Skip to main content

मुक्त कविता

तो मुशाफर

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 07/12/2023 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
तो मुशाफर मध्यरात्री चांदण्यांशी बोलतो नश्वराच्या तागडीने शाश्वताला तोलतो दीर्घिकांच्या अंतरंगी अग्नि जो कल्लोळतो आणुनी त्या भूवरी तो मृगजळाने शिंपतो स्थूलसूक्ष्मातील सीमा जेथ होते धूसर त्या तिथे थबकून थोडा, द्वैत सगळे मिटवितो चेतनेची स्पंदणारी नाळ जिथुनी उगवते त्या जडाच्या जटिल प्रांती प्राणफुंकर घालतो शोधिले मी त्यास जळिस्थळी, काष्ठी आणि पत्थरी शोध माझा दर्पणी प्रतिबिंब बघुनी संपतो
काव्यरस

चांद्रयान तीन......स्वप्न पूर्ण जाहले

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 24/08/2023 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
चांद्रयान देखणे ते चेहरे पंडितांचे, हिरमुसले स्वप्न चांद्रयान, जेव्हां विखुरले हसले फिदीफिदी, छद्मवेषी म्हणती नऊशे कोटी मातीत घातले. "आर्यभट्ट,मिहीर,विक्रम का इतिहास अपना, दधिचीसा दृढःसंकल्प,पवनपुत्रसा बल अपना दिल ना तोडो,छप्पन इंच सिना अपना एक सौ चालीस साथ है...'कर लो मुठ्ठीमें चांद को', फिरसे बनाओ चांद्रयान तीन को".... घेउन ओज,तेजःपुंज ज्ञानीयांचा,सज्ज तांडा जाहला मिशन चांद्रयान तीनचा,पुनश्च पांचजन्य वाजला गोठले शब्द ओठी,श्वास काही रोखले श्रमसाफल्य पाहता,मनोमनी सुखावले पाहून विक्रमास, तो चंद्र गाल

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

लेखक गड्डा झब्बू यांनी शनिवार, 08/07/2023 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३
काव्यरस

और तुम्हारे कंधे का तील..

लेखक प्राची अश्विनी यांनी रविवार, 25/06/2023 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या नजरेतलं लाडीssक आमंत्रण स्विकारून, गालावरच्या मिरीमिठाचा तो खरखरीत स्पर्श अनुभवत, थोsडं खाली उतरलं की तुझ्या खांद्यावरचा तो एक धीटसा तीळ, खुणवून बोलवणारा. त्याला आंजारायचं गोंजारायचं आणि मग तुझ्या पाठीवरून अजून खाली जायचं. कंबरेवरच्या जुन्या व्रणांवर हळूच ओठ टेकवले की उमटणारी थरथर मुरवून घ्यायची अंगभर.. आणि मग ओठांनीच जोडत बसायचे तुझे सगळे तीळ. अगदी निवांत... जर थकले तर क्षणभर विसावायला असतोच की तुझ्या खांद्यावरचा तो हक्काचा तीळ.. .... मधेच मान वर करून पहावं तर मिशीतल्या मिशीत हसत आभाळभर मायेनं मलाच निरखणारा तू.. किती गोड चित्र असतं हे माहितीये? .... चंद्रमाधवीच्या एकशे सोळा रात्रींना

बस्स! फक्त एवढंच कर...

लेखक चक्कर_बंडा यांनी गुरुवार, 01/06/2023 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस कसाबसा निघून जाईल कातरवेळ मात्र अंगावर येईल तू फक्त माझी सय काढू नको "ती" आली तशी संपून ही जाईल मग काही अबोल-अनाथ स्वप्ने वाऱ्यावर बेवारस फिरत-उडत रात्रारंभी तुझ्या खिडकीशी येतील डोळ्यांवाटे आत शिरू पाहतील त्यांना अजिबात थारा देऊ नकोस डोळे अगदी घट्ट मिटून घे हात बाहेर न काढता आतूनच निग्रहाने "ती" खिडकी बंद कर मग मऊ केस झटकून जरासे कुरळ्या बटांना मोकळं कर सुकलेले ओठ घट्ट करून पाठीला उशी लावून स्वस्थ बस पुर दाटून आलाचं पापण्यांमध्ये तर त्याला तिथेचं थोपवून ठेव अन् माझा चेहरा आठवलाचं तर चुकूनसुद्धा झरू नकोस मी "हरवून" गेलोय कधींचं मला पुन्हा शोधत बसू नकोस तुझ्या बाजूला गाढ झोपलेल्याला
काव्यरस

चाललोय....

लेखक चक्कर_बंडा यांनी मंगळवार, 09/05/2023 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
काळेसावळे ढग, दरीतल्या सावल्या पावसाचा साज, बुजलेली पाऊलवाट, वाऱ्याचे बहाणे, सोनकीचे डोलणे मुरवत चाललोय.... हिरवीगारं कुरणं, दगडी शेवाळ विहीरीतला खोपा, कुत्र्याच्या छत्र्या चंद्रमौळी विसावा, खापरी कौलं निरखत चाललोय.... देवळाची पायरी, चाफ्याचा दरवळ सोनसळी पावलं, पैंजणांचा गुंजारव नजरेतला नखरा, माळलेला गजरा आठवत चाललोय.... क्षण तुझ्या दरवळत्या अस्तित्वाचे कण तुझ्या विरघळत्या भासांचे दशकं सरली, चालण्याचा मोह सुटेना जगणं कसलं ???
काव्यरस

एकदाच काय ते बोलून टाकू

लेखक मित्रहो यांनी शुक्रवार, 07/04/2023 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
होळीच्या पूर्वसंध्येवर एक हलकीफुलकी कविता लिहिली होती. खास पुणेकर प्रेमींसाठी, यात बरेचसे पुण्याचे संदर्भ आहेत.

पडघम

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 22/11/2022 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
अनाम तार्‍याच्या गर्भीचे ऊर्जा वादळ लवथवणारे उधळून देते विस्फोटातून विकीरणांचे पिसाट वारे दुबळी दुर्बिण अधांतरातून अनंतात डोकावून बघते सर्वव्यापी, निर्लेप, अनादि स्थळकाळाचे चित्र रेखिते आतशबाजी अवकाशातील निरभ्रातुनी मला खुणविते भव्यत्वाचे क्षुद्रत्वाशी अबोध नाते अधोरेखिते अज्ञाताचा अदम्य रेटा परतविण्याचे प्रयत्न माझे थिटेच ठरती, रोमरोमी मग कुतूहलाचा पडघम वाजे
काव्यरस