मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

डॉ.विद्याधर ओक

आनंद घारे ·

विसोबा खेचर 03/07/2008 - 23:24
गेली अनेक वर्ष डॉ ओकांचा आणि माझा खूप जवळचा परिचय आहे. माझे त्यांच्या घरी अनेकदा जाणेयेणे सुरू असते. त्यांच्या घरी गेलो असताना त्यांनी निर्मिलेल्या मेंन्डोलियम या वाद्याबद्दल त्यांनी अगदी माझं समधान होईस्तोवर माहिती पुरवली. खूप वाजवूनही दाखवलं. त्यांचा अभ्यास अणि त्यांचं संशोधन हे निश्चितच वाखाणण्याजोगं आहे! "अरे तात्या, अगदी केव्हाही ये, मस्तपैकी पेटी वाजवत बसू!" असं डॉक्टर मला नेहमी म्हणतात! :) त्यांचे चिरंजीव आदित्य ओक हाही माझा चांगला मित्र आहे. तोदेखील गायनाच्या साथीला हार्मिनियमची संगत चांगल्या प्रकारे करतो. राहूल देशपांडे सोबत हार्मोनियम-साथीदार म्हणून नुकताच तो अमेरिकेच्या दौर्‍यावर गेला आहे... आपला, (गोविंदरावांचा भक्त) तात्या.

धनंजय 04/07/2008 - 03:19
याबद्दल सचित्र आणि चित्रफितींसह तपशीलवार माहिती या संकेतस्थळावर मिळू शकेल. (कुशल हार्मोनियमवादक साथ करताना काय क्लृप्त्या वापरतात? हार्मोनियमचे स्वर हिंदुस्थानी [किंवा कर्नाटक] शास्त्रीय संगीतासाठी बेसुरे असतात हे तर सर्व वादकांना माहीत असते. योग्य स्वराचा [भसाडा का होईना] आभास निर्माण करण्यासाठी नेमक्या स्वराच्या वरची-खालची अशा दोन्ही पट्ट्या दाबतात का?) तात्यांना (किंवा आणखी कोणी ती पेटी खुद्द बघितली/वाजवली असेल त्यांना) प्रश्न : डॉ. ओक यांचे लेख वाचून असे दिसते की ती कुठल्यातरी स्थिर षड्जाला धरून बनवलेली आहे - त्यांच्या लेखांत त्यांनी नेहमी सफेत६चे उदाहरण दिलेले आहे. अर्थात पंचम अचल आहे. समोरची बटणे ओढून जो राग गायचा आहे त्यासाठी बाकीच्या ५ स्वरांसाठी योग्य श्रुती निवडता येतात. पण या श्रुतींमधील अंतर समसमान नाही. त्यामुळे कोणाला सफेत६ ऐवजी काळी२ पट्टी षड्ज म्हणून निवडायची असेल, तर (लेखांप्रमाणे तरी) ते जमणार नाही. करण सफेत६ पासून योग्य अंतरावर (पण समसमान अंतरे नाहीत) अशा २२ श्रुती काळी२ पासून योग्य अंतरावर असणार नाहीत. त्यांचे लेख वाचण्यात माझी काही गफलत झाली आहे का? त्यांच्या मेलोडियमवरती गायकाला हव्या त्या पट्टीत गाणे वाजवता येते का? या बाबतीत येथे एक गायक/पियनोवादक श्री. रॉनल्ड नेकर यांच्याशी चर्चा झाली. ते ओमाहा, नेब्रास्का येथे असताना तेथे २००३ साली नवीन बांधून घेतलेल्या ऑर्गनबद्दल त्यांनी मला माहिती दिली (दुवा). एकाच ऑर्गनला अनेक कळफलक असतात, आणि प्रत्येक कळफलकला वेगवेगळे स्वर-श्रुती बसवता येतात. हल्ली पाश्चिमत्य संगीत १२-समसमान श्रुतींमध्ये वाटलेले सप्तक मनात धरून रचलेले असते. त्यामुळे काही कळफलक तसे असतात. तर काही कळफलक जुन्या प्रकारच्या श्रुतींना मानून बनवलेले असतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या काळात लिहिलेले संगीत संगीतकाराला जसे अभिप्रेत होते तसे वाजवता येते. अर्थात असा पर्यय असणे हे केवळ या ओमाहा येथील चर्चमधील ऑर्गनचे वैशिष्ट्य नव्हे, तर अनेक मोठ्या चर्चमध्ये अशी ऑर्गन आहेत.

अप्रतिम माहिती.. आणि मला मेटलोफोन या वाद्याची माहिती फार आवडली... धन्यवाद, आनंद... आपला ( पेटीवादक) भडकमकर मास्तर ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

अमोल केळकर 04/07/2008 - 09:30
आनंदघन डॉ.विद्याधर ओक यांचा परिचय आवडला त्यांचे एखादे चित्र असेल तर प्रतिसादात टाकावे ही विनंती -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

आनंद घारे 04/07/2008 - 11:30
गायकाला हव्यात्या सुरात गाता यावे आणि त्याला हार्मोनियमवर त्याच्या सुरात साथ करता यावी याच उद्देशाने टेम्पर्ड स्केल तयार केले गेले. परंतु त्यातील श्रुती सुरात येत नाहीत म्हणून त्या योग्य जागेवर ठेऊन नवी पेटी तयार केली तर ती कोणत्या तरी एका षड्जाच्या संदर्भातच असणार असे मला वाटते. मोठे गायक जसे स्वतःचे तानपुरे आणि तबले बरोबर घेतात त्याप्रमाणे त्यांना साथीसाठी स्वतःची संवादिनीही लागेल. या बाबतीत श्री. तात्या एक्सपर्ट कॉमेंट देऊ शकतील.

आनंद घारे 04/07/2008 - 11:44
खाली दिली आहेत. ती आधी दुसरीकडे आंतर्जालावर चढवून तिथला दुवा द्यावा लागतो. यामुळे लेखासोबत देता आली नव्हती.

प्रमोद देव 04/07/2008 - 13:17
ही नवीन पद्धतीची संवादिनी फक्त साथीसाठी उपयुक्त आहे. स्वतंत्र(सोलो) वादनासाठी नव्हे असे डॉ.ओक ह्यांनी सांगितल्याचे स्मरते. त्यांचे प्रात्यक्षिक ह्यापूर्वी मी विलेपार्ले येथे टिळक मंदिरात पाहिले-ऐकले होते. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

हेरंब 04/07/2008 - 18:48
ओकांवरचा लेख आवडला. तात्यांची त्यांच्याशी एवढी ओळख आहे हे वाचून आनंद वाटला. (गोविंदरावांचा भक्त आणि आरंभशूर पेटीवादक)

कंजूस 07/10/2018 - 19:04
दहाएक वर्षं आमचे शेजारी होते. रोज दोनतीन तास पेटी वाजवत ती ऐकायला येई. पण आमच्या घरात कुणालाच संगीताचा कान नसल्याने कधीही पेटी ऐकायला गेलो नाही. इमारतीत आठजण होते त्यातल्या दोघांनाच आवड होती व ते सांगत की पेटी छान वाजवतात. आदित्य तिसऱ्या वर्षापासून वाजवतो. दुसरे दोघे भाऊही वाजवायचे. शिवाय भारतीय ज्योतिषाची आवड होती. चिनी ज्योतिषावरही एक जाडजुड पुस्तक लिहिले आहे.

In reply to by कंजूस

चौकटराजा 11/10/2018 - 15:13
तुमच्या त्या इमारती मध्ये मी का राहावयाला नव्हतो ? अरे दैवा ! असा प्रश्न मला पडलाय ! तुमचे व त्यांचे निरनिराळे उद्योग जवळून पहात मला अधिक श्रीमंत होता आले असते की !

कंजूस 11/10/2018 - 20:55
दात आहेत तर चणे नाहीत!! डोंबिवलीत सुरुवातीला ज्या इमारतीत राहात होतो तिथे शेजारी नाट्यहौशी होता. मुंबइतल्या कापडगिरण्या बंद झाल्यावर त्याचीही नोकरी गेली. पण त्याची हौस कामाला आली. रविद्र नाट्यमंदिरासमोर राहायचा आणि फावल्या वेळात नाट्यमंदिरात पडून असायचा. सर्व नाटके तोंडपाठ त्यामुळे प्रॅाम्पटिंग, नेपथ्य मदत करत असे. मोरुच्या मावशीत माळ्याचे काम बदली म्हणून करत असे. मग मोरुच्या पथकाबरोबर भारत फिरला. तर सांगायची गोष्ट म्हणजे तो म्हणाला सांगाल ते पास घेऊन येतो ! मग फक्त मोरुची मावशी पाहिलं आणि दुर्गा झाली गौरी'ची मेटालिक कॅसेट साउंड ट्रॅक घरी ऐकला! नाटक समजत नाही त्याला फुकट पास!!

डॉ.विद्याधर ओक हे नांव हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात सुपरिचित आहे. स्व.गोविंदराव पटवर्धनांच्या या पट्टशिष्याने निष्णात हार्मोनियमवादक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहेच, शिवाय प्राचीन शास्त्रीय संगीताला आधुनिक विज्ञानाचा आधार देणारा अभ्यासू वृत्तीचा आणि एक कुशाग्र बुध्दीचा संशोधक, या क्षेत्रात नव्या दिशा चोखाळणारा आणि दाखवणारा द्रष्टा, त्यासाठी नवे तंत्रज्ञान विकसित करणारा उद्योजक अशी अनेक प्रकाराने त्यांची ओळख करून द्यावी लागेल.

"लाला! मी पास की नापास? "

श्रीकृष्ण सामंत ·

चतुरंग 02/07/2008 - 21:50
लालाचं व्यक्तिचित्र नेटक्या शब्दात उभं केलंत! (सामंतकाका तुम्ही पास! ;)) चतुरंग

आपल्याला आनंद द्दायला मी नक्कीच प्रयत्न करीन www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by श्रीकृष्ण सामंत

आनंदयात्री 03/07/2008 - 11:09
>>आपल्याला आनंद द्दायला मी नक्कीच प्रयत्न करीन वाचन आनंद असा स्पेसिफिक उल्लेख करावा असे वाटले ;) .. हो तर मग तुम्ही दिलेला वाचन आनंद मी घ्यायला मी उत्सुक आहे :) हलके घ्यालच :)

'लाला' हा शब्द सामान्यतः पठाणांना उद्देशून वापरला जातो. पण बुटकीशी व्यक्ति,जेमतेम साडेचार फुट उंची हे वर्णन पठाणाच्या देहयष्टीच्या विरोधात आहे. असो. एकंदर शब्दचित्र सुरेख जमलय. आवडलं.

