Skip to main content

शांतरस

नियती

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 01/10/2012 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
कुणी पाहिली भोर उद्याची अवचित होइल भेट किती भांडणे तंडुन घेशी अखेर अंत समेट कोण्या नशिबी असे न संचित धुके हरवली वाट नसे दूर; अंधारी उमले रोज नवीन पहाट भंगुर हे क्षण भोगाचे उपभोगाचे वा दाट नियतीचे चिरअनंत फिरते आशा एक रहाट ......................अज्ञात
काव्यरस

देव नाही देवळात

लेखक विदेश यांनी रविवार, 30/09/2012 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
देव आहे, का देव नाहीच ! एक शंका घुटमळणारी, सदैव मनाला पोखरत आहे - देवळाबाहेर लंगडा माणूस एका आंधळ्याच्या ताटलीत आदबीने जवळचे नाणे टाकत आहे - हे असे का, ते तसे का अपंग नसतांना माझे मन पंगु बनायला सरावत आहे - देव जवळून गेला तरीही रांगेतल्या लोकांसोबत आस्तिक-नास्तिक चर्चा रंगत आहे ! .
काव्यरस

स्वामी तुम्ही तारा

लेखक अज्ञात यांनी गुरुवार, 20/09/2012 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
धरिला वृथा हट्ट वाळूस पकडतो घट्ट हाती काय उरावे, भाळतो कांचना भोगतो विवंचना खरे काय म्हणावे, गेली वेळ निघोनी मडके फुटके खालोनी, किती ते भरावे, शेवटी जळते काया भवती सगळी माया का मग रडावे, केला अहंकारे दंश वाढतो वासनेचा वंश कोणी सावरावे, विपरीत हे घडले मोहात शरीर सडले कोणी सोडवावे, वाट ही बिकट मार्ग हा धाकट पैलतीरी कोणी धाडावे, पोसतो ही काया स्वामी चरणांसी जाया जवळ तुम्ही करावे, स्वामी तुमचा दास चरणांचा तुमच्या ध्यास बोट तुम्ही धरावे,
काव्यरस

कायच्या काय

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी गुरुवार, 13/09/2012 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
बोलु नको काय, तुझे ऐकणार नाय बोलु नको काय, तुझे ऐकणार नाय दादा आज आम्ही बसणार हाय काळ्या काळ्या ओल्डमाँकची आणली आहे बाटली चौकोनाची बाटली पाहुन पोर सारी पेटली पेटलेल्या पोरांना चकणा पुरणार नाय दादा आज आम्ही बसणार हाय दोन पेग पोटी जाता डॉन होती सारे झोपी जाती काही काही मोजतात तारे वकार युनुसचा काही भरवसा नाय दादा आज आम्ही बसणार हाय सकाळी डोके दुखता हवा एक उतारा जमले नाही त्याने तर लिंबुपाणी मारा ऑफीस मात्र उगाच चुकवायचे नाय दादा आज आम्ही बसणार हाय बाटलीधर,

देवळाबाहेरचा गाभारा

लेखक अज्ञात यांनी रविवार, 09/09/2012 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा वाटल की देवळात जावं आणि देवाच दर्शन घ्यावं भर दुपारी तशी शांतताच होती, बहुतेक देवाचीसुद्धा आरामाची वेळ होती, मनात म्हंटलं नको द्यायला त्याला त्रास घटकाभर बघावी वाट, आणि पहावी आरास गाभारा तसा दिसत होता बराच प्रशस्त त्याची भग्नता देत होती गतवैभवाची साक्ष प्रांगणही देवळाच तसं जाणवत होतं मोठं पडक्या तटबंदीत सावरत होतं कस बसं एका कोनाड्यात काही लोक दिसत होते, दगडातून काहीतरी घडवत बसले होते, त्यातली काही वयस्कर, प्रौढ तर काही तरणी होती, जी छन्नी हातोड्याने नवनिर्मितेचे गीत गात होती, आजूबाजूला काही लहान मुलं ही खेळत होती, पण उडणार्‍या दगडांची त्यांना मुळीच चिंता नव्हती एक वेगळीच जादू त
काव्यरस

शब्दांचा स्पर्श !!

लेखक जेनी... यांनी गुरुवार, 06/09/2012 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
शांत स्वरात मिसळावा,अन एकच तरंग कानात घुमावा, इतका सुरेख प्रवास व्हायचा शब्दांचा ! कधी तोच शब्द, तुझ्या माझ्यात ओठांचा आधार घेऊन, अस्तित्व सिद्ध करायचा ! तर कधी, अबोल डोळ्यातल्या भावनेच्या स्वरूपात, स्वता:ला पहायचा ! मी खरच हरवून जायची ,उताविळ नजरेनं, तुझ्या नकळत तुझाच पाठलाग व्हायचा ! तुझ्या एकेक हालचालीवर, शांत नजरेन लक्ष ठेवायची मी, तुझं बोलन तुझं चालणं, अगदी तुझं माझ्याकडे चोरून बघणं हि मी मनमुराद लुटायची,पण मग कळलं, कि तुलाही शब्दांचा अर्थ जाणून घ्यायचाय ! तुझ्याही डोळ्यात, त्या अर्थाचे भाव तयार झालेत, तुझ्याही ओठांवर त्या शब्दांना, स्पर्शाच्या खुणा ठेवायची इच्छा आहे ! बाहेरच्या जगापासू
काव्यरस

वळवथेंब

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 31/08/2012 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
एक थेंब वळवाचा अंकुर पुन्हा उजवेल खपलीखालच्या वळणापाशी नवा श्रावण हिरवळेल पाउलवाटांचं काय पाऊल पडेल तिथे वाट सापडेल अवखळ खळखळणारं पाणी ओंजळीत साकळेल आकाशही मावेल मग त्यात रुसलेलं गावेल निर्व्याज पावेल मावळतीच्या संध्येकाठी चंद्र चांदणं हसेल ..................अज्ञात
काव्यरस

(गर्विष्ठ निराकाराच्या शष्पतत्वज्ञानाचे कवित्व)

लेखक मूकवाचक यांनी शुक्रवार, 24/08/2012 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रेरणा - http://misalpav.com/node/22536 ही रचना) तर्ककुतर्की खंडनमंडन अभिनिवेशी मतप्रतिपादन चिल्लरसांख्यी बथ्थडगोडी सूज्ञजनांचे अरण्यरूदन छद्मसाधुत्व अतिबोभाटा गुरूपदप्राप्ती आटापीटा आंजासंस्थळ फुकटचव्हाटा सद्वस्तुप्राप्ती घडेना घंटा! निराकाराची धुंद समाधी भ्रांतप्रचिती वृथाउपाधी चित्तदशेची भगेंद्रव्याधी भक्ती साधी, भक्ती साधी .... तळटीपा: साधी - सरळ, सोप्पी, सुसाध्य
काव्यरस