(कोरडी भाकर)
मागच्या वेळी पेर्णा दिली नव्हती तर नाखुकाकांनी माझा कान धरला होता,
त्यामुळे यावेळी न विसरता - ही पेर्णा
फार धावाधाव झाली, सकाळी खरोखर
जेवणा तरी सुधा, नाराज नसे मी तुझ्यावर
मी किती दडवून ठेवले या ढेरीला
कुत्सित नजरा घाव घालती.. या..! मनावर
फेरफटका मारण्याचे, आजकाल टाळतो मी
एक एक पाउल उचलणे, जाहले खूप खडतर
तू नको आणूस सुगंध, ऐक वाऱ्या
एक वडा खायचा, होईल मोह अनावर
नुकतेच जरीही, जेवण असले जाहले ना
काकडी-खिचडी, सहज खायचो मी त्या नंतर
मन पुन्हा हळूवार जाहले त्या आठवाने
जेव्हा घ्यायचा परस्पर, वेटरही आमची ऑर्डर
फक्त डॉक्टरशी केले बोलणे, हीने अन्
जेवणात रोज मिळते, एक कोरडी भाकर
शोधसी का ‘पैजारबुवा’ खणांतूनी लोणच्याला
पहा थोडी मिरपुड घालूनी सुपावर
-(खारा)काजू
मी पयाला....
आधी विडंबन वाचले. आता मूळ
अप्रतिम विडंबन ..... =))
मस्त विडंबन
=))
=))
छान !
झकास!!!!
जबराट! स्वाक्षरीसुद्धा
ही ही !!
मस्त
=))