एक तरी शिवी अनुभवावी..
धर्मेंद्रचे दोन्ही हात वरती लोखंडी चौकटीला बांधलेले. त्याच्या मानेला,ओठाला रक्त. त्याच्यावर गन रोखलेली. गब्बर बसंतीला म्हणतो,"नाचो,जबतक तेरे पाॅंव चलेंगे ,इसकी साॅंस चलेगी!" आणि विरु ऊर्फ धरमिंदर ओरडतो,"बसंती,इन कुत्तोंके सामने मत नाचना!"तरी बसंती त्याचे प्राण वाचवायसाठी नाचते.
शोले मधला हा सीन सर्वांना तोंडपाठ आहे. (शोले न पाहिलेला माणूस भारतात नाही. अशी वदंता आहे.) असा एकही सिनेमा
नसेल ज्यात धर्मेंद्रने "कुत्ते,कमीने" ही शिवी दिली नसेल.
सिनेमातला प्रत्येक हिरो,हिराॅईन,व्हिलन शिव्या देतोच. एवढंच काय, जगात कुठेही असा माणूसच सापडणार नाही,ज्यानं आयुष्यात कधी कुणाला शिवीच दिली नाही. आणि असाही माणूस नसेल ज्यानं कधी कोणाची शिवी खाल्ली नसेल. आपले पंतप्रधान मोदीही आपल्या भाषणात सांगतात,"मैं दिनभर विपक्षकी इतनी गालियाॅं खाता हूॅं।"
शिवी दिली की मन मोकळं होतं.मनातल्या दबलेल्या भावनांचं विरेचन होतं. मनात कोंडलेला संताप,राग, तिरस्कार, शत्रुत्व अशा सर्वच निगेटिव्ह भावनांचा निचरा होतो. मनावरचं ओझं उतरतं. तो एक शिष्टसंमत नसलेला मानसोपचार आहे. अनेक मारामाऱ्या,हिंसक घटना फक्त दूर राहून मनसोक्त शिव्या दिल्याने टळल्या आहेत.
शिव्या अनेक प्रकारच्या असतात. शिवी देण्यामागे दुसऱ्याची अवहेलना करणे, अपमान करणे, निंदानालस्ती करणे,त्याचे अवगुण दाखवणे,त्याचे वाईट चिंतणे हा हेतू असतो. अगदी सौम्य शिवी म्हणजे "मूर्ख,दीडशहाणा" काही शिव्या प्राणीवाचक असतात."गाढवा,कुत्र्या,डुकरा,घोड्या."त्यातून जरा लागट शिव्या म्हणजे,"नीच, नालायक,हलकट."
त्याहून वाईट शिव्या म्हणजे आई बहिणीवरुन दिलेल्या शिव्या. आणि अगदी ऐकवणार नाहीत अशा लैंगिक अवयवांवरुन दिलेल्या शारीरिक संबंधावरुन दिलेल्या, अश्लील शिव्या. शिव्या देताना समोरच्याच्या मर्मावर आघात केला जातो. आई हा माणसाचा "हळवा कोपरा "असतो. आईबद्दल माणसाच्या मनात अपार प्रेम,माया,आदर असतो. ती त्याचं मर्मस्थान असते. त्या मर्मावर आघात झाला की माणूस विद्ध होतो. कोलमडून पडतो. ती शिवी त्याला कमालीची झोंबते. तोच तर शिवी देणाऱ्याचा हेतू असतो. म्हणून मग आईवरुन शिवी दिली जाते.
मानवी संस्कृतीत काही शारीरिक संबंध निषिद्ध मानले जातात.उदा.भाऊबहीण, पितापुत्री,आई मुलगा.इ.इ इतर जनावरांमध्ये ते तितकेसे निषिद्ध नसतात. उदा. कुत्री,मांजरं आणि इतर सर्व जीव. आपल्याच मुलापासून मांजरीला पिल्ले होणे अगदीच अशक्य नाही. म्हणून मग अशा निषिद्ध संबंधावरुन शिव्या दिल्या जातात.
कित्येक शिव्या आपल्या नकळत आपण देत असतो. तुम्हांला आश्चर्य वाटेल पण "अरेच्या"हा शब्दही एका लांबलचक शिवीचा अवशिष्ट -शिल्लक राहिलेला-तुकडा आहे.