In reply to by प्रभाकर पेठकर

सुंदर..., वरवर पहाता आपलं म्हणणं बरोबर आहे.पण ह्या व्यक्तिचं काय झालं ह्याच्या त्या पान खावून सर्व शरिर- थुंकण्याच्या निष्काळजीने -वरच्या पेहरावासकट लाला लाल लाल करून ठेवायचा. तशात तो उर्दूतही बोलायचा म्हणून कदाचीत त्याला "लाला" असं म्हटलं गेलं असावं.पठाण ह्या जमातीशी त्याचा काहीही संबध नसावा.असं मला वाटतं. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

लाला हा जन्माने मुसलमान होता असावा.बुटकीशी व्यक्ति,जेमतेम साडेचार फुट उंची,डोक्याला गुंडाळलेली पगडी (मुंडासे),खाली तोटके धोतर,वरती एक सदरा, रस्त्यातून चालताना मोकळे पाय,हातात आधाराला दांडका त्याची उंची थोडी त्याच्यापेक्षा जास्त,तोंड सतत पान खावून लाल दिसणारे,तिच तोंडातली लाल थुंकी दोन्ही बाजुच्या ओठाच्या फटीतून खाली ओघळणारी, मान सतत रस्त्याकडे खाली झुकलेली,चेहऱ्यावर दाढीचे खुंट,अशी ही व्यक्ति वेंगुर्ल्याच्या मेनरोड वरून सकाळी, मध्यांनी आणि तिन्हीसांजा झाल्यावर चालत जाताना हटकून दिसायची.वाटलंतर त्याला जाताना पाहून, दिवसाची घटका कळायला कठीण होत नसे. वेंगुर्ल्याचे लाल मातीचे त्यावेळचे रस्ते आणि

एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) भाग तिसरा : संघर्ष,लय,संवाद,जॉनर

भडकमकर मास्तर ·

मनिष 01/07/2008 - 15:51
उदाहरणांमुळे जास्त मजा येते आहे. अवांतर - नुकत्याच पाहिलेल्या 'आमीर' मधला क्लायमॅक्स ला प्रोटॆगनिस्टचा अंतर्गत संघर्ष आवडला.

In reply to by मनिष

मे अमीर पाहिलेला नाहीये... 'आमीर' मधला क्लायमॅक्स ला प्रोटॆगनिस्टचा अंतर्गत संघर्ष याबद्दल अजून माहिती द्या... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

वरदा 01/07/2008 - 20:15
हा भाग जास्त छान समजला...उदाहरणं जास्त किंवा सोपी असल्याने असेल कदाचित... माझी अशी एच आर इंटर्व्यु साठी तयारी झाली होती ते आठवलं कुठल्याही प्रश्नाला...माझ्यापुढचा प्रॉब्लेम, माझी थॉट प्रोसेस, माझं सोल्युशन आणि त्याचा रिझल्ट असं उत्तर द्यावं लागायचं...एक्दम तस्संच वाटलं मला... पु ले शु... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

विसोबा खेचर 02/07/2008 - 08:17
हा लेख पण लै भारी वाटला! मास्तर, तुमचा या विषयातला व्यासंग पाहून अंमळ थक्क व्हायला होतं! आपला, (नाट्यप्रेमी) तात्या.

आमच्या काही आवडत्या वेबसाईट्स..... १.playwriting seminars खूप मोठी साईट आहे ही.... http://www.vcu.edu/arts/playwriting/seminar.html २.होतकरू पटकथालेखकांसाठी http://www.toronto-filmmaking.com/screenwriting.html ३.पटकथालेखनासाठी काही टिप्स .by Billy Wilder http://www.writingclasses.com/InformationPages/index.php/PageID/270 ४.Emotional plots and suspense plots...भावकथा आणि गूढकथा (?) जोडीनं येतात इथे.... http://www.vcu.edu/arts/playwriting/plot.html ५.नाट्यलेखनाची मूलभूत तत्त्वे...by Charles Deemer http://www.geocities.com/cdeemer/Play.htm ६. आणि सबसे बढिया... लायोस ( की लाजोस) एग्रि भाऊचे पुस्तक...सर्जनशील लेखनाची कला. हे पुस्तक एफ्टीआयाय मध्ये लेखक मंडळी पाठ्यपुस्तकासारखे वापरतात, असे ऐकले. मला संपूर्ण इ बुक नाही सापडले पण या नोट्स सापडल्या..... भन्नाट प्रकार आहे... Lajos egri's book art of creative writing... http://www.darkcloudpress.com/%5Cblog_files%5Cegri_notes.pdf ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

लय (rhythm) गोष्टीला किंवा नाटकाला एक लय असते.प्रत्येक गोष्टीला लय असते. आपल्या आयुष्यात सुद्धा काही दिवस सावकाश जाणारे, कंटाळवाणे असतात तर काही घटनांनी भरलेले वेगवान असतात... लय सगळीकडेच असते. ..., गाण्यांमध्ये / संगीतात / नृत्यनाट्यात तर असतेच पण संवादांमध्ये , नेपथ्य आणि पात्रांच्या हालचालीमध्ये सुद्धा असते...रेसमध्ये धावणार्‍या घोड्याला स्वत:ची लय असते आणि सर्व धावणार्‍या घोड्यांची मिळून एक लय असते.... तेंडुलकर म्हणतात," अननुभवी लेखक लयीसाठी दिग्दर्शकावर अवलंबून असतो"...विशेषत: कादंबरीचे नाट्यरूपांतर किंवा सिनेरूपांतर करताना ती लय टिकवणं मुश्किल..... किंवा "वाडा चिरेबंदी त्रिनाट्याचे एकच नाटक करायचा एक प्रयत्न झाला, त्यात लय सांभाळणे अवघड जाते " मला स्वत:ला खूप पूर्वी वाचलेली आनंदाचं झाड कादंबरी आवडलेली होती पण चित्रपट अगदीच सुमार वाटला. घटनांसंदर्भात बोलायचं तर ही लयच वेगवान घटना आणि व्यक्तिरेखांची खोली यामधला तोल सांभाळणार असते. हॊरिझॊंटल ऎक्शन गोष्ट पुढे नेते. घटना घडवते. व्हर्टिकल ऎक्शन वेग कमी करते. व्यक्तिरेखांमधलं मानसिक चिंतन दर्शवते. ( आंतरिक अंतर्गत संघर्ष) गोष्टीतले अनेक पदर उलगडून दाखवते. या दोन्ही ऎक्शन आणि त्यातला तोल साधणं गोष्टीसाठी आवश्यक ... मारधाडपटात जास्त हॊरिझॊंटल ऎक्शन असते. चेकॊव्हच्या नाटकात व्हर्टिकल ऎक्शन जास्त असते. _____________________-- त्यामुळे उत्तम पटकथेत भांडण / मारामारीच्या सीननंतर लगेचच पुन्हा मारामारी नसते.... मग शांतता...प्रेमाचे दृश्य / किंवा फ्लॅशबॅक जुन्या आठवणी / गाणी / मानसिक चिंतन वगैरे... हा सारा लयीचा भाग आहे. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

संवादलेखन १. व्यक्तिरेखेच्या मनातलं जसंच्या तसं लिहू नये.. आपण रोजच्या आयुष्यात तरी कुठे अगदी खरं मनातलं बोलत असतो ? त्यांना उपरोधाने बोलूदेत, कधी खोटंसुद्धा बोलूदेत..कधी अडखळत, थट्टा करत,कधी कॊमेंट पास करत , टोमणे मारत संवाद पुढे सरकायला हवा. पात्राच्या मनात काय आहे हे अप्रत्यक्षपणे समजलं तर संवाद बरा चाललाय असं समजावं... २. कधीकधी काही अस्वस्थ हालचाली , वागण्याच्या पद्धती असतात ज्या पात्राच्या मनात काय चाललंय ते दर्शवतात.अशा छोट्याछोट्या हालचाली शोधून काढून त्यात्या प्रसंगात पात्रांना चिकटवाव्या लागतात. ( पात्रांची शारीरिक जडणघडण इथे उपयोगी पडते) ३. आपण स्वत:सुद्धा बर्‍याचदा मनातल्या मनात संवाद तयार करत असतो. पार्टीत किंवा गप्पा मारताना आपल्याला कधी मस्त कॊमेंट सुचते आणि बोलायची राहून जाते, मग आपण संवाद तयार करत राहतो की तो जर असं बोलला असता तर मी मग असं बोललो असतो वगैरे... ४.विशेषत: एकांकिकांसाठी संवाद छोटे हवेत.वेगवान हवेत. छोटे म्हणजे किती छोटे ? एका भाषणात एकच कल्पना. (one idea per speech) ५. संवाद लिहिताना संवाद सतत वाचत राहा आणि आता या वाक्यानंतर रंगमंचावर हजर पात्रांपैकी कोण यात व्यत्यय आणणार याचा अंदाज घेत घेत पुढे जा. ६. "दाखवा...सांगू नका." हे सर्वात महत्त्वाचं.. उदा. ती हुशार मुलगी आहे असं कोणी सांगण्यापेक्षा ते प्रसंगातून दिसूद्या. ७. कथेच्या रूपांतरामध्ये सूत्रधार गोष्ट सांगतो अशा युक्त्या शक्यतो वापरू नयेत. ( ती एक पळवाट आहे असं माझं वैयक्तिक मत) ८. बर्‍याचदा दोन ( विरुद्ध स्वभावाच्या सुद्धा) पात्रांच्या तोंडून लेखक स्वतःच बोलतो आहे असा भास होतो... कौशल्याचा भाग हाच की पात्रे जीवंत होण्यासाठी संवाद त्यांचे स्वतःचे वाटले पाहिजेत... त्याच व्यक्तिरेखा बोलताहेत असं वाटलं पाहिजे.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

