मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रकटन

मुझको ठंड लग रही है..

आजी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझा सर्वात आवडता ऋतू म्हणजे थंडीचा. पावसाळा आणि उन्हाळा मला अजिबातच आवडत नाहीत. मुंबईत राहणाऱ्या नोकरदारांना पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात लोकलनं कामावर जाणं म्हणजे अग्निपरीक्षाच! पावसाच्या तपकिरी रंगाच्या गढूळ पाण्यात काय काय गलिच्छ वस्तू वाहात येतील आणि आपल्या पायाला स्पर्श करतील सांगता येत नाही. कुठं खड्डा असेल, कुठं सरळ रस्ता असेल.रस्त्याची सीमारेषा संपून कुठं गटार लागेल सांगता येत नाही. वाहत्या पाण्यात रस्ता अजिबात दिसत नसताना त्याचा अंदाज घेत चालणं महाकर्मकठीण काम. मला रस्त्यातल्या खड्याची एक महाभयानक आठवण आहे.

अ‍ॅनिमल...नी अंमळ मळ मळ

निओ ·
अ‍ॅनिमल पाहिला आणि लेखणी हाती घेतली. अ‍ॅनि मल की मळ, जे काही असेल ते आणि त्यामुळे झालेली मळमळ उलटी करून टाकावी म्हटले, म्हणजे मन शांत होईल म्हणून हा प्रपंच. सुरुवातीलाच वाईट जोक. कोणी आगाऊ म्हणेल कि मळ बाहेर काढायची दुसरी क्रिया पण असते ती इथे नाही केली याबद्दल धन्यवाद. असो कोटीचा मोह आवरला नाही. मूळ मुद्दा चित्रपटाबद्दल. Violence presented in entertaining way (काही दृश्य सोडली तर ) हे दिग्दर्शक व कलाकार या जोडीने दाखवून दिलं. आणि खरंच, चित्रपटात जेव्हा हाणामारी चालते तेव्हाच बरं वाटतं. फॅमिली ड्रामा येतो तेव्हा बोअरच होतं. तरीपण सध्याचा अति हिंसाचार नाही झेपत आपल्याला .

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण श्रध्दांजली

अहिरावण ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
डॉ.भीमराव रामजी आंबेडकर, यांना आपण सर्वजण डॉ.बाबासाहेब आंबेडकर या नावानेही ओळखतो. दरवर्षी ६ डिसेंबर हा बाबासाहेबांचा पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. संविधानाचे जनक, दलितांचे उद्धारकर्ते, अग्रणी सामाजिक सुधारक अशा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण श्रध्दांजली ! जय हिंद ! जय महाराष्ट्र !! जय भिम !!

पुन्हा एकदा राजगड-तोरणा

राजेंद्र मेहेंदळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी आज पहिल्यांदा एक प्रयत्न करून बघतो आहे टायपिंग ऐवजी स्पीच टू टेक्स्ट वापरायचा. बघुया कसे जमतेय. =============================== राजगड तोरणा हा रेंज ट्रेक मी याच्या आधी पण केलाय. साधारण २०१५ मध्ये हा ट्रेक मी एकदा केला होता आणि त्याच्या आधी एकदा २००४ मध्ये तोरणा ते राजगड असा उलट ट्रेक केला होता पण त्यावेळेला आम्ही आदल्या दिवशी रात्री मुंबईहून निघून वेल्ह्यापर्यंत गेलो होतो. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी वेल्ह्यातून तोरण्यावर गेलो होतो.

श्यामची आई

विअर्ड विक्स ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मागच्या शनिवारी चित्रपट पाहिला . साधारणतः चित्रपट पाहिल्याच्या २-३ दिवसात मी परीक्षण टाकतो ( टंकायची इच्छा असली तर ) पण यावेळेस एक आठवडा गेला. असो . ( वर्ल्ड कप हरल्याचा धक्का आणखी काय) श्यामची आई नावात वजन असले तरी मापात नाही. ह्या एका वाक्यात परीक्षण संपवू शकलो असतो पण वादंग टाळण्यासाठी पुढील ओळी खरडतोय. संपूर्ण चित्रपट कृष्ण धवल रंगात आहे परंतु पहिल्या कृष्ण धवल चित्रपटाची सर नाही."श्यामची आई " हे पुस्तक संस्कारक्षम वयात वाचावयास दिले जाते आणि प्रेक्षक वर्ग सुद्धा त्याच याच अपेक्षेने चित्रपट पाहावयास जाणार असतील तर हाती निराशा लागेल.

