पाककृती
पालकाची सुकी भाजी - ज्वारीचं पीठ वापरून
साहित्य:
- पालकाची एक जुडी (साधारणपणे २५० ग्रॅम)
- दोन मध्यम टोमॅटो
- ८-९ लसूणपाकळ्या
- सुक्या लाल मिरच्या ३/४
- हळद
- मोहोरी
- हवं असेल तर लाल तिखट
- मीठ
- तेल
- चिमटीभर'च' साखर
- लागेल तसं ज्वारीचं पीठ (तरी प्रमाण म्हणून २-३ मोठे चमचे लागेल)
फरसाणाची भाजी
फरसाण किती आहे त्यानुसार जरा प्रमाणं बदलतील. तरी एक परिमाण म्हणून...
- दोन-अडीच मुठी भरून कुठलंही फरसाण
- दोन टोमॅटो
- दोन कांदे
- लाल तिखट
- मीठ
- तेल
- जिरे
- चिमटीभर साखर
- कोथिंबीर वरून घ्यायला
व्हेज तंदूर
श्रावण महिना सुरु असल्यामुळे दुधाची तहान ताकावर भागवण्यासाठी व्हेज तंदूरचा प्रयोग करून बघावा असे ठरवले. त्याप्रमाणे ऑफिस सुटल्यावर तडक वखार गाठली आणि एक किलो कोळसा घेतला. सौ.ना विचारून घरी उपलब्ध असलेल्या भाज्यांचा अंदाज घेतला आणि पाव किलो मश्रुम आणि शंभर ग्राम पनीर घेतला. मश्रुम शक्यतो डेअरी मधून घेतल्यास ताजे आणि मॉल पेक्षा कमी किमतीत मिळतात.
बॅचलर लोकांचा आख्खा मसूर
ढगाळ वातावरण आणि वातावरणात भरून राहिलेला आळस.. रविवार आरामात चालला होता..पोटातले कावळे हळू हळू आवाज देत होते ..त्यांना तेवढ्यापुरतं चाऊ माऊ देऊन गप्प केलं .. इतक्यात आईचा कॉल आला.. इकडचं तिकडंच बोलून अंदाज घेत विचारलं ..आज काय केलं होतं जेवायला .. आम्ही काही चहा बिस्किटांवर नाही दिवस काढत .. मसूर केला होता आज .. इति मातोश्री
पावसाळ्यातील मासे
सध्या जोरात पावसाळा चालू आहे. नदीचे मासे आणि त्यांच्या पाककृती बद्दल माहिती हवी आहे कृपया खवय्यांनी मार्गदर्शन करावे....
रानभाजी - पेव च्या पानांची भजी
पावसाळ्यात पेवची ओसाड जागी बरीच झाडे उगवलेली दिसतात.पेवचे कंद असतात. त्याला कालांतराने सुंदर पांढरी फुले येतात. पेवची रोपे कोवळी असताना त्याची भाजी व भाजी करतात.
छंद पाककलेचा
भातूकली खेळता खेळता अलगद कधी मला पाककलेची आवड निर्माण झाली ते कळलेच नाही. भातूकलीत अंगणातल्या झाडपाल्यांची भाजी करता करता हळू हळू आजी आणि आईकडे खर्या भाज्या मागून छोटीशी चुल लावून भातुकलीतले खरे जेवण बनवू लागले.
कच्छी दाबेली
पावसाळी हवा झाली आणि काही तरी चटपटीत खायची इच्छा झाली. घरी मस्त दाबेली चा बेत केला.
साहित्य
पाव, मसाला दाणे, बारीक शेव
उकडलेले बटाटे। 4-5
चिंच खजूर चटणी
पुदिना कोथिंबीर चटणी
बारीक चिरलेला कांदा
डाळिंब दाणे
बटर
गरम मसाला, पावभाजी मसाला, चाट मसाला, तीखट, मीठ
गट्टे बिर्याणी
गट्टे बिर्याणी
१. भात :
बासमती भात दोन वाट्या धुवुन अर्धा तास भिजुन निधळून घ्यावा. अर्धा कच्चा शिजवून घ्यावा. शिजताना त्यात तेल १ चमचा, मीठ , तमालपत्र आणि बिर्याणी मसाला एक चमचा घालावे. भात बाजूला ठेवावा.