हा माझा सध्याचा आवडता सिनेमा. गंमत म्हणजे ही सगळी सूत्रं त्याला चपखल लावून दाखवता येतात. पूर्वपक्ष? जशास तसे! हे सूत्र सगळ्या सिनेमात कुठेही उच्चारलं जात नाही. उलट चिरोंजीलाल अमेरिकेत निघून जाण्याच्या प्रयत्नात आहे. त्याला या प्रकरणात अज्याबात गुंतायचं नाही आहे, मग सूड-बिड तर दूरच राहिला. ते सभ्यपणे पोलिसांकडेही जाऊन पाहतात, पण तिथेही काही डाळ शिजत नाही. मग नाईलाज म्हणून म्हणा, योगायोगानं तो दलाल भेटतो म्हणून म्हणा, थोडी खुमखुमी असल्यामुळे म्हणा - मंडळी या अचाट प्लॅनमधे सामील होतात आणि बघता बघता गोष्ट वेग घेते. प्रमुख व्यक्तिरेखा - यातली सगळ्यांत लोभसवाणी आणि खरी महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे ती अनुपम खेरची. फसवणूक त्याची झालीय. या सगळ्या अव्यापारेषु व्यापारातून त्याला पैसे आणि घर तर मिळतंच. पण त्याचं हातून निसटणारं कुटुंबही अनपेक्षितपणे परत मिळून जातं. या प्रवासातून दिसणारा-घडणारा टिपिकल मध्यमवर्गीय, पापभीरू, कुटुंबवत्सल, नेक बाप अक्षरशः लाजवाब आहे. तो असतो पार्श्वभूमीला. सतत मोडता घालत, चिडत-वैतागत-खंतावत. पण ही गोष्ट त्याचीच. पोरगा मोठ्या कंपनीत आहे असं अभिमानानं कुणालाही सांगणं काय, किंवा 'इसके साथ कुछ चटनी वगैरा है क्या?' असं पिझ्झा पाहून वैतागानं विचारणं काय! त्याला त्याचा इतिहास-भूगोल आहे आणि तो नेमका दिसत राहतो. हेच इथल्या सगळ्या व्यक्तिरेखांना लागू होतं. भलेही चार फ्रेमकरता का पात्र पडद्यावर येईना, ते सकाळी चहा पीत असेल, की कॉफी हे अचूक सांगता येईल, इतकी स्पष्ट माणसं आहेत ही. त्यांच्या कपडे घालण्याच्या, खाण्या-पिण्याच्या पद्धती (बोमन इराणीचं नि:संकोचपणे आपल्याच घराच्या आवारात जरा लांब जाऊन लघवी करणं!), त्यांची भाषा (मेघनाच्या मैत्रिणीनं 'बास्टर्ड' अशी शिवी हासडणं!), त्यांचे मॅनरिझम्स (सतत घायकुतीला आलेला काहीसा नर्व्हस असा बापूंचा सेक्रेटरी)... आहाहा! संघर्ष - खोसला कुटुंब आणि बोमन इराणीचं पात्र (नाव विसरले!) यांच्यातला हा संघर्ष असं ढोबळ मानानं म्हणता येईल. पण तो बाह्य संघर्ष झाला. खरा संघर्ष अनुपम खेरचा. कुटुंबाशी, नव्या मूल्यव्यवस्थेशी आणि स्वत:शी. अशी फसवाफसवी करून पैसे परत मिळवावेत की न मिळवावेत, या त्याच्या 'भवति न भवति'मधून तो अचूक दिसत राहतो. तो पोरांवर चिडल्यासारखं करतो, पण पोटातून मात्र सुखावलेला. काळजी आणि कौतुक करणारा. तरी चिरोंजीलाल पैसे घेऊन आल्यावर त्याला पुरेसा आणि निर्भेळ आनंदही होत नाही. मासिक वाचल्याचं नाटक करत तो आपला व्हरांड्यातच. आपली प्रतिक्रिया नक्की काय असली पाहिजे, या संभ्रमात. हाच तो मास्तर म्हणत असलेला अंतर्गत संघर्ष असेल का? संवाद - 'हम आपके' मधे सुरुवातीला आलोकनाथ आणि कुणाचातरी एक संवाद आहे. कसला विनोदी आहे तो! तुम्ही भाऊ वारल्यावर पुतण्यांना कसं सांभाळलंत आणि त्यासाठी लग्न टाळलंत, तुम्ही किती थोर, असं आलोकनाथलाच सांगण्यात येतं! अरे, त्याला माहीत नाही का हे? ही कुठली निर्बुद्ध पद्धत पात्राची पार्श्वभूमी सांगायची? असो. असले आचरट संवाद 'खोसला..'मधे नाहीत. त्यातली सगळी माणसं आपापली, आपल्या वयाला-पेशाला-संस्कारांना साजेशी भाषा बोलतात. बिनदिक्कत (आणि गरज पडेल - नाईलाज होईल तेव्हाच!) शिव्या देतात. उगीचच्या उगीच भाषणं न झोडता एखाद्याच लुकनं आपलं म्हणणं स्पष्ट करतात. (चिरोंजीची बहीण अनुपम खेरला कसले खतरनाक लुक्स देत असते सतत! 'बाबा म्हणजे ना... ' असं कौतुक कम वैताग सरळ वाचता येतो त्यात.) लय - आधी काहीशी संथ आहे गोष्ट. सगळ्या माणसांशी पुरेशी ओळख होते आपली. सगळ्यांची गोची - स्वभाव - अडचणी - एकात एक गुंतलेल्या तंगड्या... सगळं स्पष्ट होतं. आणि मग सुरुवातीला मंद हुंकार देणार्‍या बाईनं हळूहळू अंगात येऊन जोरदार भीतीप्रद घुमायला सुरुवात करावी, तशी गोष्ट वेग घेत जाते! पेहेलवान, पोलीस, नाटक मंडळी, फिशरी जमिनीवरचं नाटक... अशा चढत्या क्रमानं गोष्टी घडत जातात. ही मास्तरांची हॉरिझॉण्टल लय असावी बहुधा. पण पार्श्वभूमीला त्याला आडवा छेद देत, अनुपम खेरची चलबिचल सदसद्विवेकबुद्धी असतेच. ती खरी गंमत! मास्तर, बरोबर आहे का हो?

In reply to by मेघना भुस्कुटे

मनिष 02/07/2008 - 11:00
'खोसला का घोसला' खरच छान आहे. ते व्हर्टिकल/हॉरिझॉण्टल माहित नाही. पण व्यक्तिरेखा फारच सुरेख लिहिल्यात आणि अभिनेत्यांनी त्याला मस्तच न्याय दिलाय. अनुपम खेर -- केवळ अशक्य!! अभिनयाचा वस्तुपाठ म्हणा ना...ते दारू घेऊन येतांना त्याचे चालणे? वा!!!

In reply to by मेघना भुस्कुटे

जशास तसे! हे सूत्र सगळ्या सिनेमात कुठेही उच्चारलं जात नाही. परफेक्ट...पूर्वपक्ष डायरेक्ट न सांगता आपोआप कळायला हवा... ते इथे एकदम जमतेच... ते सकाळी चहा पीत असेल, की कॉफी हे अचूक सांगता येईल, इतकी स्पष्ट माणसं आहेत ही. ...........आपली प्रतिक्रिया नक्की काय असली पाहिजे, या संभ्रमात. हाच तो मास्तर म्हणत असलेला अंतर्गत संघर्ष असेल का? एकदम सहमत. त्यातली सगळी माणसं आपापली, आपल्या वयाला-पेशाला-संस्कारांना साजेशी भाषा बोलतात आणि बापूचे ते पैसे पाहून घाबरून परत येणं, आणि अनुपमला सॉरी म्हणणं...आणि इतर सगळे बापूवर वैतागलेले असताना अनुपमने येऊन सांत्वन करणं.हा एक अप्रतिम सीन आहे... मग सुरुवातीला मंद हुंकार देणार्‍या बाईनं हळूहळू अंगात येऊन जोरदार भीतीप्रद घुमायला सुरुवात करावी, तशी गोष्ट वेग घेत जाते हे एकदम मस्त .. अनुपम खेरची चलबिचल सदसद्विवेकबुद्धी असतेच. ती खरी गंमत!... एकदम पटले.... ही व्हर्टिकल ऍक्शन.. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by मेघना भुस्कुटे

वरदा 02/07/2008 - 20:36
सॉलीड अभ्यास केलायस गं....माझा पण हा सगळ्यात लाडका सिनेमा.... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

In reply to by मेघना भुस्कुटे

महेश हतोळकर 02/07/2008 - 23:31
मेघना म्हणाल्या ते मनापासून पटले. उगीच संवाद बोलून पात्राच्या आडून प्रेक्षकांना त्याच पात्राची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न अगदीच हास्यास्पद होता. मास्तरांच्याच शिकवणीवरून वरील प्रसंग बदलण्याचा प्रयत्न. बघा कसा वाटतो ते. (अलोकनाथ व अजीत वाच्छानी अलोकनाथच्या दिवाणखान्यात बसले आहेत. अलोकनाथच्या मागे भिंतीवर त्याच्या भाऊ-भावजयीचा फोटो टांगला आहे.) अजीत वाच्छानी: भाईसहाब अब राजेश की शादी का दिल पे ले ही लिजीये| अलोकनाथ: हां भाईसहाब, (फोटोकडे निर्देश करून) भय्या भाभी की अशिर्वादसे राजेश बिजीनेसको अच्छी तरहसे संभाल रहा है| अब प्रेम भी MBA खत्म करके उसके साथ जुड जायेगा| आपकी नजरमे कोई लडकी हो तो बताईये| (एवढ्यात प्रेम येतो. तो खूप आनंदात आहे.) प्रेमः (दोघांच्या पाया पडून). प्रणाम चाचाजी| प्रणाम मामाजी| अजीत वाच्छानी: भाईसहाब लगता है प्रेम का Result उम्मीद के मुताबिक निकला है| क्यों बेटा? प्रेमः हा मामाजी! मै अव्वल आया| अजीत वाच्छानी: भई व्वा! कृपया हिंदी कडे थोडे दुर्लक्ष करा. खूप चिंध्या केल्या आहेत

