[शशक' १९] - हकालपट्टी

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
6 Feb 2019 - 6:08 pm

"ती भयाण कुरूप दिसते. तिचं ते टक्कल पडलेलं बोडकं डोकं पाहिलं की मला भीतीच वाटते. मला तिच्याकडे नाही जायचं."
"असं म्हणून कसं चालेल, तुला मूळ स्थानी परत जायलाच हवं”
"तिच्याकडे गेलं की रुक्ष, भकास वाटत राहतं, नकारात्मक लहरींनी तनमन व्यापून जातं आणि उदास छाया पसरून राहते. माझं तुझ्यावर प्रेम आहे हे माहिती असूनही तू मला तिच्याकडे पाठवत आहेस. तुझ्याशिवाय मी क्षणभरही राहणार नाही. तुझी चंदेरी कांती, लालसर केस, सोनेरी डोळे ह्यांनी मला मोहून टाकलंय. मी इथेच राहीन."
“तिच्या वाईट अवस्थेला तूच जबाबदार आहेस, आईवर ही वेळ आणू शकतोस तर मी कोण!”
असे म्हणून तिने त्या मानवाला अंतरिक्षमार्गे पृथ्वीवर ढकलून दिले.

प्रतिक्रिया

> तुझी चंदेरी कांती, लालसर केस, सोनेरी डोळे ह्यांनी मला मोहून टाकलंय. > हा कोणता ग्रह असेल?

शाली's picture

6 Feb 2019 - 6:32 pm | शाली

+१

द्वादशांगुला's picture

6 Feb 2019 - 6:37 pm | द्वादशांगुला

+1

भारी लिहीलीय :)

जव्हेरगंज's picture

6 Feb 2019 - 6:39 pm | जव्हेरगंज

अफाट!!
+1

पैलवान's picture

6 Feb 2019 - 10:39 pm | पैलवान

मंगळी?

मंगळ ग्रहावर गेलाय का तो?

प्रशांत's picture

7 Feb 2019 - 2:14 pm | प्रशांत

मस्त

चिनार's picture

7 Feb 2019 - 9:51 am | चिनार

+१
अफाट कल्पना

सिद्धार्थ ४'s picture

7 Feb 2019 - 11:00 am | सिद्धार्थ ४

+१

विनिता००२'s picture

7 Feb 2019 - 11:30 am | विनिता००२

असेच पाहिजे :)

+१

मोहन's picture

7 Feb 2019 - 12:02 pm | मोहन

+१ छान कल्पना

अक्षय दुधाळ's picture

7 Feb 2019 - 1:05 pm | अक्षय दुधाळ

+१

किल्ली's picture

7 Feb 2019 - 1:29 pm | किल्ली

+१

अरे सर्व जण " अफाट कल्पना , छान " असं लिहीतायत .. कृपा करून जरा समजावून सांगाल का या पामराला ? मला समजलंच नाही त्यामुळे खरंच गुण देता येत नाही आहेत पण जर कुणी समजावून सांगितलं तेर नक्कीच देईन ..

रांचो's picture

7 Feb 2019 - 8:00 pm | रांचो

+१

विजुभाऊ's picture

8 Feb 2019 - 10:20 am | विजुभाऊ

+१

ज्योति अळवणी's picture

9 Feb 2019 - 10:53 pm | ज्योति अळवणी

वृद्ध आईला सोडून एका सुंदर स्त्रीच्या आकर्षणापाई स्वग्रह सोडून तो जातो. परंतु ती स्त्री त्याच्या लंपटपणाला नाकारून त्याला ढकलून देते

पद्मावति's picture

9 Feb 2019 - 11:20 pm | पद्मावति

मला वाटतं याचा अर्थ बहुदा असा असावा. मानवानी पर्यावरणाचे नुकसान केले आणि पृथ्वीला भयाण, ओबडधोबड केली आणि मग नवीन वस्ती करायला दुसऱ्या ग्रहावर जाऊन राहतोय पण तेथील रहिवासी त्याला म्हणताहेत कि तुझ्या आईच्या ( पृथ्वीच्या) विनाशाला तूच कारणीभूत आहेस, तिचा विनाश केलास आता इथे आमचा विनाश करशील असं म्हणून त्याला पृथ्वीवर ढकलून देतात. सुंदर रूपकात्मक कथा.

चौथा कोनाडा's picture

8 Mar 2019 - 1:05 pm | चौथा कोनाडा

+१

अगदी !

नूतन's picture

10 Feb 2019 - 9:59 am | नूतन

+1
(मला वाटतं याचा अर्थ बहुदा असा असावा. मानवानी पर्यावरणाचे नुकसान केले आणि पृथ्वीला भयाण, ओबडधोबड केली आणि मग नवीन वस्ती करायला दुसऱ्या ग्रहावर जाऊन राहतोय पण तेथील रहिवासी त्याला म्हणताहेत कि तुझ्या आईच्या ( पृथ्वीच्या) विनाशाला तूच कारणीभूत आहेस, तिचा विनाश केलास आता इथे आमचा विनाश करशील असं म्हणून त्याला पृथ्वीवर ढकलून देतात. सुंदर रूपकात्मक कथा)याच्याशी सहमत

L Lawliet's picture

10 Feb 2019 - 2:49 pm | L Lawliet

+१

दादा कोंडके's picture

11 Feb 2019 - 12:14 am | दादा कोंडके

वेगळी कल्पना.

उपेक्षित's picture

11 Feb 2019 - 1:06 pm | उपेक्षित

+१
जबरदस्त

समर्पक's picture

14 Feb 2019 - 12:07 am | समर्पक

.

nanaba's picture

14 Feb 2019 - 3:31 pm | nanaba

+1

ईश्वरदास's picture

16 Feb 2019 - 9:45 pm | ईश्वरदास

1

कुमार१'s picture

25 Feb 2019 - 10:09 am | कुमार१

+१

किल्ली's picture

4 Mar 2019 - 5:13 pm | किल्ली

सर्व वाचकांचे आणि मत दात्यांचे आभार!

किल्ली's picture

4 Mar 2019 - 5:14 pm | किल्ली

पद्मावति ह्यांनी लावलेला अर्थ अगदी बरोबर आहे.. धन्यवाद पद्मावति