मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अ॑तर

शितल ·

मदनबाण 21/06/2008 - 14:55
शितलताई मस्तच लिहल आहेस तु ,,,सगळ कसं अगदी डोळ्यासमोर घडतं आहे अस वाटल..... मदनबाण.....

अनिल हटेला 21/06/2008 - 21:15
वा !!! सून्दर लिखाण आहे बर.... सगळ कस नजरेसमोर घडतये असच वाटल.... अजुन वाचायला आवडेल......

ऐकदम एमोशनल करुन टाकले हो. मी पण बर्याच लोकांना छोट्या छोट्या कारणाने अलग होताना पाहीले आहे. सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

कविता अणि अमेय चा मुलगा मानस आज उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला रवानगा होणार होता. कविता आणि मानस पुण्याहुन मुबईला कॆब करून एअरपोर्टवर आले, अमेय त्याची वाट पहातच उभा होता. मानसने त्याच्या बाबाना पाहिल्यावर त्याना नमस्कार केला, आज ब-याच वर्षानी कविता आणि अमेय समोरा समोर होते आणि कोणाला काय बोलावे हे समजत नव्हते.

डोळे हे जुलमी गडे...

प्राजु ·

प्राजु 21/06/2008 - 20:21
मी कोणी निष्णात फोटोग्राफर नाही. मला जमतील तसे मी फोटो घेतले आहेत मी. इथे चढवण्यासाठी तात्यांची खूप मदत झाली आहे. धन्यवाद तात्या...! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मस्त लेख... कसले फोटो आहेत मांजरांचे... एकदम आवडले... दोन वेगळ्या लेन्सेस लावलेल्या फॅशन मॉडेलसारखी दिसताहेत माय लेकरं... :O ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विसोबा खेचर 22/06/2008 - 10:03
लै भारी डोळे! :) प्राजू, तू देखील इतकी चांगली फोटूग्राफर आहेस हे माहीत नव्हतं! जियो...! अवांतर - मला हा प्राणी मुळ्ळीच आवडत नाही. पाळीव असला तरी याचा फक्त स्वत:शीच मतलब असतो. कुत्र्यांप्रमाणे माणसांवर याचं मुळीच प्रेम नसतं! असो... तात्या.

भाग्यश्री 22/06/2008 - 10:23
काय भन्नाट प्रकार आहे हा!! :O निळा आनि हिरवा डोळा!! अफलातून.. कलम केलेली झाडं असतात तसं वाटलं! गम्मतच आहे.. पण पिल्लु खूप क्युट आहे.. आणि ती आई पण छान आहे, पण हिरवा डोळा नुस्ता पाहीला तर वाघाची मावशी हे नाव अगदी खरे करतीय.. भिती वाटली.. :( सॉरी ग.. पण आईचे फोटो जरा डेंजर आलेत,शांत नजर नाही वाटली मला.. कोण काही करत नाहीय ना, असं डोळ्यात तेल घालून पाहतीय असं वाटलं! :) .. पिल्लू फार निरागसतेने बघतय म्हणून गोड वाटले! पण एकंदरीत, प्रकार भारीय हा!! http://bhagyashreee.blogspot.com/

पण मांजर आम्हाला आवडत नाही. कुत्र्याचं पिलु असते तर लगेच चौकशी केली असती, कुत्रे कोणत्या जातीचे आहेत म्हणुन, आणि केवढ्यापर्यंत देता हेही विचारलं असतं :) बाकी आपण डोळ्यातले भाव ओळखतात म्हटल्यावर डोळ्यांचे म्हणाल तर घारे डोळे असणारे माणसे फसवणूक करण्यात तरबेज असतात म्हणे ? दगेबाजी करण्यात पटाईत असतात....इत्यादी-इत्यादी. :) ( ऐश्वर्या नाही सोडून गेली भविष्यात अभिषेकला, तर डोळ्याचा काहीही संबंध नसतो असे समजेन) बाकी एक डोळा निळा आणि एक हिरवा गम्मतच आहे. डोळ्यांवरचे विवेचन आवडले. 'डोळे हे जुल्मी गडे खोकुनी मज पाहु नका' असे उगाच थोडी म्हटल्या जाते !!!! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

II राजे II 22/06/2008 - 11:37
मस्त लेख... कसले फोटो आहेत मांजरांचे... एकदम आवडले... माझ्या एका मित्राचा एक डोळा घा-या रंगाचा आहे व एक तपकीरी :) राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

प्राजु, मस्त फोटो. डोळ्यांची निसर्गाची करामत आहे! असे एक निळा आणि एक हिरवट घारा डोळे पाहून सत्ते पे सत्ता मधला दुसरा अमिताभ(बाबूच ना नाव त्याचे ?)आठवला. आणि घाणीत न लोळणारं डुक्कर मी कधी पाहिलं नाही. फिरंगी मंडळींना ह्या प्राण्याबद्दल काय ममत्व असतं आणि चक्क भाग्यदात्याचे प्रतिक मानून त्यांची प्रतिमा(चिनीमाती,पोर्सेलिन,सॉफ्ट टॉय इ.प्रकारे)ठेवतात. चॉकलेटांना वराह आकार दिलेला पाहून कित्येक दिवस चॉकलेट खायची इच्छाच होत नव्हती.एक नक्की! चक्क स्वच्छ डुकरे मात्र मी इथे पाहिली.(मला मात्र ती पाहून आणि त्यांचे लाड करणारे फिरंगी पाहून कसंतरीच होतं) स्वाती

मदनबाण 22/06/2008 - 12:48
अरे रंगांची तर कमालच आहे..गोंडस फोटो..... दुसरा फोटो फार आवडला.. मदनबाण.....

सुचेल तसं 22/06/2008 - 16:36
मला हे आधी माहितीच नव्हतं की मांजरांना वेगवेगळ्या रंगांचे डोळे असू शकतात. माहिती आणि फोटो दोन्ही छान आहेत. http://sucheltas.blogspot.com

प्रियाली 22/06/2008 - 17:55
प्राजु, मांजरांचे फोटो अगदी गोजिरवाणे आले आहेत. मांजरांत असे दोन वेगळ्या रंगाचे डोळे सहज आढळून येतात. त्यामानाने माणसांत ते कमी आढळतात परंतु निळसर - हिरवट झाकेचे डोळे असणार्‍या माणसांच्या दोन डोळ्यांत वेगळ्या छटा असतात. याला हेटरोक्रोमिया असे म्हटले जाते. टोबी मॅक्ग्वायर (स्पायडर म्यान) आणि ख्रिस्टोफर वॉल्कन या दोघांचे डोळे वेगवेगळ्या रंगाचे आहेत.

चतुरंग 23/06/2008 - 04:08
मार्जारकुलाचे आणि माझे जमत नाही असे नाही पण मला कुत्री जेवढी आवडतात तेवढे प्रेम ह्यांबद्दल नाही. पण तुझे फोटू मात्र एकदम झकास आले आहेत आणि लिखाणही एकदम चटपटीत झाले आहे! :) चतुरंग

ऋचा 23/06/2008 - 09:51
माझ्या कुत्र्याचे डोळे निळे आहेत. आणि नजरेत इतका प्रेमळ भाव की बस्स! पण अनोळखी माणसाची खैर नाही इतकी चिड असते त्याच्या नजरेत!!! माझ्या २ मांजरांचे डोळे पण असेच वेग्ळ्या रंगांचे आहेत. मांजर आई-हिरवट्-निळा आणि चॉकलेटी मांजर पिल्लु- चॉकलेटी आणि हिरवा गायीकडे कधीही पाहीलं तरी शांत वाटतं खुप प्रेम करणारी वाटते ती :) (मांजर-कुत्रा प्रेमी ऋचा) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

ध्रुव 23/06/2008 - 10:08
अरे काय हे :) हे म्हणजे सत्ते पे सत्ता मधला दुसरा अमिताभ जेव्हा एकाच डोळ्याला लेन्स लावतो तसलं काहीतरी वाटतय :) तुमच्या माऊ लई भारी आहेत.... -- ध्रुव

अमोल केळकर 23/06/2008 - 10:31
फोतो मस्तच आहेत. या प्राण्यांच्या बाबतीत एक गोष्ट चांगली की चश्मा, लेन्स , मोतीबिंदु या पासुन ही जनता बरीच दुर आहे.

