मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हळूच तू मला पाहीलेले

पाषाणभेद · · जे न देखे रवी...
काव्यरस
हळूच तू मला पाहीलेले
हळूच तू मला पाहीलेले मी तुला पाहीले नजरेला मिळता नजरा, मी न माझी राहीले ||धृ|| कधीतरी ओळखीचे हासू पाहीले तुझ्या ओठी नकळत स्मित माझे आले त्याच्या उत्तररासाठी कळले का रे तेव्हा हृदयात काही झाले? नजरेला मिळता नजरा, मी न माझी राहीले ||१|| पुस्तके देता घेता थरथरती भेट झाली अलवार स्पर्श होता काटा फुले शरीरी प्रित पुष्पे अशी कितीतरी मी मनी माळले नजरेला मिळता नजरा, मी न माझी राहीले ||२|| ठेवले वहीत मी पिंपळपान आठवांचे बघ ते आता झाले बदलून जाळीचे तेवढेच जून झाले प्रेम पहीले आपले नजरेला मिळता नजरा, मी न माझी राहीले ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) २८/०९/२०११

वाचने 1289 वाचनखूण प्रतिक्रिया 2

मिसळलेला काव्यप्रेमी 28/09/2011 - 10:49
मस्त झाली आहे रचना. आवडली. :)

चित्रा 28/09/2011 - 18:17
जुन्या (बहुतेक सफल) प्रेमाची कल्पना चांगली आहे.