वालाची उसळ

Primary tabs

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in पाककृती
3 Jun 2018 - 8:52 pm

.
ब-याचश्या गृहिणी कडधान्ये घरातच भिजवतात व त्याला मोड आणतात
आमच्या कडे आम्ही दोघेच असल्याने तसे करत नाही
मोड आलेली कडधान्ये विकत आणतो उसळी साठी
डेक्कन वर डेक्कन पोस्ट ऑफिस आहे त्याला लागून एक गल्ली आहे
तिथे एक माउली कडधान्ये विकते दर्जा उत्तम असतो
पेरू गेट पोलीस चौकीला लागून एक दुकान आहे त्या तिथे पण एक जण कडधान्ये विकते
मूग-मटकी-वाल-मसूर पांढरा व हिरवा वाटाणा अशी सारी कडधान्ये तिथे विक्रीला असतात
काल तिच्या कडून बिरड्या (वाल) विकत घेतले
ओलंखोबरे कोथिंबीर आलेलसूण हिरव्यामिर्च्यांचे वाटण केले
कांदा टोम्याटो परतला व मिश्रण छान एकजीव केले कोरडे मसाले मीठ आदि टाकले
काही वेळा विकतचे वाल चांगले शिजत नाहीत टचटचीत राहातात
त्यामुळे कुकर मधून वाल शिज वून घेतले होते
वाफ निधाल्यावर कुकर उघडले अन बोटाने वाल शिजले का ते पाहिले
वाल यावेळी प्रमाणा पेक्षा जात शिजले होते
बोटाने दाबून पाहिले तर पीठ होत होते
तसेच ते वाल मिश्रणात टाकले
वाल परतानाच जाणवत होते वालाचे तुकडे होत आहेत
उकळी येऊन तपासले तर वाल बारीक तुटले होते
वालाची उसळ करायची होती
पण वालाची आमटी झाली
अर्थात वाटण मसाले प्रमाणात असल्याने आमटी चवदार झाली

प्रतिक्रिया

वरचे नावाचे बॅनर जबरदस्त टाकलेत हो अकुकाका. फ्लेक्सांच्या धंद्यात येतायत का?
ते प्रणालीज किचन म्हणजे तुमचेच किचन ना? मग हरकत नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Jun 2018 - 9:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

याला बिरडं (बिरडे) म्हणतात. उसळ म्हणजे सुकी भाजी.

श्वेता२४'s picture

3 Jun 2018 - 11:13 pm | श्वेता२४

हि उसळ खूपच छान लागते चवीला . इथे मुंबईत ऑफिसमध्ये कुणाचा सेंड ऑफ असला की जेवणाच्या मेनूत हि भाजी असतेच . कोकण भागात हि उसळ जास्त केली जाते . पण तुम्ही प्रमाण नाही संगीतलात साहित्याचे

टवाळ कार्टा's picture

4 Jun 2018 - 11:02 am | टवाळ कार्टा

मुंबई, सेन्डऑफ आणि ही भाजी याचा परस्पर संबंध लावून द्याल का?

श्वेता२४'s picture

4 Jun 2018 - 11:19 am | श्वेता२४

आमच्या ऑफीसमध्ये निवृत्त होण्याच्या दिवशी निवृत्त होणाऱअयाने कार्यालयातील सहकाऱ्यांना जेवण देण्याची पद्धत आहे. ऑफीसमध्ये कोकणातून येऊन इथे स्थाईक झालेले लोक जास्त आहेत त्यामुळे जेवणातील एक मेनू भाजी ही बिरड्याची उसळ असते. हा प्रकार मी पुण्यात असताना किंवा माहेरीही नव्हता खाल्ला. इथे मात्र ही भाजी कि्वा उसळ म्हणजे स्पेशल मेनू असतो.

