मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अदभूत

विहीर खोदण्याचा विचार

शिव कन्या ·
विहीर खोदण्याचा विचार... डोळ्यांतील उजेड कमीकमी होऊ लागला हसण्यातील सच्चेपणा संपू लागला तेव्हा मी विहीर खोदण्याचा विचार करू लागले.... जमिनीला भेगा, उन्हाच्या झळा पाण्याची पातळी इतकी खोल इतकी खोल.... कि आतला लाव्हाच दिसू लागला! विहीर खोदल्यावर पाणीच लागेल हे मी तरी कशाच्या आधारावर ठरवले? डोळ्यांतील उजेड संपताना, संपू द्यावा उन्हात हसू हरवताना, हरवू द्यावे दुष्काळात विहीर खणू नये जमिनीला कष्ट देऊ नयेत ..... इतकेच काय पावसाचीही वाट पाहू नये आता, डोळ्यातील क्षीण उजेडाला फसवू नये संपू पाहणाऱ्या हसण्याला धरून ठेवू नये..... विहीर खोदण्याचा विचार मात्र.....?? विचार काही माझ्या आधीन नाह

दाराआडचे घड्याळ

चित्रगुप्त ·
. एक घड्याळ दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर ? स्वतःच्या बाहेर, शतकानुशतकांच्या पार... जिथे आहे एक लंबकाचे घड्याळ... . आणि एक वाळूचे घड्याळ... . अजुनही मागे मागे.... जिथे आहे घंगाळात तरंगणारे घटिका पात्र

(दाराआडची आई)

चांदणे संदीप ·
पेरणा...अर्थातच एक आई दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर? कॉलनीच्या बाहेर, ग्राऊंडच्या पार जिथे एक मुलगा खेळतो आहे मुग्ध.... करत असेल का तो तिचा काही विचार? येत असेल का तो ही खेळण्यातून बाहेर, ग्राऊंडच्या अलीकडे? आईला दाराआडून बाहेर यायचं नाही... मग ती वेताची काठी हळूच चाचपते, ती काठी पाठीत घेऊन मुलगा अविश्रांत कोकलत राहतो.... काठी सापडलेली आई सताड उघडलेल्या दाराआडून सुतत राहते... सुततच राहते.... -चमचमचांदन्या

ते दोघे

शिव कन्या ·
पानगळीने रेखीव झालेल्या त्या प्रचंड वृक्षातळी ते दोघे होते मघामघाशी तर! मी पाहीले त्यांना बराच वेळ खाली मान घालून एकमेकांमध्ये साखरेइतके अंतर ठेवून चालताना, कुठेही न थांबता त्यांना एकमेकांकडे बघताना, अन् तेव्हा रस्ता हसताना... मी पाहिले त्या दोघांना , हात हातात घेताना 'बाहों के बाहर नजरों से ओझल होना ही लकिरों पे लिखा है तो वो लकिरे ही मिटा देते हैं' त्याने एवढेच म्हणलेले मला ऐकायला आले नंतर मला ते दिसले नाहीत... पानगळीने रेखीव झालेल्या प्रचंड वृक्षामागे मला नंतर कुणीच दिसले नाही... -शिवकन्या

तुझी कविता

शिव कन्या ·
तुझ्यापाशी जन्मलेली माझी हट्टी, खोडकर, अल्लड कविता तू डोळ्यांत सांभाळून घेऊन ये.... येता येता वाट चुकली तर मला जागं कर...पण मी माझ्याच तंद्रीत असेन तर माझ्या कवितेला वाट विचार.... ती आधी मस्करी करेल, तुला चकवा घालेल, घनघोर गप्पा मारेल, निळावंती होऊन, वाटेवरले झाडमाड प्राणीपक्षी दाखवेल, लपूछपू म्हणत पाठीत गुद्दे घालेल, मिठीत शिरता शिरता एकदम वारा होऊन तुझ्या गळ्यात पडेल, शेवटी थकून तुझ्या दुमडलेल्या हातावर निर्धास्त झोपी जाईल, तेव्हा तू तिला परत डोळ्यांत साठव.... अशी थकून झोपलेली, झोपेतही तुझ्याच डोळ्यांत राहणारी माझी कविता सांभाळून घेऊन ये.... मी असेनच कवितेच्या आसपास. -शिवकन्या

बोली बोली बायका बोली

शिव कन्या ·
आम्ही बायका म्हणजे बोलीभाषा, बोलघेवड्या ! चुलीपासून फोनपर्यंत बडबडबड, गप्पागोष्टी.... लिपीबिपीचे बंधन नाही व्याकरणबिकरण... हे काय असते? आम्ही बोलतो अनंत बोलीतून .... कुजबुज जितकी थरथरणारी तितके भांडण कडकडणारे कठोरतेचा शीण आम्हाला मवाळतेचा शाप तसाही पण बोली आमची जपून ठेवतो.... अर्थाचा पण अनर्थ करू.... खिल्ली तुमची सहज उडवू निरर्थाला अर्थ देऊ...

