Skip to main content

[शशक' १९] - नियती

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 04/02/2019 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळ झाली तशी ती सरसरून उठली. एका अनामिक आनंदाच्या ओढीने आळस झटकून तीने आवरायला सुरूवात केली. एका नव्या आयुष्याची स्वप्ने गेल्या कित्येक रात्री तीने रंगवली होती. आज त्या स्वप्नांची पूर्तता करायची वेळ आली होती. एव्हाना तो यायला हवा होता.?!! मनाशीच तिला वाटलं, कदाचित त्याने आपला विचार तर बदलला नसेल ना? या विचाराने ती सैरभैर झाली. बरोबर आठ वाजता तो आला. सर्वांना चुकवत त्यांनी रेल्वे स्टेशनच्या दिशेने धाव घेतली. त्या गर्दीत आपल्याला कुणी ओळखणारं नसेल असं वाटलं असावं त्यांना. अचानक एका राठ हाताची पकड तिच्या कोमल हाताभोवती पडली. "हां अम्मा, ठेसनपें पकडाय सालीको, लेके आता अब्बी उधरही." मुदस्सर फोनवर बोलत होता.

वाचने 15066
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

+१. कथा आवडली. (आणि उदासही करुन गेली.)

म्हणजे ती वेश्या आणि अम्माच्या गुंडाने तिला पळून जाण्याआधीच पकडलं. परत तिचे तेच भयानक आयुष्य! :-(

+१

हेच्यासाठी शशक भारी!! उगाच पाल्हाळ नाही आणि ललित नाही.

हेच म्हणतो. एकदम कडक

+१ शशकच्या प्रवाहाचा वेग आणि शेवटचा धक्का आवडला.

+१

+१

आवडली पैजारबुवा,

+१

अभागी पलायनाची वास्तव कथा

आवडली

+1

आवडली!

+१

+१

+१

.


+१

मस्त!

+१

+१

+१