टवाळ कार्टा's picture

4 Jun 2018 - 10:07 pm | टवाळ कार्टा

स्वस्तात कटवतात म्हणजे

श्वेता२४'s picture

4 Jun 2018 - 10:31 pm | श्वेता२४

काहीही असो पनीर भाजीपेक्षा हि भाजी मला जास्त आवडते आणि अशी special मेजवानी असताना पनीर भाजीला पण मार देते

मार्मिक गोडसे's picture

4 Jun 2018 - 11:45 pm | मार्मिक गोडसे

बिरडं बनवणे हे सुगरणीचे काम आहे.
पनीरची भाजी(?) हे निव्वळ फॅड आहे.

फ्रॉड आहे. पनीर कुठून आणतात, काय क्वालिटीचे असते याचा कसलाच थांगपत्ता लागत नाही. आम्ही पनीरच्या भाजीला खोडरबरांची भाजी म्हणतो.

श्वेता२४'s picture

5 Jun 2018 - 2:03 pm | श्वेता२४

,

manguu@mail.com's picture

3 Jun 2018 - 11:35 pm | manguu@mail.com

कडधान्याची उसळ करताना त्यातच पालकांच्या अर्ध्या पेंढीची मिक्सरातून ग्रेवी करून टाकायची

मार्मिक गोडसे's picture

4 Jun 2018 - 12:37 am | मार्मिक गोडसे

ह्याला बिरडं म्हणतात, कडवे वालाचे ओले खोबरे आणि कोकम घालून केलेले बिरडे भाताबरोबर अप्रतिम लागते.

कायस्थ वालाचं बिरडं आणि कोकणातली बिरड्यांची आमटी / उसळ (वेगवेगळी पातळता) हे वेगळे प्रकार आहेत असं मत नोंदवतो.

पिवळा डांबिस's picture

5 Jun 2018 - 1:29 am | पिवळा डांबिस

कायस्थ वालाचं बिरडं आणि कोकणातली बिरड्यांची आमटी / उसळ (वेगवेगळी पातळता) हे वेगळे प्रकार आहेत असं मत नोंदवतो.

कोकणातली वालाची उसळ (काळी मिरी आणि खोबर्‍याचं वाटण घतलेली) आणि आमटी (विशेषतः कैरी घालून केलेली) लाजवाब असतातच.
पण कायस्थांच्या वालाच्या बिरड्याला तोड नाही. कडव्या वालाला सद्गती देतात लेकाचे!! :)
-कुरबुरत दिलेली कबुली

वालाचं बिरडं फक्त हॉटेलात खाल्लं आहे. घरचं ऑथेंटिक खाल्लेलं नाही. जे दोन तीन ठिकाणी खाल्लं ते तिखट मसालेदार आणि तिथल्या अन्य ग्रेव्हीशी साम्य साधणारं होतं.

बिरड्या, फणस वगैरे पदार्थांना फार झणझणीत मसाला लावून त्याचा ओरिजिनल सौम्य स्वाद लपतो / मरतो असं वाटतं. ते कोकणातल्या उसळीत टाळलं जातं.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jun 2018 - 1:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

वालाचं बिरडं फक्त हॉटेलात खाल्लं आहे. घरचं ऑथेंटिक खाल्लेलं नाही. म्हणुनच कदाचित् वरची मते आहेत.

वर मार्मिक गोडसे यांनी म्हटले आहे, "वालाचे बिरडे बनवणे सुग्रणीचे काम आहे." त्याला +१००

घरी वर्षभर आठवड्यातून एकदा तरी बिरडे बनते. एखादा आठवडा बनले नाही तर लगेच चौकशी सुरू होते ! :)

पिवळा डांबिस's picture

5 Jun 2018 - 10:21 pm | पिवळा डांबिस

आणि गंमत अशी की आमच्या घरी हा एकच पदार्थ असा आहे की तो करायचा ठरल्यावर घरातली प्रत्येक व्यक्ती निमूटपणे वेळ काढून आपल्याला जमतील तितके वाल सोलून देते!! :)