२. गट्टे :
सुका मेवा चपाती
मी करून पाहिलेली सुका मेवा चपाती
कृती-१
प्रथम एका भांडयात पाणी घेऊन ते ग्यास वर उकळी येउस्तर ठेवा , उकळी आल्याबरोबर ग्यास बंद करा व त्यात 6 बादाम, २ आक्रोड, 12 काजू आणि 12 पिस्ते टाका. यानंतर साधारण ५-७ मिनिटानंतर पाणी काढून टाका तसेच बदाम सोलून घ्या.
हुलग्याची (कुळीथ) शेंगोळी
ईथे ही माझी पहिलीच पाककृती आहे. आमच्या मावळप्रांताची ही पारंपारीक पाकृ आहे. शेंगोळी. हिची आवड एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येते. नविन मानसाला हा पदार्थ शक्यतो आवडत नाही. खायला आणि पहायलादेखील. खास केलेला पदार्थ शेजारी द्यायची पध्दत असल्याने मी हा प्रकार एकदा आमच्या शेजारी दिला होता पण त्यांनी पहाताक्षणीच “ई ऽ हे क्काये?” म्हणत असा काही चेहरा केला की विचारु नका.
अंड्याचा रस्सा
चावट रश्श्याच्या धाग्यात बर्याच लोकांनी माझ्या आजीची ही रेसिपी देण्याचा आग्रह केला सो काल केला अंड्याचा रस्सा !
जमवाजमव एकदम सिंपल. हा एक झटपट रस्साच आहे म्हणा ना :)
तर एक (च) अंडे, बोटाच्या पेराएवढं आलं, ४-५ लसूण पाकळ्या, ४-५ चमचे ओले खोबरे, १ चमचा तीळ आणि अर्धा चमचा जिरे, एक मध्यम कांदा बारीक चिरून. कोथिंबीर बारीक चिरून.
नाचणीचे लाडू
नाचणीचे लाडू
साहित्य -
नाचणीचे पीठ अर्धी वाटी
ओले खोबरे किसुन २ चमचे
शेंगदाण्याचा कूट ४ चमचे
गूळ गरजे नुसार
नाचणीच्या पिठात पाणी घालून त्याची भाकरी / टिक्की करुन घ्यायची. ती तव्यावर भाजून घ्यायची.
मिक्सरमध्ये भाकरीचे तुकडे, ओले खोबरे , कूट आणि गूळ घालून मस्तपैकी फिरवावे. मिश्रण तयार होते. त्याचे लाडू बांधावेत. एखादा चमचा तूप टाकल्यास चालेल.
वालाची उसळ
ब-याचश्या गृहिणी कडधान्ये घरातच भिजवतात व त्याला मोड आणतात
आमच्या कडे आम्ही दोघेच असल्याने तसे करत नाही
मोड आलेली कडधान्ये विकत आणतो उसळी साठी
डेक्कन वर डेक्कन पोस्ट ऑफिस आहे त्याला लागून एक गल्ली आहे
तिथे एक माउली कडधान्ये विकते दर्जा उत्तम असतो
आजीच्या पाककृती(१) खाटं वरण.
खुपदा असं होत की नुस्ता वरण भात खायचा कंटाळा येतो त्यासाठी ही वरणाचीच पाककृती.
वरण- १वाटी
तूप ३ते ४ चमचे
जिरे , मिरची,मीठ चवीनुसार.
कृती एकदम सोप्पी तुप-जिरे-मिरचीची फोडणी करुन वरणावर घालायची मिश्रण एकजीव करायचे आणी गरम भात/पोळीशी खावयाचे.
हिरव्या/ कच्च्या टोमॅटोची चटणी
साहित्य-
2 चमचे तेल
7-8 छोटे हिरवे टोमॅटो
4 चमचे तीळ भाजून
3 चमचे शेंगदाणे भाजून
2 लसूण पाकळ्या
1 चमचा मीठ
2 चमचे गुळ पावडर
2-3 तिखट हिरव्या मिरच्या
फोडणीसाठी 2-3 चमचे तेल, मोहरी,जिरे,हिंग
- ‹ previous
- 12 of 122
- next ›