✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रक्तगंध

प — प्रचेतस, गुरुवार, 10/13/2011 - 22:12
आमचा हा विडंबनाचा चुकार टुकार प्रयत्न प्रेरणा -स्पा यांची ग्रहण ही कथा आणि गणेशा यांची स्पर्शगंध ही कविता. हे विडंबन रचण्यात ५०फक्त यांचे मोठे योगदान आहे, त्यांचे खास आभार. रक्तगंधाने बुजलेल्या वाटेवरती तो स्पर्श बोचरा होता सुरकुतल्या कोरड्या कातडीत मात्र रक्तनिर्झर खळाळत होता हलक्याच कुटील चाव्याने तो कुशीवर वळताच त्या हिरव्या डोळ्यांच्या मागे देह वेदनेत बुडाला होता तशातच आकाशात रात्रीने सोडला काळिमा अभद्र कौलारु खोल्यांमधुनी अजुनी तो रात्री भटकत होता जळमटलेल्या काळोख्या रात्री एक चांदणी धुरकट होती नशीबाच्या पटावरती माझ्या काळी मांजरं खेळत होती.

प्रतिक्रिया द्या
8328 वाचन

💬 प्रतिसाद (41)

डब्बल डोस!

पैसा
गुरुवार, 10/13/2011 - 22:20 नवीन
भयानक विडंबन आहे! मिसळ छान जमली पण. (स्वगतः हर्षद सक्तीच्या विश्रांतीचा फार छान उपयोग करतो आहे आणखी काही जणाना अशी सक्तीची विश्रांती मिळो ही "भयंकर"सदिच्छा व्यक्त करून मी काढता पाय घेते! ;) !
  • Log in or register to post comments

वा वा !!

सूड
गुरुवार, 10/13/2011 - 23:05 नवीन
चारोळ्या लिहीता येत नाही म्हणता म्हणता सारा सुका मेवा ( कविता बीभत्स, भय रसाची असली तरी ही उपमा देतोय) पेरल्यागत केलं की !!
  • Log in or register to post comments

जबरा !!! सहकार तत्वावर झक्कास

धन्या
गुरुवार, 10/13/2011 - 23:27 नवीन
जबरा !!! सहकार तत्वावर झक्कास काव्यरचना चालू आहे मंडळी. :)
  • Log in or register to post comments

एकदम खतरी..

किसन शिंदे
Fri, 10/14/2011 - 08:41 नवीन
हाहाहा...ठोठोठो... मांजरीचे विडंबन करू नका रे..नायतर ती गंगी येईल तिच्या सगळ्या गँगला घेऊन...मग तुमचाही होईल 'हर्षद बोरकर'. :D :D
  • Log in or register to post comments

बाबो .... वल्ली सेठ.... एकदम

स्पा
Fri, 10/14/2011 - 08:54 नवीन
बाबो .... वल्ली सेठ.... एकदम कविता वेग्रे.... काय खर नाय .. हर्षद पण पेटलाय :) मस्तच जमली आहे,. एक स्वतंत्र कविता म्हणून सहज खपून जाईल .. भयरसातली कविता पहिल्यांदाच वाचली रे बाबा तुफान ,... Image removed.
  • Log in or register to post comments

अ‍ॅकदम 'भोयोंकर भीषण सुंदोर'

प्यारे१
Fri, 10/14/2011 - 09:09 नवीन
अ‍ॅकदम 'भोयोंकर भीषण सुंदोर' कॉबिता....
  • Log in or register to post comments

वल्लीने केलेल्या कवितेला नमन.

५० फक्त
Fri, 10/14/2011 - 10:02 नवीन
वल्लीने केलेल्या कवितेला नमन. एक गद्य अन एक पद्य एकत्र करुन कविता लिहिणं हि सोपि गोष्ट नाहि, आणि यात माझे योगदान फक्त व्याकरणाच्या चुका सुधारण्याएवढेच आहे, @ स्पा, तु हि कथा मालिका मोठि कर, मग त्याचि टिव्ही सिरियल नायतर फिल्म बनवु, अन हि कविता त्याला टायटल साँग म्हणुन वापरु. कसं आहे ' अबी नाल मिलाय ना तो घोडा ढुंढनेको जातेय, क्या बराबर है ना ?
  • Log in or register to post comments

>>स्पा, तु हि कथा मालिका मोठि

सूड
Fri, 10/14/2011 - 10:21 नवीन
>>स्पा, तु हि कथा मालिका मोठि कर, मग त्याचि टिव्ही सिरियल नायतर फिल्म बनवु, अन हि कविता त्याला टायटल साँग म्हणुन वापरु. अगदी !! त्यात स्पाचे डोळे पण हिरवे आहेत. इच्छाधारी मांजर करुया त्याला. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

इच्छाधारी मांजर करुया त्याला.