वरदा 23/06/2008 - 22:48
प्राजु एकदम झकास लेख आणि फोटो पण ! कसलं आश्चर्य आहे ना...लेन्स घातल्यासारखे वाट्टायत डोळे हे नक्की....

शितल 24/06/2008 - 05:23
मस्त च अग किती सुरेख फोटो काढले आहेस, आणि मस्त दिसत आहेत पिल्ला॑चे डोळे. लेख ही छान झाला आहे.

नमस्कार मंडळी, शिर्षकावरून असं वाटेल की, मी डोळे या विषयावर काही लिहिणार आहे. तसं पाहिलं तर ते थोडं फार खरंही आहे. तिच्या / त्याच्या प्रेमळ डोळ्यांवर आजपर्यंत अनेक कवींनी कवनं रचली, गझला लिहिल्या, शेर लिहिले. निसर्गानं प्रत्येक माणसाला डोळे देताना रंगनिर्मिती कोठून केली असेल हा प्रश्न मला नेहमीच पडतो. काळे भोर डोळे, भुरे डोळे, पिंगट डोळे, निळसर डोळे, हिरवट डोळे, राखडी छटा असलेले डोळे.. असे कितीतरी प्रकारचे डोळे आपण पाहतो. डोळ्यावरून मनातील भावना लगेच कळतात असं म्हणतात. काही डोळे शांत वाटतात, काही पाणिदार, काही प्रेमळ , काही उथळ, काही खट्याळ, काही भोचक.. काही गंभिर....

उद्यान नगरी

आनंद घारे ·

अनिल हटेला 13/06/2008 - 13:36
आनन्दघन जी!!! ठरल तर पहीली सन्धी मिळताच ट्रीप टू मैसूर !!! छान वाटल वाचुन , काही सेकन्द दोळ्यासमोर ती सगळी द्रुश्य जिवन्त झाली होती ,ज्यान्चे तुम्ही वर्णन केलेत ... बाकी सोबत फोटोस टाकले अस्त तर दूधात साखर टाकल्या सारख झाल असत, नाही का? असो.. धन्यवाद !!!!

सचीन जी 13/06/2008 - 14:11
खरे तर वृंदावन गार्डन मधे फारसा राम राहीला नाही. झाडे सुकली आहेत आणि हाइद्राबादचा लेझर शो पाहील्यानंतर वृंदावन गार्डनातले संगीत कारंजे फारसे भावत नाहीत. मैसूरच्या प्राणीसंग्रहालय मात्र अप्रतिम आहे. मैसूर पासुन १५० किमि वर हलेबेळु आणि बेलुर ही शिल्पे आहेत. १२ व्या शतकातली दोन मंदिरे . अजोड त्रि मितिय शिल्पकला. एका मन्दिराकरीता दिवस कमी पडावा असं कोरीवकाम! हलेबेळु इथे शासनाचे विश्राम गॄह आहे. दिवसभर मंदिर पाहुन झाल्यावर मुक्कामाची उत्तम व्यवस्था.

In reply to by सचीन जी

बेलूर - हळेबीडु - श्रवणबेळगोळ हा आणखी एक पर्यटन त्रिकोण माय-मराठीच्या आद्य लेखांपैकी एक लेख "चामुंडराये करयविले" श्रवणबेळगोळी आहे.

मुक्तसुनीत 14/06/2008 - 00:15
अतिशय प्रसन्न शैली, सहज , हसत खेळत सांगितलेली माहिती. अशा लेखांमधे "केवळ माहितीवजा" बनण्याचा फार मोठा धोका असतो. तो तुमच्या बाबतीत अजिबात संभवत नाही. सुरवातीचा "झनक झनक ..." हा परिच्छेद म्हणा , किंवा इतर व्यक्तिगत उल्लेख म्हणा , अशा गोष्टींमुळे लेख अतिशय वाचनीय झाला आहे. शेवटचा परिच्छेद मात्र खास ! " मागे वळून पाहिले तर एक मुलगा सुवासिक फुलांच्या माळांनी भरलेली चपट्या आकाराची वेताची पाटी सायकलच्या हँडलवर ठेऊन ती हळू हळू बेताने चालवत येत होता." हे वाक्य वरवर पहाता साधेच आहे , पण मला ते एकदम चित्रदर्शी वाटले ! आणि "त्यांच्या परड्यांमधली फुले दुपारपर्यंत कोमेजून जात असतील, पण ते घालत असलेली "हूवा मल्लिगे...." ही साद दीर्घकाळपर्यंत माझ्या लक्षात राहील. " हा जो शेवट आहे तो तर सगळ्या लेखाला काव्याकडे घेऊन जातो. लिखाणामधे सहजता, बांधून ठेवणारी रंजकता, माहितीपूर्णता आणि या सगळ्याच्या वर असणारी काव्यात्मता या सार्‍या गुणांमुळे हे छोटेसे टिपण सुंदर झाले आहे. तुमच्या पुढच्या लिखाणाची नक्की वाट पाहिली जाईल ! :-)

आनंद घारे 15/06/2008 - 11:18
या वेळेस मी वृंदावन उद्यान चवथ्यांदा प्रत्यक्ष पाहिले. ( सिनेमात अनेक वेळा ते दिसले आहे) तरीही मला ते आवडले. झाडांना लागणारी फुले, पाने वगैरे 'ऋतुकालोद्भव' असतात, ती निसर्गनियमाप्रमाणे 'नेमेचि' येतात, पिकतात किंवा सुकतात व गळून पडतात. अशा सुकलेल्या पानाफुलांचा कचरा परदेशातील बागेत तत्परतेने काढून टाकला जातो तसे मात्र वृंदावन गार्डनमध्ये होतांना दिसले नाही. लेजर शो किंवा फटाक्यांची आतिशबाजी यांची तुलना कारंजावरील प्रकाशझोतांबरोबर करणे हे आंबा आणि गुलाबजाम यांची तुलना करण्यासारखे आहे असे मला वटते. दोघांची मजा वेगवेगळी असते.

मैसुर आणी परिसराचे आनंदघनजींनी उत्तम व यथार्थ वर्णन केले आहे. परंतु, हल्ली सर्वच पर्यटन स्थळांकडे लोकाचा अमाप ओघ येतो, त्यामुळे आता अशा स्थळी जाण्यापूर्वीच ताण येतो. गेल्या २२ वर्षांत बर्‍याचदा मैसुरला गेलो. परंतु हल्ली त्या जीवघेण्या गर्दीमुळे वृंदावन गार्डन नकोसे वाटते. पूर्वी, धरणाच्या बांधावरुन फिरता येत असे. ३-४ तास निवांतपणे घालवता येत. आता धरणाच्या बांधावर जायला परवानगी नाही, त्यामूळे पूर्वीची मजा गेली. बांधावर प्रवेशासाठी एक कमान आहेत. त्यावर धरणबांधणार्‍या तंत्रज्ञांची सुची आहे. त्यात एका मराठी तंत्रज्ञाचे नांव वाचून अभिमान वाटत असे. दोन महीन्यांपूर्वी आमच्या जर्मन पाहूण्यांना घेऊन मैसुरला गेलो होतो, धरणाच्या बांधावर नेऊन, भारतीयांनी ७५-८० वर्षांपूर्वी केलेले कर्तॄत्व त्यांना दाखवायचे होते. बांधावरून दिसणारा विशाल जलसागर एका बाजुला, बांधाखाली प्रवाह नियंत्रणासाठी दरवाजे व त्याच्या दुसर्‍या बाजुला खालच्या पातळीवरचे ते उद्यान. तंत्रज्ञानाचा उत्तम नमुना. पण तो अमाप लोकसागर पाहून केवळ त्यांनाच नव्हे तर आम्हालाहि तेथुन लवकरच काढतापाय घ्यावा लागला. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

मी शाळेत असतांना शांतारामबापूंचा 'झनक झनक पायल बाजे' हा आगळा वेगळा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत व नृत्य यांना केंद्रस्थानी ठेऊन निर्माण केलेल्या या सिनेमातील कांही दृष्यांचे चित्रीकरण 'म्हैसूरच्या वृंदावन गार्डन'मध्ये केले होते आणि "ती दृष्ये पाहतांना प्रत्यक्ष स्वर्गलोक पहात असल्यासारखे वाटते." अशी त्याची तारीफ ऐकल्यामुळे "म्हैसूर म्हणजे वृंदावन गार्डन आणि म्हणजेच स्वर्ग " असे एक समीकरण डोक्यात फिट झाले होते.

