फिशिंग अलर्ट

सर्व सदस्यांना सूचित करण्यात येते की, काही नवीन सदस्यांकडून बाकी सदस्यांना व्यक्तिगत निरोपाद्वारे आपला ईमेल देऊन किंवा आपल्याबाबत फसवी माहिती देऊन आपल्याशी संपर्क करण्यास सांगत असल्याचे दिसून येते. असे कुणी आपल्याशी संपर्क साधल्यास सर्वात आधी अश्या फसव्याप्रकारापासून दूर राहावे आणि त्या सदस्याबाबत सरपंच आयडीला कळवावते. याबाबत तातडीने कारवाई करण्यात येईल.

नाचणीचे लाडू

Primary tabs

manguu@mail.com's picture
manguu@mail.com in पाककृती
5 Jun 2018 - 7:20 am

नाचणीचे लाडू

साहित्य -

नाचणीचे पीठ अर्धी वाटी
ओले खोबरे किसुन २ चमचे
शेंगदाण्याचा कूट ४ चमचे
गूळ गरजे नुसार

नाचणीच्या पिठात पाणी घालून त्याची भाकरी / टिक्की करुन घ्यायची. ती तव्यावर भाजून घ्यायची.

मिक्सरमध्ये भाकरीचे तुकडे, ओले खोबरे , कूट आणि गूळ घालून मस्तपैकी फिरवावे. मिश्रण तयार होते. त्याचे लाडू बांधावेत. एखादा चमचा तूप टाकल्यास चालेल.

वेलची, ड्राय फ्रूट , तीळ , भाजलेली मेथीदाणे एखादा चमचा , खजूर इ इ इ अ‍ॅड करता येईल.

नाचणीच्या पिठाच्या लाडवाच्या अनेक पद्धती दिसतात. पीठ भाजणे, त्यात गूळाचा पाक करुन घालणे. गुळाच्या पाकात नाचणी पीठ घालून तव्यावर गोळा करणे . इ इ
ही पद्धत त्यातल्या त्यात एकदमच सोपी वाटली.

नाचणीच्या पिठाचे तिखट पदार्थ ( डोसे, उत्तप्पा, उपमा, भाकरी, थालीपीठ इ इ ) गरम असतानाच खायला चांगले वाटतात. त्यामुळे त्याना स्टोरेज लाइफ नाही. हे लाडू दोन चार दिवस तरी टिकु शकतील.

ladu

ragi ladduraghi laddufinger milletनाचणीचे लाडूनाचणी

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

5 Jun 2018 - 2:37 pm | श्वेता२४

सोपी वाटतीय पाकृ. आणि वेगळीच पद्धत. धन्स

पद्मावति's picture

5 Jun 2018 - 3:32 pm | पद्मावति

सोपी वाटतीय पाकृ. आणि वेगळीच पद्धत

असेच म्हणते. मस्तच.

स्नेहांकिता's picture

5 Jun 2018 - 3:42 pm | स्नेहांकिता

हे तर एकदम सोपे आहे की.
छान.

manguu@mail.com's picture

5 Jun 2018 - 7:59 pm | manguu@mail.com

चवीला मस्त झाले आहेत

एस's picture

7 Jun 2018 - 11:10 pm | एस

छान आणि सोपी पाकृ.