Skip to main content

डिजीटल डिजीटल

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 15/09/2018 07:31 या दिवशी प्रकाशित केले.
जी माणसे कुठल्याच डिजीटल प्रोफाईल मध्ये नसतात, त्यांचे जगणे कसे असेल, हा प्रश्न मला छळू लागला, आणि मला माझ्या डिजीटल विचारांची भिती वाटू लागली... जी माणसे ऑफलाईन असतात त्यांचे लाईफ कसे असेल या प्रश्नाने मला परेशान केले आणि मला माझ्या डिजीटल चिंतेची काळजी वाटू लागली... मग, या डिजीटल तुरुंगातून सुटका होण्याची वाट पाहताना मी विंडोजमध्ये डोकावून पाहते... तर, खऱ्या जगण्यातून सुटका म्हणून डिजीटल तुरुंगात येणारे लाखो, करोडो लोक समग्र पृथ्वीला वेढा घालून, प्रकाश डोळ्यांवर घेत 24/7 काल डिजीटल दोरीवर चालत असतात... मी ते डिजीटल जगाचे सत्यरूप पाहून हादरून जाते, आणि परत विंडोजमधून आत येऊन माझ्या डिजीटल प्रोफाईलमध्ये सुखीआनंदीसुंदर होऊन खऱ्या जगाचा डिजीटल विचार करू लागते... -शिवकन्या

वाचने 7011
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

खऱ्या जगण्यातून सुटका म्हणून डिजीटल तुरुंगात येणारे लाखो, करोडो लोक समग्र पृथ्वीला वेढा घालून, प्रकाश डोळ्यांवर घेत 24/7 काल डिजीटल दोरीवर चालत असतात... एक नं

वाईट आहे , हा नैसर्गिकपणा वाईट आहे या डिजिटल युगात , सर्वजण घाईत आहे पत्र वाचायला नि बोलायला वेळ कुठे ? हाय नि बाय या दोन शब्दांनाच लाईक आहे डिजिटल युगात माणूस नाती शोधत शोधत , मातीपर्यंत आला तरीदेखील डिजिटलपणा सोडून , नॅचरल नाही झाला सातासमुद्रापारचा गोळा , माय डोळे भरुनी पाहते अश्रुंचे बांध सोडिता , बॅटरी डाऊन होते डिजिटल मित्रा, सारेच डिजिटल , नॅचरल काहीही नाही मरणासन्न झाला तरीही " नैसर्गिक " कळत नाही सिद्धेश्वर विलास पाटणकर

ढकलपत्र ढकलणार्यांना, तसेच ढकला ढकलीत कुठलीही चालढकल न करता आभासी जगात रमणार्या अभ्यासूंना समर्पित.... अशी अर्पणपत्रिका हवी. जमिनीवरील नाखु