तुला माहित आहे ?

शितल ·

वरदा 09/06/2008 - 17:25
तुला टपोर्‍या मोगर्‍याचा गजरा दिला की तु माझ्याकडे पाहुन सु॑दर हसायचीस !! हे छान (मोगर्‍याच्या गजर्‍याची फॅन)

In reply to by वरदा

विसोबा खेचर 09/06/2008 - 20:47
तुला टपोर्‍या मोगर्‍याचा गजरा दिला की तु माझ्याकडे पाहुन सु॑दर हसायचीस !! मलाही ह्याच ओळी जास्त आवडल्या! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तुला टपोर्‍या मोगर्‍याचा गजरा दिला की तु माझ्याकडे पाहुन सु॑दर हसायचीस !! पुढील कविता लेखनाला शुभेच्छा !!!

इनोबा म्हणे 09/06/2008 - 17:47
आहे कविता...! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

आनंदयात्री 09/06/2008 - 17:55
तुला मी नकटे म्ह॑टल्यावर तु गाल फुगवुन रूसायचीस !! हे मस्तच !! और भी आन दो :)

मदनबाण 10/06/2008 - 04:05
ताई खुपच सुंदर कविता आहे..... मी तुझ्याकडे पाहिल्यावर तु हळुच लाजायचीस आणि लाजुन हसल्यावर गोडच गोड दिसायचीस !! (गोड मुलगा) मदनबाण.....

मयुरयेलपले 10/06/2008 - 19:18
मी तुझ्याकडे पाहिल्यावर तु हळुच लाजायचीस आणि लाजुन हसल्यावर गोडच गोड दिसायचीस !! खुप आवडलि............... आपला मयुर

विजुभाऊ 10/06/2008 - 19:52
तुला माहित आहे तु कधी भाव खायचीस तुला कोणी प्रपोज केले की तु माझ्या बरोबर ए॑गेज आहे असे सा॑गुन जायचीस आणि मग माझा भाव वाढवुन जायचीस !! हे मस्त एकदम ढग ढग वाटले पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

तुला माहित आहे तु कधी गोड दिसायचीस मी तुझ्याकडे पाहिल्यावर तु हळुच लाजायचीस आणि लाजुन हसल्यावर गोडच गोड दिसायचीस !! तुला माहित आहे तु कधी रूसायचीस तुला मी नकटे म्ह॑टल्यावर तु गाल फुगवुन रूसायचीस !! तुला माहित आहे तु कधी हसायचीस तुला टपोर्‍या मोगर्‍याचा गजरा दिला की तु माझ्याकडे पाहुन सु॑दर हसायचीस !! तुला माहित आहे तु कधी जळायचीस तुझ्या मैत्रिणीला मी गाडीवरून घरी सोडायचो तेव्हा तु जळुन जळुन जायचीस !! तुला माहित आहे तु कधी भाव खायचीस तुला कोणी प्रपोज केले की तु माझ्या बरोबर ए॑गेज आहे असे सा॑गुन जायचीस आणि मग माझा भाव वाढवुन जायचीस !!

राजवाड्यांचे शहर

आनंद घारे ·

पक्या 09/06/2008 - 03:00
म्हैसूर राजवाड्याची ओळख चांगली करून दिलीत. सोबत राजवाड्याचा एखादा फोटो ही चढवायचा होता. म्हणजे वाचताना मजा आली असती.

यशोधरा 09/06/2008 - 08:54
अतिशय देखणा राजवाडा आहे हा!! मी गेल्या महिन्यातच बघून आले.

पक्या 09/06/2008 - 12:57
धन्यवाद , प्रमोदकाका राजवाड्याची दोन्ही प्रकाशचित्रे फारच छान आहेत. खरोखरीच देखणा आहे राजवाडा . आणि रोषणाईने त्यात अजूनच भर पडली आहे.

दरबार हॉलमध्ये हिंडतांना कोठल्याही क्षणी भालदार चोपदार महाराजाधिराजांच्या आगमनाची वर्दी देत येतील असा भास होतो. असेच वाटले होते मलाही राजवाडा पाहताना.. लेख आवडला. स्वाती

आपल्या लेखात राजवाड्याच्या छायाचित्रांची गरज होतीच त्या शिवाय सुंदर लेखातील राज वैभव दिसलेच नसते. अजून येऊ द्या असेच लेखन !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आनंद घारे 09/06/2008 - 19:54
मिसळपाव या स्थळावर चित्र डकवण्यापूर्वी ते आधी कोठे तरी चिकटवून त्याचा दुवा द्यावा लागतो. ही दुहेरी प्रक्रिया करण्यातील तांत्रिक अडचणींमुळे मला ती देता आली नव्हती. माझे मित्र श्री. प्रमोद देव यांनी राजवाड्याची सुंदर छायाचित्रे देऊन ती कसर भरून काढली. या मदती बद्दल मी त्यांचा आभारी आहे.

सर्वसाक्षी 09/06/2008 - 21:29
फार वर्षांपूर्वी पाहिलेला तो खरा. मागील भेटीत बहुधा सुट्टीचा काळ त्यात आणखी रविवार यामुळे भयानक गर्दी होती. आलेल्या बहुसंख्य लोकांना 'आम्ही राजवाडा पाहिला' या रक्यानात खूण करण्यापलिकडे काही स्वारस्य नसावे. पैसे खर्च करुन इथवर आलोच आहोत तर जे जे आहे ते सर्व बघुया अशा भावनेते लोक ढकला ढकली करत होते. एकुण आषाढीला पंढरीला होते तशी अवस्था होती. निमूटपणे माघार घेतली.
आणखी एक चित्र

In reply to by प्रभाकर पेठकर

राजे 10/06/2008 - 09:50
मनोवेधक आणि नेत्रदिपक असा राजवाडा आहे. हेच म्हणतो.. पाहीला आहे पुन्हा पुन्हा पाहण्याची ईच्छा आहे.. पण ह्यावेळी दस-याच्या वेळी ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

चतुरंग 10/06/2008 - 22:03
मी दिवसा पाहिलाय अगदी मनसोक्त! पण दसर्‍याच्या रात्री पाहण्याची इच्छा आहे. पाहू कधी पूर्ण होईल. छान लेख आनंदघन! चतुरंग

आनंद घारे 11/06/2008 - 11:11
राजवाड्यावर दर रविवारी रात्री एक तास रोषणाई केली जाते. दसरामहोत्सवात ती दररोज आणि अधिक वेळ असते. फक्त राजवाडाच नव्हे तर त्याच्या आसमतातील सर्व वास्तू असंख्य दिव्यांच्या प्रकशात उजळून निघतात. राजवाड्यासमोरील पटांगणात उभे राहून चारही बाजूला असंख्य दीपमाळा पाहण्यातला आनंद अद्भुत असतो.

आमच्या जमखंडीसारखे पिटुकले संस्थान असो किंवा पांच खंडात पसरलेले ब्रिटीशांचे साम्राज्य असो, त्याच्या राजघराण्यातले लोक कुठे आणि कसे राहतात याबद्दल सामान्य प्रजाजनांत विलक्षण कुतूहल असे. त्या कुतूहलाची परिणती भयमिश्रित आदरात होऊन प्रजेने राजनिष्ठ बनावे यासाठी राजघराण्यातल्या व्यक्ती सामान्यांपेक्षा वेगळ्या आणि श्रेष्ठ असतात असे सतत लोकांच्या मनावर बिंबवले जात असे. राजे महाराजे म्हणजे दिसायला राजबिंडे, त्यांचे खाणेपिणे, कपडेलत्ते वगैरे सारे कांही राजेशाही थाटाचे आणि त्यांचा निवास भव्य राजवाड्यात असे.

पिसि,जेसि.-काही मोहरे , काही चाली.

