मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुझको ठंड लग रही है..

आजी ·

मस्त गुलाबी थंडी!! जॅकेट कानटोपी वगैरे घालुन भल्या पहाटे वॉकायला रनायला बाहेर पडलेले लोक्स!! बाईकला कॅन अडकवुन जाणारे दूधवाले, पेपरवाले घराबाहेर शाळेच्या व्हॅनची वाट पहाणारी मुले लांबवरुन ऐकायला येणारा काकड आरतीचा रेल्वेच्या शिट्टीचा आवाज आणि काय काय..... लेख वाचुन सगळ्या आठवणी जाग्या झाल्या.

वामन देशमुख 19/12/2023 - 18:36
हिवाळा हा माझाही आवडता ऋतू असल्यामुळे की काय, या ऋतूचं वर्णन खूपच भावलं. ---
वाटतं अशा वेळी "तो"जरी आला तरी थांबेल तोही पळभरी!
हे आवडलं नाही, आजी. तुम्ही छान लिहिता. नेहमीच सगळेच वाचक प्रतिसाद देत नसले तरी ते वाचत राहतात. असं काही लिहून तुमच्या लिखाणात खंड पडण्याची भीती दाखवू नका ही विनंती. --- सवांतर: पाचवी-सातवीत असताना "माझा आवडता ऋतू" या विषयावरचा नवनीतचा निबंध वाचला होता, त्यात हिवाळा हा आवडता ऋतू असं वर्णन केलेलं होतं. कदाचित ते वाचल्यापासूनच की काय, "हिवाळा हा माझा आवडता ऋतू" ही जाणीव झाली असावी. --- अवांतर: ३१ डिसेंबर २०१६ रोजी आम्ही चार मित्र दार्जिलिंगला होतो. शिमला येथील मॉल रोड सारखेच दार्जिलिंग येथेही एक ठिकाण आहे. आम्ही चारजण दिवसभर भटकंती करून रात्री आठ वाजता हॉटेलात परत आलो. फ्रेश होऊन बाहेर जाऊन गावात भटकावे, प्यावे-खावे, मॉल रोडवर नाचगाणे करावे, हिरवळ पहावी, थर्टी फर्स्टचा आनंद रात्री उशिरापर्यंत लुटावा असा बेत होता. रूमवर चार जणात मिळून जेमतेम २००-२५० मिली शिल्लक होती. ती गटकावून रात्री सव्वा नऊ ला बाहेर पडलो. जवळच्या वाईन शॉप वॉर जातो तर काय, तो शटर लावून घेत होता. इथला सगळा बाजार नऊ वाजताच बंद होतो असे समजले. त्या दुकानदाराला कसेबसे थांबवून सामान घेतले. कसचा मॉल रोड, हिरवळ, थर्टी फर्स्टची रात्र आणि कसचे काय? सगळेच बंद झाले होते. मौजमजा करण्याचा सगळं बेत पाण्यात गेला. निराशेने शेवटी दहा वाजता हॉटेलात परत आलो. हॉटेलचे रेस्टॉरंट होते तिच्या मालकीणबाईंना विनंती करून काहीतरी खायचे करून घेतले. पिणे-खाणे करून मग जवळपास पाय मोकळे करायला बाहेर पडलो. बाहेर प्रचंड थंडी होती. जाडजूड स्वेटरं, टोप्या, हातमोजे स्पोर्ट्स सॉक्स आणि बूट्स असा जामानिमा असूनही अक्षरशः हाडे गोठविणारी थंडी वाजू लागली. पोटभर जेवल्यावर थंडी जास्त वाजते याची तिथे जाणीव झाली. पण ओव्हरऑल नंतर ती रात्र आम्ही चार जणांनी खूपच एन्जॉय केली. म्हणजे, unplanned मौजमजा केली. बोचर्‍या थंडीचा मस्त अनुभव घेतला.

हिवाळा खरंच आवडता ऋतू आहे. त्याचा कंटाळा नाही येत कधी उन्हा-पावसासारखा! मी आजवर एकापेक्षा एक देखणे चंद्र पाहिले,पण इतका दिलतोड देखणा चंद्र मी पूर्वी आणि नंतर पाहिला नाही. तुम्ही वर्णन केलेलं चित्र डोळ्यापुढे उभं राहिलं. माघ पौंर्णिमेचा उगवता चंद्रदेखील असाच सुंदर दिसतो.

Bhakti 22/12/2023 - 08:09
सुंदर लिहिलंय आजी! मलापण बाई थंडीच आवडते. मी बर्फाचे कण अंगावर झेलत,हात जोडून, डोळे टक्क उघडे ठेवून तो अनुभव मी पंचेद्रियांनी घेत होते. परमेश्वराच्या जवळ नेणारा अनुभव!! सुंदर क्षण! आपला हेमंत ऋतू

In reply to by धर्मराजमुटके

गवि 22/12/2023 - 10:21
:-) नाही हो. अमरेंद्र बाहुबली हे मराठमोळे आयडी नाव जास्त छान आहे. ;-). (ह.घ्या हो बाहुबली.. )

In reply to by गवि

हे सिनेमातील पात्र आहे. पण मला एक कळेना मराठीची मागणी म्हणजे इतर भाषांना विरोध हे समीकरण मराठी माणसात घट्ट का हसलंय??

In reply to by अमरेंद्र बाहुबली

गवि 22/12/2023 - 12:33
अहो, गंमत केली. तुमचा मुद्दा रास्त असेलही. शीर्षक एका प्रसिद्ध गाण्यासारखे वाटते आहे. लेख तर मराठीत आहे ना. झाले मग. बाकी थंडीवरून एखादे मराठी गाणेदेखील शीर्षकात चालून जावे. तूर्त असे गाणे पटकन आठवेना. गारवा हे गाणे पावसाळी आहे असे स्मरते. असो.

In reply to by गवि

गदिमा बाबूजी आशाताई चित्रपट-नरविर तानाजी माघाची रात चांदण त्यात कुशी बदलून भागेना थंडीची झोप काही लागेना -३० ते ५०+ आसे तापमान भोगलेला.

आजी गं मस्त लेखन. मस्त आठवणी. लेखन आवडलं. सगळ्या आठवणी भारी. सर्व वाचकांना लिहिते करणा-या. तर, ऋतु म्हणशील आजी तर, तरुणपणात पावसाळा आवडायचा. तिच्या गावाकडे पाऊस पडला की आपल्याही गावातही पाऊस व्हायचा. दोन-चार थेंब तर आठवणींचे येऊन जायचे. तेव्हा पाऊस आवडायचा. आता वयपरत्वे म्हणे तिकडे ब्लडप्रेशरच्या गोळ्या. इकडेही तसंच थोड्याफार प्रमाणात तर, पाऊस असा विविध आठवणी घेऊन येतोच येतो. बाय द वे, पाण्याची भिती म्हणजे वाहत्या पाण्यातील साचलेल्या पाण्यातील खड्ड्यात फोर व्हीलरचं तर एक चाक कायम अडकण्याची भिती वाटते. एवढं भितीदायक सोडलं तर पाऊस आवडतो. आजी प्रत्यक्षातला पाऊस आवडतो तसा सिनेमातला म्हणशील तर दीठीतला आवडला. सिनेमाभर पाऊस पडतो. थंडी विशेष आवडावी इतकं तिचं कौतुक नाही. पण, नौकरीच्या गावी थंडीच्या दिवसात मंदिरात भजनं करणा-या वारक-यांबरोबर एक दोन भजनं ऐकण्यातली मजा भारी. गुळाचा चहा यायचा भारी वाटायचं. काही अभंग-ताल-नाद अहाहा. भारी एकदम ती थंडी मस्तच. लहानपणी शेकोटीत 'सासू' आणावी लागे. सासू म्हणजे पाचट, काड्या, कागदं जमा करुन आणायचं आणि मग शेकायला यायचं. ती थंडी शेकोटी भन्नाट. थंडीत लाड वाढतात शरीरास पौष्टीक सकस आहाराच्या गप्पा. आता काही मोठी मुलं थंडीचं उष्णमय द्रव्याबद्दल बोलत असतात. आपण दुर्लक्ष तर, अशी वेगवेगळी थंडी. म्हैसमाळ म्हणजे आमच्या छ.संभाजीनगरातलं काय ? पूर्वी दूरदर्शनचा सेटप तिथे होता. मोठमोठ्या छत्र्या तिथे लावलेल्या. मोठा टॉवर खास बघायला शहरवासी तिथे जायचे. आताही लोक तिकडे गर्दी करतात. पण, मुलं मुली, महिला-पुरुष काही असे तसे त्यामुळे त्या छोट्याशा हीलष्टेशनला गर्दी वाढली आहे. इतकी की आता तिकडे नको असे म्हणायची वेळ आली आहे. असं सगळं. आजी तुम्हाला खूप हजारो वर्षाचं दीर्घायूष्य लाभो. रावसाहेबांच्या एका लेखाची मला आठवण येते. ’मरणा तुझा काय तेगार’ ची आठवण झाली. जालावरील रावसाहेबांनी त्याबद्दल खूप वर्षापूर्वी इकडे मनोगतवर लिहिलं होतं मला कायम त्याची आठवण होते. रावसाहेबांच्या लेखनाची ओळख झाली ती याच लेखापासून. आजी तुमचं लेखन गप्पांची मैफिल असते. घमील्यात फळ्या टाकून शेकत तुमच्या गप्पा आठवणी निवांत ऐकत राहावे असे आणि लेखाला दीर्घ प्रतिसाद उमटत जातो तो असा. तहे दिलसे शुक्रिया. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

खूप छान लेख आजी. एकेक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो तुमच्या लिखाणातून. एकदा मी आमच्या कंपनीतल्या ग्रुपमध्ये बोलत असताना ठंड लग रही हैं च्या ऐवजी ठंड बज रही हैं असं म्हटलो होतो ,त्याची आठवण झाली शीर्षक बघून :D

माझा सर्वात आवडता ऋतू म्हणजे थंडीचा. पावसाळा आणि उन्हाळा मला अजिबातच आवडत नाहीत. मुंबईत राहणाऱ्या नोकरदारांना पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात लोकलनं कामावर जाणं म्हणजे अग्निपरीक्षाच! पावसाच्या तपकिरी रंगाच्या गढूळ पाण्यात काय काय गलिच्छ वस्तू वाहात येतील आणि आपल्या पायाला स्पर्श करतील सांगता येत नाही. कुठं खड्डा असेल, कुठं सरळ रस्ता असेल.रस्त्याची सीमारेषा संपून कुठं गटार लागेल सांगता येत नाही. वाहत्या पाण्यात रस्ता अजिबात दिसत नसताना त्याचा अंदाज घेत चालणं महाकर्मकठीण काम. मला रस्त्यातल्या खड्याची एक महाभयानक आठवण आहे.

