मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दूर गाव माझा

भास्कर केन्डे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
राहिला दूर गाव माझा मी असा का भरकटलो श्वास इथे अन आत्मा तिकडे खरे, असा मी का जगलो? क्षण क्षणातून जगलो मी का कण कणातून मी वधलो नेत्र इथे अन अश्रू तिकडे खरे, असा मी का रडलो? नव्हता दुश्मन रणही नव्हते दमून पुरता मी हरलो हृदय इथे अन स्पंदन तिकडे अरे असा मी का लढलो? जावे फिरूनी कुशी गावच्या साद गावची घुमत असे उगव भास्करा रात्र ढळू दे प्रभात मंगल पुन्हा दिसे.

वाचने 1240 वाचनखूण प्रतिक्रिया 4

गावाकडे परतण्याची हुरहुर शब्दातून उत्तम व्यक्त झाली आहे. काही इथे तर काही तिथे अशा भावभावनांची गर्दीही झालेली आहे. अजून येऊ द्या. -दिलीप बिरुटे