In reply to by महेश हतोळकर

...मस्त रे "मी " खूप छान प्रयत्न... ... किंवा "शो डोंन्ट टेल "...पद्धतीने हे सारे अत्यंत कमी किंवा शून्य संवादात दाखवताही आले असते.... .... (आलोकनाथ मोहनीश बहलसाठी स्थळं पाहायला म्हणून हातात मुलींचे फोटो, पत्रिका आणि माहिती वगैरे घेऊन बसला आहे, त्याचे समोरच्या भाऊ आणि भावजयीच्या फोटोकडे लक्ष जाते ....फोटोवर क्लोज मग आलोकनाथवर क्लोज्...त्याला आठवतं, त्याच्या भावाच्या मृत्यूसमयी दोन घाबरलेली लहान मुलं काकाला बिलगतात आणि हा त्यांना डोळ्यातलं पाणी थोपवत शांत करतो,थोपटतो...पुन्हा आलोकनाथचा चेहरा दिसतो, त्याच्या डोळ्यात अश्रू पण चेहर्‍यावर समाधान...( भावाला दिलेलं त्या पोरांना नीट सांभाळायचं वचन पूर्ण केल्याचं वगैरे समाधान) . शेजारी स्थानिक वर्तमानपत्रात मोहनीशचा यंग बिझिनेसमन ऑफ द इयर वगैरे पुरस्कार स्वीकारतानाचा फोटो आहे, त्या फोटोकडं तो अभिमानानं पाहतो आणि साधारण पसंत असलेल्या मुलीचा फोटो त्याच्याशेजारी धरतो, नापसंत करतो, असं दोन तीन वेळा होतानाच प्रेम आलेला आहे...).... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

वरदा 03/07/2008 - 00:32
मस्तच आहे मास्तर्....मला आवडली ही आयडीया एक्दम्.... "मी" ची पण आयडीया आवडली... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

तुमच्या नाट्यलेखन तंत्राचे सगळे दुवे एकमेकांना जोडाल का? उदा. भाग २ च्या लेखाखाली भाग १ आणि भाग ३ चे दुवे ! तुमच्या नाट्यलेखन तंत्राचे सगळे दुवे एकमेकांना जोडाल का? आता तसे केले आहे. -- जनरल डायर. -------------------------- www.atakmatak.blogspot.com --------------------------

In reply to by संदीप चित्रे

भाग एक http://www.misalpav.com/node/2344 भाग दोन.. http://www.misalpav.com/node/2347 आता तसे केले आहे. -- जनरल डायर. धन्यवाद डायरसाहेब... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

दामिनी... कथासार : दामिनी (मीनाक्षी शेषाद्री) या गरीब मुलीचे ऋषी कपूरच्या श्रीमंत घरात लग्न होते, तिथल्या तरूण मोलकरणीवरती बलात्कार करताना आपल्या दिराला आणि त्याच्या काही मित्रांना दामिनी पाहते आणि कोर्टात सत्य बोलून गुन्हेगारांविरुद्ध साक्ष देते,( यात ती तिचा पती आणि सासरच्यांचा रोष ओढवून घेते) मात्र तिला कोर्टात वेडं ठरवलं जातं, घरातून हाकलून वेड्यांच्या इस्पितळात पाठवलं जातं.. तरीही ती तिथून पळून जाऊन सनी देओल या एका हुषार वकिलाच्या मदतीनं त्या मोलकरणीला न्याय मिळवून देते... पूर्वपक्ष जे सत्य आहे, ते कोणत्याही अडचणींशी लढून विजय मिळवतंच... प्रिमाईस मध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी आल्या पाहिजेत. १.भावना (character) : सत्य २.संघर्ष (conflict ) : संकटं , अडचणी ३.निराकरण / गोष्टीचे ध्येय. (goal / resolution) विजय मिळवतं.. म्हणजे काय तर दामिनी सनी मिळून सत्यासाठी अमरीष आणि सासरा यांनी उभ्या केलेल्या संकटावर मात करून न्याय मिळवतात. प्रमुख व्यक्तिरेखा १. दामिनी. (प्रोटॆगनिस्ट )सरळमार्गी, संस्कारी मोठ्या श्रीमंत घरात अचानक येऊन पडल्यावर मोलकरणीवरचा अत्याचार पाहते...खरं बोलण्यासाठी नवर्याचेही मन वळवू पाहते...पण कितीही संकटं आली तरी सत्याचीच बाजू घेते. २. ऋषी कपूर : द्विधा मनस्थितीत, न्याय आणि सत्य महत्त्वाचं की कुटुंब...? ३.अमरीष पुरी (ऎंटागनिस्ट): आरोपीचा महापाताळयंत्री वकील, याच्याकडे सर्व संकटांवरचे कायदेशीर (आणि इतरही) उपाय असतात. ४.सनी देओल : सर्वात भावखाऊ रोल.... पत्नीला न्याय मिळवून न देऊ शकलेला एक वैफ़ल्यग्रस्त, व्यसनी वकील पण दामिनीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रचंड प्रयत्न, ( हुशारी आणि मारामार्या दोन्हीही) करतो. ( बाकी मंडळीसुद्धा उत्तम ... सासू सासरे, ती सुटेल अशा समजुतीने खोटी साक्ष द्यायला तयार झालेले तिचे अगतिक वडील, परेश रावल,इन्स्पेक्टर कदम, तिच्या बहिणीचा मिमिक्रीवाला नवरा मस्त)... संघर्ष कोअर कॊन्फ़्लिक्ट सांगायचा तर सत्य विरुद्ध असत्य असा सनातन संघर्ष... बाह्य संघर्ष : दामिनीचं सत्य आणि तिच्या सासरकडचे लोक + अमरीष यांचं असत्य यांचा संघर्ष. शिवाय सनी आणि अमरीष यांचा संघर्ष आंतरिक संघर्ष : तिचं आणि तिच्या पतीचं नातं ... तो तिला " जाउदे ,विसरून जा" असं सांगतोय आणि ती सत्य आणि न्याय पकडून बसलीय. आणि या दोघांचाही अंतर्गत आंतरिक संघर्ष असा की नातं महत्त्वाचं की न्याय ? संघर्ष वाढवण्यासाठी आवश्यक असलेले प्लॊट मोटिव्हेटर्स. सूड : ऋषी कपूरशी आपल्या मुलीचे लग्न लावू इच्छिणारा एक उयोगपती सूड घेण्याच्या इच्छेने ( आणि ती वेडी झाली की आपल्या मुलीचे पुन्हा ऋषीशी लग्न करून देण्याच्या इच्छेने) दामिनीविरुद्ध अमरीषला मदत करतो. संकट : दामिनीविरुद्ध अनेक संकटे पाठलाग : तिच्या मागे पळणारे गुंड. प्रेम : पतीकडून पूर्वी मिळालेले प्रेम. फ़सवणूक : तिच्या भोळ्या बापाला खोटं सांगून तिच्याविरुद्ध खोटी साक्ष वदवून घेतात. छळ :वेड्यांच्या इस्पितळात तिला शॊक देतात. वाढता संघर्ष : सुरुवातीला तिला धमक्या, मग कोर्टात तिला वेडं ठरवून इस्पितळात, तिथे शॊक देतात... ती पळून सनीच्या आश्रयाला जाते... मग अटक करायला पोलीस पाठवतात ( सनीने अटकपूर्व जामीन घेतलेला असतो),गुंड पाठवतात ( सनी तुफ़ान मारामारी करतो)... अगदी शेवटी कोर्टात पोचायच्या वेळी तिच्यावर खुनी हल्ला होतो... तेव्हा पळतापळता एके क्षणी एका इमारतीच्या बांधकामाजवळ येऊन पोचते, ती हातात टिकाव घेऊन उलटी फ़िरते आणि गुंडानाच आव्हान देते... हे पाहून इमारतीतील बांधकामावरचे मजूर दगडाविटांच्या मार्याने गुंडांना पळवून लावतात..( हे दृश्य अप्रतिम आहे)... इकडे सनी अमरीषच्या वकिली डावपेचांना "तारीख पे तारीख .."चं भाषण करून वेळ काढतोय... :) .. मग ती नाट्यमयरित्या पोचते आणि साक्ष देते...( आरोपीच्या वकिलाला लै बोल लावते)..हा उत्कर्षबिंदू...पुढे फ़ॊलिंग ऎक्शन ... मग तिचा नवराही येऊन तिच्या बाजूने साक्ष देतो...कोर्टाचा निकाल... ती खुश...नवरा परत तिच्याबाजूने मिळाला.. या प्रत्येक रायजिंग कॊन्फ़्लिक्ट ( वाढत्या संघर्षा) च्या मुद्द्याला प्रेरणा ध्येय अडचणी आणि कृती यांचा संदर्भ देता येतो... संवाद पात्रे आपापले संवाद बोलतात.... अत्यंत स्टाईलाईज्ड अमरीष आणि सनी.. मजा येते. दामिनी आणि तिचे वडील साधं बोलतात.... ऋषीचं पात्र दोन्ही बाजू समजून घेत मध्यम बोलत राहतं... अमरीष अणि विशेषत: सनीचे संवाद अप्रतिम / अजरामर वगैरे :) ... "ये ढाई किलोका हाथ जब पडता है तो आदमी उठता नही उठ जाता है" किंवा इन्स्पेक्टरला " एक कागजका टुकडा मेरे पास भी है" " कदम संभलकर चल कदम" किंवा शेवटचा " तारीख पे तारीख.." संवाद. लय सुरुवातीला व्यक्तिरेखा कळेपर्यंत सावकाश.. गाणी ( बिन साजन झूला झूलूं, जबसे तुमको देखा है सनम)..वगैरे... ऋषीचं तिला मागणी घालणं , प्रेम...पण एकदा लग्नानंतर ती सासरी आल्यावर होळीच्या त्या दिवसानंतर घटना वेगात घडतात...हॊरिझोंटल ऎक्शन... त्यात तिचं आणि ऋषीचं मानसिक द्वंद्व.. तिथे व्हर्टिकल ऎक्शन.. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