अ‍ॅनिमल...नी अंमळ मळ मळ

निओ ·

चौथा कोनाडा 10/12/2023 - 15:31
लै भारी निरिक्षण, परिक्षण, रसग्रहण ! PADHAHIWARI
तसंच आपले उपेंद्र भाऊ लिमये. tense वातावरणात भारी विनोद निर्मिती करून जातात. त्यांच्या तोंडून आयच्या गावात, चांगभलं व दोन चार मराठी शिव्या ऐकून या हैदराबादच्या थेटरात जय महाराष्ट्र जोरात ओरडावे वाटले. action ला background मधे 'डॉबीवाल्या बोलव माझ्या डीजे ला' मराठी गाणं ऐकायला मजा वाटली
याची लैच चर्चा सुरू आहे ! मराठी ऑडियन्स सुद्धा मिळावा म्हनून खटपट सुरु आहे की काय शंका येतेय ! अगदी योग्य शब्दात घेतली आहे !

In reply to by चौथा कोनाडा

शशिकांत ओक 24/12/2023 - 12:26
सीेेेेेेेेेेेेेेए करताना ती बाळगावी लागते याची आठवण झाली. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन देमार मार धार करून आपले खिसे भरायला सोईचे होते.

परीक्षण आवडले असे सुपरस्टार बेस पिक्चर धो धो पैसे कमावतात .... कबीर सिंग , अर्जुन रेड्डी , KGF काय पठाण , जवान लिस्ट लंबी आहे ... सगळे one time watch पठडीतले ....

In reply to by विअर्ड विक्स

चौथा कोनाडा 11/12/2023 - 12:54
पण आपण जसजसे चोखंदळ आणि बहूश्रुत होत जातो तसे ही असले सिनेमे फोल वाटायला सुरुवात होते असे माझे निरिक्षण आहे

In reply to by चौथा कोनाडा

चौथा कोनाडा 11/12/2023 - 12:56
.. म्हणजे सगळे one time watch पठडीतले पण रहात नाहीत, असे मला म्हणायचे आहे. आधीच प्रचंड चर्चा झालेली असते, औत्सुक्य लोप पावते.

अ‍ॅनिमल पाहिला आणि लेखणी हाती घेतली. अ‍ॅनि मल की मळ, जे काही असेल ते आणि त्यामुळे झालेली मळमळ उलटी करून टाकावी म्हटले, म्हणजे मन शांत होईल म्हणून हा प्रपंच. सुरुवातीलाच वाईट जोक. कोणी आगाऊ म्हणेल कि मळ बाहेर काढायची दुसरी क्रिया पण असते ती इथे नाही केली याबद्दल धन्यवाद. असो कोटीचा मोह आवरला नाही. मूळ मुद्दा चित्रपटाबद्दल. Violence presented in entertaining way (काही दृश्य सोडली तर ) हे दिग्दर्शक व कलाकार या जोडीने दाखवून दिलं. आणि खरंच, चित्रपटात जेव्हा हाणामारी चालते तेव्हाच बरं वाटतं. फॅमिली ड्रामा येतो तेव्हा बोअरच होतं. तरीपण सध्याचा अति हिंसाचार नाही झेपत आपल्याला .

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण श्रध्दांजली

अहिरावण ·

शाहु फुले आंबेडकर ह्या पुरोगामी विचारांच्या त्रयीतील सनातनींचा चातुर्वर्ण व्यवस्थेला सुरूंग लावून सनातनी जातीवाद्यांना सळो की पळो करून सोडनारे, दलित दिनदुबळ्यांना जातीवादातून ाहेर काढनारे, आधुनीक पुरोगामी महाराष्ट्राचे प्रणेते, भारतीय संविधानाचे जनक आदरणीय बाबासाहेब आंबेडकर ह्यांना अभिवादन.

Bhakti 06/12/2023 - 14:54
A माझ्या लेकीने हे चित्र मागच्या वर्षी बनवलं होतं(वयं ७) ,उत्स्फूर्तपणे आणि मला दाखवलं होतं .अजूनपर्यंत ती बाबासाहेबांविषयी अनेक गोष्टी आनंदाने सांगते.मराठी माध्यमातून ती शिकतेय ह्यामुळेच हे घडलं :)

In reply to by Bhakti

स्वधर्म 06/12/2023 - 16:06
पण तुमची मुलगी मराठी माध्यमातून शिकते आहे, हे वाचून आनंद झाला. माझी मुलेही मराठी माध्यमातूनच शिकली आणि त्यांना आणि मलाही त्याचा कसलाही तोटा जाणवलेला नाही.

स्वधर्म 06/12/2023 - 16:15
यांच्याविषयी नेहमी दलितांचे उध्दारकर्ते असे म्हटले जाते, पण खरे पाहता ते सगळ्या भारतीय नागरिकांचेच उध्दारकर्ते आहेत. कामगारांच्या हिताचे अनेक कायदे, शेतीबाबतचे कायदे (खोती पध्दत), स्त्रियांबाबतचे अनेक कायदे करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. रूपयाच्या परिवर्तनियतेबाबतचा त्यांचा पी एचडीचा निबंध हा सुध्दा देशाच्या अर्थशास्त्राला दिशा देणार होता. त्यांनी इतरांच्या भावनेचा वापर करून आपल्या मनासारखे करून घेतले नाही. अंतरी अपार करूणा होती पण नेहमी बुध्दीवादाचा आधार घेतला. एवढा मोठा माणूस आपल्या देशात झाला याचा अभिमान वाटतो.

चौकस२१२ 07/12/2023 - 11:29
कोणीतरी पूरोगाम्यांची व्याख्या विचारली होती एक सुचलेली - जे बाबासाहेबांच्या आरक्षण आणि मुस्लिमांबद्दलचं काही परखड वक्तव्या कडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात https://www.firstpost.com/opinion/how-br-ambedkars-idea-of-islam-exposes-woolly-headed-liberals-of-the-day-10559281.html https://www.quora.com/What-were-Dr-Ambedkars-views-on-Islam - जे सावरकरांचच्या जातीनिर्मुलासाठी/ पतितपावन मंदिर सारखया प्रयत नांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात ते पुरोगामी कारण अशांना दोन्ही पचणारे नसते

In reply to by चौकस२१२

अहिरावण 07/12/2023 - 13:38
सहमत आहे. वरील व्याख्येत "लोका सांगे ब्रह्मज्ञान. स्वतः मात्र कोरडे पाषाण" ही उक्ती सार्थ करणारे ही टीप सुद्धा जोडा असे सुचवतो.

डॉ.भीमराव रामजी आंबेडकर, यांना आपण सर्वजण डॉ.बाबासाहेब आंबेडकर या नावानेही ओळखतो. दरवर्षी ६ डिसेंबर हा बाबासाहेबांचा पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. संविधानाचे जनक, दलितांचे उद्धारकर्ते, अग्रणी सामाजिक सुधारक अशा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण श्रध्दांजली ! जय हिंद ! जय महाराष्ट्र !! जय भिम !!

पुन्हा एकदा राजगड-तोरणा

राजेंद्र मेहेंदळे ·

सुंदर छायाचित्रण, सखोल वर्णन आणी बरोबर तरूण पिढी तयार करता आहात हे प्रशंसनीय आहे. लेख आवडला हे वेगळे सांगणे नलगे.

प्रचेतस 06/12/2023 - 08:58
खूपच भारी लिहिलंय. राजगड, तोरणा दोन्ही अजस्त्र किल्ले आहेत. राजगडावर तर जनता असते, सर्वसाधारणपणे लोक सुवेळा आणि बालेकिल्लाच पाहतात, संजीवनीकडे त्यामानाने कमी लोक जातात. ज्यांना महाराजांचं दुर्गशास्त्र बघायचं आहे त्यांनी संजीवनी पाहावी. अत्यंत अद्भुत रचना. त्या चिलखतात फिरण्याचा अनुभव अविस्मरणीय. बाकी हा रेंज ट्रेक करणे सोपे काम नव्हे. मस्त एकदम.

सौंदाळा 08/12/2023 - 13:59
सुंदर वर्णन आणि फोटो. कोलाज तर मस्तच. राजगड तोरणा एकत्र कधीच केले नाहीत. तुमचा लेख वाचून माहितगार माणूस बरोबर असल्याशिवाय जमणार नाही असे वाटतय.

लेख आवडला . आता एक पुरवणी येऊ द्या पुढील माहितीसाठी १. छायाचित्रे विविधरूपात कशी डकवायची २. टेक्स्ट टू स्पीच चा अनुभव ? चांगला वाईट ?

In reply to by विअर्ड विक्स

फार काही करावे लागत नाही. १. स्पीच टू टेक्स्ट- टेक्स्ट टू स्पीच तशा अनेक वेब्साईट आहेत, पण मी ह्या वेबसाईटचा वापर केला. ७०-७५ टक्के काम झाले , पण नंतर संकलन करताना चुकीच्या ठिकाणी पडलेली विराम चिन्हे, किवा काही ठिकाणी चुकीचे शब्द दुरुस्त करावे लागले. तरीही एकुण वेळ कमी लागला असे म्हणेन. तरीसुद्धा लिहिताना डोक्यात त्या आठवणी घोळवत लिहिल्यामुळे लेखाला जास्त जिवंतपणा येतो असे वाटते. बोलताना येणार्‍या विचारांचा वेग नीट जुळत नसल्याने ती क्वालिटी कमी होते. २. फोटो कोलाज- मोबाईलवर फोटो काढले होते. तिथेच लाईव्ह कोलाज नावाचे फोटो कोलाज अ‍ॅप डाउनलोडवले, त्यात पाहीजे त्या फोटोंचे डकवुन कोलाज करुन घेतले आणि ते सेव्ह केले. मग मूळ फोटोंऐवजी ते कोलाज केलेले फोटो गूगल फोटोज मध्ये पब्लिक अ‍ॅक्सेस असलेल्या अल्बम मध्ये अ‍ॅडवले. आणि त्या फोटोंची लिंक लेखात देत गेलो.