प्यारे१
Fri, 10/14/2011 - 10:31 नवीन
इच्छाधारी मांजर करुया त्याला. <<< आहट सारख्या मालिकेतला कुठलाही मांत्रिक >>> आपण कोण करणारे न करणारे सुड्स? कदाचित कोणी हिरवी इच्छाधारी मांजरच स्पावड्याचं मानव रुप घेऊन मिपावर ... आता उरलो प्रतिसादापुरता म्हणत असेल. अत्रुप्त आत्मा आहेच. आता हे पण. मिपाची 'सर्वरशांती' केली पाहिजे.<<< आहट सारख्या मालिकेतला कुठलाही मांत्रिक >>> काय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

>>आता उरलो प्रतिसादापुरता

सूड
Fri, 10/14/2011 - 13:55 नवीन
>>आता उरलो प्रतिसादापुरता म्हणत असेल. रत्नांग्रीची मांजर असेल तर कदाचित आता उरले 'पति'सादापुरती म्हणेल. :D @ ५० फक्त : मांजर काय नि बोका काय लोकं घाबरतील असं काही केल्याशी मतलब. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

रत्नांग्रीची मांजर असेल तर

अत्रुप्त आत्मा
Sat, 10/15/2011 - 23:07 नवीन
रत्नांग्रीची मांजर असेल तर कदाचित आता उरले 'पति'सादापुरती म्हणेल. :bigsmile: खपलो....फाट फुट फट्याक....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मांजर का बोका ?

५० फक्त
Fri, 10/14/2011 - 10:35 नवीन
मांजर का बोका ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

बोका, बोकाच. ठाकुर्लीचा हिरवट

प्रचेतस
Fri, 10/14/2011 - 14:42 नवीन
बोका, बोकाच. ठाकुर्लीचा हिरवट (डोळ्यांचा)बोका. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

@ठाकुर्लीचा हिरवट

अत्रुप्त आत्मा
Sat, 10/15/2011 - 23:15 नवीन
@ठाकुर्लीचा हिरवट (डोळ्यांचा)बोका. .... या बोक्याला एकाच वेळी बय्राच मांजरींची दुसय्रांना घाबरवावे कसे या विषयावर शिकवणी घेतांना आंम्ही पाहीले आहे... अं..अं..अं.. कुठलं गाव बरं ते परवा गेलो होतो आंम्ही ते?... हां ... चोळगाव चोळगाव म्हणे,,, बरोबर ना हो वल्लीदादा...? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

नाही नाही

प्रचेतस
Sat, 10/15/2011 - 23:28 नवीन
चोळगाव नाही हो भटजीबुवा, चोळेगाव ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

>>@ स्पा, तु हि कथा मालिका

मी ऋचा
Sat, 10/15/2011 - 13:05 नवीन
>>@ स्पा, तु हि कथा मालिका मोठि कर, मग त्याचि टिव्ही सिरियल नायतर फिल्म बनवु, अन हि कविता त्याला टायटल साँग म्हणुन वापरु. तिकडे डेटाथेफ्ट केल्यापासून याला सारखे "बिन्नेस" च्याच कल्पना सुचू राहिल्या की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

प्रागऐतिहासिव,पारचीन व आधुनिक

५० फक्त
Sat, 10/15/2011 - 17:06 नवीन
प्रागऐतिहासिव,पारचीन व आधुनिक मराठी साहित्या वि शवाच्या अखंद फिरत राहणा-या ग्रह गोलांच्या अतिलंबित अन परप्रचंलित गतीमुळे दोन दोलायमान प्रबुद्ध विनयशोल परमाणु जेंव्हा एकमेकांना असामाईक प्रत्यजैवसाद्यमजअणु प्रलयमध्यक्षेत्रात आवाजाच्या गतिच्या एक सप्तमांश गतीने इंधन अधिभारित निर्वात पोकळीत भेटतात, तेंव्हा अशी समाज रचनेच्या उत्तुंग अंधश्रद्धेला मुळापासुन हलविणारी एखादी रचना निरमा ण होते, त्याल तुम्हि व्यापार म्हणता. आज आपणसुद्धा एक सशक्त प्रतिदोलायमान अतिमाणु असल्याची शंका आली. . . . . . . . . . सदर प्रतिसाद ज्याला समजेल त्याला माझ्याकडुन एक लिटर अतिशय दुर्मिळ आणि किंमती असे डायहायड्रोजन मोनोऑक्साईड देण्यात येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी ऋचा

:)

प्रचेतस
Sat, 10/15/2011 - 17:12 नवीन
_/\__/\__/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

@सदर प्रतिसाद ज्याला समजेल

अत्रुप्त आत्मा
Sat, 10/15/2011 - 17:53 नवीन
@सदर प्रतिसाद ज्याला समजेल त्याला माझ्याकडुन एक लिटर अतिशय दुर्मिळ आणि किंमती असे डायहायड्रोजन मोनोऑक्साईड देण्यात येईल. साष् --^-- टांग नमन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

आमचाही..