मनिष 03/07/2008 - 12:29
मला पटकथा, प्रिमाईस आवडले तरी प्रत्यक्ष सिनेमा फार भडक/लाऊड वाटला होता.... सनीचा रोल तर फारच...नंतर एकदा चॅनेल सर्फ करतांना एका साऊथ च्या सिनेमात (नाव माहित नाही) तस्सच हात करून बोलणार वकिल पाहिला...फारच विनोदी वाटलं ते सगळ. त्यापेक्षा ऋषी कपूर चा अभिनय आवडला (ह्याला खरं तर कोणी नीट वापरला नाही, बराच चांगला अभिनेता अहे, फक्त फार फालतू रोल मधे अडकला)...त्याने त्याचे ते "दु:ख तो इस बात का है दामिनी, की तुम्हारे लिये मुझस, हम दोनोसे जरुरी कुछ और हे" अशा अर्थाच्या संवादाच्यावेळी द्विधा होणे किंवा व्याकूळ होणे खूपच चांगले दाखवले ... एकूणात मला "व्हर्टिकल ऍक्शन", "हॉरिझाँटल ऍक्शन" पेक्षा जास्त आवडते असे वाटते! - ( "व्हर्टिकल ऍक्शन" प्रेमी) मनिष

In reply to by मनिष

सनी देओल इतका परिणामकारक वाटलाय तो निव्वळ त्या स्क्रिप्ट आणि संवादांमुळे. एरवी तो कसला! ऋषी कपूर मलापण फार आवडतो यातला. त्याच्या ऑफीसातला एक सीन आहे ना, त्याचा कुणीतरी एम्प्लॉयी काहीतरी क्षुल्लक खोटं सांगतो त्याला, आणि ऋषी कपूर वेडावाकडा भडकतो. 'हम झूठ क्यों बोलते हैं यार?' हा त्याचा सवाल स्वतःलाच. कसला हताश वाटतो तो तेव्हा. तसाच त्याचा संताप. अमरिश पुरीची कॉलर धरून त्याला मधे न पडण्याबद्दल बजावताना काय बोललीय त्याची नजर. सनीला 'ए गोविंद..' म्हणून धमकावतानाचा त्याचा उफाळून आलेला संताप. काय चूक काय बरोबर, हे कळतं आहे खरं तर. पण चौकटीबाहेर जाऊन कुटुंबाला विरोध करण्याचा धीर नाहीय. ही तगमग आणि त्या पार्श्वभूमीवर दामिनीवरचं नितांत प्रेम. सनी त्याच्या पासंगालाही पुरायचा नाही.

In reply to by मनिष

हो, कोर्टात तिला वेडं ठरवताना तर सिनेमा एकदम मद्रासी टाईपचा भडक होतो... (९४ साली एका फॅमिली गेदरिंगला कोणती व्हिडीओ कॅसेट बघायला आणावी , या विचारात असताना सर्व लहानांनी मोठ्यांच्या मनावर भडक सिनेमामुळे वाईट परिणाम नकोत म्हणून हा सिनेमा आणायचे कॅन्सल केले होते...) :) .. आणि ऋषीचं काम फार छान आहे सिनेमात फक्त त्याला टाळ्या शिट्यांचे संवाद नाहीत इतकेच...( सनी फक्त स्क्रिप्ट + संवादावर मारून नेतो गोष्टी)... ते तारीख पे तारीख असं म्हणत जजवर ओरडणं मला अंमळ विनोदी वाटलं होतं... आणि ऋषीशी सनीची काही तुलनाच नाही हेही खरेच... :) असतात काही माणसं नशीबवान... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

१. आपल्या सर्व व्यक्तिरेखा नीट समजून घ्या... त्यांची सारी पार्श्वभूमी आणि विशिष्ट वागण्याची कारणमीमांसा ,प्रेरणा तयार असूद्या. २.नायक आणि खलनायक त्या सार्या व्यक्तिरेखामध्ये न तुटणारं एक नातं तयार होऊद्यात.का? अन्ब्रेकेबल बाँड का? तर ही विरुद्ध स्वभावाची मंडळी गोष्टीत एकमेकांशिवाय राहू शकायला नाही पाहिजेत. ... इंट्रेस्ट गुंतले नाहीत तर लोक सोडून जातील ना एकमेकांना.... ३. आपल्या गोष्टीची थीम ठरवा, मुख्य पात्राचं ध्येय काय ते ठरवा.... तुम्हाला काय सांगायचंय ? प्रीमाईस ४. मुख्य व्यक्तिरेखेकडे असा एखादा गुण किंवा एखादा विशिष्ट स्वभावविशेष हवा... विशिष्ट बाबतीत थोडासा चक्रम वाटणारा,शंभर टक्के अतिरेकी टोकाचा विचार हवा..( १०० % कंपल्सिव्ह ट्रेट).. आता दामिनीच्या उदाहरणात बघा... ती सत्य आणि न्यायासाठी इतकी टोकाला जाते, नवर्‍यापासून सगळ्यांशी लढते...आता एवढं काय गरज होती का करायची? पण नाही... चक्रमपणा असलेली माणसं काहीतरी करून दाखवतात...म्हणून उत्तम गोष्टीतलं पात्र विशिष्ट् बाबतीत चक्रम असतं... ५.आणि त्याच्या त्या विशिष्ट चक्रमपणामुळंच तो काही प्रसंगात संकटात अडकलाय.. इथे संघर्ष सुरू. ६.त्याच्या अशा स्वभाववैशिष्ट्यामुळं तो अधिकाधिक संकटात , अडचणीत सापडतो.... आणि अस्तित्त्वासाठी, जगण्यासाठी संघर्षात पडावंच लागतं.. अधिकाधिक गुंतत जावं लागतं...अधिकाधिक नाट्यमय घटना...व्यक्तिरेखा अधिकाधिक संकटात... ७. त्यातून बाहेर पडत पडत उत्कर्षबिंदू...आता माघार नाही... ८.उत्कर्ष निराकरण...त्यातूनच प्रेमाईस ची सत्यता व्यक्तिरेखांना आणि प्रेक्षकांना कळते...(काय धडा घेतला... काय शिकवण मिळाली??) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सहज 03/07/2008 - 17:55
मास्तर तीनही भाग, उदाहरणे, प्रतिसाद अतिशय वाचनीय.

मुक्तसुनीत 04/07/2008 - 01:55
आताच तीन्ही भाग वाचले. प्रचंड आवडले !! भुस्कुटे , मनिष आणि इतरांचे प्रतिसाद खूप एंजॉय केले ! भडकमकर, तुमच्याबरोबर एखादे नाटक पहायला आवडेल बुवा ! :-)

In reply to by मुक्तसुनीत

आताच तीन्ही भाग वाचले. प्रचंड आवडले !! भुस्कुटे , मनिष आणि इतरांचे प्रतिसाद खूप एंजॉय केले !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

genre याचा उच्चार बरेच जण जॉनर / जॉन्रा / जॅनर असा करताना ऐकले आहेत..मी सध्या जॉनर म्हणतो...ते काही फ़ारसे महत्त्वाचे नाही ... मी याला लेखनप्रकार , लेखन शैली म्हणेन... (अधिक चांगला प्रतिशब्द कोणीतरी देइलच..) उदा. सामाजिक, थरार, गूढ, फ़ॆंटसी, कॊमेडी, प्रेमकथा वगैरे वगैरे... आता थेट उदाहरणे घेऊ... समजा घटना हीच आहे ... एक मनुष्य त्याच्या मित्राच्या घरात येतो तेव्हा तो मित्र मेलेला आढळतो... आता याच घटनेचे जॊनरप्रमाणे पुढे कथानकाच्या ट्रीटमेंटमध्ये बदल होतात... उदाहरणार्थ... १.सामाजिक नाट्य : या मृत्यूला कोणती सामाजिक कारणं आहेत,जर समजा चोरी साठी हा खून झाला असेल तर गरीबी, बेरोजगारी.. किंवा हार्ट ऎटॆकने गेला असेल तर वेळेत वैद्यकीय सेवा न मिळणे... वगैरे वगैरे... यावर चर्चा... आसवं गाळत स्वगत वगैरे... २.सस्पेन्स.. ( गूढ उकलणे)...मित्र घरात इकडे तिकडे पाहतो, तर त्याला सिगरेटचे थोटूक , कोटचं तुटलेले बटन आणि लायटर सापडतो.. ( मित्र सिगरेट न ओढणारा वगैरे). ३.थरार... ( थ्रिलर).. घड्याळात बाराचे टोले पडतात..बाहेर काहीतरी आवाज होतो आणि खिडकीतून एक काळी आकृती जाताना दिसते... ४.फ़ॆंटसी :यमदूत मेलेल्या मित्राच्या आत्म्याला म्हणतो, " अरेरे, खरंतर या दुसया मित्रालाच मारायचं होतं...चूक झाली... आता काय करायचं?" ५. कॊमेडी.. : तेवढ्यात बेल वाजते,...मित्र घाबरून ते प्रेत लपवायच्या प्रयत्नाला लागतो... त्यातून गोंधळ उडतो... ६. रोमॆंटिक : मित्राच्या निराधार बहिणीला तो भावनिक आधार देतो आणि त्यातून त्यांचं प्रेम फ़ुलतं वगैरे... आता साधारणपणे एकच एक जॆनर नसतो तर त्याची मिश्रणे असतात... उदाहरणार्थ रोमेंटिक कॊमेडी.., सस्पेन्स थ्रिलर... सगळं तसं एकमेकांच्यात गुंतलेलंच असतं... फ़ार वेगळं काढून दाखवता येत नाही असं मला वाटतं... जॊनर हा प्रकार फ़क्त एकूण लेखकाला लिहायला सुरुवात करण्यापूर्वी एक मार्गदर्शक म्हणून असावा, की बाबा आपल्याला काय शैलीत लिहायचंय... एकूण त्या बाबतीत गोंधळ माज्ला की अवघड जातं.. .... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मुक्तसुनीत 04/07/2008 - 12:03
भडकमकरांची ही सगळी लेखमाला मला आवडली हे आधीच सांगितले आहे. असे म्हणतात की मोठ्या कलाकृतींमधे बर्‍याचदा , त्या त्या कलेच्या क्षेत्रातील नियम , संकेत मोडल्याचे दिसून येते. विशेषतः चित्रकलेमधे असे वारंवार घडले. (इम्प्रेशनिझम हे एक ठळक उदाहरण.) युलिसिस ही कादंबरी म्हणे प्रसिद्ध झाली तेव्हा "संज्ञाप्रवाही कादंबरी" हा प्रकार जन्माला आला. आपल्याकडील नेमाडे, मर्ढेकर यांची अशी "क्रांतिकारकाची" उदाहरणे आहेतच. माझी भडकमकरना अशी विनंती आहे की त्यानी जे नियम समजावून दिलेत त्याना छेद देणार्‍या नाट्य किंवा सिनेकृतींचाही उल्लेख उदाहरणांसकट करावा. नियम असतात ते मोडण्याकरता , हे चांगल्या अर्थाने खरे करणार्‍या , एकूण कलाप्रकाराची कक्षा वाढवणारे त्यांनी काही पाहिले काय ? असल्यास काय ते जाणून घ्यायला उत्सुक आहे.