खूप सुंदर लिहीलं आहे. शाळेत असताना गड किल्ल्यावर खूप वेळा जाणं होत असे.आता शक्य होत नाही त्यामुळे अशी वर्णनं वाचली किखूप छान वाटतं.

नमस्कार मंडळी आज पहिल्यांदा एक प्रयत्न करून बघतो आहे टायपिंग ऐवजी स्पीच टू टेक्स्ट वापरायचा. बघुया कसे जमतेय. =============================== राजगड तोरणा हा रेंज ट्रेक मी याच्या आधी पण केलाय. साधारण २०१५ मध्ये हा ट्रेक मी एकदा केला होता आणि त्याच्या आधी एकदा २००४ मध्ये तोरणा ते राजगड असा उलट ट्रेक केला होता पण त्यावेळेला आम्ही आदल्या दिवशी रात्री मुंबईहून निघून वेल्ह्यापर्यंत गेलो होतो. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी वेल्ह्यातून तोरण्यावर गेलो होतो.

श्यामची आई

विअर्ड विक्स ·

अश्या “मरेल/थकलेल्या” कथांवर पैसा कसे लावतात लोक देव जाणे. इतर सिने इंडस्ट्री घोडदौड करत असताना. आपण मागेमागे का जातोय?? - अशामळू बाहुबली (फाॅरेन रिटर्न)

कंजूस 26/11/2023 - 17:42
शामची आई कथा/कादंबरी अजाणतेपणी वाचणे चूक आहे. पेंडसे यांची कथा 'गारंबीचा बापू' ज्यासाठी होती त्याच कारणासाठी 'शामची आई' आहे. म्हणजे त्यावेळच्या एका समाजाची बखर. अर्थात ही पुस्तके मोठेपणी वाचावीत.

In reply to by कंजूस

कधी लहानपणी शामची आई हे पुस्तक वाचून घळाघळा रडलो होतो. कुठलीही मुळ कलाकृती पुनर्निर्माण करण्यात पुनर्निर्मिती करणारा तोकडा पडला तर मुळ कलाकृतीचे मुल्य कमी होते व ती जशीच्या तशी वाचक,प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही. हा दोष पुनर्निर्माण करणाऱ्यांचा आहे मुळ कलाकृतीचा नाही. कलाकृती ,साहीत्य ही समाजाची बखर आहे या मताशी कंजूस भौं बरोबर सहमत आहे व त्यामुळेच ती बघताना आजच्या परिप्रेक्षातून बघणे वाचणे चुकीचे ठरेल. अर्थात कुणाला काय आवडावे हे व्यक्तिसापेक्ष आहे. लहानपणी शाईची आई या पुस्तकाचे पारायण केल्यामुळे चित्रपट बघणार नाही आणी तसाही हा चित्रपट लहान मुलांसाठी आहे तो लहान होऊनच बघावा.

In reply to by कर्नलतपस्वी

आई ऐवजी शामची आई वाचावे. माझ्या माहितीनुसार या कथानकावर एक प्रहसन पण लिहीले आहे. बबन कडू आणी विशाखा सुभेदार यांनी उत्तम अभिनय केला आहे

Bhakti 27/11/2023 - 20:34
हा हा! प्रामाणिक लिहिले आहे. माझं मन म्हणत होतं..उठ जा लेकीबरोबर हा सिनेमा बघ!तर माझा मेंदू म्हणत होतं..काय गरज नाही थिअटरात जायची ..बोर होशील उगाच! मग मन म्हणालं-कशी आई आहेस,काय संस्कार वगैरे देणार की नाही पुढच्या पिढीला...मेंदू म्हणाला आम्ही ओटीटीवर पाहू नंतर नाहीतर जूना सिनेमा पाहू परत! मी मेंदूचं ऐकलं :)

मागच्या शनिवारी चित्रपट पाहिला . साधारणतः चित्रपट पाहिल्याच्या २-३ दिवसात मी परीक्षण टाकतो ( टंकायची इच्छा असली तर ) पण यावेळेस एक आठवडा गेला. असो . ( वर्ल्ड कप हरल्याचा धक्का आणखी काय) श्यामची आई नावात वजन असले तरी मापात नाही. ह्या एका वाक्यात परीक्षण संपवू शकलो असतो पण वादंग टाळण्यासाठी पुढील ओळी खरडतोय. संपूर्ण चित्रपट कृष्ण धवल रंगात आहे परंतु पहिल्या कृष्ण धवल चित्रपटाची सर नाही."श्यामची आई " हे पुस्तक संस्कारक्षम वयात वाचावयास दिले जाते आणि प्रेक्षक वर्ग सुद्धा त्याच याच अपेक्षेने चित्रपट पाहावयास जाणार असतील तर हाती निराशा लागेल.

जिथे सागरा धरणी मिळते

वझेबुवा ·

किनाऱ्यावर आल्यावर 'जिथे सागरा धरणी मिळते..' इथपासून मनात सुरु झालेला बॅकग्राऊंड स्कोर आता 'खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता..' इथवर आला होता. कवी ग्रेस यांच्या कवीता प्रमाणे दुर्बोध. काहीतरी लिहायचं राहीलयं असे वाटते.

चौथा कोनाडा 25/11/2023 - 22:16
मुक्तक आवडले.
तेजोनिधीने पाण्याच्या पृष्ठभागावर सोनेरी रेखा काढली होती आणि वाळूच्या खळग्यांमध्ये साचलेल्या ओहोटीच्या पाण्यात अनेक केशरी दिवे लावले होते.
खुप छान !
'जिथे सागरा धरणी मिळते..' इथपासून मनात सुरु झालेला बॅकग्राऊंड स्कोर आता 'खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता..' इथवर आला होता.
कंदील का आला असेल ही उत्सुकता दाटून आली ! ते कंदीलाचे मुक्तक पण लिहा एकदा. पुलेशू

जिथे सागरा धरणी मिळते मावळतीच्या सूर्याकडे पाहत पाहत पावले पडत होती. ओहोटी असल्याने चालायला भरपूर वाव होता. जसजसा पुढे जात होतो, तसतशी मागच्या लाऊडस्पिकर वर चालू असलेली क्रिकेट मॅचची कॉमेंटरी क्षीण होत होती. त्या तेजोनिधीने पाण्याच्या पृष्ठभागावर सोनेरी रेखा काढली होती आणि वाळूच्या खळग्यांमध्ये साचलेल्या ओहोटीच्या पाण्यात अनेक केशरी दिवे लावले होते. चालता चालता त्या पाण्यातील सूर्याच्या प्रखर प्रतिबिंबावर नजर रोखली गेली. आकाशातला सूर्य जणू जाता जाता वाळूवर रेंगाळत होता.

पॅरिसमधील शिवचरित्र

मनो ·

मनो 12/11/2023 - 01:43
मूळ बखरीतील हा परिच्छेद छत्रपती शिवाजी महाराज कसे होते ते सांगतो : "त्यास, मोगलांनी हिंदुधर्माचा उच्छेद करून म्लेंछमय करावें या दुर्वृत्तीस प्रवर्तक झाला. तें देवास न साहे. यवनाचें पारपत्य करून हिंदुधर्म स्थापावा, याजकरितां शिवाजी महाराज यांजवर श्रीची कृपानुग्रह होऊन- त्या कालीं साता वर्षांचे होते- वय लहान होत्साता तेव्हांपासून मोठमोठीं अमानुषीं कर्में करून राज्य मेळविलें. म्लेंच्छादि शत्रू पादाक्रांत करून धर्मक्षेत्रादि महास्थानें, तीर्थाचीं व देवाचीं, स्थापना, पूजा ब्राह्मणापासून ब्रह्मकर्मे यागादि करवून श्रीरामेश्वरापासून गोदातीरपर्यंत धर्मस्थापना केली. शयाद्रि पर्वताचे किल्ले व समुद्रांतील बेटें, जंजिरे बांधून, फौज व पागा व हशम चाकर ठेऊन राज्यवृध्दी केली. मोठमोठे बलाढय तांब्र विजापूराहून व दिल्लीहून चालून आले. त्यांचा पराभव करून महाराष्ट्र राज्याची अभिवृध्दी पाववून निर्वैर केलें. त्या कालीं चित्तांत आणिलें कीं सर्व शत्रू पराभव झाले. आपल्या जवळ द्रव्यसंग्रह व मुलुख, किल्ले, कोट, फौज, पागा व पदाती व सरकारकून व सरदार पराक्रमी राज्य संरक्षणास असे आहेत. याजउपरि आपण सिंहासनाधीश्वरत्व करावें. हा संकल्प करून चाळीस वर्षांचें वय झाल्यानंतरीं किल्ले रायगडावर शालिवाहन शके १५९५ आनंदनामसंवत्सरीं ज्येष्ठ शुध्द त्रयोदशीस यथाशास्त्रोक्त सर्वांसमोर थोर थोर शिष्ट ब्राह्मण आणून राज्याभिषेक करून सिंहासनाधीश होते झाले. अष्टप्रधान ज्यास जें पद योग्य, स्वामीसेवेचे ठायीं तत्पर, कार्यकर्ते, पाहून योजिले. सिंहासनारूढ झाल्यावर सात वर्षेंपर्यंत धर्मरीतीनें राज्यपालन करिते झाले. " "मोगलांनी हिंदुधर्माचा उच्छेद करून म्लेंछमय करावें या दुर्वृत्तीस प्रवर्तक झाला. तें देवास न साहे. यवनाचें पारपत्य करून हिंदुधर्म स्थापावा, याजकरितां शिवाजी महाराज यांजवर श्रीची कृपानुग्रह होऊन" ही वाक्ये फार महत्त्वाची आहेत. यातून महाराज कसे होते याबद्दल पेशवेकालीन लोकसमज कशी होती ते आपल्याला जाणवते.

