मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माळरान अन् ते दोघे!! -- ७

मिसळलेला काव्यप्रेमी · · जे न देखे रवी...
माळरान अन् ते दोघे!! -- ६ बरसणार्‍या पावसाने माती गच्च भिजली होती तिची मगरमिठी आता जरा सैल झाली होती वठलेल्या झाडाची मुळे जरा मोकळी झाली होती . फार दिवसांनी मिळालेली हि थोडीशी मोकळीक . मातीची पण काय कमाल ना, ज्यांना घट्ट धरायला हवे, त्यांनाच मोकळे सोडते! . . आज जरा उघाड आहे सोनेरी कोवळी उन्हे पसरायला सुरवात झाली आहे कालच्या वर्षावाने हवेत दाटलेला मृदगंध अजूनही विरळ झाला नाहीये . त्या गंधात... हिरव्या झाडाच्या धुंद कळ्यांचा मंद सुगंध मिसळतोय सगळे वातावरण कसे बेधुंद . बऱ्याच दिवसानंतर, नाही, बहुदा काही दशकानंतर त्या निर्मनुष्य माळरानावर एक वृद्ध लावण्य अवतरले वठलेल्या झाडाजवळ येवून थबकले, त्याच्या पायाशी पडलेल्या वाळक्या पानाखालचे कोवळे फुल उचलून मंद हसले . त्या गोंदवलेल्या अस्फुट अक्षरांवरून तिने आपले सुरकुत्या पडलेले मऊसुत हात फिरवले . वठलेल झाड खोडभरून शहारले . युगांनतरचे हे शहारणे कदाचित, विस्मृतीत गेलेले, पण, फार फार मोहक होते . भूतकाळाचे क्षण आता वर्तमानाला सुखावत होते (क्रमशः) |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (१६/१०/२०११)

वाचने 2294 वाचनखूण प्रतिक्रिया 7

गवि 16/10/2011 - 10:32
great... >>> बऱ्याच दिवसानंतर, नाही, बहुदा काही दशकानंतर त्या निर्मनुष्य माळरानावर एक वृद्ध लावण्य अवतरले वठलेल्या झाडाजवळ येवून थबकले, त्याच्या पायाशी पडलेल्या वाळक्या पानाखालचे कोवळे फुल उचलून मंद हसले . त्या गोंदवलेल्या अस्फुट अक्षरांवरून तिने आपले सुरकुत्या पडलेले मऊसुत हात फिरवले . वठलेल झाड खोडभरून शहारले . युगांनतरचे हे शहारणे कदाचित, विस्मृतीत गेलेले, पण, फार फार मोहक होते >>> Excellent Mika...