(गर्विष्ठ निराकाराच्या शष्पतत्वज्ञानाचे कवित्व)
लेखनविषय:
काव्यरस
(प्रेरणा - http://misalpav.com/node/22536 ही रचना)
तर्ककुतर्की खंडनमंडन
अभिनिवेशी मतप्रतिपादन
चिल्लरसांख्यी बथ्थडगोडी
सूज्ञजनांचे अरण्यरूदन
छद्मसाधुत्व अतिबोभाटा
गुरूपदप्राप्ती आटापीटा
आंजासंस्थळ फुकटचव्हाटा
सद्वस्तुप्राप्ती घडेना घंटा!
निराकाराची धुंद समाधी
भ्रांतप्रचिती वृथाउपाधी
चित्तदशेची भगेंद्रव्याधी
भक्ती साधी, भक्ती साधी ....
तळटीपा:
साधी - सरळ, सोप्पी, सुसाध्य
वाचने
5027
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
_/\_
In reply to _/\_ by प्रचेतस
छद्मसाधुत्व अतिबोभाटा गुरूपदप्राप्ती आटापीटा आंजासंस्थळ फुकटचव्हाटा सद्वस्तुप्राप्ती घडेना घंटा!पैतळ्याचे दार्शनिक असे हे अप्रतिम मौकवाचक्य आहे ;)
In reply to छद्मसाधुत्व by बॅटमॅन
+ १
In reply to छद्मसाधुत्व by बॅटमॅन
असेच म्हणतो.
राघव
In reply to छद्मसाधुत्व by बॅटमॅन
असेच म्हणतो.
छद्मसाधुत्व अतिबोभाटा
गुरूपदप्राप्ती आटापीटा
आंजासंस्थळ फुकटचव्हाटा
सद्वस्तुप्राप्ती घडेना घंटा!
या ओळी मस्त! :)
राघव
निराकाराची धुंद समाधी भ्रांतप्रचिती वृथाउपाधी चित्तदशेची भगेंद्रव्याधी भक्ती साधी, भक्ती साधी ....भारीच. :D
In reply to निराकाराची धुंद by किसन शिंदे
+१.
चित्तदशेची भगेंद्रव्याधी तर केवळ नोबेलपात्र!!
In reply to +१. चित्तदशेची भगेंद्रव्याधी by बॅटमॅन
चित्तदशेची भगेंद्रव्याधी तर केवळ नोबेलपात्र!!अगदी अगदी
In reply to निराकाराची धुंद by किसन शिंदे
वाह वाह !!
:D
मेलो मेलो 

नीर क्षीर सागर विवेक बुद्धी अनंतात विलीन झाली ...
अरारारा
क लिवलंय,क लिवलंय
संजयाला बोलवा रे कुणीतरी , मा पामराच्या साध्या चक्षुंना या काव्याचे रसग्रहण करता येत नाहीये
त्याला दिव्य दृष्टीच हवी
(धूर्त राष्ट्र ) इस्पा


नीर क्षीर सागर विवेक बुद्धी अनंतात विलीन झाली ...
अरारारा
क लिवलंय,क लिवलंय
संजयाला बोलवा रे कुणीतरी , मा पामराच्या साध्या चक्षुंना या काव्याचे रसग्रहण करता येत नाहीये
त्याला दिव्य दृष्टीच हवी
(धूर्त राष्ट्र ) इस्पा हाहाहा :) मस्त टोले.
घंटा कळले नाही.
मुकोबा कधीतरीच तोंड उघडतो पण मग कसाच थांबत नाही!
=)))
दे दणका! ;)
हम्म. आधी या काव्याला न वाचता त्याचे रसग्रहण कम निरुपण करायचा विचार होता.
चुकून वाचले. थोडे समजले.
मग परत वाचले. अजुन थोडे समजले.
विचार केला लिहू.
तेव्हा समजत नाही असे वाटले.
मग परत वाचले.
आता मला एवढेच समजते की मला समजत नाही,
थोडक्यात निरुपणाची आयडीया... कॅन्सल. ;)
वाह वाह छाण छाण. :)
हि हि हि : : :
और हम बोले तो ...
तर्ककुतर्की खंडनमंडन
अभिनिवेशी मतप्रतिपादन
चिल्लरसांख्यी बथ्थडगोडी
सूज्ञजनांचे अरण्यरूदन
छान. वरील ओळी मोठ्या आवाजात म्हणुन पाहिल्या. मजा आली. :)
-दिलीप बिरुटे
गुर्जी, मान गये !
ह ह पु वा
काय हाणलाय.. पार बाउंड्रीच झाली
तुमचे 'एका तळ्यात होती'चे विडंबन फार आवडले होते. हे पण जबरदस्त! तळटीप म्हणजे कहरच आहे. ;)
क ड क...!
म्याउ!!! :)
मूकवाचका.. बऱ्याच दिवसांनी 'पद्यात' काही फक्कड असे वाचायला मिळाले..
सगळ्या गोष्टी नाही कळल्या... पण भावल्या मात्र नक्की.. :)
बाकी तळटीप म्हणजे 'आईसक्रीमवरची चेरी' .. अचूक आणि समर्पक..
(मिपावरवर फ्यान-लिस्टची सोय हवी... ;) )



_/\_