कंजूस 12/11/2023 - 05:17
संतोष. तर यापुढे कुणी ना कुणी या कागदपत्रांचा मागोवा घेणे, अभ्यासणे गरजेचे आहे. मोडी लिपीसाठी मोडीदर्पण या नियतकालिकेचे दरवर्षी चार अंक निघतात. मागच्या दिवाळीचा अंक चांगला होता. पहिले सहा लेख मोडी लिपीमध्ये आणि त्यांचेच मराठीमध्ये लिप्यंतरही दिले होते. शिवाय मोडी बाराखडी व काही शब्दही होते. एकूण मोडी शिकणाऱ्यांना फारच उपयुक्त अंक होता. अंकात इतर लेख कोकणातील पर्यटनाविषयी मराठी बाळबोधीत होते. वाघनखे हे एक हत्यार म्हणून राजस्थानमधील महालांत क्वचित दिसते. Everyman's Searies या पर्यटनविषयक प्रकाशन करणाऱ्या प्रकाशकाने भारतात फक्त एकच पुस्तक काढले होते ते राजस्थानचे. ( ISBN 1-85715-887-3 ) भरपूर फोटो ,नकाशे आणि समग्र माहिती देणारे एवढे रंगीत पुस्तक अजून कुणाचे नसेल. तर यामध्ये वाघनखे आहेत.(Weaponry,page 200). पाच नखे एकाच बाजूला आहेत. पहिले बोट आणि करंगळीत सरकवण्यासाठी कड्या आहेत.

मराठी बखर वाचली. अतिशय छान लिहिलं आहे. वाचताना अतिशोयक्ती हा बखरींचा गुणधर्म टाळल्याचे जाणवते. आठ वर्षांच्या मुलास आपला इतिहास व्यवस्थित समजेल, याची काळजी घेतली आहे. म्हणजे मालोजी राजे - शहाजी राजे - शिवाजी महाराज - संभाजी महाराज - राजाराम महाराज - शाहू महाराज इथपर्यंत चढत्या क्रमाने विस्ताराने लिहिले आहे. (लेखन काळाच्या दृष्टीने) अलीकडील काळ (बाळाजी विश्वनाथ यांना पेशवाई दिल्यापासून अधिक विस्ताराने लिहिले आहे. संताजी घोरपडे यांचा अंत कसा झाला, हे पहिल्यांदा कळले. बाळाजी नानांनी कान्होजी आंग्रे यांना कसे वळवून घेतले, किल्ले सोडवून घेतले, हे देखील रोचक.

देशात परत आल्यास वाचक,अभ्यासक जरूर वाढतील.संदर्भ शोधकार्यात मदतगार ठरतील यात शंकाच नाही. महाराष्ट्राचा इतीहास मराठी नेत्यांनी पुढाकार घेऊन आणला पाहीजे.

मनो 13/11/2023 - 07:31
ता. क. : Rajendra Dhume यांचे खूप आभार, त्यांनी बाबासाहेबांचा मूळ व्हिडिओ उपलग्ध करुन दिला. बाबासाहेबांच्या शब्दांमध्ये या कागदांचे महत्व इथे ऐका. https://youtu.be/AcngiBh_vXo?feature=shared

गेले काही महिने इंग्लंडमधील तथाकथित वाघनखे चर्चेत आहेत. ती खरी की खोटी हा मुद्दा सोडला, तरी महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित अनेक अज्ञात वस्तू, हस्तलिखिते परदेशात आहेत, ही गोष्ट मात्र १००% सत्य आहे. अश्याच एका हस्तलिखिताचा हा शोध-वृत्तांत पुढे देतो आहे. या शोधाची सुरुवात झाली ती पुण्यात. दोन वर्षांपूर्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा २९ जुलै २०२१ रोजी १०० वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्त बाबासाहेबांच्या घरी राज ठाकरे इत्यादी अनेक मान्यवर येऊन गेले. शिवचरित्रकार श्री. गजानन भास्कर मेहेंदळे आणि भारत संशोधक मंडळाच्या कार्यकारिणीचे सभासद बाबासाहेबांना भेटले.

दिवाळी विशेष - ‘सागरी पक्ष्यां’चं संग्रहालय

पराग१२२६३ ·
गोवा जवळ असूनही जाऊ-जाऊ करत राहतच होतं. गोव्यात नौदलाच्या हवाई शाखेचं संग्रहालय असल्याचं बऱ्याच वर्षांपूर्वी वाचनात आलं होतं. त्यातच नौदलाच्या हवाई शाखेबद्दल आणि त्यातही विमानवाहू जहाजांबद्दल आकर्षण असल्यामुळं ते संग्रहालय पाहावं अशी खूप इच्छा होती.

एक तरी शिवी अनुभवावी..

आजी ·

Trump 29/10/2023 - 13:50
उत्तम लेख. शिव्या दिल्याने भावनांचा निचारा होतो हे मान्य. श्री बिपिन कार्यकर्ते यांनी खोबार (?) मालिकेत तत्सम विषयावर लिहिले होते. --
त्याहून वाईट शिव्या म्हणजे आई बहिणीवरुन दिलेल्या शिव्या. आणि अगदी ऐकवणार नाहीत अशा लैंगिक अवयवांवरुन दिलेल्या शारीरिक संबंधावरुन दिलेल्या, अश्लील शिव्या. शिव्या देताना समोरच्याच्या मर्मावर आघात केला जातो. आई हा माणसाचा "हळवा कोपरा "असतो. आईबद्दल माणसाच्या मनात अपार प्रेम,माया,आदर असतो. ती त्याचं मर्मस्थान असते. त्या मर्मावर आघात झाला की माणूस विद्ध होतो. कोलमडून पडतो. ती शिवी त्याला कमालीची झोंबते. तोच तर शिवी देणाऱ्याचा हेतू असतो. म्हणून मग आईवरुन शिवी दिली जाते.
हे पुर्णतः खरे नाही. शिवी काय, त्याबरोबरच ती कोणी दिली आणि कोणाला दिले हे सुध्दा महत्वाचे आहे. उदाहरणार्थ १. तथाकथीत सवर्णाने दलिताला शिवी दिली तर तो गुन्हा ठरतो. पण तीच शिवी दलिताने दलिताला दिली तर तो गुन्हा ठरत नाही. २. गोर्या युरोपियनला नाझी म्हणुन म्ह्टले ते आईवरील शिवीपेक्षा वाईट समजले जाते. ३. श्री हरभजन सिंग यांनी श्री अ‍ॅन्ड्रु साईमंड यांना माकड म्हटल्यामुळे गदारोळ निर्माण झाला होता. श्री सिंग यांनी पंजाबीमधुन आईला शिवी दिली असे सांगुन स्वत:ची सुटका करुन घेतली. https://www.theguardian.com/sport/2008/jan/30/cricket

आजी, नेहमीप्रमाणेच वेगळा विषय. शिव्यांबद्दल मागे कोणी एक मिपाकर प्रचेतस नामक आयडीने वीरगळावर आईवरुन दिलेला शाप शिव्या शिळा आठवण झाली. आईवरुन शिव्या दिल्या की त्या थेट पोचतात, आई हा प्रत्येकाचा हळवा कोपरा. शिवी दे, पण आईवर नाय द्यायची. आणि दिली की त्यावरुन भांडण तर, अनेकांची होतात. लहानपणी कितीतरी शिव्या दिल्या आणि खाल्ल्या आहेत. शिव्या जशा द्यायच्या असतात, तशा खायच्याही असतात, हे समजूनच शिवीगाळ करावी लागते. गाडी चालवतांना चूकीच्या साईडने कोणीतरी येतो तेव्हा, कोणीतरी आडवा तिडवा येतो तेव्हा, कोणीतरी रस्त्यात गाडी उभी करुन गप्पा मारत असतो तेव्हा हलक्या फुलक्या शिव्या येतातच. बावळट, येडपट, अडाणी असा स्तर आताशी उंचावला आहे, हल्ली इतकाच तो काय फरक झालेला असतो. पण, तेही फार कमी. वयपरत्वे राग व्यक्त होण्याचं प्रमाण होत जात असावं, मन की बात मनमे. असं सगळं. मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार, संकेत हे अ.द.मराठे यांच्या पुस्तकात तर, अनेक शिव्यांची तपशीलवार ओळख होते. आजी लिहिते राहा. तुम्ही काही तरी, वेगळं लिहिता म्हणून निवांत वाचून प्रतिसाद लिहावा लागतो. तेव्हा लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टर्मीनेटर 31/10/2023 - 21:03
आईवरुन शिव्या दिल्या की त्या थेट पोचतात, आई हा प्रत्येकाचा हळवा कोपरा. शिवी दे, पण आईवर नाय द्यायची. आणि दिली की त्यावरुन भांडण तर, अनेकांची होतात.
+१ भांडणं मारामाऱ्या पर्यंत ठीक आहे पण वेळप्रसंगी खुनही केले जातात. असो, लेख आवडला हो आजी 👍 (एकेकाळी भरपूर अर्वाच्य शिव्या देणारा) टर्मीनेटर 😀

सुबोध खरे 30/10/2023 - 10:02
शिवी त्याच्या दर्जावरून हलकी किंवा भारी समजू नये. वाहत्या रस्त्याच्या मध्यभागी कानाला भ्रमणध्वनी लावून माझ्या मोटारसायकलच्या पुढे अचानक आलेल्या एका तिशीच्या आसपास वय असलेल्या विशाल महिलेला मी शांत शब्दात, "आजी, आता वय झालंय तुमचं! बघून रस्ता ओलांडायला पाहजे!" असे म्हटल्यावर संतापाने तिचं तोंडातून शब्द फुटेनासा झाला होता. मोटार सायकल पुढे गेल्यावर मागून आवाज ऐकू आला, "मेल्या, आजी कुणाला म्हणतोस?"

चौथा कोनाडा 31/10/2023 - 17:32
मस्त माहितीपुर्ण लेख !
म्हांला आश्चर्य वाटेल पण "अरेच्या"हा शब्दही एका लांबलचक शिवीचा अवशिष्ट -शिल्लक राहिलेला-तुकडा आहे.
मला नाही वाटत असं असेल म्हणून ! या विषयी आणखी तपशिलात जाऊन (सभ्य भाषेत) कोण सांगु शकेल ?

