दिवाळी अंक २०१५: आवाहन

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
3 Sep 2015 - 11:23 pm

नमस्कार मिपाकर हो,

गेल्या ३ वर्षातील यशस्वी दिवाळी अंकाप्रमाणे आपण याही वर्षी आपल्या मिपाचा दिवाळी अंक काढणार आहोत तेव्हा आपल्या कविता, व्यंगचित्र, कथा, दीर्घकथा, विडंबने, माहितीपूर्ण लेखन, मुलाखती, विनोदी लेखन, प्रवासवर्णने, पाककृती, इत्यादि सर्व प्रकारचे लेखन दिनांक १५/१०/२०१५ पर्यंत वर्ड फाईल असेल तर mipa.sampadak@gmail.com या स्वतंत्र ईमेल आयडीला ईमेलद्वार किंवा दिवाळी अंक या मिपावरच्या आयडीला व्यनिद्वारे पाठवा. जास्त चित्रे असतील तर शक्यतो gmail आयडीला पाठवावे ही विनंती. अन्यथा जणू धागाच प्रकाशित करतो आहोत अशा रितीने "लेखन करा" ऑप्शनखाली (इमेज टॅग्जसकट) लिहीलेली पोस्ट तशीच्यातशी एचटीएमएल टॅग्जसहित कॉपी पेस्ट करुन टेक्स्ट फाईल (नोटपॅड) जीमेलवर अटॅच करुन पाठवली तरी दिवाळी अंक संपादकांचे काम सोपे होईल.

१. कोणकोणत्या साहित्यप्रकारात लेखन अपेक्षित आहे.
कविता, व्यंगचित्र, कथा, दीर्घकथा, विडंबने, माहितीपूर्ण लेखन, मुलाखती, विनोदी लेखन, प्रवासवर्णने, पाककृती, इत्यादि सर्व प्रकारचे साहित्य पाठवावे. अंक पीडीएफ स्वरूपातही काढायचा आहे त्यामुळे मल्टिमिडिया फाईल्स असतील तर त्या पीडीएफ अंकात फक्त लिंक या स्वरूपात येतील आणि स्वतंत्रपणे प्रसिद्ध केल्या जातील.

यावर्षी विडंबने आणि कथा यावर भर असावा अशी सर्वसाधारण कल्पना आहे.

२. कोणत्या प्रकारचे साहित्य स्वीकारता येणार नाही (बंधने - विषय, आकार इत्यादिबाबतची)
नेहमीचे म्हणजे अगदी एकोळी दोनोळी साहित्य पाठवू नये, अन्यत्र पूर्वप्रकाशित असलेले साहित्य पाठवू नये, तसेच उत्सवी अंक असल्यामुळे दु:खी, सणाच्या दृष्टीने अप्रिय, किळसवाणे, मृत्यूशी संबंधित, थेट शोकांतिका असे प्रकार कृपया न पाठवल्यास बरे.

३. साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख : १५/१०/२०१५

४. इतर अटी:
साहित्य दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्याच्या बाबतीत दिवाळी अंक संपादक मंडळाचा निर्णय अंतिम राहील. दिवाळी अंकात समाविष्ट न होऊ शकलेलं साहित्य तुम्ही नेहमीप्रमाणे मुख्य बोर्डावर प्रसिद्ध करू शकताच! साहित्य स्वीकारल्याची पोच २५/१०/२०१५ पर्यंत दिली जाईल. त्यानंतर अस्वीकृत साहित्य तुम्ही इतरत्र प्रसिद्ध करू शकता. मात्र दिवाळी अंकासाठी म्हणून पाठवलेले साहित्य आधीच किंवा दिवाळी अंक प्रसिद्ध झाल्यानंतर ३ महिनेपर्यंत अन्य संस्थळावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

५. साहित्य पाठवण्याचा ऑप्शन.
वर लिहिल्याप्रमाणे mipa.sampadak@gmail.com या जीमेल आयडीला पाठवल्यास उपकृत राहू. पण काही कारणाने ते शक्य नसेल तर दिवाळी अंक आयडीला मिपावर व्यनि करावा.

तुमचे सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. अजून साधारण दीड महिना आहे. तरी सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा ही विनंती! धन्यवाद!

