स्पर्धा
[शशक' १९] - भेट
दरवाजा उघडला.
तर हा! समोर गुलाबासकट गुलाबाची कुंडी घेऊन...
(हम्मम... मवाली कुठला...)
(तेवढ्यात बाबांचा प्रश्र्न..)
कोण आहे गं?
मी चाचपडत... गोंधळलेल्या अवस्थेत काही बोलणार तोच.
बाबा बोलले "रोपटे घेऊन आलाय...
हा ये रे! तिकडे गॅलरीत ठेव..."
[शशक' १९] - गलका
तो आज चालतच निघाला. ऑफिस आगदीच हाकेच्या अंतरावर नसलं तरी वेळेत निघालं तर बॉसच्या शिव्या खायच्या आत पोहोचण्या एवढ्या अंतरावर होतं. दोन चौक ओलांडून पुढच्या वळणावर तो वळला. शेजारच्या वेड्यांच्या इस्पितळाच्या दहा फुटी लाकडी कुंपणा पलीकडून एकाच गलका झाला.
[शशक' १९] - टर्मिनेशन लेटर
आठवडाभर बेंगलोर मध्येच तळ ठोकून होतो, पूर्ण टीमला कामाला लावलं पण कॉन्ट्रॅक्ट मिळवलंच.
[शशक' १९] - ते दोघे
व्यक्ती १ - रोज सराईतपणे दोघातीघांना "कापणे" हे त्याचे काम होते
व्यक्ती २ - रोज दोघातीघांवर "संस्कार" करणे हे त्याचे काम होते
व्यक्ती १ - थंड डोक्याने थंड वातावरणात नित्यनेमाने आपले कर्म करत होता
व्यक्ती २ - निरपेक्ष भावाने अग्नीच्या सान्निध्यात नित्यनेमाने आपले धर्मपालन करत होता
[शशक' १९] - ज्योतिष
गुरुजी - "मुलाच्या कुंडलीत राजलक्षण आहेत, फक्त पाण्यापासुन जपा, खुप जपा"
...
...
"आज्जी, सगळेजण जातात सोसायटीच्या पुलमध्ये पोहायला, दहा फुटावरुन उडीपण टाकतात. मीच का नाही जायचे?"
"नको रे बाळा, जाउदे त्यांना, तु हा लाडु खा"
"जाउदेना आई त्याला, पोहायला शिकला तर कसला धोका रहाणार नाही. मी पुर्णवेळ जवळ थांबेन."
[शशक' १९] - गिनी पिग
" प्रणव, दहावीत लिहिलेले निबंध हे माझं शेवटचं मराठी लेखन. कसा जिंकणार मी "कांदाभजी" संस्थळाच्या शशक स्पर्धेत?"-मी
" पक्या, बिंधास लिही. जिंकशील"
" प्रणव, प्रयत्न करून थकलोय रे, पण जमतच नाय"
" ठीकाय, ह्या "खास"पेनने लिहून बघ. हे पेन नोबेल विजेते शास्त्रज्ञ नारगोळकरांना आजच मी बँकेत सही करायला दिलं होतं "
" तुझ्या पेनने काय वेगळे दिवे लागणार? पण दे."
.
[शशक' १९] - ड्रॅक्युला
"तुला त्या रक्त पिणाऱ्या ड्रॅक्युलाची गोष्ट माहितीय?" रियान म्हणतो. त्याचे नेहमीच लालसर दिसणारे डोळे आज अधिकच तांबारलेत असा भास मला होतो.
ट्रान्ससिल्वानियाच्या राजप्रासादात राहणारा काऊंट ड्रॅक्युला मला चांगलाच माहितीय.
[शशक' १९] - पूर्ण-अपूर्ण
वैदेही बाल्कनीत उभी होती. रिमझिम पावसात एकमेकांना बिलगत, मस्ती करत चाललेले अविनाश आणि नैना तिला दिसलेत. दहा वर्षांचा भूतकाळ तिच्या इच्छेविरुद्ध पुन्हा एकदा तिला आठवला.
[शशक' १९] - क्लिन बोल्ड
अल्झायमरग्रस्त वृद्ध भाऊसाहेब म्हणजे जणू अजाण बालक.जानकी वहिनींसाठी पति पत्नीतील संवाद कधीचाच संपुष्टात आला होता.भाऊसाहेबांशी शब्दांच्या भाषेत केलेला संवाद म्हणजे जणू भिंतीशी संवाद करणं.साहजिकच दैनंदिन बाबींसाठी जानकी वहिनींनी शब्दाबरोबर अभिनयाची कास धरलेली.
[शशक' १९] - परप्रांतातून
परप्रांतीयांचे लोंढे येतच होते. मुजोर राज्यकर्त्यांच्या अमानुष अत्याचारांना बळी पडलेल्या त्या लोकांना हे शांतताप्रिय राज्य खुणावत होतं. त्या लोंढ्याबरोबर आलेल्या, अनेक दिवसांच्या प्रवासाने शिणलेल्या, त्या झोपलेल्या किडकिडीत मुलाला सैनिकाने उठवलं.
‘कोण रे तू? कुठून आलास? तुझे आई आणि वडील कुठे आहेत?’
[शशक' १९] - निर्णय
" आता २७ दिवस ICUत झाले आहेत. गेले ७ दिवस व्हेंटीलेटरवर. तुम्ही आता काहीतरी निर्णय घ्या."
"अस कस म्हणतोस तू. परवा किडनी काम करत नाही म्हणालास , आणि सकाळी परत सुरु झाली न."
