Skip to main content

शांतरस

जमणार नाही ... !!!

लेखक नाना चेंगट यांनी सोमवार, 25/06/2012 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
निवेदन - सदर काव्य दोनअडीच वर्षांपूर्वी मीमराठी या संकेतस्थळावर प्रकाशित झाले होते. निवेदन संपले. *** तेच ते...
काव्यरस

"...कविता कविता कविता..."

लेखक विदेश यांनी सोमवार, 18/06/2012 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
इकडे कविता तिकडे कविता बघावे तिकडे कविताच कविता पेपरच्या पुरवणीत कविता मासिकाच्या गदारोळात कविता रद्दी कागदावर दिसते कविता कवितेच्या रद्दीवर कविता सुटका नाही बजावतात कविता संमेलनात सतावतात कविता ऑर्कुट कविता सर्किट कविता ब्लॉग कविता फेसबुक कविता चितेवर कविता चिंतेवर कविता उन्हावर कविता पावसावर कविता गारांसारख्या आदळतात कविता धबधब्यासारख्या कोसळतात कविता तहानभूक विसरून कविता उठता बसता पाडतात कविता शब्दांपुढती शब्द कविता वेळही जातो बनते कविता
काव्यरस

सत्यमार्गा उजळुनी आम्हास तारा बापुजी

लेखक JAGOMOHANPYARE यांनी शनिवार, 16/06/2012 00:12 या दिवशी प्रकाशित केले.
अंतराळी कालगंगी अढळ तारा बापुजी सत्यमार्गा उजळुनी आम्हास तारा बापुजी पेटत्या हीमालयाची रोजची होई व्यथा तोफगोळ्यांचा धुमसता नित्य मारा बापुजी विहिर सुकली रान सुकले ऊष्ण उन्हाच्या झळा आपुल्या शेळीस आणू कुठुन चारा बापुजी भ्रष्ट नेते देश लुटती खाटकाची गाय ही संस्कृतीचे वाजवीती रोज बारा बापुजी पीक येवो वा न येवो नित्य कर्जे काढली फाटला घेऊन बोजा सात बारा बापुजी पाचशेची नोट कोणी काल दारी फेकली धुंद लोकांच्या सभेचा आज नारा बापुजी
काव्यरस

" अजून आहे लहान मी... ! "

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 15/06/2012 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
. नवे कपडे नवे बूट पुन्हा तीच शाळा - आजपासून पुन्हा दप्तर करा गोळा ! छान होती सुट्टी कित्ती कित्ती आराम रोज भोवताली गोळा राजा राणी गुलाम ! मित्र मैत्रिणी घालत अवतीभवती पिंगा, आईस्क्रीमच्या पार्टीचा रोजचा धांगडधिंगा रात्री होई जागरण दुपारी खूप दंगा - अभ्यासाचा मुळीच पाठीशी नव्हता भुंगा अस्सू दे ना ग आई शाळेला कायम सुट्टी अजून आहे लहान मी... अस्सू दे थोडा हट्टी !
काव्यरस

निराकार

लेखक अज्ञातकुल यांनी रविवार, 10/06/2012 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
आलो वेस ओलांडून देह जन्म त्वा वाहून आले गेले निरोपाचे रोप अंगणी लावून करू पाहिला संसार ऐहिकाचा मुका मार पळ पळालो बेजार नाही फिटला अंधार रूप निरूप आकार विरूपाची सोंगे फार जेहि देखणे पाहिले नाहि भेटला आधार जळू गेली माया काया छेडली अंगी शततार राहिल्या न पडदे भिंती दिसू लागले त्या पार क्षणाची उसंत बेतली उलगडले घन संभार घरटे उसवून उघडले उजेडास मिटले दार सुटे मोकळे आकाश जीव आता,.. विना पाश झिंग निराकार अशी ही नको पुन्हा उसने श्वास शेवटास आरंभाची चिरंजीव वेडी आशा राहुदेत ध्रुवापाशी अशी चंदनी आरास .........................अज्ञात
काव्यरस

झालरी

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 21/05/2012 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
झालरी वसने तरूंची मूक त्यांची स्नेहभाषा जाणिवांच्या भावरंगी उन्मनी एकच दिशा जे मिळे तेथेच देई अंबरी पायातही गूढ नाते या चराशी अंतरी हळवी नशा कोष गाभ्याचे कळे ना कोण विणतो साखरी अंशकण मजला मिळावे आळवे निज वैखरी ..............................अज्ञात
काव्यरस

निवडुंग

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 14/05/2012 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
रुतल्या कोर-कपारी दारी अगणित वांछा संसारी निवडुंग कुंपणी मी तैसा चाकरी करी खडकाळ तिरी निश्चल काटेरी खोड असे माळल्या विशाखा संभारी राखणे देखणे बहुतांचे अंकीत होतसे सहज उरी निरपेक्ष साधना जन्मभरी जड देह उभा; जळ गाभारी अवकाळहि माझा काळ नसे मी चिरंजीव तव दरबारी ...............अज्ञात
काव्यरस

अंगणात बाप, दारात माय,

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 13/05/2012 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
अरे अंगणात बाप अन दारात माय, घरला तुज्या यायला मी खुळा हाय की काय, येड्या, रानात गेला बाप अन बाजारला माय, एकली हाय घरला, आता येतो का नाय, घराकडे आलो तर काय काय देशील घराकडे आलो तर काय काय देशील गरम गरम पीठल अन भाकर तू खाशील सोताच्या हातानी भरवणार हाय, रानात गेला बाप अन बाजारला माय, एकली हाय घरला, आता येतो का नाय, पोटभर खाल्यावर लै झोप येते पोटभर खाल्यावर लै झोप येते दोघांसाठी खोलीत गोधडी घालते खोलीच दार आतुन लावनार हाय, रानात गेला बाप अन बाजारला माय, एकली हाय घरला, आता येतो का नाय, काय हुईल बाजारन जर आली आई काय हुईल बाजारन जर आली आई सांगेन आई ह्यो तुजा जावई, मागन मला घालायाला येनार हाय

तीन गझला

लेखक JAGOMOHANPYARE यांनी शनिवार, 12/05/2012 00:43 या दिवशी प्रकाशित केले.
------------१-------------------- बालकाच्या शुष्क गाली तू लळा शोधून ये जन्मता त्या टाकणार्‍या तू खळा शोधून ये जीवनाची द्वाड रेती निसटली हातातुनी सोडुनी गेला तुला त्या तू पळा शोधून ये जीवनाचा अर्थ पाणी सांगती जन सारखे बुडविली नौका तुझी त्या तू जळा शोधून ये कर्म करता कर्म करणे आणि जा विसरूनिया बोलते गीता तरीही तू फळा शोधून ये बंध होते प्रीतिचे अन स्वार्थ नव्हता कोणता आपल्याला जोडणार्‍या तू बळा शोधून ये --------------२------------------------ प्रेम म्हणजे काय मजला सांगते नसणे तुझे जाणवे हर एक श्वासा अंतरी असणे तुझे रातराणीच्या फुलांच्या गंधभरल्या तारका पौर्णिमेच्या चांदव्यासम त्यामधे बसणे
काव्यरस