Skip to main content

करुण

..उरला पलाश आता

लेखक राघव यांनी मंगळवार, 01/11/2011 या दिवशी प्रकाशित केले.
सगळीच राख येथे.. दिसतो विनाश आता.. नुसते वळून बघता तुटतात पाश आता.. पाहून कुंपणा त्या.. जाणीव तीव्र होते; घर तेवढे निमाले..उरला पलाश आता.. राखेत जन्मणार्‍या पक्ष्यापरी स्थिती..की.. सर्वस्व जाळुनी मज दिसते अकाश आता? अंधार तेवतांना ठिणगी महाग होती.. डोळ्यांस त्रास होतो दिसता प्रकाश आता... आसुसल्या मनाला.. कूस तेवढी मिळेना.. आसेतलेच आर्त.. होते निराश आता.. (विषण्ण) राघव
काव्यरस

कविता

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 31/10/2011 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या आत सतत काहीतरी वाजतंय कोण आहे? सारखी टक टक टक . . . सहन होत नाहीये आता कोण आहे आत? . . . बहुतेक एक कविता अडकली आहे . . गोजीर्‍या शब्दांची, साजीर्‍या उपमांची, खूप काळ लोटला आहे अडकली आहे, तळघरात . . तिने बराच प्रयत्न केला, बाहेर पडण्याचा पण सगळं निष्फळ . . . . . एकदा त्सुनामी सारखी उसळून बाहेर आली . . . बाहेर पडलीय तर छिन्नविछिन्न अन् रक्तबंबाळ . . . डॉक्टर म्हणाले आता ती अन् तिचे नशीब |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (३१/१०/२०११)
काव्यरस

दूर गाव माझा

लेखक भास्कर केन्डे यांनी शुक्रवार, 28/10/2011 या दिवशी प्रकाशित केले.
राहिला दूर गाव माझा मी असा का भरकटलो श्वास इथे अन आत्मा तिकडे खरे, असा मी का जगलो? क्षण क्षणातून जगलो मी का कण कणातून मी वधलो नेत्र इथे अन अश्रू तिकडे खरे, असा मी का रडलो? नव्हता दुश्मन रणही नव्हते दमून पुरता मी हरलो हृदय इथे अन स्पंदन तिकडे अरे असा मी का लढलो? जावे फिरूनी कुशी गावच्या साद गावची घुमत असे उगव भास्करा रात्र ढळू दे प्रभात मंगल पुन्हा दिसे.
काव्यरस

पहाटे पहाटे फिरायला ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 27/10/2011 या दिवशी प्रकाशित केले.
पहाटे पहाटे फिरायला जाताना मला ह्या पोरी ,बाया दिसतात पाठीवर झोळी नि हातात तारेचा हूक [वारसाहक्काने त्याना मिळाला असतो हा ठेवा ] कचरा कुंडीत काहीतरी शोधीत बसतात ह्या शोधत असतात प्ल्यास्टिकच्या बाटल्या , कसली कसली फेकलेली खोकी विजेची वायर काय नि काय काहीतरी निराळेच मिळाले तर आनंदात असतात मी चालत असतो खरपूस वेगाने वाढलेली चरबी ,पोट संतुलित ठेवण्यास आणि घरी जाऊन मला चहा प्यायचाय हे देखील विसरत नसतो [!!] आणि ह्या माझ्या मागून पुढे जातात भन्नाट वेगाने दुसर्या कचरा कुंडीच्या शोधांत कचरा चिवडित बसतात विस्कटून टाकतात सगळा कचरा रस्त्यावर घाण करून जातात काहीतरी मिळेल ह्या आशेने खूप क
काव्यरस

शप्पत तो देखील भिजला होता....!!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 25/10/2011 या दिवशी प्रकाशित केले.
निरोप घेता घेता उंच उडणारे विमान बघता बघता ती हलकेच डोळ्यातला थेंब पुसत म्हणाली आभार, परत कधी ..?
काव्यरस

रक्तगंध

लेखक प्रचेतस यांनी गुरुवार, 13/10/2011 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा हा विडंबनाचा चुकार टुकार प्रयत्न प्रेरणा -स्पा यांची ग्रहण ही कथा आणि गणेशा यांची स्पर्शगंध ही कविता. हे विडंबन रचण्यात ५०फक्त यांचे मोठे योगदान आहे, त्यांचे खास आभार. रक्तगंधाने बुजलेल्या वाटेवरती तो स्पर्श बोचरा होता सुरकुतल्या कोरड्या कातडीत मात्र रक्तनिर्झर खळाळत होता हलक्याच कुटील चाव्याने तो कुशीवर वळताच त्या हिरव्या डोळ्यांच्या मागे देह वेदनेत बुडाला होता तशातच आकाशात रात्रीने सोडला काळिमा अभद्र कौलारु खोल्यांमधुनी अजुनी तो रात्री भटकत होता जळमटलेल्या काळोख्या रात्री एक चांदणी ध