मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लेख

आनंदयात्रिकाला सलाम आणि प्रबोधनकर्त्याला दंडवत

आनंद घारे ·
आज महाराष्ट्रदिनाच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातल्या दोन महापुरुषांचा 'महाराष्ट्रभूषण' हा खिताब देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. या दोन्ही व्यक्ती महाराष्ट्राला भूषणभूत आहेत हे सर्वांना माहीतच आहे. कविवर्य मंगेश पाडगांवकर नेहमी प्रसिध्दीच्या झोतात असल्यामुळे त्यांचे नांव सर्व मराठीभाषिकाच्या चांगल्या परिचयाचे आहे, तर डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांनी प्रसिध्दीपासून दूर राहून समाजाचे प्रबोधन करण्याचे सेवाव्रत गेली चौसष्ठ वर्षे अव्याहतपणे चालवले आहे.

आवाज

हेरंब ·
जन्माला येणार्‍या बाळाचा पहिला आवाज ऐकायला सगळे किती उत्सुक असतात! खळखळणार्‍या पाण्याचा, वार्‍याचा, पावसाचा किंबहुना निसर्गातील प्रत्येकच गोष्टीचा आवाज हा कानांना सुखदच असतो. हिमालयात फिरायला गेल्यावर तर हे फारच जाणवते. पण हाच आवाज शहरांत फारच भीतिदायक रुप धारण करतो. शांतताप्रिय लोकांचे म्हणणे या गदारोळांत ऐकतो कोण? त्यांत ते संख्येने फारच कमी! तरी त्यातल्या कांहींनी दुर्दम्य चिकाटीने गोंगाट हा आरोग्याला कसा हानिकारक आहे हे सप्रमाण सिद्ध केले आणि सरकारला व न्यायालयांना तसे कायदे करावयास भाग पाडले. पण तिथेही तथाकथित धर्म आडवा आला.

प्रतिमा सृष्टी

मन ·
काल घरी गेलो. दाराने रोजच्यासारखे स्वागत केलेच नाही. काय झालयं तेच कळेना.म्हटलं जाउन त्या आरशाच्या काचेला विचारावं झालय तरी काय? तर तीही जागची गायब. काहिच कळेना.अजब शांतता.माझे रूम मेट्स ते दार, ती आरशाची काच धड कोणीच दिसेना. जे दिसताहेत् ते बोलेनात.वैतागुन खिडकीवर ओरडलो:- "अरे, झालय तरी काय् ईथे?काल् पर्यंत तर हे दार आणि आरसा प्रेम गीत म्हणायचे.मला जरा बर वाटायचं आनंदी जोडप्याकडे पाहुन.ह्यांना प्रायव्हसी हवी म्हणुन मी नाइट शिफ्ट सुद्धा घेतली होती ना मागे(आणि म्हणुनच लेका तुझा जन्म झाला) काय,चाललयं तरी काय ईथे?" खिडकीने एक स्माइल दिली.(गूढ, गमतीशीर स्माइल.खिडकी खुश आहे का उदास तेही कळेना.) मल

संवयी

हेरंब ·
माणूस हा संवयींचा गुलाम असतो असे म्हणतात. यापैकी कांही सभोवतालच्या परिस्थितीमुळे लागतात, कांही आनुवंशिक असतात तर कांही मुद्दामहून लावून घेतलेल्या असतात. प्रत्येक आईवडिलांना (स्वतःला नसल्यातरी) आपल्या मुलांना आदर्श संवयी लागाव्या असे वाटत असते. प्रत्यक्षांत मात्र तसे होत नाही. संवयी चांगल्या की वाईट हे ठरवण्यापेक्षा त्यांचे फक्त निरीक्ष्ण करणे जास्त मनोरंजक ठरेल. सकाळी उठण्याचे प्रकारच पहा, लवकर उठणारे, अतिलवकर उठणारे, उशीरा उठणारे आणि चक्क बारा वाजता उठणारे! त्यातले पोटप्रकार आणखी मजेशीर.

लास वेगास!

पिवळा डांबिस ·
लास वेगास - सिन सिटी (पापांचं शहर)!!
... ...
गेल्या आठवड्यात लास वेगासला गेलो होतो. तसा मी तिथे पूर्वी गेलो आहे. एकतर ते एल्.ए. पासून जवळ (म्हणजे ड्रायव्हिंग करून जाण्यासारखं) आहे, आणि दुसरं म्हणजे तिथे बर्‍याच कॉन्फरन्सेस होत असतात. यावेळी असाच एका कॉन्फरन्सला तिथे गेलो होतो. परत आल्यावर सहज कुतुहलाने पाहिलं तर मिपावर या शहरावर काही लेखन केलेलं आढळलं नाही. अमेरिकेत रहाणारे बहुतेक भारतीय कधी ना कधी लास वेगासला जातातच.

भाषा आणि प्रमाण

नीलकांत ·
गेल्या काही दिवसांपासून(ण) मिसळपाव वर शुद्धलेखन(ण) आणि(न) प्रमाण(न) भाषेचा जयघोष चालला आहे. काय आहे हो ही प्रमाण(न) भाषा? प्रमाण कशासाठी हवं? आणि प्रमाणा(ना)चं प्रमाण किती असावं? 'चामुंडराये करविले' श्रावणबेळगोळच्या (हे कर्नाटकात आहे) गोमटेश्वराच्या पायाशी दगडात कोरलेलं पहिलं मराठी वाक्य. त्याकाळी मराठीला प्राकृत म्हणत असत. त्यानंतर आमच्या अमृतातेही पैजा जिंकणार्‍या मराठीत 'ज्ञानेश्वरी' लिहिल्या गेली. सुरुवातीला मराठीत पद्य रचनाच लिहिल्या जायच्या. लिहायला कमी जागा, गेयता असल्यामुळे सहज मुखोद्गत होत असत आणि सहज प्रसार होई.

साहेबलोक !

संदीप चित्रे ·
पोटासाठी दाही दिशा, फिरवीशी तू जगदीशा! नोकरीठेप भोगत, देश-विदेश फिरताना, तरतर्‍हेचे मॅनेजर भेटतात / दिसतात. कधी आपले मॅनेजर म्हणून, कधी दुसर्‍या टीमचे मॅनेजर म्हणून, कधी आपल्या मित्र/मैत्रिणींचे मॅनेजर म्हणून तर कधी टी.व्ही, वृत्तपत्रे अशा मिडीयांतील बातम्यांमधून! आपल्या सुदैवाने बरेचजण चांगले असतात पण काही नमुनेही भेटतात !! काहीजण तर नमुनेदार असले तरी मॅनेजर म्हणून चांगले असतात ! तर, ही आहे साहेबलोकांची एक मिष्किल झलक ! थोडं हसायचं आणि सोडून द्यायचं ! गंभीरराव आपण interview देतानाच अंदाज येतो. ह्यांचा चेहरा अतिशय गंभीर आणि आपल्यावर डोळे रोखून बघायची सवय.