साहना 01/11/2023 - 01:52
उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून शिवी हा एक महत्वाचा "हिंसक" भाग आहे. ह्यावर भरपूर रिसर्च झाला आहे. स्टीवन पिंकर महोदयांनी ह्यावर विपुल लेखन तसेच व्याख्याने दिली आहेत. जरूर ऐका. काही शेकडा वर्षे मागे जा. तुम्ही एक पुरुष आहात आणि कुठेतरी दुसऱ्या पुरुषा बरोबर तुमचा वाद होतो. आता, तुम्ही निमूट पणे हार मान्य केली तर तुम्ही बीटा आणि तो अल्फा सिद्ध होतो. त्यामुळे, तुम्हाला त्या वादांत हार मानणे तुमच्या फायद्याचे नाही. इतर लोक तुमच्याकडे बारकाईने पाहत आहेत. आता तुमच्याकडे एक उपाय उरतो तो म्हणजे ठोसा मारणे. पण एकदा तुम्ही ठोसा मारला तर दुसरी व्यक्ती लाथ मारेल, मग तुम्हाला शस्त्र काढावे लागेल. मग तुमच्यापैकी एक मृत्युमुखी पडेल. ह्यावर सोपा उपाय म्हणजे फक्त शिवी द्या. शिवी हा एक शाब्दिक ठोसा आहे. त्यावर दुसरी व्यक्ती आणखीन शिवी देईल त्यावर तुम्ही आणखीन शिव्या देऊ शकता. जो पर्यंत कुणी ठोसा मारत नाही तो पर्यंत फक्त शिव्यांचे ठोसे मारणे आपल्या हिताचे आहेत. इथे तुम्ही "प्रतिकार" केला हे सुद्धा दिसते आणि त्यांत escalation ची रिस्क सुद्धा नाही. त्यामुळे योग्य प्रमाणात शिव्या देणे हे किमान पुरुष मंडळींच्या हिताचे आहे. लहान मुलांना शिव्या देऊ नये असे संस्कार दिले तरी त्याच वेळी योग्य परिस्थितीत शिव्या त्यांनी दिल्याचं पाहिजेत नाहीतर अनेकदा "ठोसा" हा एकमेव उपाय त्यांच्या हाती राहतो जो चांगला नाही.

In reply to by साहना

>>> काही शेकडा वर्षे मागे जा. आताही असेच असते कमी जास्त प्रमाणात बातम्या वाचल्या बघितल्या की लक्षात येते फार फरक नाही. >>>तुम्ही एक पुरुष आहात आणि कुठेतरी दुसऱ्या पुरुषा बरोबर तुमचा वाद होतो. आता, तुम्ही निमूट पणे हार मान्य केली तर तुम्ही बीटा आणि तो अल्फा सिद्ध होतो. त्यामुळे, तुम्हाला त्या वादांत हार मानणे तुमच्या फायद्याचे नाही. इतर लोक तुमच्याकडे बारकाईने पाहत आहेत. आता तुमच्याकडे एक उपाय उरतो तो म्हणजे ठोसा मारणे. पण एकदा तुम्ही ठोसा मारला तर दुसरी व्यक्ती लाथ मारेल, मग तुम्हाला शस्त्र काढावे लागेल. मग तुमच्यापैकी एक मृत्युमुखी पडेल. >>>खरंय, किरकोळ गोष्टी जीवावर बेततात. -दिलीप बिरुटे

साहना 01/11/2023 - 02:01
विविध शब्द वापरून मानवी मनावर प्रभाव पाडला जाऊ शकतो. लहान मुलाशी बोलताना "शी" तीच गुरांच्या बाबतीत शेण होते, नगर व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून सांडपाणी तर वैद्यकीय दृष्टिकोनातून मल, फॉर्मल भाषेंत विष्ठा आणि शिवीच्या बाबतीक गू. एकच वस्तू पण शब्द वापरा प्रमाणे भावना बदलतात.

सर्वसाक्षी 02/11/2023 - 22:11
ज्या मित्राचा फोन आला असता प्रतिक्षिप्त क्रियेने आपल्या तोंडुन हॅलो ऐवजी कचकचीत शिवी उत्तरादाखल जाते असा एकही मित्र नसलेला मनुष्य खरोखर हतभागी! संभाषणाची सुरुवात आणि अखेर जर शिवीने होत असेल तर ते जिवलग मित्र, बाकी सगळे स्नेही, सवंगडी, परिचीत वगैरे.. खरंच सांगतो, अशा एका मित्राचा एकदा सकाळी सकाळी फोन आला. उचलला तर काय? एकदम सोज्वळ भाषा! मी कानाला लावलेला फोन समोर धरला आणि खात्री करुन तो फोन त्याचाच आहे ना याचे खात्री करुन घेतली. मग हळूच विचारलं अरे कुठे बाहेर आहेस का? आजूबाजूला कुणी पाहुणे वगैरे आहेत का? गाडी चालवताना अशा मित्रवर्यांचे फोन आले तर कॉल उचलताक्षणी समोरच्याला बोलाची संधी न देता ओरडून सांगावं लागतं की गाडी चालवत आहे, हपीसला निघालो आहे आणि बरोबर काही सत्पुरुष आणि कुलीन स्त्रिया आहेत. तर शिव्यांची मनमोकळी देवाणघेवाण हे घट्ट मैत्रीचं लक्षण आहे जिथे कुठल्याही औपचारिकतेला थारा नाही. अशा मित्रांशी बोलल्यावर खूप बरं वाटतं. विशेष्तः दिवसभर औपचारिक, सावध, शिष्टसंमत बोलून झाल्यावर रात्री अशा मित्राचा फोन ही संजीवनी असते. माझ्या अशा एका मित्राला करोनाकाळात एकाएकी जबरदस्त मानसिक दडपण आलं. ठणठणीत असणार्‍या जीवाला फोनवर बोलताना धाप लागू लागली. आपल्या मुलीची प्रकृती नाजूक आहे, ती चार चौघांसारखी नाही; आई नव्वदीत आहे, आणि यापैकी कुणाला करोना झाला तर? या चिंतेने तो ग्रासला आणि असा विपरीत परिणाम दिसू लागला . एका मित्राची आई गेली तेव्हा तो आणि त्याची पत्नी तिथे भेटले आणि ही सगळी हकिगत समजली. मी त्याला सांगितलं की त्याला काही झालेलं नाही तर भितीने घरात बसून असल्याने तो मित्रांच्या प्रेमळ संवादांना मुकतोय आणि यावर सोपा उपाय म्हणजे आपण किमान दिवसाआड तरी रात्री फोनवर बोलू, मनसोक्त शिव्या घालू (आतल्या खोलीत बसून) जरा रोजचे शब्द कानी पडले की तब्येत सुधारेल.

प्रचेतस 03/11/2023 - 15:15
ह्या संदर्भात रा. चिं. ढेरे यांनी आपल्या "शिवी आणि समाजेतिहास" ह्या निबंधात ज्ञानेश्वरांच्या 'खर दृष्टांताचे उदाहरण दिले आहे. ते म्हणतात सकळांना आपल्या करुणेच्या मायेत घेणार्‍या, सकळांचे इष्ट चिंतिणार्‍या ज्ञानदेवांनीही आपल्याला सौम्यसा धक्का दिलेला दिसतो. खरी टेंकों नेदी उडे । लातौनि फोडी नाकाडें । तऱ्ही जेवीं न काढे । माघौता खरु ॥ ७०६ ॥ तैसा जो विषयांलागीं । उडी घाली जळतिये आगीं । व्यसनाची आंगीं । लेणीं मिरवी ॥ ७०७ ॥ गाढवीण गाढवाला स्पर्श करु न देता उसळून मागील लाथेने त्याचे नाकाड फोडते तरिही ज्याप्रमाणे गाढव मागे हटत नाही त्याप्रमाणे विषयासक्त पुरुष जळत्या आगीसारख्या स्त्रीदेहाचा उपभोग घेण्यास सरसावतो आणि ही व्यसनी अलंकारासारखी मिरवतो. हा खर दृष्टांत म्हणजे ज्ञानदेवांनी विषयलंपटांना दिलेली एक तिखट शिवीच आहे असे म्हणावे लागेल.

मदनबाण 05/11/2023 - 11:27
कित्येक शिव्या आपल्या नकळत आपण देत असतो. तुम्हांला आश्चर्य वाटेल पण "अरेच्या"हा शब्दही एका लांबलचक शिवीचा अवशिष्ट -शिल्लक राहिलेला-तुकडा आहे. हे माझ्यासाठी नविन आहे ! पूर्ण शिवी काय असावी ? असं विचार करुन देखील काही सुचलं देखील नाही ! ज्ञान वर्धन करावे ! बाकी या विषयावर अमुल्य रत्न मिपावर उपलब्ध आहेच :- शिव्यांना शिवी देऊ नका

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Thaai Kelavi - Official Video Song | Thiruchitrambalam | Dhanush | Anirudh | Sun Pictures

शशिकांत ओक 08/11/2023 - 11:09
जिव्हासफाई एक अभियान कदाचित काहींना आठवेल... काही काळापूर्वी या धाग्यावर २१ हजारहून अधिक टिचक्या पडल्या होत्या. कधी सकारण तर कधी अभावितपणे भाषेला धार आणायला जिव्हा लवलवते. तो जिव्हा'ळ्याचा विषय बनतो. कळतं पण वळतं नाही असेही होते! मग उपाय काय?

आजी 08/11/2023 - 14:37
माझ्या या लेखावर भरपूर प्रतिसाद आपण दिलेत. वाचनेही खूप जणांनी केली. आपणा सर्वांचे मी मन:पूर्वक आभार मानते. आणि एक सांगायचे झाले तर "अरेच्या"प्रमाणेच"अरे"हा सुद्धा शिवीचा एक तुकडा आहे.बाकी ठीक.असाच लोभ असावा.

धर्मेंद्रचे दोन्ही हात वरती लोखंडी चौकटीला बांधलेले. त्याच्या मानेला,ओठाला रक्त. त्याच्यावर गन रोखलेली. गब्बर बसंतीला म्हणतो,"नाचो,जबतक तेरे पाॅंव चलेंगे ,इसकी साॅंस चलेगी!" आणि विरु ऊर्फ धरमिंदर ओरडतो,"बसंती,इन कुत्तोंके सामने मत नाचना!"तरी बसंती त्याचे प्राण वाचवायसाठी नाचते. शोले मधला हा सीन सर्वांना तोंडपाठ आहे. (शोले न पाहिलेला माणूस भारतात नाही. अशी वदंता आहे.) असा एकही सिनेमा नसेल ज्यात धर्मेंद्रने "कुत्ते,कमीने" ही शिवी दिली नसेल. सिनेमातला प्रत्येक हिरो,हिराॅईन,व्हिलन शिव्या देतोच. एवढंच काय, जगात कुठेही असा माणूसच सापडणार नाही,ज्यानं आयुष्यात कधी कुणाला शिवीच दिली नाही.

