वर्गास काँग्रेस सत्तेत होती म्हणून हे जमू शकले नाही असे वाटते , त्यामुळे भाजपास अजून पाच एक वर्षे मिळावयास हवीत म्हणजे पाकीस्तानला युद्धात एकतर्फी नेस्तनाबूत भाजपा सरकारांनाही करता आले नाही हे पटेल मगच त्यांच्या कडून इतर उपायांवर अधिक गंभीर विचार होऊ शकेल.
वस्तुतः १९४७ मध्ये-फाळणी नंतर हिंसेने माणसे मरायची तेवढीच मेली - पेक्षा एक पूर्ण नागरी यादवी होऊन जाऊ दिली असती आज ह्या अण्वस्त्रीय डोके दुखी शिल्लक राहील्या नसत्या . -आता कोणत्याही साईडने अण्वस्त्र वापरले तर जेवढी माणसे मरू शकतात त्यापेक्षा १९४७ मध्ये किती मोठी यादवी झाली असती तरी कमी माणसे मेली असती , हि प्रॅक्टीकल असली तरी पश्चात बुद्धी आहे आता ते शक्य नाही .
व्यापारी संबंध वाढवण्यात एकतर पाकीस्तानच हात मागे ठेवते , आणि व्यापारी संबंधानी बर्याचदा संघर्ष टोकाची पातळी गाठत नाहीत पण ह्याची पूर्ण गॅरंटी ही देता येत नसते. हजार वर्षाच्या सानिध्यात इस्लामिक आयडीयॉलॉजीचे तार्कीक खंडन भारतीयांना अशक्य नव्हते पण ते विवीध कारणांनी हजार वर्षे सोबत राहून केले /झाले नाही. खरे म्हणजे आजूनही पाकीस्तानातील शाळातून भारता विरोधी जे काही शिकवले जाते त्याचे मिडीयाच्या माध्यमातून व्यवस्थीत मुद्देसूद खंडन व्हावयास हवे होते. दुसरा मार्ग सांस्कृतीक स्वातंत्र्याची पाकिस्तानी लोकांना चटक आणि सवय लावणे. पण या बाबतीत कर्मठ हिंदू त्यांना आपले सांस्कृतीक स्वातंत्र्य शिकवण्या एवजी स्वतःच त्यांची संकुचितता घेऊन बसतात त्यामुळे त्यांच्यातल्या कर्मठांचे अधिकच फावते असे वाटते असो.
* Reimagining Pakistan: Transforming a Dysfunctional Nuclear State
गूगल बुक्सवर
* मुलाखत १
* मुलाखत २
* मुलाखत ३
* दैनिक हिंदू मधील लेख
* इंडिया टूडेतील लेख
* जी पार्थसारथी यांचा लेख
* Husain Haqqani
इंग्रजी विकिपीडियातील लेख
वाचने
20143
वाचनखूण
प्रतिक्रिया
57
पाकिस्तानला नेस्तनाबूद करणे म्हणजे,
दुर्दैवी वास्तव!
कर्मठ हिंदू
In reply to कर्मठ हिंदू by गामा पैलवान
अजून किती वर्षांच्या सत्तेची गरज ?
In reply to अजून किती वर्षांच्या सत्तेची गरज ? by माहितगार
भाजप माझा लाडका ....?!
In reply to भाजप माझा लाडका ....?! by गामा पैलवान
ठिके खाली प्रतिसादात मदनबाण
In reply to ठिके खाली प्रतिसादात मदनबाण by माहितगार
हक्कानी म्हणतात ५ वर्षं
In reply to हक्कानी म्हणतात ५ वर्षं by गामा पैलवान
न उमगलेल लॉजीक
सातत्याने जवानांच्या शवपेट्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- भोर भये पनघट पे मोहे नटखट श्याम सताये मोरी चुनरिया लिपटी जाये... :- ShikariIn reply to सातत्याने जवानांच्या शवपेट्या by मदनबाण
भारताची युद्धविषयक मानसिकता
In reply to भारताची युद्धविषयक मानसिकता by एस
!
In reply to ! by माहितगार
१९४७ साली भारत ह्या भूभागाचे
In reply to १९४७ साली भारत ह्या भूभागाचे by एस
तर , आपले हे विधान लागू झाले असते ?