मी-सौरभ
Sat, 10/15/2011 - 23:31 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

[] माझी शरण चिट्ठी स्वीकार

मी ऋचा
Mon, 10/17/2011 - 11:25 नवीन
[] माझी शरण चिट्ठी स्वीकार करा गुरूदेव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

प्रतिसाद !

चौकटराजा
Sat, 03/17/2012 - 10:57 नवीन
अफ्जफ्जकज्फ्क्स्द्ज्र्तितिरेर्त्च्व्क्ष्व्म्क्ष्व्,फ्ग्द्फ्क्ग्रोतेइर्प्तोएतिएओर्त्क्द्फ्ल्ग्क्द्फ्ग्क्द्ग्ल्केओतिरोतेइतोफ्स्द्फ्क्स्ल्फ्क्स्फ्ल वरील लिपी ही रोमन कालीन मौर्य घराण्याची आहे. त्यावर गांधी घराण्याचा प्रभाव दिसत आहे . वा काही शब्द हे किराणा गायकीचे दिसतात. नेपाळी संतकवि जॉग मुब खे यांचाही ही लिपी बनविण्यात यात हात आहे. आपले संतकवि मानदेव ( यांचे मूळ नाव वेगळे होते पण पंजाबात मान आडनावाच्या गायकाशी यांची घन मैत्री झाली व त्याना आपल्या गायक मित्राचे नाव मिळाले ) हे पंजाबातून पुढे पिंडारी मागे तिबेटी गेले त्यावेळी त्यानी व तिबेटी संतकवि जॉग मुब खे यानी मिळून एक वरील लिपीत काव्य केले. आपले इंडी वल्ली यानी लीलया त्याचे डिकोडिंग हपिसच्या वेळात केले. पण मूळ काव्य हे लक्ष्मी प्यारे, हुस्नलाल भगतराम, शंकर जय या शैलीचे असल्याने एकाने टंकायचे दुसर्याने भंकायचे असे ठरले. इति लेखनसीमा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

अप्रतिम

गणेशा
Fri, 10/14/2011 - 10:20 नवीन
विडंबन ते ही करुन भयानक .. प्रत्येक कडव्यात मस्त मजा आणली आहे, वाचताना मजा आली भारी..
जळमटलेल्या काळोख्या रात्री एक चांदणी धुरकट होती नशीबाच्या पटावरती माझ्या काळी मांजरं खेळत होती.
एकदम भारीच ...
सुरकुतलेली कोरडी कातडी, कुटील चावा, अभद्र काळीमा जळमटलेला काळोख
असले उच्चतम विशेषणे वापरुन तुम्ही खुप्च मजा आणली राव .. अवांतर : ५० फक्य यांच्या गाडीबरोबर आता वल्ली पण म्हंटल्यावर मेजवाणी उत्कॄष्ट होणारच
  • Log in or register to post comments

अंधार, धुर, आडवी मांजर काही

जागु
Fri, 10/14/2011 - 13:31 नवीन
अंधार, धुर, आडवी मांजर काही खर नाही.
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ, सिरीयल किलरचा बिभत्सविकृतभाव मिसळतो यामधे

आत्मशून्य
Fri, 10/14/2011 - 13:49 नवीन
गंधाने बुचलेल्या (नेल्पॉलीशच्या)बाटलीवरती तो स्पर्श बोचरा होता सुरकुतल्या कोरड्या कातडीत मात्र रक्तनिर्झर खळाळत होता हलक्याच कुटील चाव्याने तो कुशीवर वळताच त्या पिंगट डोळ्यांच्या मागे देह वेदनेत बुडाला होता तशातच आकाशात रात्रीने सोडला काळिमा अभद्र खोल्यांच्या गल्यांमधुनी अजुनी तो रात्री (नव्या सावजांच्या शोधात)भटकत होता जळमटलेल्या काळोख्या रात्री एक चांदणी धुरकट होती नशीबाच्या पटावरती त्याच्या Pussycat खेळत होती.
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ

प्रचेतस
Fri, 10/14/2011 - 13:49 नवीन
मस्त रे आशू. १ नंबर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

महात्मा आत्मशून्य की जय हो...जय हो...जय हो...

