Skip to main content

(वळण)

लेखक माहितगार यांनी रविवार, 29/03/2020 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
(विडंबनच आहे, ह. घ्या. हे.वे.सा.न.ल.) . . . . महापुरुष आणि तीर्थस्थाने बाप आणि आई डोळ्या समोर आली नसतील तर नसू देत तसेही त्यांना तू मागच्याच कोणत्यातरी वळणावर नाकारले होतेस * देव नाकारले म्हणजे उघड दारचे तुणतुणे सुटतेच असे नाही तेव्हाच मग का सखीच्या आणाभाकांची आठवण येते? पण गुलमोहरावरची चिमणी पोपटासोबत उडून गेल्या नंतर शहरी दिव्व्याखाली ज्या टिटवीशी आणाभाका केल्यास तिच्या आवाजाने देह चिरुन गेला तरी आठवणीतल्या चिमणीच्या गावाकडे कंगाल भूकेला धावतोस? भूकेला आवर जरासा! चिमणी पोपटा सोबत मागेच उडून गेली परतण्याची शक्यता नाहीए ती माहित असताना देखिल?

उंटावरल्या प्रा.डॉ. दा.ता.

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 19/03/2020 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रा.= प्राध्यापक डॉ. = डॉक्टर दा.= दादा ता. = ताई उंटावरल्या प्रा.डॉ.

दुष्ट दुष्ट बायको!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 31/07/2019 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
पारंपरिक बायकांच्यात, एक गोष्ट कॉमन असते. आई झाल्यावर त्यांच्यातली, बायको बरीचशी मरते. सगळ लक्ष मुलांकडे, त्यांचं सुख पहिलं! नवरा म्हणजे शंकराची पिंडी, वाटीभर दूध.., वाहिलं..न वाहिलं! ''अग तुला काही होतय का ? मी स्वंयपाक करू का ? " " तुम्ही स्वयं - पाक'च करता! तोच पिऊन मी मरू का!???" (दुष्ट दुष्ट बायकू! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ) "कशाला मरतेस?

अभंग...

लेखक bhagwatblog यांनी सोमवार, 15/07/2019 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
पंढरीच्या गावा| वैष्णवांचा मेळा| भक्तीचा उमाळा| अपरिमित || सोहळा कीर्तनाचा| नामाचा गजर| श्रद्धेचा महापूर| अखंडित|| पांडुरंग ध्यानी| पांडुरंग मनी| नाम संकीर्तन| प्रवाही|| टाळांचा नाद| मृदुगांचा हुंकार| विणेची झंकार| संगीतमय|| विटेवरी पांडुरंग| अठ्ठावीस युगं| भक्तांची रांग| अविरत||
काव्यरस

बरवा विठ्ठल ,बडवा विठ्ठल...जुडवा विठ्ठल .

लेखक बाजीगर यांनी शनिवार, 11/05/2019 00:40 या दिवशी प्रकाशित केले.
बातमी :पंढरपुरात आता दोन विठ्ठल, बडवे समाजाने उभारले स्वतंत्र मंदिर https://www.loksatta.com/maharashtra-news/another-vitthal-temple-built-… बातमी वाचून मनात विचार आला..... जुडवा विठ्ठल !! जुडवा विठ्ठल बडवा विठ्ठल । खरा बा विठ्ठल जीवभाव ॥१॥ येणें त्यांचे मन जालें हांवभरी । परती माघारीं घेत नाहीं ॥२॥ बंधनापासूनि उकलल्या गांठी । देतां येईल मिठी सावकाशें ?॥३॥ तु का म्हणे देह भारिला विठ्ठलें ? दामक्रोधें केलें मन रीतें ॥४॥
काव्यरस

माझे मन पाही

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 10/05/2019 08:06 या दिवशी प्रकाशित केले.
माझे मन पाही विठ्ठल मुर्ती सावळां विठ्ठल उभा पंढरीसी ||१|| नाही मज वेळ जाण्या राऊळा नच पूजा केली कधी काळां ||२|| रमलो संसारी विना विचार भाव भक्तीचा केवळ उपचार ||३|| नमस्कार केला दोन्ही कर जोडूनी पाषाण भेटला उराउरी दुरूनी ||४|| ०९/०५/२०१९

असे षंढ आम्ही कैसे निपजलो

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 19/02/2019 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
आज शिवजयंतीच्या निमित्ताने शिवरायांच्या चरणी मी हे काव्य विनम्र भावाने अर्पण करतो... पुलवामा निषेधे कॅन्डल लावून आलो | “उरी” पाहताना, “जय हिंद” म्हणालो || पण, बलोपासनेची, महती विसरलो | असे षंढ आम्ही कैसे निपजलो || सायंकाळी हवी आम्हा दारूची बाटली | संडे टू संडे खातो मटणाची ताटली || पोहणे धावणे नव्हे, चालाणेही विसरलो | असे षंढ आम्ही कैसे निपजलो || स्वराज्य गुढी रोविली, शिवबाने | स्फुलिंग जे चेतले, जिजाउने || स्मार्टफोन लेकरांच्या, हाती देऊन बसलो | असे षंढ आम्ही कैसे निपजलो || ज्ञानातुकयाची, शिकवणी व्यर्थ गेली | स्वार्थाने आमुची, मती अंध केली || आम्ही बाजीरावाची, जात शोधित बसलो | असे षंढ आ
काव्यरस

मोबाईलची शेजआरती

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 23/12/2018 23:05 या दिवशी प्रकाशित केले.
*मोबाईलची शेजआरती* उत्तररात्र रात्र झाली तुम्ही झोपावे आता थकलो मी दिसभराचा व्हावे आता त्राता || धृ|| दया दाखवा मज पामरासी केले मनोरंजन तुम्हासी दिला आनंद केला माझा नाश बॅटरी उतरवली दोन वेळा ||१|| घरी लपविले आई बापापासून मला ऑफीसात केले कामाच्यावेळी खेळ असा टाईमपास किती करावा? ||२|| असतात महत्वाची कामे घरी हापीसात न वापरावे कधी कितीही व्हाटसअप जरी आता मिळे फ्री डेटा ||३|| वर्षभरातच मज वापरून टाकूनी देसी नवे मॉडेल मोबाईलचे घेवूनी येसी जरी मी असे चांगला ||४|| काही मर्यादा सेल्फी फोटो किती काढावे?

वाट त्याची पाहाता....

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 12/12/2018 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वच संतांच्या चरणी नतमस्तक होऊन; एक लहान प्रयत्न केला आहे.... मागे पाहता वळून वाट गेली हो पुसून भविष्यापासून सोडवि कोण आता मग विचार कशापरी चालत रहा परोपरि विश्वचक्र तो फिरवि तू फ़क्त एक धागा गुंफ़त राहावे स्वतःला फुला-पाना-माणसांना निसर्गाच्या देणगीचा अवमान कैसा करा तुझी वेळ खरी येता   तो करेल उद्धारा तोवर चरणी माथा त्याच्या टेकवावा
काव्यरस