फार प्राचीन काळी म्हणजे वेदकालापासून शिव्या अस्तित्वात आहेत. अश्वमेध यज्ञात एका विशिष्ट विधीत निंदाव्यंजक शब्दांचा वापर केला जायचा. शाकुंतल नाटकातील कण्व मुनींचा शिष्य रागाच्या भरात दुष्यंत राजाला उद्देशून अपशब्द वापरतो.मृच्छकटिक नाटकातील शकार हे पात्र अपशब्द वापरते. जारण मारण मंत्रात "नाशय,उच्चाटय"असे निंदाव्यंजक शब्द वापरले गेले आहेत. संस्कृत वाङ्मयात 'हे,गर्दभ,शूकर, मूर्खशिरोमणी" अशा शिव्या दिल्या आहेत.
आपल्या महाराष्ट्रात आणि देशात अशी गावं आहेत की जी वेशीवर एकत्र येऊन दुसऱ्या गावातल्या लोकांना म्हणजे दोन गावातले लोक एकमेकांना मनसोक्त शिव्या देतात. फार कशाला आपल्या संतांनी विठ्ठलाला सुद्धा शिव्या दिल्या आहेत. कित्येक भक्त स्वतःला उद्देशून शिव्या देताना आढळतात.
शिव्या ह्या सार्वत्रिक आणि सार्वकालिक आहेत. प्रत्येक भाषेत शिव्या आहेत आणि जगाच्या पाठीवर सर्व देशांत शिव्या आहेत. शहरात, ग्रामीण भागात सर्वत्र शिव्या आहेत. दोन मित्र एकमेकांना खूप वर्षांनी भेटले की संभाषणाची सुरुवातच एकमेकांना मिठी मारुन आणि शिव्या देत करतात. अतिग्रामीण भागातील आई सुद्धा स्वतःच्या लेकराचं कौतुक करताना त्याच्या गालावर चापट मारत ,"कुणी काढलं रे तुला!" असं सहज बोलून जाईल. क्रिकेटमध्ये किंवा इतर कोणत्याही क्रीडाप्रकारात आपला देश हारतोय कळलं लोक भावनेच्या भरात खेळाडूंना शिव्या घालतात. राजकारणात तर विचारूच नका.गद्दार ,ढेकूण, डुक्कर,प्रेतं अशा अनेक शिव्या दिल्या जातात.
पण शिष्टसंमत भाषेतच सभ्य माणूस बोलत असतो. त्यात शिव्यांना मज्जाव आहे. त्यातूनही "गोलपिठा"सारख्या पुस्तकात शिव्या असतात. तर पुलं सारखा खट्याळ लेखक म्हैस कथेत "बा"चा "बा"ची-बाचाबाची अशी मिश्किल कोटी करुन जातो.
तेव्हा शिव्या द्यायच्या नाहीत हे खरं,पण भावनेच्या भरात आली एखादी तोंडात तर द्या हासडून ! व्हा मनमोकळे!
कारण.... कारण... एक तरी शिवी अनुभवावी...!!
वाचने
7060
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
उत्तम लेख. शिव्या दिल्याने
बसवला टेंपोत हि मिसळपाववरची
छान.
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आईवरुन शिव्या दिल्या की त्या
शिवी त्याच्या दर्जावरून हलकी
मस्त माहितीपुर्ण लेख !
In reply to मस्त माहितीपुर्ण लेख ! by चौथा कोनाडा
.
In reply to . by कॉमी
हा .... हा .... हा .... !
उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून
In reply to उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून by साहना
+१
विविध शब्द वापरून मानवी मनावर
In reply to विविध शब्द वापरून मानवी मनावर by साहना
अगदी सहमत. महाराणी प्रसूत
शिवी आणि मैत्री
ह्या संदर्भात रा. चिं. ढेरे
In reply to ह्या संदर्भात रा. चिं. ढेरे by प्रचेतस
+१ ... माहितीपुर्ण !
In reply to ह्या संदर्भात रा. चिं. ढेरे by प्रचेतस
माहितीपूर्ण आहे.
कित्येक शिव्या आपल्या नकळत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Thaai Kelavi - Official Video Song | Thiruchitrambalam | Dhanush | Anirudh | Sun Picturesएक राष्ट्रीय समस्या?
माझ्या या लेखावर भरपूर