अत्रुप्त आत्मा
Sat, 10/15/2011 - 13:57 नवीन
अपल्या प्रतिभेची खोली पाहुन आंम्हास असे वाटुन ह्रायले आहे की,,,आपल्या आत-'म' नावाचं शून्य दडलेलं आहे ... ज्यातुन अशी ख-मंगं निर्मिती होऊ शकते... ;-) अवांतर- 'म' फॉर महात्मा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

प्रतिभेची खोली ? प्रतिभा

आत्मशून्य
Sat, 10/15/2011 - 22:43 नवीन
प्रतिभेची खोली ?
प्रतिभा नावाचे कोणीच परीचीत नसल्याने आपण कोणाच्या खोली बद्दल बोलत आहात याबाबत संपूर्ण अंधार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

प्रतिभा नावाचे कोणीच परीचीत

अत्रुप्त आत्मा
Sat, 10/15/2011 - 23:25 नवीन
प्रतिभा नावाचे कोणीच परीचीत नसल्याने.... ह्हे... तुमच्या त्या प्रतिभेला येवढ्या लवकर विसरलात...? का परिचयच झाला नव्हता नीट..? ;-) कोणाच्या खोली बद्दल बोलत आहात याबाबत संपूर्ण अंधार आहे. :-D तुमचा जो अंधार आहे,,,त्याची खोली कीती आहे..? हे मला नीट ठाऊक आहे हो ;-) जाऊ दे अता यापुढे ''तळ'' गाठण्याची माझी विच्छा नाही... ह्ही ह्ही ह्ही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

का हो भ. बुवा?

मी-सौरभ
Sat, 10/15/2011 - 23:33 नवीन
तुम्हाला बरी ती प्रतिभा माहित आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

आम्हाला फक्त

प्रचेतस
Sat, 10/15/2011 - 23:40 नवीन
आम्हाला पूर्वी दूरदर्शनवर 'प्रतिभा आणि प्रतिमा' कार्यक्रम लागायचा तो माहित आहे ब्वा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

@तुम्हाला बरी ती प्रतिभा

अत्रुप्त आत्मा
Sun, 10/16/2011 - 07:52 नवीन
@तुम्हाला बरी ती प्रतिभा माहित आहे ... या प्रति--सादा मुळे आमच्याही प्रतिभेला बहर आला...त्यात एक उषासूक्त अठवलय...जिज्ञासूंनी पहा बर जुळतय का ते? हम को जो ताने देते है,हम खोयें है इन रंगरलियोंम मै। हमने उनको भी छुप छुप के,आते देखा इन गलीयों मै ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

मस्तच !

श्यामल
Fri, 10/14/2011 - 18:26 नवीन
मस्तच कविता !
  • Log in or register to post comments

भन्नाट........!

ज्ञानराम
Sat, 10/15/2011 - 15:28 नवीन
भन्नाट........!
  • Log in or register to post comments

भन्नाट........!

ज्ञानराम
Sat, 10/15/2011 - 15:28 नवीन
भन्नाट........!
  • Log in or register to post comments

छनाच कविता ,जाम अवद्लि

मीनाक्षी देवरुखकर
Mon, 10/17/2011 - 11:36 नवीन
छनाच कविता ,जाम अवद्लि
  • Log in or register to post comments

कविता आवडली नारायण

सांजसंध्या
Sat, 03/17/2012 - 09:02 नवीन
कविता आवडली :) नारायण धारपांच्या कथांवर आधारीत अनोळखी दिशा नावाची एक मालिका स्टार प्रवाह वर सुरू आहे. त्याचं शीर्षकगीत म्हणून एकदम फिट्ट आहे !
  • Log in or register to post comments

नारायण धारपांच्या कथांवर

धन्या
Sat, 03/17/2012 - 09:40 नवीन
नारायण धारपांच्या कथांवर आधारीत अनोळखी दिशा नावाची एक मालिका स्टार प्रवाह वर सुरू आहे. त्याचं शीर्षकगीत म्हणून एकदम फिट्ट आहे !
पण त्या मालिकेला आधीच एक शिर्षकगीत असेल ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांजसंध्या

धन्यवाद

स्पा
Sat, 03/17/2012 - 09:25 नवीन
वल्लीची जुनी कविता वर आणल्याबद्दल मनापासून धन्यवाद सांज्संध्याजी.. तुम्ही खर्या फ्यान ... -- तृप्त आत्मा (स्पा)
  • Log in or register to post comments

हल्लीचीच जुनाट प्रति-क्रीया

अत्रुप्त आत्मा
Sat, 03/17/2012 - 09:40 नवीन
हल्लीचीच जुनाट प्रति-क्रीया वर आणल्याबद्दल मनापासून धन्यवाद स-पाजी.. तुम्ही खरे छताला लटकलेले फ्यान ... ;-) अत्रुप्त आहे हा-(पहा) :-p स्पा---आत्मा ;-) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

दुरूस्त केलेला प्रतिसाद !

चौकटराजा
Sat, 03/17/2012 - 11:01 नवीन
ह्म्म , मनी गोड हुरहूर लावणारी कविता- आपला काउंट ड्राक्युला .
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा