(कोरडी भाकर)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
11 Dec 2016 - 10:41 am

मागच्या वेळी पेर्णा दिली नव्हती तर नाखुकाकांनी माझा कान धरला होता,
त्यामुळे यावेळी न विसरता - ही पेर्णा

फार धावाधाव झाली, सकाळी खरोखर
जेवणा तरी सुधा, नाराज नसे मी तुझ्यावर

मी किती दडवून ठेवले या ढेरीला
कुत्सित नजरा घाव घालती.. या..! मनावर

फेरफटका मारण्याचे, आजकाल टाळतो मी
एक एक पाउल उचलणे, जाहले खूप खडतर

तू नको आणूस सुगंध, ऐक वाऱ्या
एक वडा खायचा, होईल मोह अनावर

नुकतेच जरीही, जेवण असले जाहले ना
काकडी-खिचडी, सहज खायचो मी त्या नंतर

मन पुन्हा हळूवार जाहले त्या आठवाने
जेव्हा घ्यायचा परस्पर, वेटरही आमची ऑर्डर

फक्त डॉक्टरशी केले बोलणे, हीने अन्
जेवणात रोज मिळते, एक कोरडी भाकर

शोधसी का ‘पैजारबुवा’ खणांतूनी लोणच्याला
पहा थोडी मिरपुड घालूनी सुपावर

-(खारा)काजू

eggsअदभूतआरोग्यदायी पाककृतीकाणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडबालसाहित्यभूछत्रीरतीबाच्या कवितारौद्ररसपाकक्रियावाङ्मयऔषधोपचारकृष्णमुर्तीशिक्षण

प्रतिक्रिया

पगला गजोधर's picture

11 Dec 2016 - 10:49 am | पगला गजोधर

अन मस्त विडंबन, तेज्या आयला .....
(यमक पहा: पयला, तेज्या-आयला)

आधी विडंबन वाचले. आता मूळ प्रेरणा वाचतो जाऊन. विडंबनांचा सर्वात मोठा फायदा हा असतो की मूळ कवितेचा ऍड्रेस सापडतो.

शार्दुल_हातोळकर's picture

11 Dec 2016 - 12:53 pm | शार्दुल_हातोळकर

अप्रतिम विडंबन ..... =))

मित्रहो's picture

11 Dec 2016 - 2:11 pm | मित्रहो

मस्त जमलय विडंबन
मूळ कविता पण वाचली विडंबन वाचल्यावर चांगली आहे.

चांदणे संदीप's picture

11 Dec 2016 - 4:02 pm | चांदणे संदीप

खारा काजू! =))

Sandy

रातराणी's picture

11 Dec 2016 - 6:22 pm | रातराणी

=))

संजय क्षीरसागर's picture

11 Dec 2016 - 6:42 pm | संजय क्षीरसागर

या भावूक ओळींचा :

मन पुन्हा गर्भार झालेले व्यथेने
वेदना पुरवेल डोहाळे परस्पर

हा जुगाड :

मन पुन्हा हळूवार जाहले त्या आठवाने
जेव्हा घ्यायचा परस्पर, वेटरही आमची ऑर्डर

तितकाच भारी जमवलांय!

दमामि's picture

12 Dec 2016 - 7:37 am | दमामि

झकास!!!!

हतोळकरांचा प्रसाद's picture

12 Dec 2016 - 10:35 am | हतोळकरांचा प्रसाद

जबराट! स्वाक्षरीसुद्धा सोडलेली नाही! :):)

नीलमोहर's picture

12 Dec 2016 - 3:41 pm | नीलमोहर

असंच पाहिजे =)

पाटीलभाऊ's picture

12 Dec 2016 - 3:46 pm | पाटीलभाऊ

जबराट जमलंय...!
खारा काजू....हाहाहा

पैसा's picture

12 Dec 2016 - 5:20 pm | पैसा

=))