पुन्हा एकदा म्युचुअल फंड्स

राजेंद्र मेहेंदळे ·

वामन देशमुख 27/10/2023 - 16:40
या फंडांची सूची तयार करताना "मागच्या तीन वर्षांतील ४०% हुन अधिक परतावा" हा एकाच निकष ठेवला होता का? मी म्युफंतला तज्ज्ञ नाही; तज्ज्ञांचे प्रतिसाद वाचायला आवडतील. --- स्वगत: बऱ्याच दिवसांनी मिपावर अर्थपूर्ण धागा आलाय का?

स्नेहा.K. 27/10/2023 - 19:44
२०२० च्या मध्ये जवळपास सगळ्या शेअर्सच्या किंमती(आणि पर्यायाने म्युचुअल फंडच्या एनएव्ही) ३०-५०% कमी झाल्या होत्या. त्यामुळे त्यानंतर तीन वर्षात ४०% रिटर्न्स ही तशी सामान्य गोष्ट झाली. २०२० ते २०२२ या कालावधीतील आकडे रिटर्न्सचा अभ्यास करताना वगळलेले चांगले. एक वर्ष, तीन वर्ष, पाच वर्षे, दहा वर्षे अशा वेगवेगळ्या कालावधीतील रिटर्न्स आणि सारख्या प्रकारच्या फंड्सची कामगिरी अशी तुलना केल्यास जास्त उपयोगी माहिती मिळू शकते.

यादी नीट पहिली असता अनेक फंड हे इंडेक्सवर आधारित आहे . निफ्टी ने चांगलीच भरारी घेतली आहे . त्यामुळे इंडेक्स फंडात गुंतवणूक करावी असे तर्क सांगतो. व्यक्तिशः माझी पण इंडेक्स फंडात जास्त गुंतवणूक नाही . बाकीचे फंड सेक्टरल आहेत ,एक दोन फंडाचे नावच पहिल्यांदा ऐकले आहे . यातील टायगर आणि इंडिया अँपॉर्च्युनिटी फंड प्रसिद्ध आहेत . बाकी मी सुद्धा गुंतवणूक तज्ज्ञ नाही, कार्यालयीन गप्पात , महामुंबई वा नवे ठाणे येथे जमिनीचा तुकडा खरेदीवर काही चर्चा झाली असल्यास माहीती जाणण्यास उत्सुक रच्याकने - घर खरेदीवर मध्ये एक धागा फिरत होता , अंतिम निर्णय काय झाला काही कळले नाही अतिरिक्त माहिती - ICICI चा फ्रिडम sip चांगली scheme आहे - ३०-४० वयोगट ( हे व्यक्तिगत मत आहे )

In reply to by विअर्ड विक्स

रच्याकने - घर खरेदीवर मध्ये एक धागा फिरत होता , अंतिम निर्णय काय झाला काही कळले नाही सर्व चर्चा अंती मी निर्णय घेतलाय की रिसेल फ्लॅट सहकारनगर भागात घ्यावा, पण किमती तगड्या आहेत. वन बीएचको जूने फ्लॅट ६५० ते ७०० स्क्वेअर फुटांचे मोठे आहेत. पण किंमत ६० ते ७० लाखा दरम्यान. मध्येच हुक्की येते की पुनावळे भागात नविन बांधकामे चालू आहेत तिथे ६५० -७५० स्क्वेअर फूटाचे ५० ते ५५ लाखात ऊपलब्ध आहेत ते घ्यावेत. मॅजीकब्रीक्स वर रोज तेच पहातोय.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कंजूस 28/10/2023 - 18:49
सहमत. घराचं आणि गुंतवणूकीचं गणित वेगळं असतं. घर हे प्राधान्याचा येतं. त्यातून सुटका झाली की मग गुंतवणूक. माझ्या मते कामाच्या जागी जाणे किंवा इतर बाजार, शाळा,रेल्वे स्टेशन,बस डेपो यांचा विचार केल्यास तो भाग स्थिर झालेला असतो. तिथल्या किंमती वरचढ असल्याने लहान घरच मिळते. पण दूरगामी हिशोबाने ते स्वस्त पडते. तेच प्रथम घ्यावे. मग दूर जाऊन मोठ्या घराचा विचार करावा. सामान्य माणसाच्या कुटुंबातील लहानथोर सर्वांनाच ते घर सोयीचं पडतं. दिवसेंदिवस ओटो भाडे, पेट्रोल दर वाढत जाणार (ट्राफिक जामही अडथळा) आणि दूरचे घर गैरसोयीचे होते. विकास झालेल्या जवळच्या भागात कमी किंमतीत पण कमी एअरियाचं पहिले घर घ्यावे.

सुबोध खरे 28/10/2023 - 10:33
सर्व म्युच्युअल फंडाच्या जाहिरातीत जेंव्हा बाजार चढत असतो तेंव्हापासूनच्या परताव्याचे आकडे असतात. २०२० मध्ये बाजार साफ कोसळला होता तेंव्हा फंडाच्या जाहिराती २०१९ पर्यंतचे आकडे दाखवत होत्या आणि २०२१ मध्ये गेल्या एक वर्षातील परतावा दाखवत होत्या. २०२२ मध्ये दोन वर्षाचा आणि २०२३ मध्ये आता गेल्या तीन वर्षाचा परतावा दाखवत आहेत. उदा वरील तक्त्यातील quant fund चा परतावा ३ वर्षात ४५% आहे पण ५ वर्षात ३० % आणि १० वर्षात १८ % आहे बाजार उच्चीत असतो तेंव्हा पैसे मुदतठेवीत ठेवून सहा महिने ते एक वर्ष शांत बसावे आणि बाजार जेंव्हा जोरदार पडतो तेंव्हा उत्तम समभागात पैसे गुंतवावे यातून मिळणारा परतावा सर्वात चांगला असतोअसा माझा गेल्या १५ वर्षाचा अनुभव सांगतो. तरुण आणि नवीन गुंतवणूकदारांमध्ये एवढा धीर नसतो. त्यामुळे खिशात चार पैसे आले कि लगेचच कोणत्यातरी जाहिरातीला भुलून त्यात पैसे गुंतवले जातात आणि मग जेवढा अपेक्षित असतो तेवढा परतावा मिळत नाही. सिंहाच्या गुहेत आत जाणारी पावले दिसतत् पण परत येणारी पावले दिसत नाहीत तद्वत बाजारात नफा मिळवणारे उच्चरवाने सांगताना दिसतात कि मी किती हुशार आहे आणि बाजारात नुकसान झालेले लोक आपल्याला "आपण मूर्ख आहोत" असे लोक समजतील या भीतीने काही सांगत नाहीत. म्युच्युअल फंडात पैसे गुंतवले तर त्यात एंट्री फी, एक्झिट फी एक्सपेन्स रेशो आणि वर्षाची फी एकंदर किती टक्के जाते हे कुठेही स्पष्ट लिहिलेले आढळत नाही. वर्षाची फी फंडातील रकमेच्या किती टक्के (आणि फंडातील रक्कम वर्षाच्या सुरुवातीला असलेली कि सर्वात जास्त रक्कम किंवा वर्षाअखेरीसची) हे सुद्धा कुठेही सापडत नाही. त्यामुळे वर सन्गितलेले परताव्याचे आकडे आणि आपल्याला मिळणार प्रत्यक्ष परतावा किती हे काही केल्या समजत नाही. अर्थात हे माझे अज्ञान असावे. पण कोणी तज्ज्ञाने मला याबद्दल माहिती दिल्यास मी उपकृत होईन.

In reply to by सुबोध खरे

बऱ्याच अंशी सहमत आहे . पण सर्वजण शेअर बाजारात प्रत्यक्ष गुंवणूक करू शकत नाही , त्यामुळे म्युच्युअल फंड हा पर्याय रास्त वाटतो सामान्यजनांना

अहिरावण 28/10/2023 - 10:54
म्युच्युअल फंड ही दिर्घ कालावधीची गुंतवणूक मानली जाते. किमान दहा वर्षांचा आढावा (२० वर्षे सर्वोत्तम) घेतल्यावर नक्की कोण किति पाण्यात आहे ते कळेल. फंडांच्या जाहिरातीला बळी पडू नका... तुमच्या गरजा आणि ध्येये निश्चित करा.

In reply to by अहिरावण

म्युच्युअल फंड कॅटेगरी मध्ये गेल्या ५-७ वर्षात बरेच बदल झालेत त्यामुळे एवढा विदा मिळत नाही ( का ते उपलब्ध होऊ देत नाही ) . फंडाची थीम व नाव बदलले जाते व अजून काही त्यामुळे एजन्ट पेक्षा गुंतवणूक सल्ल्लागार गाठा पण तगडी फी मोजायची तयारी ठेवा.

सीलेक्ट केलेला फिल्टर चांगला आहे पण कोविड सारखी अपवादात्मक परिस्थितीत १२% दसादशे लागू होऊ शकत नाही . फिल्टर निफ्टी च्या बेंचमार्कवर तपासायला लागेल

मी स्वतः भांडवली बाजारात गुंतवणूकदार आहे. मी स्वतः प्रत्यक्ष समभागात गुंतवणूक करतो. माझी लक्षणीय गुंतवणूक आहे. (स्किन इन द गेम आहे) म्हणुन खालील मते मी माझ्या स्पेसिफिक ज्ञान व अनुभव यावर देत आहेत. एच डी एफ सी, यु नी लिव्हर, टी सी एस, ऐशियान पेंट, पिड लाईट, कोटक बँक, पी आय इंड, पेज ईंड या अश्या दर्जेदार समभागात गुंतवणूक करा, हे सांगायला तुम्हाला म्यु फं कशाला पाहिजे... बरं नोकरी व्यवसाय संसार या अश्या गोष्टीतील व्यापामुळे जर गुंतवणूक अभ्यास / कृती शक्य होत नसेल तर इंडेक्स फंड/ इंडेक्स ई टी एफ मध्ये करा ना.. समोरचा फक्त "म्युच्युअल फंड" ब्ला ब्लाह ब्ला बोलला.. की आपण लगेचच "सही है" अशी नंदी बैला सारखी मान डॉलवायलाच हवी का ? "म्युच्युअल फंड" बाले कोट्यवधीच्या झैराती , व्यवस्थापन फिया वसूल करतात, त्या गुंतवणूकदार कडूनच... जागो ग्राहक जागो.

