मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तो मुशाफर

अनन्त्_यात्री · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
तो मुशाफर मध्यरात्री चांदण्यांशी बोलतो नश्वराच्या तागडीने शाश्वताला तोलतो दीर्घिकांच्या अंतरंगी अग्नि जो कल्लोळतो आणुनी त्या भूवरी तो मृगजळाने शिंपतो स्थूलसूक्ष्मातील सीमा जेथ होते धूसर त्या तिथे थबकून थोडा, द्वैत सगळे मिटवितो चेतनेची स्पंदणारी नाळ जिथुनी उगवते त्या जडाच्या जटिल प्रांती प्राणफुंकर घालतो शोधिले मी त्यास जळिस्थळी, काष्ठी आणि पत्थरी शोध माझा दर्पणी प्रतिबिंब बघुनी संपतो

वाचने 1598 वाचनखूण प्रतिक्रिया 3