सावल्यांची सरमिसळ होते ..
लेखनविषय:
एक ना कारण सबळ होते
पण तुझे जाणे अटळ होते
हे कसे नाते दुराव्याचे
जे कधीकाळी जवळ होते
कोणता येथे ऋतू आहे
देहभर ही पानगळ होते
चेततो वणवा फुलापासुन
नी झुळुकही वावटळ होते
रोषणाई केवढी आहे
सावल्यांची सरमिसळ होते
डॉ. सुनील अहिरराव
वाचने
4139
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
छान.
हे कसे नाते दुराव्याचे
मस्तं!
वंस मोर..
मस्तच
मस्त
मस्तच
वा!
प्रा. डॉ. दिलीप बिरुटे ,विजय
कविता छान आहेच. खालील ओळी
In reply to कविता छान आहेच. खालील ओळी by माहितगार
:)
In reply to कविता छान आहेच. खालील ओळी by माहितगार
:) :)
सुरेख गझल.
+१ आव्डली
सुंदर गझल! पण अजून एक शेर हवा
In reply to सुंदर गझल! पण अजून एक शेर हवा by सटक
वाहवा !
माहितगार ,प्राची अश्विनी ,नाद
रोषणाई केवढी आहे
सुंदर !