Skip to main content

मुक्त कविता

ऐसे ऐकिले आकाशी

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 11/12/2021 23:06 या दिवशी प्रकाशित केले.
(१) ग्रहकक्षांच्या कातीव रेषा वितान अवकाशाचे व्यापून- अचूकतेची लय सांभाळीत- परस्परांशी अंतर राखून- कुजबुजल्या,"हे अष्टग्रहांनो, फिराल तुम्ही अथकपणाने विश्वांताचा क्षण आला तरी अमुच्या आभासी पण तरिही अभेद्य ऐशा बेड्या घालून?" (२) पिठूर केशरी चंद्रधगीने स्फटिकतळ्यातील मासोळीला म्हटले बिलगून जललहरीतून, "झगमगणारे लोलक दाहक त्वचेवरून देशील का काढून? मावळतीवर जेव्हा तारे- भल्या पहाटे फिक्कट होतील- तेव्हा त्यांना तेज त्यातले थोडे थोडे देईन वाटून"
काव्यरस

B.1.1.529

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 29/11/2021 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
मश्गूल मानवा थेट डिवचून हताश करून पुरे मास्कवून ज्ञानविज्ञानाला कुंठित करून जुन्या गृहितांना निष्प्रभ करून चाकोर्‍या आडाखे मोडून तोडून कल्पने पल्याड पायंडे पाडून वाटले गेला तो कायम निघून... गनिमी काव्याने माघार घेऊन, अस्पष्ट, दुरून, कोण हे बोलते? "पुन्हा मी येईन" "पुन्हा मी येईन"
काव्यरस

किनखापी आभाळाने

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 13/11/2021 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
किनखापी आभाळाने लपविले निळे नक्षत्र मृगजळात बुडून गेले काळाचे घटिकापात्र थोपवल्या आवेगांच्या डोहात दफनली रात्र रिक्तता नसे ज्या ठावी ते फुटले अक्षयपात्र जागवूनी पिशाच्च शमतो का कधी अघोरी मंत्र ?
काव्यरस

गाथा

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 07/11/2021 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
तुकारामाच्या गाथेने जेव्हा पछाडले मला तेव्हा ज्ञानोबा नावाचा एक मांत्रिक शोधला भ्रम रिंगण तोडून ज्ञानोबाने केली शर्थ कानामध्ये सांगितला गहनाचा गूढ अर्थ त्याची बहीण मुक्ताई सार्‍या मांत्रिकांची माय सूर्य गिळण्या ही मुंगी नभ उल्लंघून जाय "गाथा बुडवून टाक" मला मुक्ताई दटावे गाथा तरंगून येते अंतर्यामी तिला ठावे गाथा रक्तात भिनते गाथा वज्रलेप होते शब्द रोकडे बोलत पुन्हा पुन्हा पछाडते
काव्यरस

वाडा

लेखक प्रसाद गोडबोले यांनी सोमवार, 25/10/2021 01:38 या दिवशी प्रकाशित केले.
जुनाट वाडा, उजाड मंदीर, पडकी कौले ,पडक्या भिंती शिसवी तुळया वाळवीसही सांगत असतील गतश्रीमंती || इथे जाहल्या कित्येक मुंजी कित्येक लग्ने किती सोहळे वाड्यानेही मनसोक्त भोगीले सुखदु:खांचे हे हिंदोळे || कित्येक घरटी इथेच वसली, इथेच फुलली, इथे बहरली कित्येक पाखरांचीही किलबिल ह्या वाड्याने इथे पाहिली || सारी पाखरे मोठ्ठी झाली बघता बघता उडो लागली संवत्सरफल ऐकत ऐकत कित्येक वर्षे सरोनी गेली || फुटलेले नवपंख घेती मग गरुड भरारी हिरव्यादेशी एकाकीपण उमगत जाई रोज नव्याने नवीन दिवशी || आता वाडा असा एकटा सोबत नाही कोणी सोबती मंदिरामध्ये कुणी अनामिक चार दों फुलें वाहुनी जाती || बाकी सारे बेवारस अन कुणीच न
काव्यरस

आभाळाच्या फळ्यावर

लेखक अनन्त्_यात्री यांनी बुधवार, 20/10/2021 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
धूमकेतूच्या खडूने आभाळाच्या फळ्यावर काहीबाही लिहीण्याची होता ऊर्मी अनावर चांदण्यांच्या ठिणग्यांची घेतो मदत जराशी चित्रलिपी सजविण्या लिहीतो मी जी आकाशी रात्र होते जशी दाट तशा काही अनवट मिथ्यकथा नक्षत्रांच्या उजळती नवी वाट झळाळते तेजोमेघ गूढ कृष्णविवरांशी बोलताना, जोडतो मी नाळ आकाशगंगेशी भेट विराटाशी थेट माझ्या नक्षत्रभाषेची रोमरोमातून तिच्या रुणझुण ये सूक्ष्माची लागे उगवतीपाशी जेव्हा उषेची चाहूल माझ्या नक्षत्रभाषेची फिकटते चंद्रभूल

हाच क्षण

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 08/10/2021 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
चाल चाल चालत गेलास वणवण भटकून थकून गेलास हाच क्षण मोलाचा रोवून पाय थांबायचा दार दार ठोठवत गेलास उंबरा उंबरा झिजवत राह्यलास हाच क्षण मोलाचा तोडून दार घुसायचा वाच वाच वाचत गेलास वाचून वाचून साचत गेलास हाच क्षण मोलाचा फोडून बांध लिहायचा
काव्यरस

शब्दांची कर्णफुले

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 24/09/2021 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दांची कर्णफुले प्रसन्न सुंदर सुगंधी सकाळी प्रेम बरसले अवचीत अवकाळी नाहत्या ओलेत्या भोर केशांतून थेंब तयाचे अवतरले भाळी ओठी शब्द फुलून आले शब्दांचे मग मोती झाले तु ते हळूवार उचलूनी घेत कर्णफुलांसम कानी ल्याले (मिपाच्या यंदाच्या दिवाळीअंकासाठी काही उत्पादन करावे म्हणून या शब्दफुलांचे उत्पादन घेतले होते. पण आम्हा शब्दशेतकर्यांच्या मनाच्या गोदामात अनेक प्रकारचा लगोलग नष्ट पावणारा पण भरघोस उत्पन्न मिळणारा माल तयार होत असल्याने आहे ते उत्पादीत शब्दपीक मिपाच्या साहित्य मंडईइत विकायला ठेवले आहे.

धत् तेरे की...

लेखक प्राची अश्विनी यांनी सोमवार, 13/09/2021 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
तसं म्हटलं तर त्यांची ती होती खरीखुरी डेट पण तिच्या त्याच्या मनासारखी घडलीच नाही भेट.. सुट्टीचा दिवस होता, Backdrop ला पाऊस होता. Romantic होतं weather, एकांताची हलकी चादर. ती म्हणाली, खरंच येऊ? तो म्हणाला, yes plz, I'll wait.... पण... तिच्या त्याच्या मनासारखी घडलीच नाही भेट.. खरंतर त्याच्याचसाठी नेसली ती नव्वीन साडी ह्रदयात तिच्या धडधडणारी सुप्परफास्ट होती गाडी. तरी बरं तोंडावरती लावला होता मोठ्ठा मास्क नाही तर hiding feelings is not a simple task! चेहरा कोरडा करून म्हणे, "Soooo sorry for the late" पण....

कानाखाली जाळ

लेखक बाजीगर यांनी बुधवार, 25/08/2021 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
काय निवडावं लोकांनी बॅड कि वर्स ? कसला लागला आहे हा महाराष्ट्राला कर्स कितवा स्वातंत्रदिन आहे हे विसरणारा मुख्यमंत्री कि कानाखाली वाजवण्याची भाषा करणारा मंत्री तिसरी लाट, अफगाणीस्थान झालं, मिडीयाला चघळायला नवं हाडूक कोरोना, रोजगारी,वाहतूक,सुरक्षा सर्वच मूळविषय झाले गूडूप किती उर्जेचा होतो विध्वंस मनातल्या हिंसा-द्वेषाने कीव येते चूकीचे समर्थन करुन लढणा-यांचे त्वेषाने दोन पक्षांच्या बेरोजगार गुंडांना रोजगार मिळाला करण्याचा राडा जनतेच्या मालमत्तेच्या पहा काचांचा रस्त्यांवर सडा. अजाणत्या राजाला म्हणे हे काही विशेष नाही (?!) राण्यांची हीच संस्कृती म्हणे म्हणून काही निषेध नाही. सुसंस्क