नमस्कार मंडळी
हापिसात चहापाण्याच्या वेळी आम्ही नेहमी जागतिक स्तरावरच्या गप्पा मारत असतो. म्हणजे पुतीनला हार्ट अॅटॅक आला, आता युक्रेन वॉरची पुढची स्टेप काय असेल? किवा बिबीने (आपले नेतान्याहु हो) गाझा मध्ये सैन्य घुसवले, आता पुढे काय? अशा गप्पांचा मोठा फायदा म्हणजे आगामी काळात गाडी बदलायची असेल तर पेट्रोल घ्यावी, सी एन जी की हायब्रिड? सेकंड होम बूक करावे की सरळ प्लॉट मध्ये गुंतवणुक करावी? ईथपासुन ते घरात खाण्याचे तेल कितपत साठवुन ठेवावे? गव्हाचे पोतेच आणावे की नेहमीसारखे ५-५- किलो पुरे? ईथपर्यंत चे निर्णय घ्यायला बरे पडते.
तर आज नारायण मुर्तींच्या विधानावरुन (भारतीय तरुणांनी आठवड्याचे ७० तास काम करावे) रिटायरमेंट प्लॅनिंग , आणि त्यावरुन गुंतवणुक कुठे करावी? आणि त्यातुन म्युचुअल फंड्स बद्दल गप्पा निघाल्या. (कशाला कशाचा संबंध असतोय बघा). मग दुपारी २ मीटिंगच्या मध्ये नुसताच बसलो असताना डोक्यात एक किडा आला आणि कोणते म्युचुअल फंड्स जास्त परतावा देतायत बघुया म्हणुन शोधायला लागलो. त्यातुन जे ज्ञान मिळाले ते ईथे लिहितो आहे.
डिस्क्लेमर १- मी या विषयाचा तज्ञ नाही.त्यामुळे कोणाच्या नफा नुकसानीला मी जबाबदार नाही. विश्वास ठेवायचा की नाही तुम्ही ठरवायचे.
डिस्क्लेमर २- मी आंतरजालावर शोधाशोध करुन माहिती मिळवली आहे. त्या लिंका खाली देईनच. पण ही माहिती कितपत विश्वासार्ह आहे, स्त्रोत कोणता आहे, ते माहित नाही.
तर साधारण पणे ५० म्युचुअल फंड्स घराण्यांची माहिती बघुन (ईथे पहा फंड्स ) त्यातील ज्या फंड्स नी मागील ३ वर्षात ४०% पेक्षा जास्त परतावा दिला ते खाली देत आहे.
१.यामधुन मी ई एल एस एस फंड वगळले आहेत कारण त्यात ३ वर्षे लॉकिंग असते.
२.काही अगदी बॉर्डरलाईन फंडही (जसे ३९% परतावा) वगळले आहेत.
३. हे सगळे परतावे डायरेक्ट प्लॅन आणि ग्रोथ पर्यायाचे आहेत. त्याच फंडचा डिव्हीडंड पर्याय किवा रेग्युलर पर्याय निवडल्यास परतावा २-३ टक्के कमी होईल.
४. ईन्कम टॅक्स आणि ब्रोकरेज विचारात घेतलेले नाही.
५. अजुन काही आठवत नाहीये, आता बास करतो आणि ----खुल जा सिम सिम
आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
वाचने
10123
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
महत्त्वाचा विषय!
+१ चांगलय हे.
वाखुसा....
मागील तीन वर्षात ४०%
+१
In reply to मागील तीन वर्षात ४०% by स्नेहा.K.
दीर्घ मुदतीचा गुंतवणूक विचार.
