अभंग...
लेखनविषय:
काव्यरस
पंढरीच्या गावा| वैष्णवांचा मेळा|
भक्तीचा उमाळा| अपरिमित ||
सोहळा कीर्तनाचा| नामाचा गजर|
श्रद्धेचा महापूर| अखंडित||
पांडुरंग ध्यानी| पांडुरंग मनी|
नाम संकीर्तन| प्रवाही||
टाळांचा नाद| मृदुगांचा हुंकार|
विणेची झंकार| संगीतमय||
विटेवरी पांडुरंग| अठ्ठावीस युगं|
भक्तांची रांग| अविरत||
वाचने
3430
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
छान , आवडला !
In reply to छान , आवडला ! by चौथा कोनाडा
छान , आवडला !
पांडुरंग ध्यानी| पांडुरंग मनी
In reply to पांडुरंग ध्यानी| पांडुरंग मनी by राघव
प्रतिसादासाठी धन्यवाद राघव
आवडला अभंग. सुरेख लिहिले आहे.