मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

करुण

बालपणीचा गाव

navinavakhi ·
लेखनविषय:
काव्यरस
सहज वाटे धावत जावे गावाच्या आठवणीत क्षणभर थांबावे तो गाव मज आठवे सुर पारंब्या, मन जेथे झुलवे ती आंब्यांची न्याहारी त्या रात्रीच्या गप्पा धुंडाळला लपंडावात वाड्याचा हरेक कप्पा त्या संध्याकाळच्या वेळी गप्पा न् रानापर्यंत फेऱ्या रसाळ रानमेवा तो रानातल्या झाडावरील साऱ्या लाडिक हट्टाने घेतलेल्या त्या वाण्याकडील गोळ्या नव्या कोऱ्या लोणच्यासोबत त्या धबाडक्या पोळ्या त्या भुताखेतांच्या गोष्टी ते गोधडीसाठीचे भांडणे मिळता पांघराया गोधडी भावंडांना चिडवून रडवणे सारे हरवले आता हे, सर्व आहे मज ठावे तरीही मन पुन्हा पुन्हा गावाकडेच धावे

चाहूल

navinavakhi ·
लेखनविषय:
काव्यरस
हुरहूर मनी दाटता चाहूल तुझी लागता क्षणात वाटे आला वारा अलवार केस उडवणारा तुझा तो तनगंध करे मज बेधुंद हळुवार तलम स्पर्श फुलवे मनी हर्ष कधी जातील विरह क्षण कधी संपतील हे वर्ष

अखेर

अज्ञातकुल ·
लेखनविषय:
काव्यरस
मी अडखळलो धडपडलो ठायी ठायी सांभाळ मुला रे सांगुन गेली आई ती प्राणपणाने लढली घन तिमिरात कष्टात गुंतली अथक राबली बाई मायेत गुंफुनी ऊब; गाइली अंगाई भेटलो कधी तिज अखेर; आठवत नाही वाढता वाढता वय गढले संसारात मन शिणले; अवचित वृद्ध पाहिली माई हरवल्या सावल्या हरले ऋण ओघात मी जडलो अंधारात जखडलो उणा पोरका आत ठरवून न ठरवूनही न घडले कांही निसटल्या क्षणांनो सांगा मज; मी कसा होउ उतराई.... .............अज्ञात

झाडे वाट बघत बसतात ...!!

प्रकाश१११ ·
लेखनविषय:
काव्यरस
मी बघतोय ह्या देशातील सूर्य बर्फात गुंडाळून ठेवलेला शुभ्र वाटतोय खुपसा पण तोंडावर बोट गप्प गप्प मुकामुकासा जीव गुदमरून जातोय त्याचा बर्फाच्या अटकेतून सुटण्याची त्याची धडपड चिंब थंड होऊन निसटतात त्याची किरणे बाहेर निसटले की तेही गारठून जातात लंगडत लंगडत खुरडत हलकेच झाडावर रेंगाळत बसतात शुभ्र बर्फ झाडांच्या काष्ठ शिल्पावर पिवळ्या उन्हाचा तुकडा हलकासा स्पर्श नुसता कोरडा निर्जीव केविलवाणा...!!

(हल्ली मी घेतच नाही ...(؟)... )

गणपा ·
लेखनविषय:
फिझा यांची माफी मागुन त्यांच्या लिहिण्याला ही आमची पोच. हल्ली मी काही घेतच नाही ..(؟)... भांजाळला गाल एकदा पाठीवर उमटले वळ ... आणि निघाली कमरेतुनी कळ त्या कळीची दाहकता कुणा कळतच नाही हल्ली मी काही घेतच नाही ... घेण्याची कारणे होती हजार चढणार प्रेट्रोल,वाढती महागाई वर तुटपुंजा पगार ... विदेशी 'टाकुन', देशी घेतली तरीसुद्धा ..... कळी माझी खुलतच नाही हल्ली मी काही घेतच नाही ... नाही नाही म्हणत परत बळेच भरला ग्लास ... पुढ्यातला चखणा आणि माझं मुस्काट यांची सांगड घालणे मला जमलेच नाही .... पण हल्ली मी घेतल्या वाचुन रहातच नाही ...

