Skip to main content

प्रकटन

एक अनुभव

लेखक अहिरावण यांनी मंगळवार, 23/04/2024 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य कधी कधी गंमतीदार वळण घेतं. पण ज्यावेळेस अशा घटना घडत असतात त्यावेळेस असं काही वळण येईल, किंवा असं काही घडेल जे कदाचित चांगले असू शकेल असे त्यावेळेस वाटत नसतं. दिवस काढणं तर अवघड असतंच पण रात्र सुद्धा अंगावर येत असते. काय करावे, कसे करावे काही म्हणता काही सुचत नसते. फक्त आपल्याच आयुष्याचा आपण मांडून ठेवलेला तमाशा पहायचा आणि जमेल तितकी पडझड थांबवायचा प्रयत्न करायचा. दोन हात थिटे पडतात. आणि अवशेष दणादण डोक्यावर कोसळत पडतात. खिशात मोजून ४०० रुपये. घरात सामान आणायचे तर दोन हजार तरी लागतील. मोबाईल वगैरे तेव्हा नव्हते पण दूरध्वनीचे बील भरणे भाग. करंट खात्यावर शेवटचे साडेचार हजार पडलेले.

मानस- धुळवड

लेखक आर्या१२३ यांनी शुक्रवार, 29/03/2024 या दिवशी प्रकाशित केले.
मानस - धुळवड स्थळ: गोंदवले दिवस : फाल्गुनाचे. होळीपौर्णीमेचा दुसरा दिवस! वेळ : साधारण पहाटे पावणे पाचची श्रीमहाराज तसे नेहमीप्रमाणे ब्राम्ह मुहूर्तावरच उठले होते. आन्हिक आटोपून थोडा वैखरीने नामजप करून पुन्हा थोडे आडवे झालेत...आदल्या दिवशीच्या दगदगमुळे! अर्थात आत हृदयात अखंड नाम सुरू आहेच! आदल्या दिवशी पौर्णिमा, अन् होलिकादहन! इतके लोक गोंदवल्यात येणार! सगळ्यांची व्यवस्था लावणे. त्यात सध्या पाणी टंचाई! स्वयंपाकघर बांधकामासाठी काढलेले. बराच मोठा व्याप.

अधिकार

लेखक आकाश खोत यांनी बुधवार, 27/03/2024 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात माझ्या बायकोच्या आजी देवाघरी गेल्या. बातमी कळताच आम्ही सर्व तातडीने पुण्याहून छत्रपती संभाजीनगरला निघालो. गाडीमध्ये मी माझी बायको आणि माझे सासु सासरे होते. पूर्ण प्रवासात सतत आम्ही संभाजीनगरला आजींच्या राहत्या घरी गोळा झालेल्या नातेवाईकांशी संपर्कात होतो. एरवी पुण्याहून निघालो, नगरला पोहोचलो, नगर क्रॉस झालं, जवळ पोहोचलो एवढे अपडेट पुरेसे असतात. अशा प्रसंगी मात्र कोणालाच स्वस्थ बसवत नसतं, सतत बोलत संपर्कात रहावं वाटतं. जवळची एक व्यक्ती गेलेली असताना इतर जवळच्या व्यक्तींच्या सहवासात रहावं वाटतं. आणि यावेळेस सतत चर्चा करण्यासाठी आणखी एक विषय होता. दिवंगत आजींना मुलगा नव्हता.

आमची संगीत यात्रा..

लेखक भम्पक यांनी गुरुवार, 21/03/2024 या दिवशी प्रकाशित केले.
काल पोराने ऑनलाईन मागवलेला अँपल चा एअरपोड आला. चेक करू म्हटले तर काय तंत्रज्ञान प्रगत झाले आहे याचा प्रत्यय आला. त्यात नॉइज कॅन्सलेशन चा पर्याय होता .आता नॉइज कॅन्सलेशन म्हणजे त्या एअरपोड मध्ये अशी काही रचना असेल कि ते कानात फिट बसतील अन बाहेरचा गोंगाट कमी होईल अशी माझी भाबडी समजूत.पण या एअरपोड ने तीला मूठमाती दिली.कारण कानात बसवल्या बसवल्या जेव्हा नॉइज कॅन्सलेशन चे ऑप्शन निवडले अन एकदम प्रचंड शांतता पसरली. बापरे हे मात्र जबरीच होते अन संगीत हि एकदम शुद्ध स्वरूपात ऐकायला मिळत होते.अर्थातच इंग्लिश गाणी..आजूबाजूला असलेला गोंधळ कणभरही जाणवत नव्हता.मी प्रचंड प्रभावित झालो.

माझी मॅट्रिक आणि आत्ताच्या एक्झाम्स.