अमर विश्वास 29/10/2023 - 10:53
म्युच्युअल फंड या विषयावर एक विस्तृत लेखमाला लिहिली होती .. त्यामुले अनेक प्रतिसादांचा प्रतिवाद करीत नाही ... म्युच्युअल फंड्स हे गुतुवणुकीचे एक उत्तम साधन आहे ... (अनेक उत्तम साधनांपैकी एक). मी गेलेले १४ वर्षे SIP च्या माध्यमातून गुतूंवणूक करीत आहे .. पुढची अनेक वर्षे करीत रहाणार आहे .. गेल्या ३ वर्षातला परतावा हा थोडा जास्त (skewed) आहे कारण तीन वर्षांपूर्वीचा Covid Deep .. त्यामुळे ५ वर्षांचा परतावा तपासणे आवशयक तसेच निफ्टी चा गेल्या एक वर्षाचा परतवा फक्त ५.७५% आहे. आणि असे अनेक फंड्स आहेत ज्यांनी गेल्यावर्षी याहून अधिक परतवा दिला आहे (outperfornmed NIFTY) .. त्यामुळे फक्त इंडेक्स फांद्यांचा घ्या वगैरे सॅले ऐकताना जरूर विचार करावा बाकी म्युच्युअल फंड चार्जेस, advisor ची फी याविषयी यापूर्वी ही लिहिले आहे ... त्यामुळे परत लिहीत नाही पण जसे आपण आपल्या आरोग्यासाठी डॉक्टर कडे जातो तसे Financial health साठी advisor कडे का जाऊ नये ? पण याबद्दल अनेक गैरसमज आहेत तो लेखमालेचा वेगळा विषय होईल Keep Investing - Haapy Investing

In reply to by अमर विश्वास

स्टॉक का म्युच्युअल फंड हा नेहमीच चर्चेचा मुद्दा राहिला आहे , सोप्या शब्दात सांगायचे झाले तर वर्ल्ड कपच्या माहोलमध्ये क्रिकेटचे उदाहरण देतो , जर तुम्ही बुमरा व शामि ला फ्रंटफूटवर खेळायची धमक ठेवता तर स्टोकसमध्ये गुंतवा आणि जर तुम्हाला हार्दिक पंड्या नि शार्दूल ठाकूरला खेळायचे असेल तर म्युच्युअल फंडात गुंतवा बाकी म्युचल फंड लेखाची लिंक दिली तर बरे होईल .... माझ्या मिपा प्रवासात हि मालिका कशी हुकली हे कोडेच आहे ....

In reply to by विअर्ड विक्स

अमर विश्वास 31/10/2023 - 13:07
विअर्ड विक्स साहेब म्युच्यअल फंड लेखमालिका लिंक्स http://misalpav.com/node/48621 http://misalpav.com/node/48649 http://misalpav.com/node/48678 http://misalpav.com/node/48693

In reply to by अमर विश्वास

लेख वाचले आणि प्रतिसादही, चांगली लेखमाला आहे . आता MF स्टेटमेंट मध्ये कमिशन अँड एक्सपेन्स रेशो ची अमाऊंट येते. आता म्युच्युअल फंडाच्या कॅटेगरी जवळपास ३६ आहेत . स्मॉल,लार्ज व मिडकॅप आता जवळपास इतिहास जमा कॅटेगरी आहेत . बॅलन्सड नि हायब्रीडचा पण नवीन लोचा आहे . MF च्या पहिलटकारिणी साठी चांगली लेखमाला आहे. मी नोकरीला लागल्यापासून सिप चालू केला वर्षे २००८, त्यावेळी जागतिक मंदी होती. फायदा चांगला झाला तीन वर्षातच भली मोठी अमाऊंट घर खरेदी साठी काढली. चूक झाली , त्या चुकेतून शिकता शिकता इथपर्यंत आलोय , अजूनही फक्त MF नि equity खेळतो . क्रिप्टो , कमोडिटी ,डेरीवेटीव्ह व फ्युचर ला हात घातला नाही कारण इतकी वर्षे होऊनसुद्धा मी मार्केट चे हिंदोळे ओळखू शकत नाही. त्यामुळे MF नि गुंतवणूक लायक शेअर मध्येच गुंतवतो . रिलायन्स , L &T वा ITC ह्यासारखे शेअरसुद्धा गेली अनेक वर्षे स्थितप्रद्न्य होते त्यामुळे भाव हि भगवान है , कंपनी का मलिक नाही बघा जमले तर होऊन जाऊ दे MF पार्ट -२

In reply to by अमर विश्वास

शेवटचा काही भाग वाचायचा राहीला होता. आता पुन्हा लेखमाला सलग वाचली. बरेचसे मुद्दे कव्हर केले आहेत. काही भर घालतो- मला वाटते २०१७ पर्यंत म्युच्युअल फंडस वरती लाँग टर्म कॅपिटल गेन्स लागत नव्हते. ते सुरु झाले आहेत. दुसरे म्हणजे या वर्षी,च सेबीने बर्‍याच फंडांच्या कॅटेगरी त्यांच्या गुंतवणुकीच्या रेशोप्रमाणे बदलायला लावल्या आहेत, त्यामुळे अनेक फंडांची पुर्वीची नावे बदलली आहेत किवा मर्जिंग झाले आहे. त्यामुळे मागील विदा उपलब्ध नाही. पण महत्वाचे म्हणजे आजकाल परदेशी गुंतवणुकदार (एफ डी आय) जेव्हा मार्केटमधुन पैसे काढुन घेतात, (जसे मागच्या आठवड्यात झाले) तेव्हा आपली म्युच्युअल फंड हाऊसेस ते सावरुन धरण्याचे काम करतात आणि त्यामुळे मार्केट धाडकन आपटत नाही, ही एक चांगली गोष्ट होऊ लागली आहे.

एखादा डॉ जसा, चांगल्या शासकीय किंवा खासगी मान्यताप्राप्त (एम सी ए ) महाविद्यालयातून एम बी बी एस या आधुनिक वैद्यकीय शिक्षण घेतलेला आहे याची खातरजमा करण्याची जबाबदारी पेशंटची असते आणि एम बी बी एस डॉ लोकं त्यांची पदवी फ्रेम करून वेटिंग मध्ये लावतात (पारदर्शक व्यवहार ).. ( नॉन एम बी बी एस वाले सुद्धा नावापुढे डॉ लावतात. कि जे मिस रिप्रेझेन्टेशन आहे ) त्याच तर्काने ... तुमचे पैसे गुंतवण्याचा सल्ला देणाऱ्याचे मागच्या ३-५ वर्षाच्या नफा तोटा ताळमेळ ( पी अँड एल ) तो व्यक्ती पारदर्शकपणे , (फी देऊन ) गुंतवणूक सल्ला घेणाऱ्या ग्राहकाला त्याने सादर केला पाहिजे ... तर जरूर गुंतवणूकदाराने पैसे घेऊन सल्ला घ्यावा ... अवांतर, मी एका प्रतिथयश जिम मध्ये गेलो होतो , तिथे एक डाईट कौन्सलर होता ... तो मला बीएमआय वैगरे फंडे ऐकवून त्याचा व्हे प्रोटीन विकायला पाहत होता .. गप्पा मारता मारता त्याचं शैक्षणिक बॅकग्राउंड विचारलं तर तो डिप्लोमा सिव्हिल इंजिनेर होता .. लोकांना डायट प्लॅन करून देत होता .. डायट प्लॅनला माझा विरोध नाही , "कोण" सल्ला देतोय याची खातरजमा करण्याची जबाबदारी सर्वस्वी ग्राहकाची असते , असं मी म्हणतोय ... >> मग एव्हढा सगळं अभ्यास करणे ( महिना ५-२० हजार रु गुंतवणूक करणार्यांनी ) करायची तयारी असेल तर ,त्यांनी प्रत्यक्ष शेअर्स चा अभ्यास करा अन गुंतवणूक करा नं .. ( शेअर चा अभ्यास करायला इयत्ता ८-९-१० चे अंकगणित पुरेसे आहे, रॉकेट सायन्स नाहीये ते) आणि अभ्यास करायला वेळ नसेल तर इंडेक्स इ टी एफ ( निफ्टी इंडेक्स , आय टी इंडेक्स, बँक इंडेक्स, गोल्ड इंडेक्स, स्मालकॅप इंडेक्स ) मध्ये करा ना लंब सम्ब किंवा एसआयपी ... तुमची एकूण गुंतवणूक जर किमान ५० लक्ष रुपये (२०२३ मधले ) किंवा जास्त असेल तर तुम्ही पोर्टफोलिओ सल्लगार फी देऊन सल्ला घ्या ..

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे 30/10/2023 - 09:54
बाडीस आपण अचूक आणि नेमकं लिहिलंय मी एकच म्हणेन. सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत आपण म्युच्युअल फंडात निवेश केल्यास आपल्याला एकदा आणि दरवर्षी किती फी द्यावी लागेल असे स्पष्ट आणि स्वच्छ विवेचन कोणत्याही म्युच्युअल फंडाकडून निदान माझ्यातरी पाहण्यात आलेले नाही. म्युच्युअल फंदात मुदत ठेव किंवा तत्सम गुंतवणुकीपेक्षा जास्त फायदा मिळतो हि वस्तुस्थिती मान्य केली तरी मला त्याचा किती टक्के हिस्सा द्यावा लागतो याचा सुस्पष्ट हिशेब मिळणें आवश्यक आहे. उदा मी दहा हजार रुपये गुंतवले तर १०० रुपये एंट्री फी, १०० रुपये एक्सिट फी आणि १०० रुपये दर वर्षी ( किंवा जी काही टक्केवारी असेल) द्यावे लागतील हे तरी स्पष्ट असावे. मग मी ते विकेन तेंव्हा बाजाराच्या तेजी मंदी प्रमाणे मला परतावा मिळेल हे मान्य केले तरी मूळ किती पैसे मला फी म्हणून लागतील हे स्पष्ट असायला हवे.

