मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लेख

जायंट मीटरवेव्ह रेडीओ टेलिस्कोप

३_१४ विक्षिप्त अदिती ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
वाचायला सुरूवात करण्यापूर्वी: या लेखातली भाषा बोजड असू शकते आणि विज्ञानाची आवड नसणाय्रांसाठी हा लेखच कंटाळवाणा असेल. तर या प्रमादांबद्दल आधीच क्षमा मागते. पुणे-नाशिक रस्त्यावर कधी गेला असाल तर जुन्नर किंवा नारायणगावच्या जवळ मोठमोठाल्या डिश अँटेना दिसतात. बय्राचदा त्या आर्वीच्या सैनिकी किंवा व्ही.एस.एन.एल.च्या संपर्क दुर्बिणी असतात पण कधीमधी आमच्या संशोधनाच्या दुर्बिणीही दिसतात. तर या दुर्बिणी दिसतात आपल्या डीश अँटेनासारख्याच (आणि त्यांचं कामही साधारण सारखंच असतं).

एक पान हिरवंच असताना देठातून तुटलं

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नांव "सागर" ,पण खरंच सागरा सारखा विशाल होता. मोठ्ठे डोळे,लांब रुंद कान आणि गुबगुबीत शरिराचा सागर मी त्याच्या लहानपणी पाहिला होता. आता जवळ जवळ त्याच्या पस्तीस वर्षावर तो ईहलोकाच्या यात्रेवर आम्हाला एकटेच सोडून निघून गेला. म्हणतात, देवाला चांगले लोक आवडतात.पण पुरंपुरा चांगुलपणा तरी दाखवायला देवाने त्याला आयुष्य द्दयायला नको काय?का, तो त्याला एव्हडा आवडला होता का?.मग ह्या नावडत्या दुनियेत त्याला त्याने मुळात पाठवलंच कशाला?.कां त्याच्या आईला अगोदरच कमी का दुःखं होती?. बिच्याऱ्याचे वडील तो खूपच लहान असताना त्याला सोडून गेले.एक त्याला धाकटी बहिण मागे ठेवून गेले.

मी शिकले माझ्या वडलांकडून

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"काही गोष्टी त्यानी मला नकळत शिकवल्या.जसं काम करून आल्यावर धडपडत जिना चढून वर येवून ते त्यांच शेवटचंच येणं कसं झालं, ते पण." ज्यावेळी वृंदा मला बोलता बोलता असं म्हणाली त्यावेळेला मला निश्चीतच वाटलं तिला काहीतरी मेसेज मला द्दयायचा आहे.वृंदा माझ्या एका मित्राची मुलगी.दहा वर्षापुर्वी तिचे वडील निर्वतले.त्यावेळेला मी तिला भेटलो होतो.त्यानंतर पांच वर्षापुर्वी मी तिला तिच्या लग्नात भेटलो.सध्या ती न्युझरिपोर्टरचं काम करते. मला म्हणाली, "काका,तुम्ही तुमची तब्यत चांगली ठेवली आहे.तुम्ही सुरवातीपासून काम करण्य़ाची एक शिस्त ठेवली होती.

इट मेक्स सम सेन्स.......आठवण.

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
शिला मला म्हणाली, "मला वाटतं स्मरण शक्ति आणि आठवण यात फरक असावा.कारण स्मरण-शक्तिचा मेंदूशी संबंध असावा,आणि आठवणीचा मनाशी संबंध असावा." असं काही तरी विरोधाभास होईल असं स्टॆटमेंट करून शिला माझ्याकडून कसा प्रतीसाद येतो त्याची वाटच पाहत होती. मी म्हणालो, "शिला तुला खरंच काय म्हणायचं आहे ते जरा मला कळू दे." शिला म्हणाली, "चव्वेचाळीस वर्षावर माझ्या नवर्‍याचं काही खरं नाही हे मला आमच्या डॉक्टरांकडून कळलं.रमेश जास्त दिवस काढणार नाही असं ते मला म्हणाले.त्याची दोन्ही फुफुसे कॅन्सरने भरली होती. "बाळं " म्हणतात ते माझ्या वृद्ध आईला झालं होतं ज्याला, आता आपण अल्झायमर म्हणतो.

आमचे मित्र श्रीयुत "मी,माझं,मला"

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"मला वाटतं आपण नेहमी एखाद्दा गोष्टी बद्दल, प्रश्न करावे,साशंक व्हावं,शोध करावा,पटकन विश्वास ठेऊ नये अशा वृत्तीचं असावं.पटकन विश्वास ठेवायला किंवा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवायला मी नेहमीच नकार देतो.

मासे पण शिकवतात

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"आयुष्यात येणार्‍या अडचणीना सामोरं कसं जायचं हे पाण्यातल्या प्रवाहाबरोबरच्या भोंवर्‍यात तरंगून आपला जीव कसा वाचवावा हे समजणार्‍या माश्याकडून मी शिकलो" हे दत्तुचे शब्द माझ्या चांगलेच लक्षात राहिले आहेत. त्याचं असं झालं त्यावेळी आम्ही वरसोवाला राहत होतो.आमच्या घराजवळ "फिशरीजरिसर्च इंन्सटीट्युट" आहे.एकदां मला त्यांच्या डिग्री समारंभाच्या कार्यक्रमाला आमंतत्रण होतं. त्या गर्दीत मला एक ओळखीचा चेहरा दिसला.त्याला ओळख विचारावी म्हणून त्याच्या जवळ जावून मी प्रश्न विचारण्याचं साहस केलं "काय रे तू घोडग्यांचा दत्तु का?" तो म्हणाला "होय.

"लाख चूका असतील केल्या"

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
हे गृहस्थ आमचे शेजारी.शिरोडे गावाला जाताना नदी काठी एक टांक नावाचं छोटंस गांव आहे.भाऊ टांककार त्या गांवचे. आमच्या घराच्या बाजुला त्यांचे वखारवजा घर होतं. चांगलं चिरेबंदी भिंतीचं,पुढचा भाग माल ठेवण्यासाठी जरुरी पेक्षा जास्त उंच आणि ऐसपैस,आणि त्याच्या मागे पांच,सहा खोल्या आणि मागे मोठे पोरस,त्यात चार पाच माडाची फळ देणारी झाडं,मधेच एक खोल विहीर एक उंच सोनचाफ्याचं झाड,आणि कपडे धुण्यासाठी जागोजागी,ढोण्या (कपडे धुण्यासाठी सिमेंटची बनवलेली टाकी)होत्या.

पानसेबाई

संदीप चित्रे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
“अरे व्वा ! शाळा सुरू होऊन बरेच दिवस झाले. आपल्या तिसरीच्या बाई अजून कुणालाच 'चेंगट' किंवा 'शुंभ' म्हणाल्या नाहीयेत !” पानसेबाईंची पहिली आठवण मनात ठसलीय ती अशी !! कोवळ्या वयाचं मन अगदी टीपकागद असतं ! चांगलं-वाईट जे कानावर पडेल तर अगदी आतपर्यंत शोषलं जातं. दुखऱ्या शब्दाने टच्चकन पापणीत येतं आणि हसऱ्या शब्दाने डोळ्यांत आभाळ मावतं ! आमच्या पानसेबाई दिसायला कशा होत्या सांगू? अशा छान शिडशिडीत होत्या. रंगाने तांदळापेक्षा गव्हाजवळच्या होत्या. पाठीचा कणा ताठ होता. चालणं झपझप नि हालचाली झटपट होत्या. आवाज खणखणीत होता पण बोलणं मात्र मृदू होतं. खरंतर नुसतंच आवाज खणखणीत होता हे सांगून भागणार नाही.