संध्याकाळ इतक्यात कशी झाली,
काही कळलंच नाही.
आत्ता आत्ता डोक्यावर दिसणारा सूर्य
उतरला क्षितिजाकडे कधी? कळलंच नाही.
आणि अचानक अंधार झाला,
मिणमिणत्या पणत्यांनी जेमतेम दिसणारा, थरथरणारा
केविलवाण्या, धूसर सावल्या हलवणारा
एकएक करून त्याही विझल्या.
शेवटची ठिणगी गेली, एव्हाना ढिली पडत गेलेली
आशेची साखळी तोडत.
उरले एकेकाळी त्या सूर्याच्या तेजाने दिपलेले डोळे
क्षितिजांपर्यंत फाकलेल्या
किरणांची आठवण घेऊन
क्षितिजं विस्तारल्यावर
त्या डोळ्यांनी ग्रहणंही बघितली होती
पाहिले होते अधूनमधून साचणारे काळेकुट्ट ढग
सूर्याचे जमिनीत रुतलेले मातीचे पायही
दिसायचे राहिले नव्हते.
उमलत्या ज्योतीने तेजाशी घेतलेल्या टकरा
त्या कशा विसरता येतील?
पण आता, या अंधारानंतर आठवताहेत
पहाटेची आश्वासक उबदार किरणं
त्यांनी उल्हसित केलेली प्रेमळ मोकळी हवा
विचारांच्या पेटणाऱ्या नवीन ज्योती
आणि आसमंत उजळून टाकणाऱ्या
सोनसकाळीचा स्वच्छ प्रकाश
अंधार झाला असला तरी
तोच प्रकाश माझ्यात तेवतो आहे.
- वडिलांना अर्पित. २० सप्टेंबर २०११
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3989
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
.
:(
(No subject)
:(
...
+१
In reply to ... by नंदन
सहमत
In reply to ... by नंदन
.
In reply to ... by नंदन
खूपच प्रामाणिक आणि
भावव्याकुळ काव्य...
.
.
(No subject)
@-क्षितिजं विस्तारल्यावर त्या
+१ हेच म्हणतो..
In reply to @-क्षितिजं विस्तारल्यावर त्या by अत्रुप्त आत्मा
:(
(No subject)
निशब्द
माझंही अर्घ्य.
घर थकलेले संन्यासी ची आठवण
भावोत्कट रचना!
एकदम छान लिहिलीत कविता
ॐ सूर्याय नमः
.
.
.
(No subject)
(No subject)
कायं लीहु.. मनातल सार भळभत
कविता खुपच आवडली ... असेच