रामदास ·

अभिज्ञ 08/06/2008 - 10:32
रामदास साहेब, खुपच सुंदर लिहिता राव तुम्हि. वाचकाला शेवटच्या ओळिपर्यंत खिळवून ठेवता. मला तर वाटते कि आपण कोणि प्रख्यात लेखकच आहात. आपल्या कवितेचा लेखहि अत्यंत सुंदर होता. त्याच्या अगदिच दुस-या टोकाला असलेला हा विषयहि आपण अतिशय लीलया हाताळत आहात. अभिनंदन. असेच लेख येउ द्यात. अभिज्ञ.

विसोबा खेचर 08/06/2008 - 23:09
वा रामदासराव! सुंदरच लिहिता तुम्ही! वाचायला एकदम मस्त वाटतं! अजूनही लेखन येऊ द्या प्लीज.. तात्या.

हं... आता सगळी लिंक लागायला लागलीय... चांगले चालू आहे... येउद्यात लवकर... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

चतुरंग 09/06/2008 - 02:25
प्लॉट उलगडायला लागलाय! तुमची लिहिण्याची ष्टाइल एकदम खतरा आहे - छोटी-छोटी वाक्ये लिहून एखाद्या चलतपटाचा आभास उभा होतो. येऊदेत अजून. चतुरंग

ऍडीजोशी 09/06/2008 - 11:52
अप्रतीमच आहे. पुढले भाग पटापट टाका हो. उत्सुकता जास्त ताणून धरू नका. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

विदुषक 09/06/2008 - 13:09
वा फरच छान !!! आपण चित्रपटाची पटकथा लिहलि आहे का कधी ? तुमच्या सारख्या सशक्त लेखकाची तिथे फार गरज आहे मजेदार विदुषक

झकासराव 09/06/2008 - 13:56
टाकणार लेखन आणि कथेला जब्बरदस्त वेग आहे. जोरकस. येवु दे पुढचा भाग पटापट. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

प्रसंग रंगविण्याची विलक्षण हातोटी. मानले बुवा. प्रत्यक्ष चित्रपट बघत आहे असे वाटत आहे. पण चित्रपटापे़क्षाही प्रभावी कारण आशय समजून घ्यायला जास्त डोके लावावे लागत नाहीये. खुर्ची ला खिळून बसलो आहे. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत. पुण्याचे पेशवे

अनिल हटेला 10/06/2008 - 17:01
छान !!!! अप्रतीम मान्डणी आणी भन्नाट वेग!!!! पुढील भाग लवकर टाका ,रामदास जी!!!! वाट बघतोये!!!!!!!!!!!!!!

धमाल मुलगा 11/06/2008 - 12:14
रामदास काका, खर्र खर्र सांगा, तुम्ही चित्रपटांच्या पटकथा लिहिता की नाही? सस्पेन्स थ्रिलर्सची पटकथा तुम्ही इथे टाकलीये...खरं की नाही? अगदी हॉलीवूड स्टाईल कॅमेरा इन-कॅमेरा आउट, सीन्स कटींग, पात्रांचा समोरची चाल पटकन लक्षात येणार नाही असा चाललेला खेळ.... ज ह ब ह र्‍या!!!!!!!!!!!!!!!! उत्कंठा आणखी किती ताणणार? येऊद्या पुढचा भाग लवकर :) पेरी मेसन / डॅन ब्राऊन वाचताना जसं खिळायला होतं तसं वाटतंय :) - (भतिजा) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

रामदास 12/06/2008 - 07:13
हे माझे प्रथम प्रकाशन आहे. पटकथा लिहीण्याची ताकद माझ्यात नाही. पुढचा भाग येतो आहे. (फ्लॅशबॅक संपले आहेत.) रसायन जमले पाहिजे. आभारी आहे. ता.क. आपण रहस्यमय प्रकारे कुठे नाहीसे होता?

II राजे II 21/06/2008 - 18:36
वरील सर्वाशी सहमत. बाकी हा भाग वाचने कसे राहून गेले हे कळालेच नाही... पण आज वाचला जबरा !!! छान जमला आहे... वेगाने नाट्य घडत आहे... वेग व्यवस्थीत राखला आहे अभिनंदन ! राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

3

बाबा...

प्राजु ·

विसोबा खेचर 05/06/2008 - 16:31
पण माझ्या बाबांनी, जराही का कू न करता ते पाणी भातावर घेऊन खाल्लं. तो स्वयंपाक कसा झालाय यापेक्षासुद्धा तो मी केला होता म्हणजे त्यांच्या लाडक्या लेकीने... ही भावना जास्ती होती. क्या बात है! जियो...! प्राजू, छोटेखानी परंतु सुंदर लेख. अगदी मनापासनं लिहिलेला वाटतो आहे! कविताही छान आणि बोलकी आहे...! आपला, (मातृभक्त) तात्या.

ऋचा 05/06/2008 - 16:44
मी पिता पुत्रात भांडणं झालेली खूप पाहिली आहेत. पण मुलगी आणि वडील यांचं भांडण कधीच नाही पाहिलं. जसं आई होणं हे स्त्रीसाठी जगातलं सगळ्यात मोठं सुख असतं तसं एका मुलीचा बाप होणं हे एका पुरूषासाठी जगातलं सगळ्यात मोठं सुख असतं असं मी म्हणेन. आमच्या घरात मी आणि माझी बहीण आहोत माझे बाबा दुप्पट सुखी आहेत . ;;) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

वेदश्री 05/06/2008 - 16:49
प्राजु, मस्तच लेख लिहिला आहेस. आता लवकरच माझ्या बाबांबद्दलचे लेखन माझ्या ब्लॉगवर आले तर नवल राहणार नाही.. :) >मला दिलेल्या रूपयांचा बाबांनी कधीही हिशोब मागितला नाही की, पैसे कशाला हवेत असं विचारलं नाही माझ्याहीबद्दल असेच झाले.बाबांनी कधी हिशेब विचारायचीच वेळ आली नाही कारण तो त्यांनी विचारण्यागोदरच त्यांच्याकडे पोहोचलेला असायचा आणि आजही पोहोचतो. मी त्यांच्यापेक्षा हिशेबात पक्की निघाल्याने उलट हिशेबतपासणी मात्र नेहमी झाली...आजही होते .. म्हणजे मी बाबांना हिशेब विचारण्याची आणि ती त्यांनी राजरोसपणे देण्याची ! अर्थव्यवहारातले कळायला लागल्यापासून तो सगळा प्रकारच मला संभाळायला घेतला शेवटी मी बाबांकडून... त्यांना समजवण्यापेक्षा ते तरी सोपे ! त्यांच्याकडून मार्गदर्शन होत असतेच म्हणा वेळोवेळी... :)

सुंदर लिहिले आहेस... एक एक प्रसंग कसे डोळ्यासमोरून जातात. बाबा रिझर्वेशन न मिळाल्यामुळे मुंबईहून माझ्यासाठी गाड्या बदलत.. रात्रभर हेक्टीक प्रवास करत.. इचलकरंजीत पोचले होते. तेव्हा डोळे भरून यण्या इतकी मी मोठी नब्व्हते किंवा बाबांनी आपल्यासाठी वेगळं काहीतरी केलं याचीही जाण नव्हती. खरे आहे त्यावेळी आपल्याला जाणीव नसते, पण त्याची खरी किंमत आता जाणवते... आपण मोठे झाल्यानंतर... कविता छान आहे.. सारे जन्म तुमच्या पोटी घ्यावे.. हेच स्वप्न उराशी आशिर्वाद तुमचे राहोत सदैव माझ्या पाठिशी..

