Skip to main content

का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला?

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 25/12/2013 06:57 या दिवशी प्रकाशित केले.
का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला? का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला? ||धृ|| गेलो तुळशी मंजीरा घ्याया तेथे न तू गावला राया ||१|| गेलो राऊळी शोधाया शोध व्यर्थ गेला वाया ||२|| चंद्रभागेकाठी तू न सापडेना तुझ्याविण मन शांत होईना ||३|| शोध घेतला शोध घेतला अंती नाही तू भेटला ||४|| पाषाण म्हणे का शोधसी इथेतिथे चित्ती तुझ्याच विठ्ठल वसे ||५|| - पाभे
काव्यरस

अभय

लेखक सार्थबोध यांनी सोमवार, 07/10/2013 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
या अवघ्या चराचरी व्यापलास तू हरी तरी आत बाहेरी शोध फसवा असा ll १ ll चालतसे देणी घेणी जीवा नित्य जन्मांतरी चिंता लागतसे मनी होईन पार कसा ll २ ll तूच बाप जननी येई पहा धावुनी या संसार काननी बाळ हाका मारीतसा ll ३ ll काळाचिये भक्ष आम्ही तिथे नाही विनवणी अभय मिळो शेवटी पायी तुझ्या लागतसा ll ४ ll - सार्थबोध
काव्यरस

नासाचे अभंग

लेखक रमताराम यांनी गुरुवार, 03/10/2013 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
(काल काही मिपाकरांशी गप्पा मारता मारता 'नासा म्हणे' ची आठवण आली नि अचानक हे असं झालं.) डावीकडे भारत, उजवीकडे लंका सेतू मधोमध नासा म्हणे गणकी श्रेष्ठ भाषा, गीर्वाण ही थोर जळो भूतकाळ नासा म्हणे किरणोत्सारी भेव नाही मुळी वाव गोमयाच्या आड नासा म्हणे जगी या शिक्षण श्रेष्ठ एका स्थानी हिंदुस्थानी आज नासा म्हणे भारती थोरियम पडले हो विपुल आणा ढापून नासा म्हणे ऐशा नासा नरे ररा झाला त्रस्त पोचे वॉशिंग्टनी करे रुजवात कोण हा रमत्या? नि कोणता भारत? जाणतो संस्थान! नासा म्हणे हाकलला ररा परतुनी ये घरा नका काही सांगू नासा म्हणे परि ऐसे देखो संतुष्ट 'हा' फार भली मोडे खोड नासा म्हणे श्रेष्ठ आमच्या देशा
काव्यरस

ओढ दर्शनाची

लेखक विदेश यांनी बुधवार, 18/09/2013 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या दर्शनाची मनास लागली रे ओढ मन होते कासावीस लागुनिया वेड काम करता लक्ष नाही कामामधे चूक नाही जाणीव पोटाला मरते तहानभूक घर नाही दार नाही विसरतो संसार जीवनात सार सारे वाटू लागते असार नामस्मरण राहे मुखी हात टाळामधे गुंग डोळ्यापुढे चरण तुझे मनी दर्शनाचा चंग करी जिवाचे सार्थक अर्पिले जीवन माझे एकदाच डोळे भरून पाहू दे रे रूप तुझे नाही मोठा मी रे संत ना कुणी महंत इवलासा जीव माझा होई तू कृपावंत . . . .
काव्यरस

लोकशाहीचा अभंग

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 14/08/2013 13:57 या दिवशी प्रकाशित केले.

लोकशाहीचा अभंग

आपुलिया हिता । असे जो जागता ।
फक्त त्याची माता । लोकशाही ॥

कष्टकरी जणू । सवतीचे पुत्र ।
वटारते नेत्र । लोकशाही ॥

पुढारी-पगारी । लाडके जावई ।
माफियांची ताई । लोकशाही ॥

संघटन, एकी । मेळ नाही ज्यांचे ।
ऐकेचना त्यांचे । लोकशाही ॥

मिळवुनी माया । जमविती धाक ।
त्यांची घेते हाक । लोकशाही ॥

वापरता तंत्र । दबाव गटाचे ।
तालावरी नाचे । लोकशाही ॥

सत्तापिपासूंच्या । द्वारी मटकते ।
काव्यरस