पाककृती
नाचणीचे शेंगोळे
नाचणीचे शेंगोळे
१. एक वाटी नाचणीचे पीठ घेऊन, तेल, पाणी, मीठ , थोडे तिखट घालून मळून घ्यावे. त्याचे शेंगोळे करुन ताटात ठेवावेत.
२. वरण करण्यासाठी अर्धी वाटी तुर डाळ कुकरमधून अर्धवट शिजवून घ्यावी.
मटण करताना आईने शिकवलेल्या काही गोष्टी
“तांबडा पांढरा रस्सा” यावरची स्वातीतैंचा पाकृ वाचत होते आणि त्यांनी पहिली स्टेप अशी लिहिलेय.
” १.प्रथम मीठ, आले, लसूण, थोडे पाणी घालून मटण शिजवून घ्यावे.”
चावट रश्श्यांची दुनिया !
काल खफवर रश्श्याची चर्चा वाचली. लिहिणाऱ्याने रशियाची आठवण काढली होती आणि मालकांसहित सर्वांना तरतऱ्हेचे रस्से आठवू लागले. त्यांची नावे वाचूनच जीवाचे (आणि जिव्हेचे) पाणी पाणी झाले. मग रश्श्यांच्या दुनियेत मनानेच फेरी मारली.
रस्सा हा तसा चावट किंवा खरं म्हटलं तर चाबरट खाद्य-प्रकार ! तामसी खाणे या क्याटेगरीत येणारा. मराठी माणसाला रस्सा भुरकण्याचा प्राचीन काळापासून नाद !
लवंगी चहा
तर मित्रानो , आजपासून मी आपल्यासाठी ( अर्थात पुरुषांसाठी फक्त ) , हा महिना स्पेशल पाकृ आणणार आहे . मी चहाचा शौकीन असल्याने सुरुवात चहापासून करत आहे . पण त्याआधी दोन ओळी ( सवयीप्रमाणे सादर करीत आहे .. ह घ्या )
बायको गेली तिच्या आजोळी
चहा प्यावा वेळीअवेळी
टाकावी थोडीशी लवंगी कापून
रडावं तिच्या नावानं गळा काढून
कोल्हापुरी भेळ
परवा आईने फ्रिज मध्ये ठेवलेली कैरी पाहिली आणि नाळेसाठी घोडा हि म्हण मी प्रत्यक्षात उतरवली. कारण कैरी साठी मी भेळ करायची ठरवली. कैरी या प्रकरणाशी माझ फारसं कधी जमलं नाही. पण ती जेव्हा ओल्या भेळेसोबत मिळणाऱया उकडलेल्या मिरच्याच्या बाजूला जाऊन बसे तेव्हा तिची दृष्टच काढविशी वाटायची.
सुक्या सोड्यांचे कालवण
सोडे कोलंबीपासून बनवतात. सोललेल्या कोलंब्या म्हणजे सोडे.
मोठ्या कोलंब्या सोलून त्या सरळ ठेऊन उन्हात कडकडीत वाळवून साठवणीसाठी तयार करतात.
मेथी पिठले
साहित्य -
१वाटी बेसन
२मीरची चीरून
१०-१२ लसूण ठेचुन
१०-१२ पाने कढीपत्ता
२ चमचे कांदा लसूण मसाला
मीठ , तेल व फोडणीसाठी साहित्य अंदाजे
बेसनमध्यये पाणी व मीठ घालून खूप पातळ करावें. २-३ चमचे तेलात मीरची, कांदा व निम्मा लसुण घालावा
टोमॅटो सूप .. जरा वेगळ्या पद्धतीने ..
आपण नेहमी जे टोमॅटो सूप किंवा सार करतो त्यापेक्षा हे जरा वेगळ्या पद्धतीचे आहे ... छान लागते... शिवाय फार वेळही लागत नाही ...
नाचणी पुट्टू spicy
नाचणी पुट्टू
साहित्य :
१. नाचणी पीठ एक वाटी
२. बारीक कापलेला कांदा
३. बारीक चिरलेला टोम्याटो
४. लाल / हिरव्या मिरच्या
५. तेल व फोडणी साहित्य
६. मीठ
७. फुटाण्याची डाळ
--------------
सोया चंक्स आणि खजुराचे पौष्टीक लाडू
मुलाला डब्यात देण्यासाठी एखैदा पौष्टीक पाककृती शोधत होते. घरात सोयाबीन चंक्सचे पीठ व खजूर शिल्लक होते. त्याचा वापर करायचे ठरविले .
साहित्य -
पच्ची पलसू
पच्ची पलसू, मूळ तेलगू उच्चारण बहुधा 'पच्ची फुलसू ' असावे. बेसिकली गरम करण्या एवजी थंड केलेले, आंबटपणा बराच डायल्यूट केलेले चिंचेचे पेय (सार). ज्यांना पाणीपुरी मधली चिंच गूळ चटणी चालते त्यांना पच्ची पलसू ही आवडावे . उष्णतेच्या काळात हे गार क्षूधावर्धक दुपारच्या भोजनाची लज्जत सहज वाढवते.
सुधारस
सुधारस हे पक्वान्न बहुसंख्य मराठी घरात ऐतिहासिक किंवा आठवणींच्या कोषात जाऊन पडलं असलं तरी आमच्याकडील जेवणाच्या ताटात मात्र आजही सुधारस आपलं स्थान टिकवून आहे. याचं मुख्य कारण म्हणजे यासाठी लागणार्या सामग्रीची सहज उपलब्धता, कमीत कमी लागणारा वेळ आणि कौशल्य ,ही त्रिसूत्री. तर मग करुया की सुधारस लगेचच!
आधी साहित्याची जमवाजमव करू.
सुरमई एनपॅपिलो
बरेच दिवस स्वयंपाकघरात हात साफ केला नव्हता म्हणून आणि शेफ केडी व जॅक ऑफ ऑल यांनी फोटो टाकून टाकून जळवले म्हणून एकदाची किचनमध्ये एंट्री मारलीच..
स्वतः मासे फ्राय करण्याची लज्जत मागच्या वर्षी अनुभवली होती म्हणून मासे हाच प्रकार निवडला आणि आमचे द्रोणाचार्य शेफ केडींना शरण जाऊन "माशांचा एखादा वेगळा प्रकार करायचा आहे. काय करू..?" असे विचारले.
- ‹ previous
- 13 of 122
- next ›