-----------------------------

ता.क.: जास्तीत जास्त लोकांना सहभागी होता यावे म्हणून लिखाण पाठवण्याची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवून देत आहोत. कृपया आपले लिखाण लवकरात लवकर पाठवावे ही विनंती. लिखाण स्वीकारले आहे की नाही याबद्दल ५ नोव्हेंबरपर्यंत कळवू. धन्यवाद!

.
.
-----------------------------

संस्कृतीशुभेच्छाप्रतिभा

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

4 Sep 2015 - 12:09 am | अत्रुप्त आत्मा

मी पयला...

देणार देनार..

अन्या दातार's picture

4 Sep 2015 - 1:59 am | अन्या दातार

फक्त मान मिळेल बर हो गुर्जी. ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Sep 2015 - 9:23 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

गुरुजींना गुढगा पण हवाय का मानेबरोबर? =))

रच्याकने गुरुजींचं दिवाळीभावंविश्वं कधी येणार. ;)

अत्रुप्त आत्मा's picture

3 Oct 2015 - 4:29 pm | अत्रुप्त आत्मा

हलकट चिमण............................दू दू दू दू दू दू दू दू दू http://www.sherv.net/cm/emoticons/cats/firing-cat-smiley-emoticon.gif

गुर्जीला जवळपास महिन्यानंतर अठवण आलेली दिसते.

उगी दुसर्‍याला दिर्घद्वेषी म्हणून नावे ठेवत्तात.
दुदुदुदुदुदुदुदुदुदुदुद गुर्जी. ;)

प्रचेतस's picture

3 Oct 2015 - 5:25 pm | प्रचेतस

=))

गुर्जी रॉक्स....चिमण शॉक्स

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Oct 2015 - 6:30 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अन्या दातारने हे गाणे शिकवल मला.

रुणुझुणु रुणुझुणे रे "भ्रम"रा!!

चालुद्या तुमचं निरर्थक बिनबुडी अत्मरंजन. भ्रमवाद etc etc.

बॅटमॅन's picture

10 Oct 2015 - 12:16 am | बॅटमॅन

खी खी खी ;)

बोका-ए-आझम's picture

4 Oct 2015 - 12:49 am | बोका-ए-आझम

कुण्या मांजरीने भाव दिला नाही की काय?

यमन's picture

4 Sep 2015 - 12:01 pm | यमन

नक्की प्रयत्न करु..

मी-सौरभ's picture

4 Sep 2015 - 12:30 pm | मी-सौरभ

तयारीसाठी शुभेच्छा!!

मितान's picture

4 Sep 2015 - 12:46 pm | मितान

अनुवाद ?

पैसा's picture

4 Sep 2015 - 12:54 pm | पैसा

पण ते कॉपीराईट वगैरे सांभाळावे लागेल.

अमृत's picture

4 Sep 2015 - 2:21 pm | अमृत

प्रति लेखक एकच लेख ग्राह्य धरावा ही विनंती.

अंकासाठी शुभेछा व प्रतिक्षेत.

खरंच एकच लेख पाठवता येऊ शकतो का? समजा एक कथा, एक कविता पाठवायची असेल तर?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Oct 2015 - 10:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वागत.

-दिलीप बिरुटे

रातराणी's picture

15 Oct 2015 - 10:59 pm | रातराणी

धन्यवाद सर!

दिवाळी अंकाची वाट पाहत आहे.
लेखक व अंक (मुखपृष्ठ, बाकी फॉर्मटींग, एडीटींग) तयार करणार्‍या सर्व मिपाकरांना शुभेच्छा.
किती मेहनत करावी लागत असेल याची कल्पना आहे.

स्वामी संकेतानंद's picture

4 Sep 2015 - 5:38 pm | स्वामी संकेतानंद

विडंबन तर आताच रेड़ी आहे पण ते नाही पाठवणार. :P
कथा पाठवण्याचा प्रयत्न करतो.

जवळपास सवा महिना आधी सांगितल्याबद्दल धन्स. बघू काही जमतं का!!

यावर्षीचा देखिल दिवाळी अंक चांगलाच होईल याची खात्री आहे.

अंकासाठी योगदान देणार्‍या सर्वांना शुभेच्छा!

