Skip to main content

[शशक' १९] -  गुरु

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 04/02/2019 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
हातावर बसलेले झुरळ उडवले तेव्हा उसासे सोडत त्याने माझ्याकडे बघितले. पांढरा धूर सोडत मी सिगारेट त्याच्याकडे सोपवली. बाजूलाच एक चौकोनी बकेट ठेवली होती. रुंद काळपट टेबलावर विखुरलेले तुकडे तिच्यात भरून ठेवले. शुभ्र पांढरा धूर सोडत तो दुसऱ्या हाताकडे सरसावला. सिगारेट ओढली की त्याच्यातला कलाकार जागा होतो. अगदी नवयौवनेला स्पर्शावे इतक्या अलगद त्याने मनगट कापून काढले. थक्क होऊन मी बघतच राहिलो. खांद्यावर जेव्हा त्याने आलटून पालटून हत्यार चालवले तेव्हा त्याच्या हळव्या हृदयाला एक सलाम ठोकला. "आता गळा" मी बोललो. "आधी ह्या मनगटाला इस्तरी कर. मी आलोच" भर उन्हाळ्यात इस्तरीचं काम माझ्यावर सोपवून टेलर चहा प्यायला निघून गेला. शुभ्र पांढरा धूर सोडत.

वाचने 15041
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

भारीय !

+१

+१

+१

+१

+१

प्रेडीक्टेबल असली तरी आवडली पैजारबुवा,

आवडली. गुरुचं पात्र अगदी जिवंत उभं केलंत. आवाजात आणि चालण्या-बोलण्यात एक मस्त स्टाईल आहे असं वाटलं. सिगारेटच्या धुराने त्या टेलरचं पात्र अधिक जिवंत केलं.

:-) भारी....

+१

+१ मस्त

.

+1

छान!

+१

+१ :))

+१ हा हा हा . उसासे आणि सिगारेटच्या धुराने शशक किती गुढ केली !

सुंदर