फक्त संदीप 05/06/2008 - 16:57
सर्वाच्या नशिबात असे भाग्य नसते प्रत्येक मुलीला असेच वडिलांचे प्रेम लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना मी संदीप..................(विचारात गुंतलेला)

राजे 05/06/2008 - 17:09
ख-या अर्थाने आज तुम्ही आपल्या वडिलांचे आभार व्यक्त केले आहेत... प्राजु... खरोखर मनापासून आवडले लेखन ! तु खुप भाग्यवान आहेस... राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

डोमकावळा 05/06/2008 - 17:10
जसं आई होणं हे स्त्रीसाठी जगातलं सगळ्यात मोठं सुख असतं तसं एका मुलीचा बाप होणं हे एका पुरूषासाठी जगातलं सगळ्यात मोठं सुख असतं उत्कृष्ट..... मलाही आवडेल जगातलं सगळ्यात मोठं सुख मिळवायला... :)

जयवी 05/06/2008 - 17:22
प्राजु...... तू तर अगदी डोळ्यात पाणी आणलंस गं.....!! खूप छान चितारले आहेस तुझे बाबा :) बहुतेक सगळ्याच मुलींचा बाबा काहीसा असाच असतो ना गं...!!

प्राजु 05/06/2008 - 17:50
मुलीला बाबा इतका जवळचा मित्र नसतोच. पिता आणि बाबा या दोन शब्दांमध्ये हाच तर फरक आहे.. पितृत्व हे नाकारता येतं पण "बाबापण" हे मायेनं वेढलेलं असतं.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सखी 05/06/2008 - 17:59
प्राजु छानच लिहला आहेस लेख. कविताही छान आहे, आणि शेवटचे वाक्य खूपच समर्पक आहे.

मनिष 05/06/2008 - 18:01
छान लिहिले आहेस प्राजू! आमटीचा किस्सा तू आधी सांगितला होता. तुझे बाबांचे प्रेम छान दिसून येते. :)
मी पिता पुत्रात भांडणं झालेली खूप पाहिली आहेत. पण मुलगी आणि वडील यांचं भांडण कधीच नाही पाहिलं.
मी पाहिली आहेत, जवळच्या नात्यात वितुष्ट आले की खूप कडवटपणा येतो...आरुषी आणि रमेश तलवार हयांचे पण नाते फार चांगले होते असे वाटत नाही....खूप उदाहरणे आहेत अशी. तू भाग्यवान आहेस खरच!
जसं आई होणं हे स्त्रीसाठी जगातलं सगळ्यात मोठं सुख असतं तसं एका मुलीचा बाप होणं हे एका पुरूषासाठी जगातलं सगळ्यात मोठं सुख असतं असं मी म्हणेन.
तुझ्या भावनांचा आदर राखूनही मला वाटते की हे नेहमीच खरे नसते, थोडे ओव्हर-जनरलायझेशन होते आहे. तसे असते तर एवढ्या स्त्री भ्रुण हत्या का झाल्या असत्या? प्रत्येक पुरुषासाठी हे वेग-वेगळे असावे असे वाटते. शिवाय - हे (एका पुरूषासाठी जगातलं सगळ्यात मोठं सुख...) पुरुषानेच सांगितले तर बरे नाही का? :)

शितल 05/06/2008 - 18:09
प्राजु मस्त लिहिले आहेस तुझ्या बा॑बा बद्दल. माझे लग्न झाल्यावर पाठवणीच्या वेळी माझ्या प॑पाचे रडुन रडुन लाल झालेले डोळे अजुन आठवतात आणि ते आठवुन आज ही माझे डोळे पाणवतात.

In reply to by आनंदयात्री

इनोबा म्हणे 05/06/2008 - 20:49
खूप सुंदर लेख लिहीला आहेस. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

वरदा 05/06/2008 - 18:26
अगदी सुरेख.. अस्सेच आहेत माझेही बाबा...खूप आठवण करुन दिलीस गं.... बाबांचं काम सगळं भव्यदिव्यचं असतं. अगदी अगदी ११ खोल्यांच घर होतं माझं...... सगळे प्रयोग बाबांवरच होत असत. हेही १००% खरं बिचार्‍यांना काय काय पदार्थ खावे लागलेत...पिझ्झा केला होता मी पहिल्यांदा इतका जळला होता..पण चांगला लागतोय म्हणून खाल्ला बिचार्‍यांनी.....आई म्हणाली माझी पोळी थोडी जळली की म्हणता आज पोळी बनवताना पोटातले गॅस निघून जावे ह्या उद्देशाने बनली वाट्टं आणि पोरीने कसंही बनवलं तरी चालतं... तर म्हणाले, लाडकी लेक काय असते ते फक्त मलाच माहीत तिने काहीही वाढलं तरी ते किती चविष्ट लागतं हे समजायला मी होऊन पहा...... खूप खूप आठवणी आल्या...इतक्या सुंदर लेखासाठी तुझं अभिनंदन! कविताही खूपच छान!

चतुरंग 05/06/2008 - 20:06
तुझ्या आणि बाबांमधल्या नातेसंबंधाचा एक हळवा पट अवचित उलगडला आहेस. तो स्वयंपाक कसा झालाय यापेक्षासुद्धा तो मी केला होता म्हणजे त्यांच्या लाडक्या लेकीने... ही भावना जास्ती होती क्या बात है! खरं आहे. हे फक्त बाबाच करु शकतात. तुझी कविताही उत्स्फूर्त आहे, सुंदर आहे! वडील-मुलगी हे नातंच फार वेगळं आहे, खूप गुंतागुंतीचं आणि त्याच वेळी साधं, सोपं आणि सरळ असं मला वाटतं! माझे बाबा मला जे निकष लावत त्यातून माझ्या बहिणीला त्यांनी कित्येकवेळा सूट दिलेली दिसली की मी त्यांच्याशी भांडे पण मोठा झाल्यावर हळूहळू समजू लागले की बाप-लेक नात्यात तर्काचे नियम नव्हे तर भावनांचे गोफ असतात. एकाचवेळी आपल्या मुलीबद्दल, तिच्या कर्तृत्त्वाबद्दल गाढ विश्वास असणारे बाबा मनात कुठेतरी तिच्याबद्दल काळजीने धास्तावलेले असतात. तसं दाखवणं हे त्यांना मनानं मान्य नसतं पण ते न दाखवण्याइतकं राजकारणीही त्यांना होता येत नाही! चतुरंग

भाग्यश्री 05/06/2008 - 22:01
ए प्राजु मस्तच लेख लिहीलास बघ! ... माझे बाबा पण अस्सेच आहेत!! कधीही हिशोब मागितला नाही, कायम विश्वास दाखव्ला माझ्यावर, अपयशाच्यावेळेला एक मस्त पत्र लिहून एन्करेज केले होते त्यांनी मला.. बाबांचा कायमच आधार वाटतो मला... शितलशी पण सहमत.. कधीही डोळ्यातून पाणी न काढणारे बाबा , त्या दिवशी इतके रडले.. मी बघायचच टाळत होते.. आईची बँगलोर ला बदली झाली होती मी १ वर्षची पण नसेन तेव्हा.. ते १-१.५ वर्ष बाबांनीच सांभाळल मला न दादा ला.. मी म्हणे तेव्हा बाबांनाच आई म्हणायचे ! :)

एक 05/06/2008 - 22:17
तुमच्या वडिलांवरून "फादर ऑफ द ब्राईड" सिनेमामधल्या वडिलांची आठवण झाली.. तो सुद्धा अतिशय सुंदर सिनेमा. वडिलांच्या मनाची मुलीच्या लग्नामुळे झालेली अवस्था अतिशय तरल पणे दाखवली आहे. अर्थात एका हिंदी सिनेमाने त्याची कॉपी करून करायच ते कडबोळ केलच.

मुक्तसुनीत 05/06/2008 - 22:32
आवडला. प्रामाणिकपणामुळे , साधेपणामुळे सुंदर झाला आहे. या विषयावरून आठवले. "बापलेकी" या नावाचा लेखसंग्रह अलिकडे प्रकाशित झाला आहे. बाप-मुलीचे नाते हा या सर्व लेखांमधला धागा. अनेक चांगल्या लेखिका, अभिनेत्री आणि इतर क्षेत्रातील मान्यवर स्त्रियांनी आपल्या वडीलांबद्दल लिहीलेले आहे. सर्वच लेख "काँग्रॅचुलेटरी" नाहीत. उदा. ना सी फडक्यांच्या मुलीने लिहिलेला लेख एक बाप आणि पती - आणि पर्यायाने एक व्यक्ती म्हणून फडक्यांची काळीकभिन्न बाजू दाखविणारा आहे. (असे लेख लिहायला प्रचंड धैर्य एकवटावे लागले असणार !) काही लेख वडीलांनीही मुलींबद्दल लिहीलेले आहेत. विजय आणि प्रिया तेंडुलकर या दोघांचेही लेख अत्यंत सुंदर झालेले आहेत ! पद्मजा फाटक, जाई निम्बकर, सई परांजपे सारख्या लोकांनी हजेरी लावलेली आहे. साडेचारशे पानांचा एक उत्तम दस्तावेज.