पिवळा डांबिस's picture

5 Jun 2018 - 10:10 pm | पिवळा डांबिस

हाटेलचं नाय गविशेठ, घरचं एखाद्या अस्सल सिकेपीणीने बनवलेलं बिरडं. त्याची गोष्ट करतोय हो मी.
बघा, एखाद्या सिकेपी सुग्रणीशी मैत्री करून. नायतर मग माझ्याकडे या, खिलवतो. :)
बाय द वे, अस्सल बिरडं फार तिखट नसतं. उलट नारळाचं दूध घालून मस्त सुरमट बनवलेलं असतं. त्यासाठीचे कडवे वाल हे देखील अलिबाग-नागांवचे लागतात.

सही..

जमवतो कुठेतरी घरगुती..

मार्मिक गोडसे's picture

5 Jun 2018 - 11:40 pm | मार्मिक गोडसे

त्यासाठीचे कडवे वाल हे देखील अलिबाग-नागांवचे लागतात.
येस्स! दर्दी बिरडं खाणारा अलिबाग ते वज्रेश्वरी , सापना पर्यंत कडवे वाल ओळखीच्या लोकांकडून घेतो. ह्यात ठाणे जिल्ह्यातील वाणी लोकं फार चोखंदळ असतात, ते बिरड्याला 'बिड्डा' म्हणतात. बिड्डा म्हणजे जीव का प्राण असतो त्यांच्यासाठी आणि बनवतातही अगदी चविष्ट.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jun 2018 - 10:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्यासाठीचे कडवे वाल हे देखील अलिबाग-नागांवचे लागतात.

क्या बोला ! एकदम बैलाचा डोळा !!

त्यासाठीच, पोयनाड/पेण वरून वर्षभराच्या वालांची बेगमी करण्याची आमच्या घराची गेल्या ६-७ दशकांची परंपरा आहे. इतर ठिकाणचे वाल किंवा अगदी पावटेसुद्धा वाल म्हणून खपवले जातात... त्याना ती खास चव कशी असेल ??!!

बिरडं! आहा हा! आपले जीव की प्राण आहे. मी रोज म्हटलं तरी खाऊ शकतो.

manguu@mail.com's picture

4 Jun 2018 - 8:05 pm | manguu@mail.com

आज केले होते. हिरव्या मिर्चा घालुन केले होते. लाल तिखट घातले नव्हते. त्यामुळे पिवळा काविळी रंग आला होता. चवीला अगदी सुरेख झाले होते.

एक शंका आहे. कुकरमध्ये शिजवल्यावर त्याची सालटी वर तरंगून आली. ती मी वेचुन वेचून काढून टाकली. ती अगोदरच काढायची असतात, नन्तर काढायची असतात , की तीही उसळीत घालून खायची असतात ?

मार्मिक गोडसे's picture

4 Jun 2018 - 8:13 pm | मार्मिक गोडसे

एक शंका आहे. कुकरमध्ये शिजवल्यावर त्याची सालटी वर तरंगून आली. ती मी वेचुन वेचून काढून टाकली. ती अगोदरच काढायची असतात, नन्तर काढायची असतात , की तीही उसळीत घालून खायची असतात ?
वालाला मोड आले की बोटाने वाल दाबून त्याची सालं काढायची असतात. पटकन निघतात सालं, मजा येते वाल साफ करायला.

माहितगार's picture

5 Jun 2018 - 10:38 am | माहितगार

मस्त पदार्थ, अर्थात ते शिजण अगदी नेमके हवे, कमी अथवा अधिक शिजू नए असे वाटते. पुलेशु.

आता विषय निघालाच आहे आणि पाऊस लागला आहे तर माझा जुना वालाचं बिरडं - मिसळ प्रयोग पाहा.
लिलि: https://www.misalpav.com/node/28384

वरचा वालाची उसळ फोटो झकास.
उसळ/आमटी/बिरडं तिन्ही वेगळं आणि तिन्ही आवडतं. लग्नसमारंभाच्या बुफेत ही उसळ असतेच.