"सामावून घेण्यावर माझा विश्वास वृद्धिंगत झाल्याने मला वाटू लागलं की मी आणि माझी आई येईल त्या प्रसंगातून मार्ग काढून जीवंत रहाण्याची धडपड करूंच."
मी आणि माझी आई संध्याकाळच्या उलगत्या बाजारात जाऊन आमची घरासाठी रोज लागणारी खरेदी करतो.उलगत्या बाजारात जाऊन खरेदी करण्याचा फायदा असा की सकाळ पासून आलेले विक्रिकर-लोकं सध्याकाळी अगदी थकून जातात.आणि उरली सुरलेली भाजी,फूलं,फळं कमी किंमतीत किंवा वाटे काढून विकून टाकतात.फळं थोडी जास्त पिकतात,भाजीचा ताजेपणा कमी होतो,आणि फूलं तर बरिच कोमेजलेली असतात.ही फूलं देवाला वाहिली तरी त्याचं त्याला काहिच वाटणार नाही असं मनात येतं.आमच्या परिस्थितीचा कुणावरही ठपका ठेव