ईश्वरी 06/06/2008 - 11:56
सुंदर लेख लिहीला आहेस. कविता पण छान. आमटीचा प्रसंग तर खासच. >>माझे लग्न झाल्यावर पाठवणीच्या वेळी माझ्या प॑पाचे रडुन रडुन लाल झालेले डोळे अजुन आठवतात - शितल माझे ही बाबा पाठवणीच्या वेळी असेच रडले होते. आईपेक्षा ही तेच जास्त रडले. आणि अजूनही जेव्हा केव्हा दिड दोन वर्षानी भारतात जाणं होतं त्या वेळी मी परत निघताना त्यांना रडू आवरत नाही. तिच स्थिती नवर्‍याची. एरवी कधीही डोळ्यात पाणी येणार नाही . पण गमतीत ७ वर्षाच्या मुलीचा लग्नाचा विषय काढला की लगेच त्याचे डोळे पाणावतात. >> १५ जून हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. कधी पासून ते नाही माहिती. अमेरिका मध्ये पहिला फादर्स डे १९ जून १९१० ला साजरा केला...स्पोकेन, वॉश्गिंटन येथे. अमेरिकेत आणि बर्‍याच इतर देशात दरवर्षी जून च्या ३ र्‍या रविवारी फादर्स डे असतो. या वर्षी ३ रा रविवार १५ जून ला आला आहे. काही देशात जून च्या २ र्‍या रविवारी असतो. ईश्वरी

'माता देवो भवो' वर अनेकदा भरभरून लिहीले जाते. आणि वडील मात्र बहुतेकवेळा 'अन् संग हिरो'च राहतात. आईचे महत्व असतेच आभाळाएवढे पण त्याच बरोबर वडीलही संपूर्ण संसारावर 'निळी छत्रीवाले' बनून राहतात. डॉक्टरांचे बील नको म्हणून अंगावर आजारपण काढणारे, शर्ट शिवला की एक एक्स्ट्रा कॉलर शिवून घेणारे (कॉलर जूनी झाली, फाटली तर ही जास्तीची कॉलर शर्टाला शीवून तोच शर्ट वापरता येतो. तेवढ्यासाठी नवीन शर्टाचा खर्च नको, हा विचार), कर्तव्यकठोर आणि तरीही मुलांच्या बाबतीत हळवे वडील मलाही लाभले होते. सगळ्याच वडीलांना मुलांपेक्षा मुली जास्त जवळच्या असतात. ह्याला कारण त्या आई-वडीलांना सोडून सासरी जाणार असतात. मुली बर्‍यापैकी संवेदनशील असतात. वडीलांच्या भावना, त्यांच्या मनातील विचार शब्दाविना ओळखतात. मुलांचे तसे नसते, लहानपणी ती हूड असतात, भावना ओळखण्याच्या कोमल संवेदनेपेक्षा व्यवहारातला रोखठोकपणा त्यांना जास्त भावतो. रफ अँड टफपणा त्यांच्या ठायी नैसर्गिकपणे असतो. आणि त्याहूनही भावना ओळखल्या तरी त्या नजरेतून दाखविण्याची, शब्दांतून मांडण्याची आवश्यकता त्यांना भासत नाही/जमत नाही. मुलांकडे बघण्याचा आई-वडीलांचा दृष्टीकोन लहानपणा पासूनच वेगळा असतो. त्याला वेगळ्या पद्धतीने वाढविले जाते. त्यालाही संवेदना असतात. वडीलांची शिस्त आणि आईचे प्रेम त्यालाही दिसते. त्याला वडीलांबद्दल आदर वाटला तरी वडीलांची सक्षमता त्याला जाणवते आणि त्यातल्या त्यात दुर्बल आईकडे तो प्रेमाने आकर्षित होतो. तिचा संरक्षक बनतो. असो. ह्या विपरीतही अनुभव येऊ शकतात ह्याची जाणीव आहे. पण जनरली मुली वडीलांकडे आणि मुलगे आईकडे आकर्षित होतात. प्राजू, लेख मनाला भिडणारा आहे. अभिनंदन. अवांतरः सुदैवाने किंवा दुर्दैवाने मला मुलगी नाही. ह्याची खंत अनेकदा वाटते पण मुलगी नाही ह्याचा आनंदही होतो कारण तिचे 'सासरी' जाणे मला झेपले नसते.

In reply to by प्रभाकर पेठकर

विसोबा खेचर 06/06/2008 - 06:33
आणि मुलगे आईकडे आकर्षित होतात. सहमत आहे...! बाप आता वारला बिचारा! त्याचा खूप जीव होता माझ्यावर. मलाही त्याच्याबद्दल खूप आदर अन् प्रेम वाटे. परंतु कधी त्याची भक्ति नाही केली! भक्ति हा प्रकार काही निराळाच असतो! ती फक्त आईचीच केली आजतागायत! :) बाप कितीही चांगला अन् प्रेमळ असला तरी मांडीवर डोकं ठेवायला आईच पाहिजे, डोक्यावर तेल थापायला आईच पाहिजे! :) आपला, (कट्टर मातृभक्त!) तात्या.

प्राजु, मस्तच लिहिले आहे तुम्ही. माझ्या बाबांनीही आमच्यासाठी खूप काही केले. मी १०वीत असताना माझे बाबा ज्या कंपनीत होते ती बंद पडली. त्या नंतर ते काही दिवस घरी होते. आणि रोज दुपारी घराच्या बाल्कनीत बसून दूरवर काही तरी बघत आपल्याच विचारात असायचे. तेव्हा काय कळणार, आज माझा स्वतःचा संसार उभा राहिल्यावर मला थोडी थोडी कल्पना येत आहे त्यांच्या मनात काय विचार येत असतील तेव्हा, अर्ध्या संसारात असा आघात झाल्यावर. बोट तुझे धरूनी पाऊल माझे स्थिरावले.. मायेच्या वर्षावात माझे बालपण विसावले.. छोटी पोळी , छोटा भात... वरण इवलसं बाहुलीचं घर आपण बांधलं.. ते ही इवलसं.. क्षितिजाच्या पारचे विश्व मला तू दाखवले पंखामध्ये बळ घेऊनी.. मी आभाळाकडे झेपावले सारे जन्म तुमच्या पोटी घ्यावे.. हेच स्वप्न उराशी आशिर्वाद तुमचे राहोत सदैव माझ्या पाठिशी.. प्राजुताई, मला कविता वगैरे करता येत नाहित, तेव्हा तुमच्या परवानगीशिवाय, ह्या ओळी माझ्याही बाबांसाठी, माफ कराल अशी आशा आहे कारण मला वाटते की ह्या ओळी केवळ तुमचेच बाबा नाही तर 'बाबा' ह्या नात्याबद्दल आहेत. बिपिन.

फटू 06/06/2008 - 08:22
खुप छान लिहिलं आहेस गं... वाचता वाचता भारतात असलेल्या बाबांच्या आठवणीने डोळे भरून आले... आईच्या ममतेबद्दल खुप लिहिलं जातं पण बाबांबद्दल सहसा नाही... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

प्राजु 06/06/2008 - 14:48
सर्वांचे मनापासून धन्यवाद. हा लेख मी खरंच मनापासून लिहिला आहे. माझ्या सगळ्या मिपा परिवाराला फादर्स डे च्या आतापासूनच शुभेच्छा! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चित्रा 06/06/2008 - 15:55
बाबांवरचा उत्कटतेने लिहीलेला लेख आवडला. ड्रेसची आठवण आवडली. असे कुठेतरी वाचले आहे की वडिलांनी मुलींना प्रेमाने प्रोत्साहन दिले, त्यांच्या वाढीत सक्रिय सहभाग घेतला, सांभाळून घेतले तर मुलींचा जगात वावरण्याचा आत्मविश्वास वाढतो. म्हणजे आईने ते करायची गरज नाही असा नव्हे!