आवडीचा विषय पण सवडीचा नाही
रच्याकने - घर खरेदीवर मध्ये
In reply to आवडीचा विषय पण सवडीचा नाही by विअर्ड विक्स
रच्याकने - घर खरेदीवर मध्ये एक धागा फिरत होता , अंतिम निर्णय काय झाला काही कळले नाहीसर्व चर्चा अंती मी निर्णय घेतलाय की रिसेल फ्लॅट सहकारनगर भागात घ्यावा, पण किमती तगड्या आहेत. वन बीएचको जूने फ्लॅट ६५० ते ७०० स्क्वेअर फुटांचे मोठे आहेत. पण किंमत ६० ते ७० लाखा दरम्यान. मध्येच हुक्की येते की पुनावळे भागात नविन बांधकामे चालू आहेत तिथे ६५० -७५० स्क्वेअर फूटाचे ५० ते ५५ लाखात ऊपलब्ध आहेत ते घ्यावेत. मॅजीकब्रीक्स वर रोज तेच पहातोय.सहमत.
In reply to रच्याकने - घर खरेदीवर मध्ये by अमरेंद्र बाहुबली
वाह
In reply to रच्याकने - घर खरेदीवर मध्ये by अमरेंद्र बाहुबली
सर्व म्युच्युअल फंडाच्या
बऱ्याच अंशी सहमत आहे
In reply to सर्व म्युच्युअल फंडाच्या by सुबोध खरे
म्युच्युअल फंड ही दिर्घ
गुंतवणूक सल्ल्लागार गाठा
In reply to म्युच्युअल फंड ही दिर्घ by अहिरावण
+१
In reply to म्युच्युअल फंड ही दिर्घ by अहिरावण
फंडांच्या जाहिरातीला बळी पडू नका... तुमच्या गरजा आणि ध्येये निश्चित करा.
या वाक्यासाठी टाळ्या 👏👏
सीलेक्ट केलेला फिल्टर चांगला
मी स्वतः भांडवली बाजारात
+१
In reply to मी स्वतः भांडवली बाजारात by आंद्रे वडापाव
म्युचुअल फंड परतावा देतात. पण जेवढी जाहीरात करतात तेवढे पैसे आपल्याला नाही मिळत.
आपण म्हट्ल्याप्रमाणे कोणते समभाग चांगले याचे बेसिक ज्ञान असेल तर म्युचुअल फंडात गुंतवण्यापेक्षा स्वता: गुंतवणुक करुन वाट पाहिली की परतावा चांगला मिळतोच.
म्युचुअल फंड आणि इन्शुरन्स कंपन्या दोन्हींबद्दल माझे मत प्रतिकुल असले तरीही, क्वांट, निप्पॉन , मोतिलाल ओसवाल सारख्या मोजक्या कंपन्यांचे म्युचुअल फंड परतावा चांगला देतात. यातही ग्यानबाची मेख अशी असते की, तुम्ही त्यांच्या सल्ला देणाऱ्या सेवा किंवा सब्स्क्रिप्शन मॉडेल घेतले तर हे लाभ मिळतात. ऐकिव किंवा मार्केटींग ला भुलुन तुम्ही फंड घेतलात की फसलात समजा. परतावा मिळतो, पण अपेक्षेप्रमाणे नाही मिळत. शेवटी हे लोक आपल्याच पैंशातून स्वत:चे लाभ मोठ्या प्रमाणात कमावतात आणि त्या मानाने आपल्याला मिळणारे पैसे बरेच कमी असतात.
म्युच्युअल फंड या विषयावर एक
स्टॉक का म्युच्युअल फंड ?
In reply to म्युच्युअल फंड या विषयावर एक by अमर विश्वास
विअर्ड विक्स साहेब
In reply to स्टॉक का म्युच्युअल फंड ? by विअर्ड विक्स
लेख वाचले आणि प्रतिसादही,
In reply to विअर्ड विक्स साहेब by अमर विश्वास
धन्यवाद!!
In reply to विअर्ड विक्स साहेब by अमर विश्वास
+१
In reply to धन्यवाद!! by राजेंद्र मेहेंदळे
म्युच्युअल फंडस वरती लाँग टर्म कॅपिटल गेन्स लागत नव्हते. ते सुरु झाले आहेत.
याचा सामान्य गुंतवणुकदारांना त्रास होतो. सरकार विदेशी गुंतवणुकदारांना ०% घेत आहे आणि आपल्या खिशावर १२ % बहुतेक आहे.