तिचा नवरा -१

सन्जोप राव ·
लेखनविषय:
काव्यरस
काही ओळख वगैरे नव्हती आमची. भेटला तसा अपघातानंच. 'बायको माझी...' म्हणाला 'हुषार आहे अगदी' हसलो मी. 'बायका असतातच हुषार' म्हणालो 'नाही, पण ही..' तो म्हणाला 'अ‍ॅक्टिव्ह हो अगदी सकाळी जिम. न चुकता घरी तर लक्ष इतकं सगळ्यांच्या तब्येती, मल्टिव्हिटॅमिन्सच्या गोळ्या, फळंबिळं.. माझ्याकडं बघताय ना?

आग्निपरीक्षा

गार्गी_नचिकेत ·
लेखनविषय:
काव्यरस
जगी एकटेच येणे अन एकटेच जणे, नत्यान्चे हे कच्चे धागे मग कशास बान्धावे, बाल्य, तारुण्य, वर्धक्य तीन अन्कन्चा हा खेळ, कोणा द्यावा किती वेळ हे तो ठरवतो काळ. देह सोडुन जाताना प्राण क्षणार्धात जातो, मागे राह्णारा मात्र दु:ख आजन्म भोगतो. का ही अग्निपरीक्षा चान्गल्याच्या माथी येई, तरण्याला आता देवा सीतेचेच बळ देई.

युगलगीतः आज पाहणार आहे

पाषाणभेद ·
काव्यरस
युगलगीतः आज पाहणार आहे
(सदर युगलगीत एकाच व्यक्तीने गायले आहे अशीही कल्पना करता येवू शकते.) तो: आज पाहणार आहे, उद्या पाहणार नाही; आज राहणार आहे, उद्या राहणार नाही ||धृ|| ती: आज पाहणार आहे, उद्या पाहणार नाही; आज राहणार आहे, उद्या राहणार नाही ||धृ|| तो: दोन दिवसांची भेट आपली; ह्रदयात खोलवर रूतून राहीली ती: वरवर भासे शांत सागर; आतील त्सुनामी दिसणार नाही ||१|| ती: आनंदाचे गवत पसरले; दु:खाचे डोंगर झाकले तो: खडकातला विटला पाझर; पाणी आता वाहणार नाही ||२|| तो: आलो, भेटलो, बोल बोललो; रमलो, हसलो, कधीतरी रडलो ती:

किसमिस

लीलाधर ·
लेखनविषय:
काव्यरस
अचानक तीने घेतला माझ्या हाताचा किस, त्यानंतर येणार्‍या प्रत्येक दिवशी आणि रात्री आम्ही खाऊ लागलो प्रेमाचे किसमिस, दीवस गेले भूरभूर लागली लग्नाची हूरहूर, खरं म्हणजे माझ्या लग्नाची बाबाच काढणार होते छानशी वरात, पण मीच आणली हट्ट करून हीला घरात, आता मात्र खरंच दिवस गेले आणि आमच्या सौंच्या बुद्धीमत्तेचे दीवे घरभर पेटू लागले, एक दीवस तीने मागितली आमच्या ईस्टेटीची परात, मी मात्र बुडून गेलो दारू सोबत अंधारात, मरून गेलेल्या बाबांचा मागून यायचा आवाज, बाळा यालाच म्हणतात- बीन बुडाची आणि बीन घोडयाची वरात, म्हणूनच आपण रहावे आपल्या रीतीभातींच्या घरात आपल्या रीतीभातींच्या घरात.

ती वाट

मिसळलेला काव्यप्रेमी ·
लेखनविषय:
काव्यरस
ती वाट गोकुळातून कुंजवनाकडे जाणारी आजही ती त्याच वाटेवर प्रतीक्षा करतेय कदाचित, तिचा प्राणसखा कधीतरी अवतरेल कुंजवनातील राधिकेला भेटायला आलाच तर तिचेही भाग्य उजळेल . त्याच्या पाऊलखुणांचा वेध घेत धूळभरल्या वाटेवर अजूनही त्या स्पष्ट होत्या पण फक्त आत जाणार्‍या बाहेर येणार्‍या काहीश्या विरळ झालेल्या . त्या कुंजवनातील तो डेरेदार कदंब अजूनही, चमचमत आहे त्या चांद्रवैभवाने त्याच्या पानापानात ते मंतरल्या मुरलीचे भारलेले स्वर अजूनही दाटून आहेत तिला तो कदंब दिसतोय, पण देवकीनंदन, तो नाही तिथे..... . क्षणभर डोळ्यांसमोर रासक्रिडेत दंग गोपीका अन्, गोपीकांमध्ये उजळून दिसणारी ती अल्लड राधिका मधोमध उभा, मुरली