मदनबाण 06/06/2008 - 21:00
प्राजुताई खरच सुंदर आहे हा लेख..... माझ्या बाबांबद्दलच्या माझ्या भावना:-- माझ्या वडीलांमुळेच मी आज इथ पर्यन्त पोहचु शकलो आहे...आईच प्रेम असतच पण वडीलांच हे प्रेम मात्र मुलासाठी न बोलताही सबकुछ अस असत..... लहानपणी मी व माझे बाबा बर्‍याच वेळी बुद्धीबळ खेळायचो ..मला हा खेळ काही आवडायचा नाही कारण,,, १ नाही तर सलग अनेक खेळ मी हारायचो..सगळी कडुन कोंडी करुन माझे वडील काही चालीतच मला गारद करुन टाकत्...मी मग भरपुर चिडायचो...त्यांना सांगायचो..एकदा तरी तुम्हाला मी हरवणारच !!!!!.....आणि मला जिंकण्याचा आनंद देण्यासाठी ते मग एखादा डाव अगदी सहजपणे हारत. लहानपणी मला सायकल शिकवताना त्या मागे धावणार्‍या माझ्या बाबांनी मला अता पर्यन्त बरच काही शिकवल आहे आणि अजुनही मी त्यांच्या कडुन शिकतच आहे... कधी प्रेमळ तर कधी कठोर होऊन त्यांनी मला नेहमी योग्य तेच कसं कराव आणि वागाव ते समजवल... माझ्या बाबांबद्दल लिहाव तेवढ कमीच आहे... फक्त एवढच म्हणतो... की गेले कित्येक जन्म मी भरपुर पुण्य कमवल असणार म्हणुनच या जन्मी मला असे बाबा आणि आई मिळाले. (पितृछाया प्रेमी) मदनबाण.....

In reply to by ऋषिकेश

सहज 07/06/2008 - 07:03
हेच म्हणतो. सुरज बडजात्याच्या सिनेमातील गाणे, भारतात असताना तो सिनेमा, गाणे मी बघीतले किंवा ऐकले ही नसते. एनी हाउ.. हे गाणे "ते शब्द ऐकल्यावर" डोळे जरा पाणावले होते.

म्हणुन तर इथे असं म्हणतात, "माय सन इज माय सन, टिल ही गेटस् हिज वाईफ बट माय डॉटर इज माय डॉटर, फॉर द रेस्ट ऑफ माय लाईफ" हॅपी मदर आणि फादर्स डे!!!

फादर्स डे च्या निमित्ताने... १५ जून हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. कधी पासून ते नाही माहिती. खरं तर मदर्स डे आणि फादर्स डे हे साजरे करण्यासाठी अमुक एखादी तारिखच हवी असं नाही. कारण आपल्या मात्यापित्यांचे आपण नेहमीच ऋणी असतो. माझ्या बाबांबद्द्ल काय सांगू मी?? आई सांगते की, माझा जन्म झाला त्याचदिवशी माझ्या काकाच्या पॉवर लूम्सच्या कारखान्याचं उद्घाटन झालं. सगळे जण कार्यक्रम आटोपून बसले होते आणि बाबा सांगत आले की, "मुलगी झाली, मुलगी झाली". त्या काळाला शोभेल अशीच असलेली माझी आजी थोडी नाराज झाली.. .. आणि आई का नाराज झाली या विचाराने माझे बाबा ही नाराज झाले.

इन्फोसिस कँपस

आनंद घारे ·

अन्जलि 30/05/2008 - 17:44
खुप छान वण्र्नन केले आहे. स ग ळे चित्र डोळ्यासमोर उभे रहिले. इन्फोसिस बद्दल खुप ऐकले होते पन कर्मचर्यासन्थि एव ढि सोय केलि असेल हे तुम्च्या लेखा वरुन कलले.

मन 30/05/2008 - 19:35
वर्णन. माझा एक वर्ग मित्र अहे इन्फोसिसला. तो ही तिथं राहुन आलाय ट्रेनिंग च्या काळात. लैच भारी आहे लाइफ तिथली. आपलाच, मनोबा

अप्रतिम वर्णन आहे. इन्फोसिसची एक छोटेखानी सफरच झाली म्हणाना. कॅम्पसमध्ये फोटोग्राफी वर्ज्य आहे का? एक दोन फोटो दिले असतेत तर लेख नुसता वाचनीयच नाही तर प्रेक्षणीय सुद्धा झाला असता. अभिनंदन.

आनंद घारे 30/05/2008 - 22:31
मिसळपवावर फोटो कसे द्यायचे याचे तंत्र मला नीटसे माहीत नाही. एक प्रयत्न करीत आहे.swimming pool Multiplex Building

बेसनलाडू 31/05/2008 - 01:59
येतो येतो सांगून ऐन वेळी इन्फोसिसला चुना लावल्याने या प्रांगणात वास्तव्य करण्याचे व प्रशिक्षण घ्यायचे राहूनच गेले; मात्र वर्गमित्रमैत्रिणींकडून बरेच ऐकायला, फोटो पहायला मिळाले होते. आज तुमच्या या सफरीतून पुनर्प्रत्ययच आला. चित्रे व वर्णन दोन्ही छान वाटले. (नॉन-इन्फोसिअन)बेसनलाडू

मनिमौ 15/11/2017 - 22:22
कॅम्पस भव्य आहे. मधेच एक छोटा पॅच आहे जिथे विहिर आंब्याचिंचेची झाडंही जपली आहेत. इन्फि सोडली तरी आठवणीत रमलेली मनिमौ

श्रीगुरुजी 15/11/2017 - 22:45
मी इन्फोसिस (पुणे) येथे ७-८ वर्षे काम केले आहे. एका प्रशिक्षणासाठी म्हैसूरच्या या कार्यालयात ३ दिवस होतो. सर्व आधुनिक सोयीसुविधांनी युक्त असे हे कार्यालय आहे.

मैसूर हे एक प्राचीन शहर आहे. महिष्मती, महिषावती वगैरे नांवाने या नगरीचा उल्लेख पुराणात होतो असे म्हणतात. इतिहासकाळात तर त्याला महत्व होतेच. पण हे शहर जुन्या काळातील आठवणीत गुंतून पडलेले नाही. ते नेहमी काळाच्या ओघाबरोबर किंवा एकादे पाऊल पुढेच राहिले आहे. एकविसाव्या शतकात माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्वाची कामगिरी करण्यासाठी ते सज्ज होत आहे याची साक्ष येथील इन्फोसिसचा कँपस पाहिल्यावर मिळते. शहराच्या वेशीवर असलेल्या हेब्बाळ परिसरात इन्फोसिसने आपले एक आगळेच विश्व उभे केले आहे. त्याचा विस्तार करायला भरपूर वावही ठेवला आहे.

अण्णा

यशोधरा ·

मन 29/05/2008 - 19:17
एका मनमोकळ्या, दिलदार व्यक्तिशी म्हंजे तुमच्या अण्णांशी ओळख झाली ह्यातुन. र या मित्राच्या अगदी गळ्यात गळा घालून आजी, आई, बाबा, काका, आत्या, मावशी, इतर भावंड आणि बाकीच सगळ जग माझ्यावर कित्ती कित्ती अन्याय करतय हे सांगायला एकदम बर वाटायच. आणि मुख्य म्हणजे त्यांना ते पटायचही. न पटण्यासारख होतच काय म्हणा? ह्यातली निरागसता आणि कसलाही आव न आणता, अगदी नकळत, भलेपणाचे संस्कार दिले. फ़ार साधी, सरळ अशी शिकवण होती त्यांची. साध्या साध्या गोष्टी सांगत. कोणाचे मिंधे राहू नका, खोट बोलू नका, कधी खर मत मांडताना, आणि स्पष्ट बोलतानाही समोरच्याला होता होईतो दुखवू नका.... साधीच, पण आजवरच्या आयुष्यात सतत उपयोगी पडलेली शिकवण. आनी ह्यातला साधेपणा,पण मनाल भिडणारा आशय आवडला. आपलाच, मनोबा

वरदा 29/05/2008 - 19:29
दुर्दैवाने मला आजोबा कधी पहायलाच नाही मिळाले माझे दोन्ही आजोबा खूप लवकर गेले...तुझ्या आठवणी पाहून वाटलं असेच असते का ते? किती मनमोकळं लिहिलयस्...खरच नशिबवान आहेस की असे आजोबा तुझ्याबरोबर आहेत नेहेमी... अतिशय सुरेख, ओघवता लेख!