जिथे सागरा धरणी मिळते

वझेबुवा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
जिथे सागरा धरणी मिळते मावळतीच्या सूर्याकडे पाहत पाहत पावले पडत होती. ओहोटी असल्याने चालायला भरपूर वाव होता. जसजसा पुढे जात होतो, तसतशी मागच्या लाऊडस्पिकर वर चालू असलेली क्रिकेट मॅचची कॉमेंटरी क्षीण होत होती. त्या तेजोनिधीने पाण्याच्या पृष्ठभागावर सोनेरी रेखा काढली होती आणि वाळूच्या खळग्यांमध्ये साचलेल्या ओहोटीच्या पाण्यात अनेक केशरी दिवे लावले होते. चालता चालता त्या पाण्यातील सूर्याच्या प्रखर प्रतिबिंबावर नजर रोखली गेली. आकाशातला सूर्य जणू जाता जाता वाळूवर रेंगाळत होता.

पॅरिसमधील शिवचरित्र

मनो ·
लेखनप्रकार
गेले काही महिने इंग्लंडमधील तथाकथित वाघनखे चर्चेत आहेत. ती खरी की खोटी हा मुद्दा सोडला, तरी महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित अनेक अज्ञात वस्तू, हस्तलिखिते परदेशात आहेत, ही गोष्ट मात्र १००% सत्य आहे. अश्याच एका हस्तलिखिताचा हा शोध-वृत्तांत पुढे देतो आहे. या शोधाची सुरुवात झाली ती पुण्यात. दोन वर्षांपूर्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा २९ जुलै २०२१ रोजी १०० वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्त बाबासाहेबांच्या घरी राज ठाकरे इत्यादी अनेक मान्यवर येऊन गेले. शिवचरित्रकार श्री. गजानन भास्कर मेहेंदळे आणि भारत संशोधक मंडळाच्या कार्यकारिणीचे सभासद बाबासाहेबांना भेटले.

दिवाळी विशेष - ‘सागरी पक्ष्यां’चं संग्रहालय

पराग१२२६३ ·
गोवा जवळ असूनही जाऊ-जाऊ करत राहतच होतं. गोव्यात नौदलाच्या हवाई शाखेचं संग्रहालय असल्याचं बऱ्याच वर्षांपूर्वी वाचनात आलं होतं. त्यातच नौदलाच्या हवाई शाखेबद्दल आणि त्यातही विमानवाहू जहाजांबद्दल आकर्षण असल्यामुळं ते संग्रहालय पाहावं अशी खूप इच्छा होती.

एक तरी शिवी अनुभवावी..

आजी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
धर्मेंद्रचे दोन्ही हात वरती लोखंडी चौकटीला बांधलेले. त्याच्या मानेला,ओठाला रक्त. त्याच्यावर गन रोखलेली. गब्बर बसंतीला म्हणतो,"नाचो,जबतक तेरे पाॅंव चलेंगे ,इसकी साॅंस चलेगी!" आणि विरु ऊर्फ धरमिंदर ओरडतो,"बसंती,इन कुत्तोंके सामने मत नाचना!"तरी बसंती त्याचे प्राण वाचवायसाठी नाचते. शोले मधला हा सीन सर्वांना तोंडपाठ आहे. (शोले न पाहिलेला माणूस भारतात नाही. अशी वदंता आहे.) असा एकही सिनेमा नसेल ज्यात धर्मेंद्रने "कुत्ते,कमीने" ही शिवी दिली नसेल. सिनेमातला प्रत्येक हिरो,हिराॅईन,व्हिलन शिव्या देतोच. एवढंच काय, जगात कुठेही असा माणूसच सापडणार नाही,ज्यानं आयुष्यात कधी कुणाला शिवीच दिली नाही.

पुन्हा एकदा म्युचुअल फंड्स

राजेंद्र मेहेंदळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी हापिसात चहापाण्याच्या वेळी आम्ही नेहमी जागतिक स्तरावरच्या गप्पा मारत असतो. म्हणजे पुतीनला हार्ट अ‍ॅटॅक आला, आता युक्रेन वॉरची पुढची स्टेप काय असेल? किवा बिबीने (आपले नेतान्याहु हो) गाझा मध्ये सैन्य घुसवले, आता पुढे काय? अशा गप्पांचा मोठा फायदा म्हणजे आगामी काळात गाडी बदलायची असेल तर पेट्रोल घ्यावी, सी एन जी की हायब्रिड? सेकंड होम बूक करावे की सरळ प्लॉट मध्ये गुंतवणुक करावी? ईथपासुन ते घरात खाण्याचे तेल कितपत साठवुन ठेवावे? गव्हाचे पोतेच आणावे की नेहमीसारखे ५-५- किलो पुरे?