In reply to by मुक्तसुनीत

अगदी मनातलं बोललात. परंपरेच्या विरोधात केलेली अर्थपूर्ण आणि अपरिहार्य बंडखोरी परंपरेला अधिक सशक्त करत जाते - बंडखोरीच्या अशा अनेक कड्यांची मिळून समृद्ध परंपरा तयार होत असते... अशा अर्थाचं एक विधान तेंडुलकरांनी कुठेतरी केलेलं आहे, त्याची आठवण झाली. नुकतंच वाचलेलं मनस्विनी लता रवींद्रचं 'सिगारेट्स' आठवतं आहे. या नाटकाला रूढार्थानं कथा नाही. प्रमुख पात्र असंही नक्की नाही. सगळेच आपापल्या परीनं चक्रम आणि चाकोरीतलेही असलेले तरुण. नायक नाही आणि खलनायकही. आपल्या लैंगिक - शारीरिक आणि मानसिकही - गरजांना हे सगळे जण रिऍक्ट होत राहतात. त्यांचे प्रश्न प्रामाणिक आहेत आणि उत्तरं शोधण्याचे प्रयत्न धीट. त्यात कसलाही अभिनिवेश नाही. सोवळेपणाचा आव वा दुटप्पीपणाही नाही. निव्वळ आयुष्याचा एक तुकडा. जिवंत. त्यांच्या प्रश्नांना उत्तरं मिळतात की नाही, त्यांच्या शोधात-लढ्यात ते यशस्वी होतात की नाही, ते सुखी होतात की दु:खी यांतल्या कसल्याही प्रश्नांची आयती उत्तरं मिळत नाहीत. जिथून नाटक सुरू होतं तिथे आणि जिथे संपतं तिथे - बाह्य परिस्थितीत काहीच फरक नाही. पण सगळ्यांच्या शरीरा-मनात काहीतरी घडून गेलं आहे - जे उत्तरं मागणार आहे. कुणी त्याला सामोरं जाईल, कुणी तोंड लपवून पळ काढील... आपापल्या वकुबानुसार. नाटक फक्त आपल्या आयुष्याचा हा एक अस्पर्श भाग आपल्या पुढ्यात आणून टाकतं. जिवंत. कसल्याही रूढ नियमांखेरीज. हे तर प्रायोगिक - त्यामुळे काहीश्या आडबाजूच्या - नाटकाचं उदाहरण झालं. पण मुख्य धारेत राहून 'दिल चाहता है'नं असे कितीतरी नियम मोडले. त्यालाही गोष्ट अशी नव्हतीच. फार तर ओढून ताणून तिला नायकांच्या 'ग्रोइंग अप्'चीही कथा म्हणता आलं असतं. पण त्यातही नायक नव्हताच, खलनायकही. एक आयुष्याचा रसरशीत तुकडा. काही घटना. काही प्रश्न. बस. काही म्हणा, नियम मोडायलाच मज्जा येते! :)

एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग पहिला. प्रिमाईस

भडकमकर मास्तर ·

चतुरंग 01/07/2008 - 02:58
चांगला चर्चाविषय. नाटकाच्या/चित्रपटाच्या लिखाणाची पार्श्वभूमी समजावून देणारा विषय. ('प्रिमाईस = प्रमेय' शब्द कसा वाटतो.) (प्लॉट = आराखडा?) चतुरंग

In reply to by चतुरंग

धनंजय 01/07/2008 - 03:13
चांगला चर्चाविषय. तंत्राबद्दल वाचून मला नाटक लिहायला शिकता येणार नाही, हे मान्य, पण नाटक बघताना अधिक आस्वाद घेता येईल. प्रेमिस/प्रिमाइस म्हणजे ज्यावर (नाट्य)वास्तू उभी करतो ते आधारस्थान, म्हणजे गृहीतक. प्रमेय म्हणजे जे प्रमाणांनी सिद्ध करायचे आहे ते. थोडक्यात "मत्सराने माणूस एकाकी पडतो" हे प्रिमाईस असले, तर नाटकाच्या शेवटी ते सिद्ध होत नाही - ते सुरुवातीलाच नाटककार + प्रेक्षकांना पूर्ण मान्य असते. हे मान्य असल्यामुळेच नाटकातल्या पात्रांच्या आयुष्यात जे काही नाट्यमय प्रसंग येतात ते प्रेक्षकांना पटतात.

In reply to by धनंजय

चतुरंग 01/07/2008 - 06:14
प्रिमाइस = गृहितक हे मान्य. ते सुरुवातीलाच नाटककार + प्रेक्षकांना पूर्ण मान्य असते - हे मात्र पटत नाही. नाटककाराला मान्य असणारच कारण त्यावरच नाटक आधारित असते पण प्रेक्षकांना गृहितक शेवटी पटणे/न पटणे हे नाट्य कसे उलगडत जाते त्यावर ठरते. ह्या गृहितकाची बांधणी ज्या तत्त्वांवर आधारलेली आहे ती जेवढी दृढ आणि ते हाताळण्याचे कौशल्य जितके जास्त तेवढी ते प्रेक्षकांना पटण्याची शक्यता जास्त. चतुरंग

In reply to by चतुरंग

उत्तम उपक्रम.. कदाचित माझ्यासारख्या दगडाला या धाग्याचा नक्की उपयोग होईल.. नाटककाराला मान्य असणारच कारण त्यावरच नाटक आधारित असते पण प्रेक्षकांना गृहितक शेवटी पटणे/न पटणे हे नाट्य कसे उलगडत जाते त्यावर ठरते. ह्या गृहितकाची बांधणी ज्या तत्त्वांवर आधारलेली आहे ती जेवढी दृढ आणि ते हाताळण्याचे कौशल्य जितके जास्त तेवढी ते प्रेक्षकांना पटण्याची शक्यता जास्त. हे देखील पटले.. पुण्याचे पेशवे

In reply to by चतुरंग

(प्लॉट = आराखडा) योग्य वाटतोय... पण प्रमेय काही कळत नाही , गणिती वाटतंय ... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by पिवळा डांबिस

चतुरंग 01/07/2008 - 07:51
प्रिमाईस -नाट्यलेखनतंत्राबद्दल लिखाण सुरु झाले की पिडाकाका झोपतात आणि संपले की पिडा काकांना उठवावे लागते! ;) चतुरंग

मास्तर, झकास झालीय सुरुवात. जाम मजा येतेय. पण जमतील तितकी उदाहरणं द्या बरं का. आणि इथेपण घरचा अभ्यास दिलात तरी चालेल. :) तुम्हांला सापडलेले दुवे इथे द्यायला जमतील का? (अवांतर वाचन करून जास्तीचा अभ्यास केलेला बरा असतो! वर्गात हमखास भाव खाता येतो!) पुढच्या भागाची वाट पाहते.

हे प्रतिशब्द चालतील का? terminology... (परिसंज्ञा) 1.premise - गृहितक 2.plot - कथानक 3.dramatic structure - नाट्य आराखडा 4.protagonist - मुख्य पात्र 5.conflict - संघर्ष 6.rhythm - ताल / लय (?) 7.genre - प्रकार (/जातकुळी?) 8.dialogue - संवाद 9.progression of play... नाटकाचा (कथानकाचा?) ओघ?

अमोल केळकर 01/07/2008 - 09:09
मस्त माहिती आर्टस् मधे ही एक सायन्स दडले आहे ( ऍरिस्टॉटलचे ड्रामॆटिक स्ट्रक्चर ) हे लक्षात आले. धन्यवाद या अभ्यासपुर्ण माहितीबद्दल

एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग पहिला. प्रिमाईस एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग दुसरा : प्रमुख व्यक्तिरेखा एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) भाग तिसरा : संघर्ष " नाट्यलेखन काय क्लासमध्ये शिकवून येतं का रे? " " काय एवढं शिकवतात रे लेखन कार्यशाळेत? " अशा काही सीनियर नाटकवाल्याच्या प्रश्नांना तोंड देत देत आम्ही एक दोन लेखन कार्यशाळांमध्ये जाऊन शिकून वगैरे आलो...

"इलो रे,इलो! कोकणातला पाऊस.