लेखक आजी यांनी गुरुवार, 21/03/2024 या दिवशी प्रकाशित केले.
त्या अनादि,अनंत, सर्वसाक्षी जगन्नियंत्याने आपल्या ललाटावर भाग्यरेखा लिहिताना अहर्निश परीक्षा देणंच लिहिलं आहे,असं प्रत्यंतर प्रत्येक जीवात्म्यास हा भवसागर पार करत असताना येत असतं! बास,बास,बास! पिळापिळी पुरे! ह्याच लायनीवर ही सगळी पोस्ट लिहीत बसले ,तर माझी दमछाक होईल. सोप्या भाषेत मला एवढंच म्हणायचं आहे की, आपल्यापैकी प्रत्येकाच्या नशिबात, रोजच्या व्यवहारात परीक्षा देणं लिहिलेलंच असतं. खरं तर मला रोजच्या रोज येणाऱ्या संकटरुपी परीक्षेवर लिहायचंच नाहीये. मला लिहायचंय ॲक्चुअल परीक्षेवर.

माझे बाबा

लेखक मनस्विता यांनी शुक्रवार, 15/03/2024 या दिवशी प्रकाशित केले.
नोव्हेंबर २०२३ मध्ये माझे बाबा गेले. वय ८२ पूर्ण होते. लौकिकार्थाने त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी व्यवस्थित पार पाडल्या होत्या. तोपर्यंतचे आयुष्य आनंदाने जगले होते. त्यामुळे फार त्रास न होता ते गेले म्हणजे त्यांचं सोनंच झालं. पण... हा पण खूप मोठा आहे. ते गेल्यावर लक्षात आलं की आपल्या बाबांचे आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे स्थान होते. त्यांच्या जाण्याने कधीच भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. खरं तर हे इतकं खाजगी असं चव्हाट्यावर मांडायची खरंच काय गरज! इथे लिहिण्यामागे दोन कारणं आहेत. एक तर असं म्हणतात की "More you write personal, more it becomes universal".

या देवी सर्वभूतेषु...

लेखक समर्पक यांनी गुरुवार, 07/03/2024 या दिवशी प्रकाशित केले.
या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:। शाक्त तीर्थ-क्षेत्र, "शक्तीपीठ"

सक्षम स्त्रियांसाठी आधारप्रणाली - सपोर्ट सिस्टीम

लेखक सुधीर कांदळकर यांनी बुधवार, 06/03/2024 या दिवशी प्रकाशित केले.
सक्षम स्त्रियांसाठी आधारप्रणाली - सपोर्ट सिस्टीम ८ मार्चला सारीकडे महिला दिनाचे वातावरण असते.प्रत्येकजण आपापला दृष्टिकोन मांडत ससतो. बहुतेकांचे दृष्टीकोन आपापल्या परीने बरोबर असतातही. या दिनाच्या निमित्ताने मी सहज मागे वळून पाहिले की मी स्वतः प्रागतिक चिचारांचा आहे म्हणून मोठ्या गमजा मारतो पण आपण खरेच कसे काय वागलों? अनेक आठवणी जाग्या केल्या, काही आपोआप जाग्या झाल्या, यात एक सुरेख आठवण आली.

बेसरकार...

लेखक सुधीर मुतालीक यांनी गुरुवार, 29/02/2024 या दिवशी प्रकाशित केले.
17 फेब्रुवारीला पाकिस्तानातल्या रावळपिंडीचे विभागीय आयुक्त असलेल्या लियाकत अली चट्टा यांनी पाकिस्तानातच नव्हे तर आख्ख्या जगात खळबळ उडवून दिली !!! दहा बारा दिवसापासून पाकिस्तानात व्यवस्थेचा नंगा नाच सुरु आहे. राष्ट्रीय निवडणुका झाल्या, त्याची मत मोजणी सुरु झाल्यावर तिकडे धुमाकुळ सुरु झाला. इम्रानखानला आधीच तुरुंगात ठेवले आहे. त्याचा पक्ष मोडीत काढला. चिन्ह गोठवले. पुन्हा कधी निवडणूक लढण्याचे धाडस केले नाही पाहिजे अशी तजवीज करण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्यक्षात भलतंच घडलं. आम जनतेने त्यालाच डोक्यावर घेतले. त्याचे उमेदवार अपक्ष लढले.

रेवदंड्याचं दर्शन

लेखक पराग१२२६३ यांनी शुक्रवार, 16/02/2024 या दिवशी प्रकाशित केले.
Korlai कुठंतरी छोटी ट्रीप करून येऊ असं ठरवत असताना अलिबागला जाण्याचं निश्चित झालं. मी अलिबागला पहिल्यांदाच जाणार होतो. त्यामुळं वेगळं ठिकाण-परिसर पाहता येणार असल्यामुळं उत्साहित वाटत होतं. त्यातच बऱ्याच वर्षांनी मुंबईशिवाय अन्य ठिकाणचा समुद्र पाहायला मिळणार होता.