शितल 29/05/2008 - 19:35
मस्त लिहिले आहेस ग॑, मला मात्र आजोबा हे दोन्ही कडचे नव्हते त्यामुळे मी लहानपणी थोडी नाराज होत असे जेव्हा माझ्या मैत्रीणी॑॑चे आजोबा त्या॑चे लाड करत तेव्हा मलाही वाटे आपल्याला ही आजोबा हवे होते. आज परत तु ती जाणीव करून दिलीस. पण तु नशिबवान आहेस.

यशोधरा 29/05/2008 - 22:14
मन, लेख आवडल्याचं सांगितल्याबद्दल धन्यवाद. हो, आमचे अण्णा, लाखात एक असे देवमाणूस होते अगदी. वरदा, नातवंड आणि आजी - आजोबा यांच्यातलं नातं काही वेगळंच असतं हे खरच आहे गं... सगळेच आजी आजोबा त्यांच्या त्यांच्या नातवंडांना प्रिय असतातच, पण माझं नशिब की मला खरच खूप ग्रेट आजी आजोबा - दोन्ही बाजूंकडून मिळाले, वेगळ्याच पिळाची माणसं होती गं ती... त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं बघ, जे कुठल्याच पुस्तकात, शाळेत, कॉलेजात मिळणार नाही!! तीच आमची दौलत! भरपूर पुरुनही उरतेच आहे. :) शीतल, धन्यवाद. खरच म्हणतेस तू, मी नशिबवान आहे अशी वडिलधारी माणसं माझ्या आजूबाजूला होती...

वडीलांचे वडील हयात नव्हते पण आईचे वडील बरीच वर्षे 'आजोबा' म्हणून लाभले. प्रेमळ आणि संतापी असे विचित्र मिश्रण होते त्यांच्या स्वभावात. संवादप्रचुर आणि गोष्टीवेल्हाळ त्यामुळे मला आवडायचे. त्यांच्या म्हातारपणी, संध्या़काळच्या वेळी मित्रांमध्ये खेळावयास न जाता, त्यांचा हात धरून त्यांना फिरायला न्यायला मला आवडायचे. मी त्यांचा लाडका नातू होतो. असो. तुमच्या अजोबांच्या व्यक्तिचित्रणामुळे माझे बालपण आणि माझे आजोबा आठवले ह्यातच तुमच्या लेखाचे यश आहे. अभिनंदन.

मदनबाण 30/05/2008 - 08:40
मलाही आजी अजोबांच प्रेम तस कमीच मिळाल.... त्यांच्या प्रेमाची छाया ही बहुमोलच असते..... मदनबाण.....

चित्रा 30/05/2008 - 09:04
मनापासून लिहीलेले आवडले. त्या हृदयीचे या हृदयी केव्हाच घातले आहे - " हे खासच.

यशोधराजी, एकदम मस्त लेख! आमचे आजोबाहि असेच प्रेमळ होते... गंमत अशी की आमचे वडील एकदम रागीट व कडक! पण जेंव्हा त्यांना नातू झाला (माझा मुलगा) तेंव्हा त्याचाशी ते अगदी जमिनीवर लोळण घेऊन वगैरे खेळायचे! आणि तो त्यांच्या पोटावर बसायचा!! मी त्यांना विचारलं सुद्धा, "बाबा, तुम्ही एव्हढे कडक होतात तुमच्या तरूणपणी, आता कसं हो हे सगळं चालतं तुम्हाला?" त्यावर त्यांनी माझ्याकडे रोखून बघितलं आणि म्हणाले, "ते तू आजोबा झालास ना की तुला कळेल!" आजोबा होण्याची वाट पहात दिवस ढकलत असलेला, पिवळा डांबिसकाका

अरुण मनोहर 30/05/2008 - 09:48
यशोधरा तू खूप बोलके व्यक्तीचित्र उभे केले आहे. अण्णांनी तुझ्या वाङमयीन जाणीवांना खतपाणी दिले. अण्णांसारखा माळी तुला लाभला. तू फार भाग्यवान आहेस. आणखी वाचायला आवडेल.

राजे 30/05/2008 - 11:50
यशोधरा तू खूप बोलके व्यक्तीचित्र उभे केले आहे. अण्णांनी तुझ्या वाङमयीन जाणीवांना खतपाणी दिले. अण्णांसारखा माळी तुला लाभला. तू फार भाग्यवान आहेस. आणखी वाचायला आवडेल. हेच म्हणतो ! १००५ सहमत, छान लेखन ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

ईश्वरी 30/05/2008 - 12:27
छान झालाय लेख. भाग्यवान आहेस असे आजोबा तुला लाभले. >> यावरच अण्णांच उत्तर मात्र मला अजून ही आठवत. ते म्हणाले होते, आत्ता तिला काही समजाव अशी अपेक्षाच नाही आमची, पण नकळत घडलेल हेच वाचन तिच्या जाणीवा प्रगल्भ करेल, तिला एक नजर देईल. कळत नकळत तिच शिक्षण होतय, त्याच्या आड येण्याच पाप मी कस करेन? हे तर खासच. आवडलं. ईश्वरी

मनापासून लिहिलेला लेख आवडला... माझ्या पुस्तकवेड्या आजोबांची आठवण झाली... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

आनंदयात्री 30/05/2008 - 16:29
अगदी प्रत्येकाला आपापले आजोबा आठवावेत असे लेखन .. ऑस्सम ... शेक्सपिअरची आठवण तर सही .. त्यांच्या जाणिवा किती प्रगल्भ होत्या हे दाखवणारी .. आपल्या मिपाला एक उत्तम ललित लेखिका मिळाली :) .. असेच उत्तमोत्तम लेखन येउ दे :)

यशोधरा 30/05/2008 - 20:24
>> दूधापेक्षा 'साय' अधिक महत्त्वाची. मुद्दलापेक्षा 'व्याज' जास्त प्रिय पेठकरकाका, माझी आज्जी असच म्हणायची :) तात्या, धनंजय, सहज, मदनबाण, आन्या, चित्रा, अरुण मनोहर, राजे, ईश्वरी, आनंदयात्री आणि मास्तर तुम्हां सार्‍यांचे लेखाला दिलेल्या अभिप्रायांबद्दल खूप खूप आभार. अण्णा तुम्हां सर्वांना आवडले, ह्यातच मला खूप समाधान आहे. थँक यू सगळ्यांना :)

चतुरंग 31/05/2008 - 03:01
हृद्य ओळख दिलीस तुझ्या अण्णाची! योगायोग म्हणजे माझ्याही आजोबांना (बाबांच्या वडिलांना) आम्ही आण्णाच म्हणत असू. ते मला बराच काळ लाभले. माझी काही मोठी चूक झाली की आई-बाबा रागवायचे क्वचित मारही मिळायचा. त्यावेळी आण्णांच्या पाठीमागे लपायला मिळाले म्हणजे हायसे वाटे. ते त्यांच्या खास कोकणातल्या बोलीत आई-बाबांना म्हणत "अगों, शिक्षा गों कसली करता पोरांना? अजून लहान आहे तो. सोडून देस बघू त्याला, जरा सबुरीनं घे!" मी बारावीत असताना ते गेले. त्यावेळी मनात झालेली पोकळी पुढे बरीच वर्षे तशीच होती, अजूनही कधीतरी हळव्या क्षणी जाणवते. मी आता माझ्या मुलाला रागवायला लागलो की माझे बाबा मला दटावतात त्यावेळी त्यांच्या डोळ्यात मला आण्णाच दिसतात! (स्वगत - हे असं पहिल्या पिढीचं नातं दुसर्‍या पिढीशी घट्ट होण्यासाठी दरवेळी तिसर्‍या पिढीला कवेत घेऊनच का जातं? :? ) चतुरंग