श्रीकृष्ण सामंत ·

वा सामंतांनु! येकदम झक्कास हो!! येकदम गावाकडेच नेऊन सोडल्यांत!! पाऊस येण्यापुर्वी एक दोन महिने अगोदर,लोकं आपआपली घरं शाखारून घ्यायची.मंगळौरी घरांची कौलं असलेले घरमालक कामगाराना घरावर चढवून कचरा साफ करून घ्यायचे. पावसाचं कौलावरून येणारं पाणी पन्हळातून खाली जमिनीवर आणल्या जाणाऱ्या ह्या पन्हळांना पण साफ करून घ्यावं लागायचं. पण दुसऱ्या प्रकारच्या कौलाना मात्र संपुर्ण काढून साफ करून मग नीट ओळीत लावावं लागायचं.त्याला घर शाखारून घेणं म्हणायचे. अगदी खरां हां!! आमच्या घराची शाकारणी करूक गावडे येयत. त्येंच्यासाठी दुपारच्याक आमची आजी फणसाची भाजी आणि उकड्या तांदळाची चवदार पेज करी. आम्ही भावंडा त्या पेजेवर नजर ठेऊन आसू. कधी आपल्याक थोडी ती मिळतां तेची वाट बघत!! आजी करवादां,"मेल्यांची भिकार लक्षणा बघा!! चांगलो बारक्या तांदळाचो भात खावचो सोडून मेल्यांका उकड्या तांदळाची पेज पिऊचे डोहाळे लागलेसत!!!":) हो आता पिच्छो पाडल्या शिवाय रव्हचो नाय! आता धुम्शाण खूप झालां बाबा! वषाड पडो! नुकसान केल्या शिवाय हो आता सोडूचो नाय! केंव्हा एकदा त्वांड घेवोन जाय्त असां झालां! असोच मधून मधून उघाडी ठेवून रव्ह.ह्या वेळेक तरी आमच्यावर उपकार कर! शीरा मारां!ही काय पडण्याची रीत झाली? गेले आठ दिवस जांवचां, नांव म्हणून काढणां नांय! गेले आठ दिवस नुसतां झोडपून काढल्यान! येतानां गर्जून येतां,आणि जातानां पण गर्जून जातां!" जुस्त हो, एकदम जुस्त!! आमचे वाडियेच्या लोकांच्या तोंडी नेहमी ह्याच!! आणखी येक, "आवशीक खावंक! या पावसान तर अगदी कहर केल्यान!! आंगावर शेवाळा उगवला!! मेल्या, आतातरी थांब!!":) पावसात सुळे,गुंजूले.शेतकं,काळूंद्री नावाचे मध्यम आकाराचे मासे मुबलक मिळतात.मग घरोघरी सुळ्याची खोबऱ्याच्या रसातली आमटी,आणि गुंजुल्याचं जागच्याजागी-घट्ट-तिरफळं घालून केलेलं तिखलं,लालबुंद कोकमाचं सार-सोलकडी- आणि साप्पाटून भात मिळाल्यावर काय विचारतां? आणि कुरल्यांचा सुक्या? तां विसरलांत काय सामंतानु? :) असो. गेले ते दिवस!! आता बसलोसोंव हंयसर साल्मन आणि कॅटफिश खात! शिरां पडो त्यांच्यार!!! आपलो (गुंजल्यांच्या तिखल्याच्या आठवणीन विद्ध!), पिवळो डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

पिवळो डांबिस ह्या नांव मालवणी माणसाकच शोभताला. मधून मधून असाच एखादां मालवणीत स्फूट बीट लिवल्यात तर मराठी आईक मालवणी मावशेची याद केल्याचा बघून नक्कीच आनंद होतोलो.तुमका नाय वाटणा? www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by श्रीकृष्ण सामंत

प्रमोद देव 07/07/2008 - 22:54
सामंतानु तुमी लिवाच! माका काय तुमची मालवणी नीट येऊची नाय . पण वाचाक आणि ऐकाक आवडता. तुमी एकेक गजाली लिवा बगु. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by पिवळा डांबिस

मिपावर प्रमोद देव आणि पिवळो डांबीस सारखे मालवणीतले दिग्गज आसत मग माका लिहूक नक्कीच बरां वाटताला www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by नंदन

यशोधरा,आणि नंदन, एव्हडे सगळे मालवणी बघून आयच्यान बरां वाटतां. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

विसोबा खेचर 01/07/2008 - 10:48
सामंतसाहेबांचा लेख आणि डांबिसरावाचा प्रतिसाद, दोन्ही आवडले. एकदम देवगडात नेऊन सोडले..! :) आपला, तात्या देवगडकर.

In reply to by विसोबा खेचर

तात्यानुं, तुमका आवडलां तेतुरंच सगळा भरून निघाला. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

चित्रा , आपल्याला आवडलं हे वाचून बरं वाटलं www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

दिनेश५७ 10/07/2008 - 16:35
सामंत भाऊ, आमास्नी तुमचा ता मालवणी काय जमत न्हाई, पन, येक सांगतू बगा. येकदम अस्सल माल. मागं कोकनात कणकवलीच्या मठाजवळच्या येका खानावळीत मटनाचा रस्सा भुरकला व्हता... आगदी, प्वोटाला तडस लागंस्तोवर हानला... ईक्ती वर्सं झाली, पन आजून ती चव त्वोंडात हाये. ह्ये वाचताना, पुन्ना त्योच खमंगपना आटवला... गजाली आजून येऊंद्यात म्हंतो मी.

In reply to by दिनेश५७

दिनेश५७जी, आभार,मालवणी हळू हळू जमेल.मी आपली घाटावरची भाषा अगदी प्रेम करून शिकत असतो.आता आता मला बरीच कळाया लागली आहे.आपल्याला मटनाचा रस्सा आवडला हे वाचून बरं वाटलं.मी सुद्धा तुम्हाला सांगतो कधी पुण्याला आलो की "बोकडाचे ताजे मटण" मुद्दाम चव लावून खातो.आणि इतराना त्याची शिफारस सांगतो. गजाली करून मी नक्कीच तुम्हाला आनंद देण्याचा प्रयत्न करीन www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

असुर 09/02/2011 - 20:52
च्यायला, ह्या कोकणातल्या पावसाने अगदी पिच्छा पुरवलाय! परवाच त्या 'गंध' मधला पाऊस पाहून वेड लागायला झालं होतं, आज हा सामंतकाकांचो लेख वाचून जीव गेलाच की अगदी! एकदाच अनुभवलेल्या कोकणातल्या पावसाच्या आठवणींमध्ये गुंतून पडायला होतंय!! उपाय आहे का काही यातून सुटण्याचा?? हा पाऊस पार म्हणजे जीवाला पीसे लावतोय!!! --असुर

"शीरा मारां!ही काय पडण्याची रीत झाली?" कोकणातला पाऊस अनुभवल्या शिवाय कसा असतो तो कळणं कठीण. "नेमिची येई मग पावसाळा" हे कुणीतरी कोकणातल्या पावसालाच उद्देशून म्हटलं असणार. मृग नक्षत्र ७ जूनला लागत.शेतकऱ्या पासून लहान मुला पर्यंत एप्रिल,मेचा उन्हाळा सहन करून झाल्यावर केव्हा एकदा पाऊस येईल असं होतं.मला आठवतं त्यानुसार, मृग नक्षत्र आलं की अगदी नियमीत त्या दिवसात पाऊस यायचाच. "घडाम,घुडूम आकाशात व्हायचं.कडाड,कुडुम" होवून लाखो दिवे पेटवावेत तसं आकाशात क्षणभर सगळं उजाळून जायचं. "इलो रे!

शिपल्यातुन अलग जसा मोती.......

शितल ·

आनंदयात्री 30/06/2008 - 19:07
>>कोणाचा धक्का लागु नये म्हणुन माझ्या हाताचे अलगत सरक्षण ही मी तुझ्या मागे राहुन तुला देत होतो, कसे कळ्ळे बॉ आमचे हे बारकावे तुला ? >>तुझ्या वर केलेल्या प्रेमात मी माझाच न उरलो. >>झेडुची केशरी फुले ओवता ओवता पाढरा दोराही केशरी झाला छान लिहलय शितल ! अभिनंदन !

मदनबाण 30/06/2008 - 19:53
व्वा ताई सॉलिड लिखेला है तुम... पुरा इस्टोरी इन डिटेल..क्या बात है..... आता तुझ्या प्रपोज केल्यावर आता निदान थप्पड तरी मिळणार नाही ह्याची खात्री झाल्यावर हे मात्र खरं आहे..च्यामारी ह्याचा पोरांना लय धाक असतो,,सर्वांन समोर इज्जत चा फालुदा होतो ना...तरी काही गडी यातही अनुभवी असुन नवीन नवीन पाखरांच्या मागावर असतात. (योग्य बसच्या शोधात) मदनबाण.....

वरदा 30/06/2008 - 20:07
तु तुझ्या मैत्रीणीला माझ्या शेजारी बसायला सागुन तु माझ्या पुढच्या सिटवर बसली होतीस, आणि मागे वळुन माझ्या चेहराचा रग कसा झाला आहे हे पाहायला विसरली नाहीस. सह्ही पोपट एकदम्...बिच्चारा मजनू... मस्त मज्जा आली..कॉलेजचे दिवस आठवले.....

इनोबा म्हणे 30/06/2008 - 21:46
तु बस मध्ये चढताना तुला कोणाचा धक्का लागु नये म्हणुन माझ्या हाताचे अलगत सरक्षण हा हा हा! मस्त निरीक्षण आहे तुझे. झेडुची केशरी फुले ओवता ओवता पाढरा दोराही केशरी झाला तसा माझ्या प्रेमाचा रग ही तुझ्या चेह-यावर दिसु लागला. मस्तच... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

अरुण मनोहर 01/07/2008 - 04:03
हे मस्तच! >>>पण आता तु मला विरोधाने का जमेत धरत होतीस हे माझ्यासाठी खुप होते. पहले इनकार फीर इकरार..... the saga continues!

ऋचा 01/07/2008 - 10:07
सहीच झालयं ग!!! तु बस मध्ये चढताना तुला कोणाचा धक्का लागु नये म्हणुन माझ्या हाताचे अलगत सरक्षण हे असं आहे तर!!! :) :) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

विजुभाऊ 01/07/2008 - 10:38
माताय.........मानले बॉ..... झेडुची केशरी फुले ओवता ओवता पाढरा दोराही केशरी झाला तसा माझ्या प्रेमाचा रग ही तुझ्या चेह-यावर दिसु लागला. हे केशरी धागे.......गुरफटुन जायला होते. ह........हः पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

अनिल हटेला 02/07/2008 - 15:47
शितल!! छान आणी हलकी फुलकी कथा ... पन ही " पी एम टी "होती का...... -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

मनस्वी 02/07/2008 - 16:09
>>झेडुची केशरी फुले ओवता ओवता पाढरा दोराही केशरी झाला छान लिहिलंएस शितल. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

मित्राला माझी बाईक हवी होती, म्हणुन मी त्याला, मला बस स्टॊप वर सोडा्यला सागितले, कॊलेजला बसने जाण्याची ही पहिलीच वेळ होती,आणि बस मधील गर्दी पाहुन परत बाईक कोणालाही द्यायची नाही असे मनात ठरवुन बस मध्ये कसाबसा चढलो, डाव्या साईडच्या बस सीट वर तु बसलेली होतीस, मी तुझ्या शेजारी लटकत होतो, बस चालु झाली, बसच्या प्रवासाची सवय नसल्याने हातातील दोन नोटबुक खाली पडल्या, त्या नेमक्या त्तुझ्या आणि माझ्या पायाच्या मध्येच पडल्या, त्या उचलण्यासाठी वाकण्याचा एक दोन वेळा प्रयत्न केला पण खुप गर्दी असल्याने मला वाकता ही येत नव्हते, हे तुझ्या लक्षात आले आणि तु मला ती उचलुन हातात दिलीस, आणि देताना एक मद स्मित केले

पाऊले चालती पंढरीची वाट

आनंद घारे ·

अमोल केळकर 28/06/2008 - 11:55
देहु , आळंदी आणी इतर ठिकाणाहुन येणार्‍या पालख्या, वारकरी ही अस्सल महाराष्ट्राची संस्कॄती, ओळख. भक्ती संप्रदायाचा एक वेगळा अविष्कार या वारीतुन दिसुन येतो. पांडुरंगाचरणी साष्टांग दंडवत !!