एखादा डॉ जसा, चांगल्या
बाडीस
In reply to एखादा डॉ जसा, चांगल्या by आंद्रे वडापाव
+१ वाजवी अपेक्षा
In reply to बाडीस by सुबोध खरे
परतावा जास्त असला तरी त्याचा लाभ म्युचुअल फंड कंपन्या आपल्याला देत नाहित असे अनुभवाअंती मत आहे.
त्यांनी दिलेले आकडे मान्य करण्याशिवाय पर्याय नसतो.
उदहरणार्थ: स्मॉल कैप फंड मध्ये कोणत्या कंपन्यांत आपली गुंतवणूक आहे याबद्दल स्पश्श्ट माहिति उपलब्ध नसते.
असती तर त्या कंपन्यांचे ३ वर्षांचा पर्फोरमन्स बघून आपल्याला ढोबळ परतावा कळू शकतो.
फंड च्या माहितीत असत ना…
In reply to +१ वाजवी अपेक्षा by सागर
फंड च्या माहितीत असत ना दिलेले किती कंपन्यात किती टक्के गुंतवणूक आहे ते?
अरे वा!!
लिहायला सोपे म्हणून इंग्रजीत
छान चर्चा.
चांगला प्रतिसाद आहे
In reply to छान चर्चा. by तुर्रमखान
चांगली चर्चा .
रोलिंग रिटर्न्स पहा.
एक निरिक्षण - कोविडच्या
NPS टायर २
बरोबर आहे. एनपीएस २ हे
In reply to NPS टायर २ by विअर्ड विक्स
Mf बद्दल बराच अभ्यास नी …
Mf बद्दल बराच अभ्यास नी बरीच गुंतवणूक करून आता मिपावरील एमएफ लेखनाचा नारळ 🥥 फोडतो!
एमएफ चांगले वाटत नाहीत पण mf इतका चांगला गुंतवणुकीचा पर्यायही दिसत नाही.
mf वरील लेखन वाचण्याचा नारळ…
In reply to Mf बद्दल बराच अभ्यास नी … by अमरेंद्र बाहुबली
mf वरील लेखन वाचण्याचा नारळ 🥥 फोडतो असे वाचावे. 🙃
पर्सनल फायनान्स
मलापण पर्सनल फायनान्सबद्दल इथे लिहायला आवडेल. मी CFP आहे आणि नुकतीच rupeegalaxy.com ही साईट सुरू केली आहे, पण ती इंग्रजीमध्ये आहे. इथे मराठीत लिहायला आवडेल. माझे काही जुने लेख ऐसीअक्षरे साईट वर आहेत.
पर्सनल फायनान्स भाग १
पर्सनल फायनान्स भाग २
पर्सनल फायनान्स भाग ३
पर्सनल फायनान्स भाग ४
पर्सनल फायनान्स भाग ५
पर्सनल फायनान्स भाग ६
पर्सनल फायनान्स भाग ७
पर्सनल फायनान्स भाग ८
पर्सनल फायनान्स भाग ९
धन्यवाद!
In reply to पर्सनल फायनान्स by उदय
धन्यवाद!
धन्यवाद उदय.
In reply to पर्सनल फायनान्स by उदय
ऐसी अक्षरे येथील लेख पूर्वीच वाचले होते. ते आवडले होते.
आता तुम्ही नवीन साईट rupeegalaxy_dot_com सुरू केली त्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा. ती उघडून वाचली. इंग्रजीत आहे आणि संज्ञा अर्थशास्त्रीय आहेत त्या माहीत नाहीत. तरीही सर्व मजकूर कॉपी करून perplexity app मधून भाषांतरीत करून घेतला आणि वाचला. [भाषांतरासाठी perplexity सर्वोत्तम आहे हे माझे मत झाले आहे.] त्यात एकसंध भाषांतर न देता एक दोन वाक्ये आणि भाषांतर असं करून मिळाले. छान सांगितले आहे.
कॉपी करताना फंक्शनसची यादी मुद्दामहून गाळली होती कारण त्याचे फक्त भाषांतर मिळवून उपयोग नाही. समजून घ्यावे लागेल एक एक समीकरण किंवा सूत्र. असो.
एकूण समाधान झाले.