डिजीटल डिजीटल

शिव कन्या ·
जी माणसे कुठल्याच डिजीटल प्रोफाईल मध्ये नसतात, त्यांचे जगणे कसे असेल, हा प्रश्न मला छळू लागला, आणि मला माझ्या डिजीटल विचारांची भिती वाटू लागली... जी माणसे ऑफलाईन असतात त्यांचे लाईफ कसे असेल या प्रश्नाने मला परेशान केले आणि मला माझ्या डिजीटल चिंतेची काळजी वाटू लागली... मग, या डिजीटल तुरुंगातून सुटका होण्याची वाट पाहताना मी विंडोजमध्ये डोकावून पाहते... तर, खऱ्या जगण्यातून सुटका म्हणून डिजीटल तुरुंगात येणारे लाखो, करोडो लोक समग्र पृथ्वीला वेढा घालून, प्रकाश डोळ्यांवर घेत 24/7 काल डिजीटल दोरीवर चालत असतात... मी ते डिजीटल जगाचे सत्यरूप पाहून हादरून जाते, आणि परत विंडोजमधून आत येऊन माझ्या

मन! - २

राघव ·
लेखनविषय:
काव्यरस
मन दु:खाचा तरंग.. मन सुख, अंतरंग.. जसा फणसाचा गर.. कठीणात मऊसर! मन अप्राप्य सागर.. अंतहीन कुतूहल.. जसा सुगंध अल्लड..शब्द-रूपाच्या पल्याड! मन अस्तित्व प्रचिती..मन फक्त विसंगती! जशी रात, न्हायलेली, चांदण-प्रकाशाच्या ज्योती!! मन शब्दांची आरास..कल्पनांचा सहवास! जशी सावली सजग..अव्यक्ताचं व्यक्त जग!! -- मनी मनाचा विचार.. स्वत्व शोध.. निरंकुश! मन आनंद केवळ.. डुंबण्याचा अवकाश!!

मी स्वप्न पाहत नाही

खिलजि ·
मी स्वप्न पाहत नाही कारण , मला ते पडत नाही नेहेमी ठरवतो आज झोपल्यावर स्वप्न बघायचे काहीतरी वेगळंच बनायचे मी पडतो , लकटतो त्या पलंगावर विचार हाच असतो , कि आज स्वप्न बघायचे डोळे काही मिटत नसतात स्वप्न कुठले बघायचे नि कसे ? याचेच विचार मनात घोळत असतात हळूहळू झापड यायला लागते डोळे जड होत जातात , निद्रादेवी प्रसन्न होते मिट्ट काळोख , कसलीही आठवण नाही , कसलीच साठवण नाही डोळे उघडतात , पण तोंडावर पाणी शिंपडून पुन्हा एक तासभर पलंगावर तस्साच पडून राहतो काही स्वप्न पडलं का ?

गणपत वाणी, सतत मागणी

शिव कन्या ·
गणपत वाणी, सतत मागणी. विड्या ओढून थकलेला गणपत वाणी कवितेच्या छपराखाली अलंकार गोळा करताना मला दिसला. म्हणाला, 'पूर्वीसारखे संपन्न अलंकार आता कोण कवी वापरतो? तसा एखाद दुसरा हौशी असतो नाही असं नाही, पण त्याला काय अर्थेय ?' त्याला एकदा मालक म्हन्ले, 'अरे, इतक्या अलंकृत कवितेचा खप होत नाही काव्यापेक्षा कवित्व जड आवरा आवाराच्या हाकाट्या पडतात कवितेला हाणून पाडतात. गणप्या, आता तुझं काम एकच, अलंकार काढायचे, अन कविता वाळत टाकायची.' 'मग काय होईल मालक?' पिंक टाकीत मालक म्हन्ले , ' काय होईल? अरे, मग काय वास्तवदर्शी, सत्याचे खोल भान, कित्ती खर्र वा, वा!