✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

डॉ.विद्याधर ओक

आ
आनंद घारे यांनी
गुरुवार, 07/03/2008 - 22:56  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8467 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर गुरुवार, 07/03/2008 - 23:24 नवीन

डॉ ओक..

गेली अनेक वर्ष डॉ ओकांचा आणि माझा खूप जवळचा परिचय आहे. माझे त्यांच्या घरी अनेकदा जाणेयेणे सुरू असते. त्यांच्या घरी गेलो असताना त्यांनी निर्मिलेल्या मेंन्डोलियम या वाद्याबद्दल त्यांनी अगदी माझं समधान होईस्तोवर माहिती पुरवली. खूप वाजवूनही दाखवलं. त्यांचा अभ्यास अणि त्यांचं संशोधन हे निश्चितच वाखाणण्याजोगं आहे! "अरे तात्या, अगदी केव्हाही ये, मस्तपैकी पेटी वाजवत बसू!" असं डॉक्टर मला नेहमी म्हणतात! :) त्यांचे चिरंजीव आदित्य ओक हाही माझा चांगला मित्र आहे. तोदेखील गायनाच्या साथीला हार्मिनियमची संगत चांगल्या प्रकारे करतो. राहूल देशपांडे सोबत हार्मोनियम-साथीदार म्हणून नुकताच तो अमेरिकेच्या दौर्‍यावर गेला आहे... आपला, (गोविंदरावांचा भक्त) तात्या.
  • Log in or register to post comments
व
वाटाड्या... गुरुवार, 07/03/2008 - 23:51 नवीन

वा : फारच छान माहिती...

अशी माहिती बहुतेक पहिल्यांदाच मिळाली मिपावर त्या बद्दल धन्यवाद. केवळ शास्त्रीय संगीतप्रेमी मुकुल
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 07/04/2008 - 03:19 नवीन

डॉ ओकांनी बनवलेले संकेतस्थळ

याबद्दल सचित्र आणि चित्रफितींसह तपशीलवार माहिती या संकेतस्थळावर मिळू शकेल. (कुशल हार्मोनियमवादक साथ करताना काय क्लृप्त्या वापरतात? हार्मोनियमचे स्वर हिंदुस्थानी [किंवा कर्नाटक] शास्त्रीय संगीतासाठी बेसुरे असतात हे तर सर्व वादकांना माहीत असते. योग्य स्वराचा [भसाडा का होईना] आभास निर्माण करण्यासाठी नेमक्या स्वराच्या वरची-खालची अशा दोन्ही पट्ट्या दाबतात का?) तात्यांना (किंवा आणखी कोणी ती पेटी खुद्द बघितली/वाजवली असेल त्यांना) प्रश्न : डॉ. ओक यांचे लेख वाचून असे दिसते की ती कुठल्यातरी स्थिर षड्जाला धरून बनवलेली आहे - त्यांच्या लेखांत त्यांनी नेहमी सफेत६चे उदाहरण दिलेले आहे. अर्थात पंचम अचल आहे. समोरची बटणे ओढून जो राग गायचा आहे त्यासाठी बाकीच्या ५ स्वरांसाठी योग्य श्रुती निवडता येतात. पण या श्रुतींमधील अंतर समसमान नाही. त्यामुळे कोणाला सफेत६ ऐवजी काळी२ पट्टी षड्ज म्हणून निवडायची असेल, तर (लेखांप्रमाणे तरी) ते जमणार नाही. करण सफेत६ पासून योग्य अंतरावर (पण समसमान अंतरे नाहीत) अशा २२ श्रुती काळी२ पासून योग्य अंतरावर असणार नाहीत. त्यांचे लेख वाचण्यात माझी काही गफलत झाली आहे का? त्यांच्या मेलोडियमवरती गायकाला हव्या त्या पट्टीत गाणे वाजवता येते का? या बाबतीत येथे एक गायक/पियनोवादक श्री. रॉनल्ड नेकर यांच्याशी चर्चा झाली. ते ओमाहा, नेब्रास्का येथे असताना तेथे २००३ साली नवीन बांधून घेतलेल्या ऑर्गनबद्दल त्यांनी मला माहिती दिली (दुवा). एकाच ऑर्गनला अनेक कळफलक असतात, आणि प्रत्येक कळफलकला वेगवेगळे स्वर-श्रुती बसवता येतात. हल्ली पाश्चिमत्य संगीत १२-समसमान श्रुतींमध्ये वाटलेले सप्तक मनात धरून रचलेले असते. त्यामुळे काही कळफलक तसे असतात. तर काही कळफलक जुन्या प्रकारच्या श्रुतींना मानून बनवलेले असतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या काळात लिहिलेले संगीत संगीतकाराला जसे अभिप्रेत होते तसे वाजवता येते. अर्थात असा पर्यय असणे हे केवळ या ओमाहा येथील चर्चमधील ऑर्गनचे वैशिष्ट्य नव्हे, तर अनेक मोठ्या चर्चमध्ये अशी ऑर्गन आहेत.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 07/04/2008 - 09:19 नवीन

अप्रतिम

अप्रतिम माहिती.. आणि मला मेटलोफोन या वाद्याची माहिती फार आवडली... धन्यवाद, आनंद... आपला ( पेटीवादक) भडकमकर मास्तर ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Fri, 07/04/2008 - 09:30 नवीन

