माझ्या आत सतत काहीतरी वाजतंय
कोण आहे?
सारखी टक टक टक
.
.
.
सहन होत नाहीये आता
कोण आहे आत?
.
.
.
बहुतेक एक कविता अडकली आहे
.
.
गोजीर्या शब्दांची,
साजीर्या उपमांची,
खूप काळ लोटला आहे
अडकली आहे, तळघरात
.
.
तिने बराच प्रयत्न केला, बाहेर पडण्याचा
पण सगळं निष्फळ
.
.
.
.
.
एकदा त्सुनामी सारखी उसळून बाहेर आली
.
.
.
बाहेर पडलीय तर
छिन्नविछिन्न अन् रक्तबंबाळ
.
.
.
डॉक्टर म्हणाले
आता ती अन् तिचे नशीब
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(३१/१०/२०११)
व्वाह!!
चांगली
In reply to चांगली by श्रावण मोडक
रचनाच मुळात विषण्ण मनोवस्थेत
सुरेख
कविता वाचून खूप्,खिन्न ,निराश
राखेत जन्मणार्या पक्ष्यापरी
मस्तच रे! चांगली जमली आहे
छान.