Skip to main content

दूर गाव माझा

लेखक भास्कर केन्डे यांनी शुक्रवार, 28/10/2011 03:20 या दिवशी प्रकाशित केले.
राहिला दूर गाव माझा मी असा का भरकटलो श्वास इथे अन आत्मा तिकडे खरे, असा मी का जगलो? क्षण क्षणातून जगलो मी का कण कणातून मी वधलो नेत्र इथे अन अश्रू तिकडे खरे, असा मी का रडलो? नव्हता दुश्मन रणही नव्हते दमून पुरता मी हरलो हृदय इथे अन स्पंदन तिकडे अरे असा मी का लढलो? जावे फिरूनी कुशी गावच्या साद गावची घुमत असे उगव भास्करा रात्र ढळू दे प्रभात मंगल पुन्हा दिसे.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1246
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

गावाकडे परतण्याची हुरहुर शब्दातून उत्तम व्यक्त झाली आहे. काही इथे तर काही तिथे अशा भावभावनांची गर्दीही झालेली आहे. अजून येऊ द्या. -दिलीप बिरुटे

अहो राव खुपच छान.... असावं असच आपलं गाव, जीथे शब्दांनी व्यक्त होईल मनातील भाव.............