आनंदघन डॉ.व

आनंदघन डॉ.विद्याधर ओक यांचा परिचय आवडला त्यांचे एखादे चित्र असेल तर प्रतिसादात टाकावे ही विनंती -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
आ
आनंद घारे Fri, 07/04/2008 - 11:30 नवीन

श्रुती संवादिनी

गायकाला हव्यात्या सुरात गाता यावे आणि त्याला हार्मोनियमवर त्याच्या सुरात साथ करता यावी याच उद्देशाने टेम्पर्ड स्केल तयार केले गेले. परंतु त्यातील श्रुती सुरात येत नाहीत म्हणून त्या योग्य जागेवर ठेऊन नवी पेटी तयार केली तर ती कोणत्या तरी एका षड्जाच्या संदर्भातच असणार असे मला वाटते. मोठे गायक जसे स्वतःचे तानपुरे आणि तबले बरोबर घेतात त्याप्रमाणे त्यांना साथीसाठी स्वतःची संवादिनीही लागेल. या बाबतीत श्री. तात्या एक्सपर्ट कॉमेंट देऊ शकतील.
  • Log in or register to post comments
आ
आनंद घारे Fri, 07/04/2008 - 11:44 नवीन

छायाचित्रे

खाली दिली आहेत. ती आधी दुसरीकडे आंतर्जालावर चढवून तिथला दुवा द्यावा लागतो. यामुळे लेखासोबत देता आली नव्हती. Image removed.

Image removed.

  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Fri, 07/04/2008 - 13:17 नवीन

डॉ. विद्याधर ओक!

Image removed. ही नवीन पद्धतीची संवादिनी फक्त साथीसाठी उपयुक्त आहे. स्वतंत्र(सोलो) वादनासाठी नव्हे असे डॉ.ओक ह्यांनी सांगितल्याचे स्मरते. त्यांचे प्रात्यक्षिक ह्यापूर्वी मी विलेपार्ले येथे टिळक मंदिरात पाहिले-ऐकले होते. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
ह
हेरंब Fri, 07/04/2008 - 18:48 नवीन

उत्तम

ओकांवरचा लेख आवडला. तात्यांची त्यांच्याशी एवढी ओळख आहे हे वाचून आनंद वाटला. (गोविंदरावांचा भक्त आणि आरंभशूर पेटीवादक)
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sun, 10/07/2018 - 17:02 नवीन

हे पुनर्जन्म मिथ्य कि तथ्य

हे पुनर्जन्म मिथ्य कि तथ्य पुस्तकाचे लेखक आहेत. मेडिकलचे डॉक्टर आहेत एबीपी माझा वर त्यांचा कार्यक्रम झाला होता नुकताच
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sun, 10/07/2018 - 17:06 नवीन

हा तो कार्यक्रम https://www

हा तो कार्यक्रम https://www.youtube.com/watch?v=9MIWw9QI7IY
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 10/07/2018 - 19:04 नवीन

दहाएक वर्षं आमचे शेजारी होते.

दहाएक वर्षं आमचे शेजारी होते. रोज दोनतीन तास पेटी वाजवत ती ऐकायला येई. पण आमच्या घरात कुणालाच संगीताचा कान नसल्याने कधीही पेटी ऐकायला गेलो नाही. इमारतीत आठजण होते त्यातल्या दोघांनाच आवड होती व ते सांगत की पेटी छान वाजवतात. आदित्य तिसऱ्या वर्षापासून वाजवतो. दुसरे दोघे भाऊही वाजवायचे. शिवाय भारतीय ज्योतिषाची आवड होती. चिनी ज्योतिषावरही एक जाडजुड पुस्तक लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 10/11/2018 - 15:13 नवीन

काय बोलता ?

तुमच्या त्या इमारती मध्ये मी का राहावयाला नव्हतो ? अरे दैवा ! असा प्रश्न मला पडलाय ! तुमचे व त्यांचे निरनिराळे उद्योग जवळून पहात मला अधिक श्रीमंत होता आले असते की !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
क
कंजूस गुरुवार, 10/11/2018 - 20:55 नवीन

दात आहेत तर चणे नाहीत!!

दात आहेत तर चणे नाहीत!! डोंबिवलीत सुरुवातीला ज्या इमारतीत राहात होतो तिथे शेजारी नाट्यहौशी होता. मुंबइतल्या कापडगिरण्या बंद झाल्यावर त्याचीही नोकरी गेली. पण त्याची हौस कामाला आली. रविद्र नाट्यमंदिरासमोर राहायचा आणि फावल्या वेळात नाट्यमंदिरात पडून असायचा. सर्व नाटके तोंडपाठ त्यामुळे प्रॅाम्पटिंग, नेपथ्य मदत करत असे. मोरुच्या मावशीत माळ्याचे काम बदली म्हणून करत असे. मग मोरुच्या पथकाबरोबर भारत फिरला. तर सांगायची गोष्ट म्हणजे तो म्हणाला सांगाल ते पास घेऊन येतो ! मग फक्त मोरुची मावशी पाहिलं आणि दुर्गा झाली गौरी'ची मेटालिक कॅसेट साउंड ट्रॅक घरी ऐकला! नाटक समजत नाही त्याला फुकट पास!!
  • Log in or register to post comments
क
कलम Fri, 10/12/2018 - 16:30 नवीन

.

चांगली माहिती
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा