!!फ्लश!!

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
5 Oct 2016 - 4:22 pm

पेर्ना..! =))

प्रत्येकाला सकाळी जायची घाई असते,
घुसायचीही मधे भलतीच तयारी असते,
जो मधे घुसला, तो धन्य होतो,
जो तसाच्च राहिला बिचारा तो "अन्य" होतो !!

पण घुसणाय्राच्या मनी कुठलाही खेद नाही,
आज, उद्या, पर्वा, नेहमीच!, असा भेद नाही,
पोटात कळ आणि गच्चीत नळ असेल तर,
तिकडे पहाटे बसणेही अशक्य नाही !!

तशीच अशांची एक दुसरीही बाजू असते,
ती तुम्हाला स्वत:च्या नंब्रात हळुच्च पुढे सोडते,
तुम्ही लाख स्वत:च्या नंबरावर अडून "बसत" असला तरी,
ती अचानक तुमच्या नंबरावर खेळते !!

मित्रानो घुसायचं असं कुठलंच सूत्र नाही,
ह्हु: ह्हु: करत घुसायला ते कै गल्लीतलं कुत्रं नाही,
नंबर नाही मिळणार म्हणून जो चिडून डबडे फोडतो,
तो कधीच गच्चीत 'जायला' पात्र होत नाही !!

----------------------------
@पाणी आणव
(हुंबअअ् हुंबक.. हुक हुक! )

vidambanअनर्थशास्त्रआगोबाआरोग्यदायी पाककृतीकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडचौरागढजिलबीफ्री स्टाइलबालसाहित्यभूछत्रीरोमांचकारी.हास्यविडंबनमौजमजा

प्रतिक्रिया

बोका-ए-आझम's picture

5 Oct 2016 - 4:28 pm | बोका-ए-आझम

आगोबा आहे पण पांडुब्बा नाही. काब्रे?

अत्रुप्त आत्मा's picture

5 Oct 2016 - 5:56 pm | अत्रुप्त आत्मा

पां डुब्बा अजूनही काव्य रसात आलेला नाही! (ह्ही ह्ही ही! =)) )

टवाळ कार्टा's picture

5 Oct 2016 - 6:19 pm | टवाळ कार्टा

तुम्च्या खवत तर काही वेगळेच दिसते

यसवायजी's picture

5 Oct 2016 - 4:49 pm | यसवायजी

अशलील

चौकटराजा's picture

5 Oct 2016 - 5:52 pm | चौकटराजा

धन्य आनंद दिन पूर्ण मम कामना...
नम्बर लागावा मधेच लोभ धरीला महा..
प्राप्त तो दिव्य पथ ( स्पेशल एन्ट्री)
पूर्ण ती आराधना....
संगीत " कळ" कल्लोळ ह्या नाटकातील पद.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Oct 2016 - 5:56 pm | अत्रुप्त आत्मा

=))

कवि मानव's picture

5 Oct 2016 - 4:56 pm | कवि मानव

विडंबन :)

टवाळ कार्टा's picture

5 Oct 2016 - 5:20 pm | टवाळ कार्टा

खी खी खी...बर्याच दिवसांनी कळ लागली म्हणायची

नाखु's picture

5 Oct 2016 - 5:26 pm | नाखु

कळा लागल्या जीवा असे का म्हणायचेय तुला टका...

चला गृहस्थाश्रमाने "मुळ कवी" हरवलेत की काय असे अगोबांचे (विनाकारण) मत होते ते दूर झाले...आणि मळभ दूर झाले

टवाळ कार्टा's picture

5 Oct 2016 - 5:31 pm | टवाळ कार्टा

कवीता आधुनिक होते आहे...तांब्या जाउन फ्लश आला =))

चौकटराजा's picture

5 Oct 2016 - 5:46 pm | चौकटराजा

ते कालच आमचे निवासी येऊन गेले. ते संसारात रमले म्हणून कवतिक केले तर हे शेफारले .उतले मातले घेतल्या वशाला टाकते झाले.संसाराच गम्भीर वसा सोडून वात्रट पणाचा पट आता हे पुन्हा मांडतायत काय...... हे टिळकांच्या शाळेचे माजी ( खरे तर .*जी विद्यार्थी) काय रे ब्वा कोण झाला होतास तू कसा परतलास तू..... ?

दोन दोन कवितांना विंडबनाचे भाग्य लाभले.
कमाल आहे.

कवि मानव's picture

5 Oct 2016 - 6:33 pm | कवि मानव

आभारी आहे :))))
विषय होता यशा चा आणि जाला नंतर कशा चा ;))

अत्रुप्त आत्मा's picture

5 Oct 2016 - 6:44 pm | अत्रुप्त आत्मा

ह्या ह्या हुक्क! =))
रुमाल तुमच्या खिशाचा, अन् तांब्या कायम उशाचा. !

पगला गजोधर's picture

5 Oct 2016 - 7:12 pm | पगला गजोधर

?

प्रचेतस's picture

5 Oct 2016 - 7:39 pm | प्रचेतस

सहज सुंदर कविता.

कवीने घाईवाल्यांची व्यथा फार सुरेखरीत्या मांडली आहे. त्यात स्वत:चा नंबर असूनही हळूच दुसऱ्याला पुढे सोडून व्यथेतून एक अलवार कथा निर्माण केलीय त्याला तोड नाही.

कवीची स्वाक्षरी आणि शेवटचे ते कुंथणे देखील मनोवेधक.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Oct 2016 - 7:46 pm | अत्रुप्त आत्मा

सहज सुंदर प्रतिसाद.

धन्यवाद हो धन्य वाद!

महासंग्राम's picture

6 Oct 2016 - 12:35 pm | महासंग्राम

ओहो अगदी हुच्चभ्रू प्रतिसाद वेग्रे

कविता मनोवेधक आपलं ते हे फ्लश खेचक! कविवर्यांना विनंती आहे की एकदा विमानातील बिनपाण्याच्या फ्लशचा अनुभव घ्यावा. अतिशय हृदयद्रावक वगैरे आहे. एकदा आमच्या पोटाने भर विमानातच बंड पुकारले तेव्हा आत गेलो. थोड्या वेळाने कुणी दरवाजा ठोठावत आलं. मी ओरडलो, अगोदर इंग्रजी व नंतर हिंदीतून "अबे मोकळे तरी होऊ द्या". तरी ठोठावणं थांबलंच नाय. मीही बधलो नाही, नंतर कळालं की पायलटला लागली होती जोराची आणि नेमका मी त्याच्या जवळच्याच स्वच्चकुपात गेलेलो. =))

दुसरा रोचक अनुभव जर्मनीतला. डुसेलडॉर्फ रेल्वे स्टेशनबाहेरचा रस्ता. एका बाजूला हाटेले आणि दुसर्‍या बाजूला बस ष्टाप आणि एक सार्वजनिक. ५० सेंटचे नाणे टाकून आत गेलो. विधी आटपून बाहेर आलो. सुदैवाने लौकर आटोपलं, नायतर आत लिहिलेलं, "२० मिनिटांत न आटपल्यास दार आपोआप उघडेल आणि मग बाहेरून नाणे टाकावे लागेल". =))

खटपट्या's picture

6 Oct 2016 - 12:28 am | खटपट्या

यासाठीच तर मिपा वर येतो. हे असे धागे आणि प्रतिसाद वाचले की माझ्या जीवनातील रीतेपणा निघोन जातो.

बाकी काय बोलावे त्यांचे फॅण तर आहोतच...

देशोदेशींचे महाल,राजवाडे,म्युझिअम,मंदिरे आणि निसर्ग दाखवण्यात आले पर्यटनात पण कळनिवारक स्थानके दाखवण्याची गरज भासत आहे.
एका कविच्या प्रतिभेचा प्रवास!
"व्हेनिसमधली मलमूत्र प्रक्रिया " अशा लेखांच्या प्रतिक्षेत.

खटपट्या's picture

6 Oct 2016 - 5:47 am | खटपट्या

खरेतर कळनिवारक स्थानके हा दुर्लक्षीत केलेला विषय आहे. जो खूप महत्वाचा आहे.

चौकटराजा's picture

6 Oct 2016 - 9:08 am | चौकटराजा

एका अमेरिकन युवतीने रोम व कळ निवरणाची 'मोफत' ठिकाणे यावर लिहिलेला ब्लॉग माझ्या वाचनात आला होता.

किसन शिंदे's picture

6 Oct 2016 - 9:39 am | किसन शिंदे

या विषयावर इतकं वास्तववादी लिहीण्यात बुवांचा हात कुणी धरूच शकणार नाही. =))

अत्रुप्त आत्मा's picture

6 Oct 2016 - 12:28 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif

जव्हेरगंज's picture

6 Oct 2016 - 12:33 pm | जव्हेरगंज

अ पे क्षा भं ग

तिमा's picture

6 Oct 2016 - 1:42 pm | तिमा

आपला नंबर आपणहून दुसर्‍याला देणे, हा केवळ परोपकारच असेल असे नाही. 'बद्धकोष्ठ' वाले पण परस्पर पुण्य मिळवत असतील.

कंजूस's picture

6 Oct 2016 - 2:32 pm | कंजूस

नंबर देण्यात इथेही स्त्रिदाक्षिण्य नाही जमणार. रांग वेगळी असते.