Skip to main content

असे षंढ आम्ही कैसे निपजलो

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 19/02/2019 या दिवशी प्रकाशित केले.
आज शिवजयंतीच्या निमित्ताने शिवरायांच्या चरणी मी हे काव्य विनम्र भावाने अर्पण करतो... पुलवामा निषेधे कॅन्डल लावून आलो | “उरी” पाहताना, “जय हिंद” म्हणालो || पण, बलोपासनेची, महती विसरलो | असे षंढ आम्ही कैसे निपजलो || सायंकाळी हवी आम्हा दारूची बाटली | संडे टू संडे खातो मटणाची ताटली || पोहणे धावणे नव्हे, चालाणेही विसरलो | असे षंढ आम्ही कैसे निपजलो || स्वराज्य गुढी रोविली, शिवबाने | स्फुलिंग जे चेतले, जिजाउने || स्मार्टफोन लेकरांच्या, हाती देऊन बसलो | असे षंढ आम्ही कैसे निपजलो || ज्ञानातुकयाची, शिकवणी व्यर्थ गेली | स्वार्थाने आमुची, मती अंध केली || आम्ही बाजीरावाची, जात शोधित बसलो | असे षंढ आम्ही कैसे निपजलो || स्त्रियांना फिगरची, फिकर जास्त आहे | मेकप मागे आपूले, वय लपवू ती पाहे | लक्ष्मीबाईचे तेज, आम्ही विसरलो | असे षंढ आम्ही कैसे निपजलो || जर पुन्हा एकदा, जाहला सव्विस अकरा | खचित पुन्हा आमुचा, होणार बकरा || प्रतिकार कैसा, ते करणे विसरलो | असे षंढ आम्ही कैसे निपजलो || आम्हावर उद्या कोणी, चालून आले | परतवू तया कैसे, नाही ठरवले || मानगूट वाळूत, खुपसूनी बसलो | असे षंढ आम्ही कैसे निपजलो || बलोपासना जिम मध्ये, होत नाही | हाती शस्र येताच, थरकाप होई || नाठाळा माथी काठी, हाणणेही विसरलो | असे षंढ आम्ही कैसे निपजलो || कराटे पोहणे आणि, फुटबॉल खेळा | सुर्यनमस्कारही, दररोज घाला || पोलादी जाहली जर, मनगटे क्रांती साठी | षंढ म्हणाण्याची नाही, कुणाचीच छाती|| यावर काही विचार झाला तर भरून पावले जर नुसते दिवा स्वप्नच ठरले तर? पण हे कसे ठरवणार? तर.... काव्य वाचिता आम्हा, बहु स्फुरण चढले | त्वरेने व्हॉट्सपी, त्यासी फॉरवर्ड केले || क्षणार्धात नव्या, मेसेज कडे वळालो | तर म्हणा षंढ आम्ही ऐसे निपजलो || पैजारबुवा,
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 8455
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

माउली... जबर्दस्त !! प्रतिसाद देऊन कर्तव्य केले | अन लगेच काथे कुटाया घेतले | टोमणे अन चिमटे रोजचेच आम्हा | हेच आमुचे शस्त्र अन हाच अमुचा बाणा | "चालू" घडामोडी हीच आमची भाकर | त्यांनाच देतो शिव्या अन त्यांचेच आम्ही चाकर | काय विचारता आम्हा षंढ कैसे निपजले | इथं पेरले वेगळे अन रोपटे भलंतेच उगवले

In reply to by चिनार

माऊली..ह्याच विषयावर काही नवीन सुचले आहे..तुमच्या कवितेचा आधार घेऊन काही नवीन लिहिण्याची परवानगी द्यावी..

In reply to by चिनार

लिहिण्यासाठी परवानगी ती कसली. जर माझ्या लिहिण्यामुळे कोणी विचार करण्यास उद्युक्त झाला तर तेच माझ्या लेखणीचे यश म्हणायचे. टिकात्मक, विरुध्द बाजूच्या लिखाणाचे किंवा विडंबनाचेही मनापासून स्वागतच आहे. लिहीताना कोणताहि मुलाहिजा न बाळगता खुशाल लिहा, मुक्त पणे लिहा. पैजारबुवा,

वास्तव :( सुरेख लिहीलेत __/\__

ह्या षंढपणाला "सर्वधर्मसमभाव चे लेबल लावून का मानवतावाद वेष्टणात गुंडाळून ठेवू, नाहितर अहिंसा परमोधर्म याच्या कागदात पुडी बांधू,असं करतो थेट उच्च भारतीय अनाक्रमण परंपरेच्या बेगडाने रंगवतो. म्हणजे मी पुढच्या ढकलपत्रात शोकसंदेशात जळजळीत इशारे द्यायला मोकळा!! मायबापा रामदासा व्यर्थ तू भांडला, तुझी जात शोधता अर्थ तो सांडला!! वाटूनी संत हते आम्ही घेतले!!इतीहासातून वेचले सोयीचे दाखले! पैजारा नका दाखवू आरसा,चालवू आम्ही (शुंभ) वारसा!! शुंभासमान ढकलपत्रात आलेला नाखु पांढरपेशा

In reply to by नाखु

शुंभ घडवण्याची फॅक्टरी | लावीली आहे घरोघरी | शिक्षणाचे बजारी | यांची नसे उणीव || बाप म्हणे शिकवणी लावू | मायम्हणते ताजेच खाउ | खेळायला नको जाउ | धडपडशील कुठे तरी || लहान पोरे जणू हत्तीची पिले | बर्गर पिझा खावोनी माजले | घरच्या भोजनास नाक मुरडीले | शेण खावोनी बाहेरी || हाती घेवोनी स्मार्ट फोन | हत्ती हलेना सोफ्या वरुन | टिव्ही पाहती रात्री जागून | तेच डोक्यात भरलेले || पैजारबुवा,

उत्स्फुर्त !!

इरावती कर्व्यांचे "युगांत" च्या अंताचे महावाक्य आठवले. बाकी असो.