अरे वा! चांगली चर्चा चालू आहे. @वामन देशमुख--होय, ४०% हाच फक्त निकष ठेवला होता. @स्नेहा के -उपलब्ध वेळेत थोडासा अभ्यास केला आहे. ३-५-१० वर्षाचे परतावे बघितले पाहिजेत ह्या मुद्द्याशी सहमत. तरीही मी म्हणेन की कोविडचा बेनिफिट ऑफ डाउट म्हणून २० टक्के कमी मोजले तरीही उरलेला २० टक्के परतावा सुद्धा काही वाईट नाही. @कंजूसकाका-सर्व प्रकारची गुंतवणूक थोडी थोडी करावी याच्याशी सहमत. @विअर्ड विक्स - बरेच टॉपचे फंड इंडेक्स पेक्षा स्मॉल कॅप आणि इन्फ्रास्ट्रक्चर फंड आहेत. पण सर्वसाधारणपणे इंडेक्स फंड नेहमीच वाढतात हा मुद्दा मान्य आहे. @आंद्रे वडापाव -मुद्दा बरोबर आहे. आय टी, फार्मा,फायनान्स ,कन्झ्युमर,मॅन्युफॅक्चरिंग अशा काही क्षेत्रातील सर्वोच्च कंपनी निवडून त्यात गुंतवणूक करणे हाही एक चांगला आणि भरवशाचा उपाय आहे. त्यासाठी म्युच्युअल फंड कंपन्यांचा सल्ला घ्यायची गरज नाही. उदा. स्टेट बँक ,एच डी एफ सी,/,इन्फोसिस,टी सी एस /ब्रिटानिया,डाबर ,नेस्ले /डॉ.रेड्डी,सॅन फार्मा/एशियन पेंट वगैरे. यातही मुदत ठेवीपेक्षा जास्तच परतावा मिळणार ह्याची खात्री असते. @डॉ. सुबोध खरे- एन्ट्री/एग्झिट लोड आणि ब्रोकरेज हे नेहमीच वादाचे मुद्दे राहीले आहेत. कोणतीच कंपनी त्याबाबत पारदर्शक माहिती देत नाही. (असल्यास मला तरी माहित नाही) चर्चा चालुद्या. त्यातुन अनेकांचा फायदा होऊ शकेल.

अमर विश्वास 30/10/2023 - 15:01
लिहायला सोपे म्हणून इंग्रजीत लिहितो आहे .. यापूर्वीही म्युच्युअल फंड्स च्या एन्ट्री / एक्सिट / कॉस्टस बद्दल लिहिले होते .. तरीही परत एकदा 1, entry & exit loads are claerly mentioned on the website for every mutual funds ... there is no secret there . you need to go & check 2. Expense ratio is clearly mentioned for every scheme. The NAV is calculated after reucing the fund management cost so you will not be paying any additional cost from your pocket 3. There is full transperency in terms of all this costs & also where the main allocation of funds is for the said scheme. I am not sure why you are creating questions ? take a scheme go on intenet & you get all the information on fund site. Try it out before creating unnecessary doubts 4. Please try it for a particular schme. If you don't get this information please post it here. I will gove it with the scheenshots from the site

तुर्रमखान 31/10/2023 - 02:27
माझ्या अनुभवाप्रमाणे खालील मुद्दे मांडतो. १. दहा वर्षापेक्षा जास्त टेन्युअर असेल तरच म्युच्युअल फंडाचा विचार करावा. किंबहुना जास्त टेन्युअर असेल तर इक्विटीशिवाय पर्याय नाही. २. थोडे पैसे फिक्स्ड इंस्ट्रुमेंट्स मध्ये ठेवावेत. स्वतःला रुचेल ते गुणोत्तर फॉलो करावं. (फिक्स्ड-इक्विटी-सोनं-रिअल-एस्टेट) ३. इटी मनी, वॅल्यु रिसर्च वगैरेंचे रेकमेंडेशन बघून तीन किंवा चार लार्ज कॅप डायरेक्ट फंडात गुंतवणूक करावी. ४. कुठल्याही सल्लागाराच्या अमिषाला बळी पडून रेग्युलर फंड्स घेउ नयेत. मुळात सल्लागाराकडून कुठलेही प्रॉडक्ट घेउ नये. खणखणीत पैसे मोजून फक्त सल्ला घ्यावा. ५. जास्त फंड्स असतील आणि फार अभ्यास नसेल किंवा होल्डींग्ज/थीम वगैरे माहीत नसेल तर सरळ इंडेक्स फंड घ्यावा. ६. निवृत्तीसाठी गुंतवणुक करत असाल तर सरळ एनपीएस सुरू करावं. ७. पैसे टाकणं जेवढं महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं पैसे काढणं आहे. त्यासाठी एसडब्ल्युपी चांगलं.

In reply to by तुर्रमखान

माझ्या अनुभवाप्रमाणे खालील मुद्दे मांडतो. १. दहा वर्षापेक्षा जास्त टेन्युअर असेल तरच म्युच्युअल फंडाचा विचार करावा. किंबहुना जास्त टेन्युअर असेल तर इक्विटीशिवाय पर्याय नाही. - सौ बात कि एक बात !!!!! डायरेक्ट स्टॉक मध्ये गुंतवून मार्केट पडझड वा कंपनी डुबली तर गुंवणूकदार उघड्यावर पडतो . उदा येस बँक माझी स्वतःची या स्टोकमध्ये गुंतवणूक होती , त्यावेळी हा सर्वोच्चपदी होता एक scam नि आता ५० च्या आत खेळतो . अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे कोणी सांगितले म्हणून स्टोकमध्ये डायरेक्ट गुंतवणूक करणे धोक्याचे ठरू शकते . अजून एक सरकारी कंपनी चे उदा देतो, LIC . लिस्टिंगच्याखाली आहे सध्या . २. थोडे पैसे फिक्स्ड इंस्ट्रुमेंट्स मध्ये ठेवावेत. स्वतःला रुचेल ते गुणोत्तर फॉलो करावं. (फिक्स्ड-इक्विटी-सोनं-रिअल-एस्टेट) - सहमत आगर आपण nps मध्ये गुंतवणूक कराल तर तिकडे वयोपरत्वे equity चा रेशो फिक्स होतो. जितके वय तितके फिक्स्ड इंस्ट्रुमेंट्स मध्ये गुंतवणूक ३. इटी मनी, वॅल्यु रिसर्च वगैरेंचे रेकमेंडेशन बघून तीन किंवा चार लार्ज कॅप डायरेक्ट फंडात गुंतवणूक करावी. - अंशतः सहमत . कारण प्रत्येक विश्लेषणात स्वार्थ हा असतोच !!! ४. कुठल्याही सल्लागाराच्या अमिषाला बळी पडून रेग्युलर फंड्स घेउ नयेत. मुळात सल्लागाराकडून कुठलेही प्रॉडक्ट घेउ नये. खणखणीत पैसे मोजून फक्त सल्ला घ्यावा. - सल्लागाराची फी २०००० हुन सुरु होते , तुमची गुंवणूक नि सल्लागाराची फी गुणोत्तर बघून निर्णय घ्या ५. जास्त फंड्स असतील आणि फार अभ्यास नसेल किंवा होल्डींग्ज/थीम वगैरे माहीत नसेल तर सरळ इंडेक्स फंड घ्यावा. - passive फंडस् तसे कोणी झैरात करत नाही कारण त्यात कमिशन कमी असते ६. निवृत्तीसाठी गुंतवणुक करत असाल तर सरळ एनपीएस सुरू करावं. - सहमत . NPS हा सुद्धा एक प्रकारचा म्युच्युअल फुंडच आहे ,फक्त निवृत्तिनियोजन उद्देश पण कमी एक्सपेन्स रेशो ७. पैसे टाकणं जेवढं महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं पैसे काढणं आहे. त्यासाठी एसडब्ल्युपी चांगलं. - सहमत - यासाठीच फ्रिडम सिप वरील प्रतिसादात सुचवली आहे यात १०, १५, २० वर्षे अनुक्रमे दरवर्षी रक्कम दरमहा आपल्या खात्यात जमा करायची सोय होते . उदा ५ हजाराचा १५ वर्षे साठी सिप केला तर १५ वर्षांनी दरमहा १५००० मिळतील युनिट संपेस्तोपर्यंत

अतरंगी 01/11/2023 - 16:50
तुम्ही फक्त पॉईंट ए ते पॉईंट बी रिटर्न्स पहात आहात. तुम्ही उदाहरणादाखल घेतलेल्या फंडस पैकी काही सेक्टरल फंड्स आहेत आणि व्हॅल्यू या फॅक्टर वर बेस्ड ईंडेक्स/ ईटीएफ आहे. हे सेक्टरल फंड्स, फॅक्टर बेस्ड ईंडाय्सेस (स्मार्ट बीटा ईंडाय्सेस) या सायक्लिक्ल असू शकतात. यातील अनेक फंड्स ने अनेक वर्षे सरासरी पेक्षा कमी रिटर्नस दिलेले आहेत. फंडचे मागील पाच-दहा वर्षातील रोलिंग रिटर्न्स पाहिलेत तर खरे चित्र समोर येईल. https://www.rupeevest.com/Mutual-Funds/Rolling-Return ईथे जाऊन तुम्ही पहात असलेले फंड्स टाकून, रोलिंग रिटर्न ग्राफ ऑल वर सेट करा. तो पाहून आणि मग खालील टेबल्स पण काळजीपुर्वक पाहिल्यास फंडचा परफॉर्मन्स मधे किती सातत्य आहे ते कळेल.

कोणी NPS टायर २ किंवा p२p लेन्डिंग चा अनुभव सांगू शकेल का ? NPS टायर २ - हें कोणत्याही mf सारखे वाटते व lockin पिरिड नाही प्लस जी एक्सपेन्स रेशोचा गोंधळ वरील चर्चेत दिसला तो nps मध्ये लघुत्तम आहे . ( हे मलाच दिसतंय ते चूक का बरोब्बर यासाठी हा पोस्ट )

नमस्कार मंडळी हापिसात चहापाण्याच्या वेळी आम्ही नेहमी जागतिक स्तरावरच्या गप्पा मारत असतो. म्हणजे पुतीनला हार्ट अ‍ॅटॅक आला, आता युक्रेन वॉरची पुढची स्टेप काय असेल? किवा बिबीने (आपले नेतान्याहु हो) गाझा मध्ये सैन्य घुसवले, आता पुढे काय? अशा गप्पांचा मोठा फायदा म्हणजे आगामी काळात गाडी बदलायची असेल तर पेट्रोल घ्यावी, सी एन जी की हायब्रिड? सेकंड होम बूक करावे की सरळ प्लॉट मध्ये गुंतवणुक करावी? ईथपासुन ते घरात खाण्याचे तेल कितपत साठवुन ठेवावे? गव्हाचे पोतेच आणावे की नेहमीसारखे ५-५- किलो पुरे?