In reply to by अमोल केळकर

विसोबा खेचर 28/06/2008 - 16:27
देहु , आळंदी आणी इतर ठिकाणाहुन येणार्‍या पालख्या, वारकरी ही अस्सल महाराष्ट्राची संस्कॄती, ओळख. अगदी सहमत...! तात्या.

झकासराव 28/06/2008 - 14:21
वारकर्‍याना इतकं सगळं करण्याची ताकद कुठुन येते हे एक कोडच आहे. ते सोडवायच असेल तर वारीत सहभागी होण्यावाचुन पर्याय नाही. आमच्या निगडीतुन जाणारी वारी आणि भान हरपुन चाललेले वारकरी पाहुन माझ्या मनात देखील वारीला जावुया, भरपुर फोटो काढुया, भक्तीची ती नशा अनुभवुया असा विचार त्यावेळीपासुनच मनात बसलाय. :) बघु कधी जमेल ते. ह्यावर्षी हाती कॅमेरा होता. आणि वारी मुक्कामाला येते आमच्या आकुर्डीच्या विठ्ठल मंदीरात. म्हणुन वारी देहुतुन निघाल्याच्या दिवशी मंदीरात गेलो. तिथे तयारी सुरु होती. तिथल्या प्रमुख विणेकरी सोमवंशी बुवा याना भेटून वारी सध्या कुठवर आली असेल, इथे रात्री कार्यक्रम असतात अशी सर्व माहिती विचारुन घेतली. घड्याळात पाहिले तर वेळेच गणित जमवण थोड कठिणच होत तरिहि दुचाकी सोडली देहुरोडकडे. तर माझ नशीबच खराब. तिथे मुख्य पालखी अजुन हायवेला लागलीच नव्हती. आणि तिथुन देहुगावात जाणं दुचाकी घेवुन अथवा चालत हे दोन्ही शक्य नव्हत. पहिल कारण गर्दी आणि दुसर कारण मला हापिसात जायच होत सेकंड शिफ्ट ला :( मग काय तिथुनच परत आलो. वारीचा छानसा फोटु काढण्याच मनातच राहुन गेल. वारीचा रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या किर्तनाचा कार्यक्रम हा रात्री ११ वाजेपर्यंतच असणार होता. आणि मी हापिसातुन सुटणार १२:३० म्हणजे तो हि चान्स गेला. बर सकाळी वारी लवकर निघते ५:३० ला तेव्हा जाव अस ठरवल तर माझ्या कुंभकर्णी झोपेने घात केला. :( आता काय दुसर्‍यानी काढलेले फोटु पाहुन समाधान मानुन घ्यायच. नाही म्हणायला हे मी घेवु शकलो अशी काहि प्रकाशचित्रे आकुर्डीच्या विठ्ठल मंदीरात तयारी सुरु होती. हे काहि वारकरी जे मुख्य पालखीपासुन बरेच पुढे होते. जर प्रकाशचित्रे दिसत नसतील तर http://picasaweb.google.co.uk/zakasrao/Wari पहा. अवांतर : लोकसता मध्ये एका पुस्तकाची ओळख आली होती. हे देखण पुस्तक लिहिल आहे संदेश भंडारे यानी जे एक उत्तम फोटोग्राफर आहेत. त्यानी "वारी" अनुभवुन त्याची प्रकाशचित्रे व त्यांचा अनुभव लेखन अस एक पुस्तक लिहिल आहे. त्याचा दुवा सध्या सापडत नाहिये. कोणाला माहीत असल्यास द्या. ता क: लोकसत्ता मधील लेखाची लिन्क सापडली नाही पण सन्देश भंडारे यांनी काढलील वारीची प्रकाशचित्रे पहायला मिळतील http://www.sandeshbhandare.com/html/assignments/self/Wari.htm इथे. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

या वर्षीच्या आषाढीच्या वारीची सुरुवात करण्यासाठी भक्तगण देहू व आळंदीला जमा झाले असल्याची बातमी आली आहे. आता त्यांच्या दिंड्यांच्या मार्गक्रमणाचा वृत्तांत 'आँखो देखा हाल'च्या थाटात पुढील पंधरवडाभर सर्व प्रसिध्दीमाध्यमांत येत राहील. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातूनच नव्हे तर शेजारच्या कर्माटकांतूनसुध्दा लक्षावधी भाविक पायी चालत पंढरपूरपर्यंत जातील. त्यातल्या अनेकांची ही पदयात्रा सुरू झालेलीही असेल. कांही लोक आपापल्या कुवतीनुसार त्यात थोडा काळ सहभाग घेऊन मिळेल तेवढा आनंदानुभव घेतील व पुण्य गांठीला बांधतील. हे सगळे संपूर्णपणे स्वेच्छापूर्वक चालत आले आहे.

ही तुमचीच मुलगी का?

श्रीकृष्ण सामंत ·

शितल 30/06/2008 - 01:31
लेखचा आशय मनाला भिडुन जातो, छान लिहिले आहे.

कुणी तरी म्हटलंय. " एखाद्दयाला समजून घेण्यातच वेळ घातला तर त्याच्यावर प्रेम करायची वेळच निघून जाणार.

आतला आवाज

श्रीकृष्ण सामंत ·

विसोबा खेचर 28/06/2008 - 18:07
छोटेखानी, परंतु चांगला लेख... मला वाटतं,आपल्या आतल्या आवाजाची जी शक्ति आहे ती आपल्याला आपल्या कठीण प्रसंगात मदतीला येते. सहमत आहे. मलाली प्रत्येक वेळेस माझ्या आतल्या आवाजाचीच मदत होते! सामंतसाहेब, आपल्या आईच्या आठवणीही हृद्य आहेत. वाचून बरं वाटलं! आपला, (मातृभक्त) तात्या.

तात्याराव, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

"मला वाटतं,आपल्या आतल्या आवाजाची जी शक्ति आहे ती आपल्याला आपल्या कठीण प्रसंगात मदतीला येते.मला वाटतं,लोक सुखासुखी कुठचीच गोष्ट जावू देत नाहीत.काही किंमत पडली तरी ते दुसऱ्याला पण मदत करतात.

प्रेमचि चटणी,प्रेमचि भाकर.

श्रीकृष्ण सामंत ·

मयुरयेलपले 22/06/2008 - 23:27
छान आहे... फक्त प्रेम,अगदी सिम्पल,सरळपणे देवू केलेलं प्रेम होतं.सुरवातीपासूनचं ते प्रेम होतं.त्यात निव्वळ माणुसकी,काळजी,संरक्षणाची खात्री,आणि एक विश्वासाची हमी होती. प्रेम करण्याच्या क्रियेत बदल घडवून आणण्याची क्षमता असते ह्या क्षमतेवर माझा विश्वास आहे. प्रेमातून जखम सुद्धा भरून आणून बरं करण्याची शक्ति आहे. आपला मयुर

चतुरंग 23/06/2008 - 00:16
पण असं चटकन का संपवलंत? अजून लिहायला हवं होतंत. लहानग्या लूकचा पोरका, बापुडवाणा चेहेरा डोळ्यांसमोर आला आणि छातीत हललं! प्रेमात फार मोठी ताकद असते हे नक्कीच! चतुरंग

शितल 23/06/2008 - 02:50
प्रेमाने सर्व काही साध्य होते, हे खरे. नशिबवान आहे पास्कल, जगात आई-वडिला॑ शिवाय जगणे ही कल्पना ही शक्य नाही, आणि असे प्रेम आई - वडिला॑शिवाय कोणी ही देऊ शकत नाही

विसोबा खेचर 23/06/2008 - 05:30
प्रेमातून जखम सुद्धा भरून आणून बरं करण्याची शक्ति आहे. सहमत आहे.. आपला, (प्रेमळ) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्राजु 23/06/2008 - 09:41
प्रेमामध्ये जखम भरू काढण्याचीच नाही तर.. पुन्हा नव्याने होणारी जखम जास्ती खोलवर न होऊ देण्याचीही ताकद आहे.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चाणक्य 23/06/2008 - 12:37
बिचार्‍या लूक वर काय परिस्थिती ओढवली. त्याचं नशीब चांगलं म्हणून त्याला मेरी आणि पास्कल सारखे आई-वडील मिळाले. मेरी आणि पास्कलचं खरंच कौतुक आहे चाणक्य

“प्रेम करण्याच्या क्रियेत बदल घडवून आणण्याची क्षमता असते ह्या क्षमतेवर माझा विश्वास आहे. प्रेमातून जखम सुद्धा भरून आणून बरं करण्याची शक्ति आहे.” बऱ्याच वर्षानी मी गोव्याला माझ्या मोठया वहिनीच्या माहेरी गेलो होतो.लहानपणी नेहमीच उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या वहिनी बरोबर मी गोव्याला जात असे. त्यामुळे त्यांच्या आजूबाजुच्या लोकांशी पुर्वी पासून ओळख होती.वहिनीच्या माहेरच्या बंगल्याच्या सभोवताली मच्छिमार लोकांची वस्ती होती.घर समुद्राच्या जवळ असल्याने ही अशी मिक्स वसाहत तयार झाली होती. आणखी बरेच बंगले आजुबाजुला होते.पण शेजारच्या झोपडी वजा घरात एक ख्रिश्चन कुटुंब राहत असे.