"मी उपचार सुरू ठेवतो, तुम्हीच बघा. घरचाच पेशंट म्हणून सांगतोय. चांगले ९५ वर्षे आयुष्य जगले आहे. "
आईची नजर मिटींग सुरू झाल्यापासून शुन्यात.
ताईच्या डोळ्यातले पाणी खळत नव्हते.
[शशक' १९] - आरसा
कुरूप राणीने देशातले आरसे फोडून टाकले. तळी, विहिरीसुद्धा बंद.
पण जसिंताच्या अप्रतिम सौंदर्याचं वर्णन वॅलेंटिन तिला प्रेमभराने सतत ऐकवत असे. एके दिवशी दोघांचं लग्न ठरलं.
मग आली थेरडी भिकारीण. राणीने पढवलेलं गरळ ओकून गेली.. "किती ग बाई कुरूप तू! काय ते तिरळे डोळे..काजळासारखा चेहरा..पिवळे फताडे दात..विद्रुप कान.."
दुखावून, शरमून जसिंताने लग्नाला नकार दिला.
[शशक' १९] - उफराटा न्याय
“त्यांच्यात काय बोलणं चाललंय ?”
“गपचूप काहीतरी प्लॅन करतायत !
“एकाच घरात राहून समजेना. पत्र आलंय बँकेकडून घरासाठी लोन मंजुरीचं ! परस्पर घर घेतलं, सांगावंसंही वाटलं नाही. ती तर सूनच, पोटच्या मुलाने सांगायला नको ?
“तिचीच फूस असणार,मुलगा असा नव्हता लग्नाआधी. लग्नाला इतकी वर्षं झाली, मूलबाळ नाही अजून, नाहीतर त्याचीही जबाबदारी आपल्यावर टाकून हिंडले असते !”
[शशक' १९] - शिक्षा
"आई माझ्याकडून कपबशी फुटली. . उठताना चुकून धक्का लागला. मला शिक्षा दे." सात वर्षाचा मोगु आईला सांगत होता.
समजूतदार आई मनाशी हसली. " बाळा चूक झालीये ना. त्याची शिक्षा हवीच. तूच ठरव शिक्षा काय घ्यायची ते. तू शहाणा आहेस"
" मी दहा मिनीटे कोपर्यात अंगठे धरून उभा रहातो"
"ठीक आहे. तुला योग्य वाटतय ना " मोगु अंगठे धरुन उभा राहिला. आई अभिमानाने स्वतःशीच हसली.
[शशक' १९] - PhD
"phd झाली. आता नो अमेरिका. आधी लग्न.आता चर्चा नाही" वैशाली हिरमुसली. दुसऱ्या दिवसापासून ती हसतमुखाने घरच्या रेस्टॉरंटमध्ये लक्ष घालू लागली. बाबा खुश. तिने आलेल्या गिऱ्हाईकांसाठी स्वतः बनवलेले सूप द्यायला सुरुवात केली. ह्या ऑफरमुळे गर्दी वाढली. अचानक 2 दिवसानंतर तक्रारी सुरू झाल्या. काहीही खाल्लं तरी एकच चव लागत होती. कधी कॉफी तर कधी उसाचा रस. बाबा वैतागले. काहीच समजत नव्हतं. सगळं तपासून झालं.
[शशक' १९] - वस्तरा
रणरणत्या दुपारी, उन्हाच्या झळा बसत होत्या. फुफाटा आसमंतात उडाला होता.
"सुन्या अरे ये सुन्या चल लवकर, शाली वरल्या माळाकड चाललीये. आज नक्की गठल बघ"
ब्रश खाली ठेऊन सुनील वस्तराच हातात घेणार होता इतक्यात दिपकच्या हाळीने तो चमकला
"आँ "
"अरे आँ काय करतोय चल लवकर, काय फटाकडी दिसून ऱ्हायली आज शाली, कहरच "
"अरे संपत" सुनील चाचरत बोलला.
[शशक' १९] - स्वप्न
आज महाराष्ट्राची नॅशनल अंडर १९ मधील शेवटची T२० मॅच तीही पुण्यात आपल्या होम ग्राउंड वर. आजपण ५० १०० केले की पुढच्या महिन्यात IPL ऑक्शनमध्ये आपण नक्की सिलेक्ट काही वादच नाही त्यात.
[शशक' १९] - दोन ध्रुवावर दोघे आपण
"हॅलो" ! फोटो स्टुडिओ का ? मी आरुष बोलतोय
समोरून अगदी मंजुळ आवाज आला , "मी आश्लेषा बोलतेय" !
धागे जुळत गेले , एक दिवस काळाघोडाला भेटीचं ठरवलंच पण भलताच दैवयोग्
ती:- तू आला का नाहीस ?
तो:- मी आलो होतो ना !
तो:- ओके , शेवटचा चान्स , संध्याकाळी शिवाजी पार्कात भेट
ती:- तिथे जेल आहे वेडी आहेस का?
तो:- खोटारडी आहेस
[शशक' १९] - हकालपट्टी
"ती भयाण कुरूप दिसते. तिचं ते टक्कल पडलेलं बोडकं डोकं पाहिलं की मला भीतीच वाटते. मला तिच्याकडे नाही जायचं."
"असं म्हणून कसं चालेल, तुला मूळ स्थानी परत जायलाच हवं”
[शशक' १९] - रेडिओ, गाणी आणि संध्याकाळ
कितने अजीब रिश्ते है यहां पे
दो पल मिलते है, साथ साथ चलते है
जब मोड आये तो बचके निकलते है
आणि…
मैने दिल से कहा ढूंढ लाना खुशी
नासमझ लाया गम, तो ये गम ही सही
- ‹ previous
- 2 of 4
- next ›