In reply to तर , आपले हे विधान लागू झाले असते ? by माहितगार
इतिहासात
In reply to इतिहासात by जेम्स वांड
जर तर , का नाही ?
In reply to जर तर , का नाही ? by माहितगार
भारत हे 'राष्ट्र' कधीपासून
In reply to भारत हे 'राष्ट्र' कधीपासून by एस
* सीमांच्या बाबतीत सहसा
In reply to * सीमांच्या बाबतीत सहसा by माहितगार
बाप रे!
In reply to बाप रे! by एस
हि आमची सुस्पष्टता आहे
In reply to इतिहासात by जेम्स वांड
संकल्पनांची क्लॅरिटी तपासताना
झकि ऊर्र रहमान आता अतिरेकी कारवायासाठी फंड गोळा करतोय !
In reply to झकि ऊर्र रहमान आता अतिरेकी कारवायासाठी फंड गोळा करतोय ! by डँबिस००७
१
In reply to झकि ऊर्र रहमान आता अतिरेकी कारवायासाठी फंड गोळा करतोय ! by डँबिस००७
२
पाकिस्तान ही जगाला लागलेली
In reply to पाकिस्तान ही जगाला लागलेली by डँबिस००७
मोंदींना अजून ५ वर्षे
हे
In reply to हे by जेम्स वांड
रिझल्ट कधी पर्यंत ?
In reply to रिझल्ट कधी पर्यंत ? by माहितगार
काय रीझल्ट अपेक्षित आहे ?
In reply to काय रीझल्ट अपेक्षित आहे ? by डँबिस००७
पाकीस्तान जगाच्या नकशावर न
In reply to रिझल्ट कधी पर्यंत ? by माहितगार
नाही सांगता येत
In reply to नाही सांगता येत by जेम्स वांड
कल्टी ?
मोदी अजून ५ वर्षे सत्तेत
तुमच्या हिशेबाने अजून किती ?
In reply to तुमच्या हिशेबाने अजून किती ? by माहितगार
नाहित पुरेसे ? असे वाचावे
पाकिस्तान जगाच्या नकाशात न
In reply to पाकिस्तान जगाच्या नकाशात न by डँबिस००७
मग काय पॉसीबल आहे ?
पाकिस्तान जगाच्या नकाश्यावर
In reply to पाकिस्तान जगाच्या नकाश्यावर by डँबिस००७
कायच वेगळ पॉसीबल नै तर ..
काय पॉसिबल आहे ?
In reply to काय पॉसिबल आहे ? by डँबिस००७
मोदी /भाजपा विरोधक यारे सगळे :)
लैच घाई आहे बुवा तुम्हाला !
In reply to लैच घाई आहे बुवा तुम्हाला ! by डँबिस००७
युद्धप्रेमी मिपाकरहो यारे सगळे
कॉम्ग्रेस पेक्षा कायच वेगळ
In reply to कॉम्ग्रेस पेक्षा कायच वेगळ by डँबिस००७
अजून मागू द्या हो मदत
In reply to कॉम्ग्रेस पेक्षा कायच वेगळ by डँबिस००७
असे आहे तर !
पाकीस्तान शी युद्ध करुन नेस्त
आपण मांडलेली आर्थीक गणिते
तुम्ही कितीही भारत पाकिस्तान
डँबिसराव
In reply to डँबिसराव by जेम्स वांड
एक मिनीट, अण्वस्त्रे नसती
In reply to एक मिनीट, अण्वस्त्रे नसती by माहितगार
मला वरील चारही मार्ग सुयोग्य
In reply to मला वरील चारही मार्ग सुयोग्य by पुंबा
समतोल प्रतिसादासाठी अनेक आभार .
:D:D:D:D
In reply to :D:D:D:D by खिलजि
मिपा संपादक आम्हाला
पाकिस्तान युद्धाने संपवायचा ?
In reply to पाकिस्तान युद्धाने संपवायचा ? by गामा पैलवान
आपला तो अद्भूत मार्ग कोणता बरे ?
In reply to आपला तो अद्भूत मार्ग कोणता बरे ? by माहितगार
देश कसा मिटतो ....