Skip to main content

देवळाबाहेरचा गाभारा

लेखक अज्ञात यांनी रविवार, 09/09/2012 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा वाटल की देवळात जावं आणि देवाच दर्शन घ्यावं भर दुपारी तशी शांतताच होती, बहुतेक देवाचीसुद्धा आरामाची वेळ होती, मनात म्हंटलं नको द्यायला त्याला त्रास घटकाभर बघावी वाट, आणि पहावी आरास गाभारा तसा दिसत होता बराच प्रशस्त त्याची भग्नता देत होती गतवैभवाची साक्ष प्रांगणही देवळाच तसं जाणवत होतं मोठं पडक्या तटबंदीत सावरत होतं कस बसं एका कोनाड्यात काही लोक दिसत होते, दगडातून काहीतरी घडवत बसले होते, त्यातली काही वयस्कर, प्रौढ तर काही तरणी होती, जी छन्नी हातोड्याने नवनिर्मितेचे गीत गात होती, आजूबाजूला काही लहान मुलं ही खेळत होती, पण उडणार्‍या दगडांची त्यांना मुळीच चिंता नव्हती एक वेगळीच जादू त्या लोकांच्या हाती होती, जी काळ्या पाषाणातसुद्धा जीव ओतीत होती, साधारण मानवाची ही कसली किमया न्यारी, गाभार्यामतला देवही ती अचंभीत होऊन पाही, हातून त्यांच्या काय घडत होतं, ह्याच मात्र त्यांना भानही नव्हतं प्रत्येक घावाबरोबर दगडांचे उडत होते तुकडे, पण घडवणार्‍याचे चेहेरे मात्र मक्ख कोरडे, एकाच कारणासाठी बहुतेक त्यांनी हातोडी धरली, ज्याने कशीबशी त्यांच्या पोटाची खळगी भरली, निरागस कर्माच्या घामाचे जेव्हा दगडावर अभिषेक केले, तेव्हाच पाषाणाचे हृदय द्रवून दैव बाहेर पडले, मी मात्र विचार करू लागलो, आणि थोडासा गोंधळात पडलो, गाभार्‍यातल्या दगडात देव असतो की राबत्या हातात तो वसतो, कोणत्या दर्शनाला आलेलो आणि कोणते दर्शन झालेले, आता उशीर खूप झालेला, गाभाराही आता गजबजलेला नकळत हलकेच पाय निघू लागले, अन दर्शंनाविणाच माघारी फिरू लागले, पारिजात...
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3215
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

जीव घाबरा झाला ना! थीम छान आहे कवीतेची. सामान्यांमध्य, जीवंत माणसांतच देव असतो हे चांगले रेखाटले आहे.

सुंदर लिखाण , सुंदर आशय, ह्रदयाला भीडणारा...

तुमच्या प्रतिसादाबद्द्ल, मनःपुर्वक धन्यवाद !!!

आवडली कविता. माणसानं देव निर्माण केला म्हणतात ते असंच म्हणावं. -दिलीप बिरुटे

झम्प्या, तुमच्या कविता नेहमी छान असतात.

आवडली कविता, वातावरण निर्मिती फार छान केलीत!!

मनाला अतिशय भिडली. होय. तो देव तिथे गाभा-यात नसतोच. आपला तो आभास असतो की काय? की गैरसमज?

"गाभार्‍यातल्या दगडात देव असतो की राबत्या हातात तो वसतो" ? राबत्या हातातच तो जास्त वसत असावा.. वास्तववादी ! छान ! ! आवडली ! ! !