Skip to main content

विश्वास वासावरचा

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी बुधवार, 06/05/2015 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
आमची पेरणा अर्थात शब्दानुज यांची क्षमा मागुन.... रोज पुन्हापुन्हा तो ढुसक्या सोडतो समोरचा नाईलाजाने नाकावर हात दाबतो हजारो वर्षांपासुन तो त्या सोडतो आणि दिवसभर पोट दाबून कळा सोसतो खरेतर प्रत्येकाच्या शरीरातून ती बाहेर पडत असते पण काहिंचे अस्तित्व नुसत्या वासावरुन ओळखता येते पवनाच्या रुपातुन तो बाहेर पडतो पोटाबरचे प्रेशर थोडेसे हलके करुन जातो प्रत्येक श्वासातुन तो नाकात घुसू पहातो श्वासाशिवाय थोड्या वेळानंतर जीव घुसमटतो काहीजण उगाचच लाजुन कायमचुर्ण घेतात वासहिन श्वासाची कामना करतात तो आला की चहुकडे वास दरवळात राहतो सेंटच्या

भाव तिथे देव

लेखक निनाद जोशी यांनी गुरुवार, 19/03/2015 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
काय हो वर्णावा त्या नराचा स्वभाव घेतला ज्याने देव विकत बाजारी चार मोजले रोकडे अन म्हणे आता धाव तुच मला वाचव संकटा पासून तुला मी रे दिले माझ्याकडले हे धन आता सोडव ह्यातुन मजला देवा अरे वेड्या त्याच्या लेखी तू आहेस कंगाल त्याला पाहिजे जो माल तुझ्याकडे नाही संत सांगती सज्जना मनी असुदेत भाव तोच करेल बचाव स्वता: हून
काव्यरस

"खरे सत्य बोला/ जपून जपून"

लेखक पदकि यांनी गुरुवार, 19/02/2015 04:40 या दिवशी प्रकाशित केले.
खरे सत्य बोला/ जपून जपून तेज लपवून / ठेवा थोडे अर्धोक्तीने करा / सत्य - सुरुवात जनां भयभीत / करू नका अंधाऱ्या अंबरी / विजेची उपज बालकां समज/ नाही तिची महा त्या तेजाने / अंधत्व नेत्रांना साध्या माणसांना / कशासाठी? क्षीण मानवाची/ क्षीण असे दृष्टी प्रकाशाची सृष्टी / सोपी नसे ---
काव्यरस

चार अपशब्द

लेखक पदकि यांनी मंगळवार, 17/02/2015 03:54 या दिवशी प्रकाशित केले.
(जसे: दाखव विठ्ठला / तुझे देवपण नाहीतर घण/ आहे माझा : विंदा करंदीकर ) खुल्या नभाखाली/ उभा मी नागडा बोल तो रांगडा / सुनावितो असे काय मोठे / देवा तुवे दिल्हे ? आई-बाप नेले/ मृत्युलागी साऱ्या सजीवांना / वेदना नि कळा रक्त भळाभळा / वाहते ते सर्वत्र ही मृत्यू /घालितो थैमान सोडीला हैवान / मोकळा तो. धाडिले "प्रेषित"/म्हणे सात-आठ त्याने काय xट/ बदलले? साऱ्या सजीवांना / बनविसी हीन होती मग दीन/ पायी तुझ्या . आम्हा सजीवांना / करी जे भिकारी ब्रम्हाची शिसारी/ नाकी माझ्या माझ्या आयुष्याचा / स्वामी मी बारका "पोर तो पोरका" / तुझा नाही. अटळ तो मृत्यू / सर्वांच्या राशीत घाल ते कांशीत / जग तुझे! :
काव्यरस

जमला मेळा संतसज्जनांचा

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 30/11/2014 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
जमला मेळा संतसज्जनांचा जमला मेळा संतसज्जनांचा पांडुरंगाच्या भक्तांचा ||ध्रू|| हाती घेवूनीया विणा आणि टाळ भजनात विसरती काळवेळ हरपली तहानभुक हरपले देहभान जमला मेळा...||1|| नको भेटी आणिक तिर्थक्षेत्री आम्हा वैष्णवांची पंढरीच काशी माऊलीच्या घरी आलो माहेराला जमला मेळा... ||2|| विठूरायाचे सावळे मुख पाहूनिया झाले सर्वसुख ओलांडला पर्वत यातनांचा जमला मेळा...||3|| - पाषाणभेद

<पतंग>

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 15/10/2014 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्राथमिक प्रेरणा - तवंग दुय्यम प्रेरणा - लवंग> माझा पतंग सतत हरवतो तुझ्या अभाळी . . पेच लावती ढगाढगात ढाले ढालगजांचे . . ढील देत मी फिरकी झपझप मांजा वाहतो . . मांजा कातर पडतो सैलसर केएलपीडी . . झाडा तारांत पतंग ढिगभर लटकलेले . . नवा पतंग उडेल लवकर नव्या अभाळी

ताई दीर तुझा गं वेडा

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी बुधवार, 06/08/2014 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
वीस वर्षांपूर्वी म्हणजे दि. ५ ऑगस्ट २०१४ रोजी हम आपके है कौन हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. त्यातली माधुरी दिक्षीत आठवली की अजुनही हृदयातुन हलकीशी कळ उठते. असा चित्रपट आपण मराठीतही करायचा हे आम्ही त्याच वेळी ठरवले होते. त्याच्या आधिच, म्हणजे साधारण १९९४ सालच्या आधिच आम्ही एक गाणे लिहिले होते. ते आमच्या आगामी चित्रपटासाठी योग्य आहे असे आम्हाला वाटले. आज आम्ही ते रसिकांच्या चरणी अर्पण करत आहोत. तरी सुध्दा एक खुलासा करावासा वाटतो. ही कविता संपूर्ण पणे स्वतंत्र आहे आणि तीचा इतर कोणत्याही मराठी किंवा हिंदि किंवा इतर कोणत्याही भाषेत प्रकाशित झालेल्या कवितेशी कोणताही संबंध नाही.

लोकशाहीचा सांगावा

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 28/03/2014 08:49 या दिवशी प्रकाशित केले.
लोकशाहीचा सांगावा

आली भूमाता घेऊन । लोकशाहीचा सांगावा ।
पाचावर्षाच्या बोलीन । गडी-चाकर नेमावा ॥

लोकप्रतिनिधी नको । म्हणा लोकांचे नोकर ।
जनतेच्या मतावर । यांची शिजते भाकर ॥

होऊ नका लोभापायी । कोण्या पालखीचे भोई ।
करा फक्त तेच ज्याने । सुखावेल काळीआई ॥

धन-द्रव्य घेतल्याने । होते कर्तृत्व गहाण ।
नको स्वत्वाचा व्यापार । राखा आत्म्याचा सन्मान ॥