सुहास झेले's picture

6 Sep 2015 - 8:52 am | सुहास झेले

नक्की सहभागी होणार :) :)

जव्हेरगंज's picture

17 Sep 2015 - 10:27 am | जव्हेरगंज

इच्छुक...
रच्याकने,
- दिवाळी अंक या मिपावरच्या आयडीला व्यनिद्वारे पाठवा.

कुठे भेटेल हा आयडी?

श्रीरंग_जोशी's picture

17 Sep 2015 - 10:33 am | श्रीरंग_जोशी
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Oct 2015 - 5:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दिवाळी अजून दुर आहे. दिनांक १५ म्हणजे अजून भरपूर अवकाश आहे, असं करु नका.
लिहिते राहा. लेखनाची वाट पाहतोय. :)

-दिलीप बिरुटे

मुक्त विहारि's picture

2 Oct 2015 - 5:11 pm | मुक्त विहारि

इति लेखनसीमा

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Oct 2015 - 10:00 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

सदस्यलोक्स दिवाळी जवळ यायला लागली. चला पटापटा लिखाण पाठवा :)!!!

द-बाहुबली's picture

3 Oct 2015 - 5:35 pm | द-बाहुबली

अवश्य लिखाण केल्या जाइल. पण ते छापल्या ज्याइल काय ?

अशी शंका तरी आपल्या मनात का बरे आली बरे बाहुबली???? आपण लिहावे अशी नरम आपलं नम्र विनंती.

द-बाहुबली's picture

3 Oct 2015 - 6:13 pm | द-बाहुबली

शंका आल्यी कारण माझे शुध्दलिखान.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Oct 2015 - 6:31 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुम्ही पाठवा. शुद्धलेखनाचं पाहु.

ज्यांनी पाठवलं त्यांच्यासाठी काही acknowledgement मेल हा प्रकार नसतो का?? कि "मिळालं ब्वा, विचार होतोय" या टाईप काही

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Oct 2015 - 6:47 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

इमेल वर पाठवलं असाल तर इमेल चेक होईपर्यंत कसं अ‍ॅक्नो. मिळेल?

पोच देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

समीर_happy go lucky's picture

3 Oct 2015 - 6:53 pm | समीर_happy go lucky

तो acceptance किंवा rejectance चा वेगळा हो पण फक्त मिळाल्याचा नसतो का??
[मी फक्त चौकशी कास्रतो आहे, का कोण जाणे पण मला वाटतंय कि तुम्ही "जाब" समजताय]

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Oct 2015 - 7:23 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मी चौकशीचं उत्तर देतोय. जाब कशाला समजेन मी? जाब वाटला असता तर उत्तर द्यायच्या भानगडीत सुद्धा पडलो नसतो :). मेल आला असेल तर मेल चा अ‍ॅक्सेस असणारे लोक्स उत्तर देतील.

मला एक पाकृ पाठवायची आहे, फराळाची! दिवाळीआधी इतक्या लवकर कसं काय करून ठेवायचं? कृती आधी पाठवून फोटू नंतर पाठवायला हरकत नाही पण मग जरासे बदल असले तर करता येत नाहीत.

सस्नेह's picture

4 Oct 2015 - 7:17 am | सस्नेह

रेवाक्काच्या पाकृसाठी जागा राखीव ठेवण्याची शिफारस करण्यात येत आहे.
सरानु वाचताव नव्हं ?

काय चेष्टा करता का तै! जर नियम असेल तर पदार्थ दोनदा करणार.......आधी दिवाळी अंकासाठी व नंतर फराळासाचा जिन्नस म्हणून. पण हा प्रश्न सगळ्या पाकृवाल्यांना येणार असे वाटते.

विडंबन मध्ये कविता/गाणे यांचे विडंबन चालणार आहे ना?

सस्नेह's picture

7 Oct 2015 - 11:22 am | सस्नेह

अर्थात ! शक्यतो मूळ गाणे / कविता परिचित असावी.

सस्नेह's picture

14 Oct 2015 - 8:35 pm | सस्नेह

उद्या अखेरची तारीख !
लोक्सहो, त्वरा करा...

जव्हेरगंज's picture

14 Oct 2015 - 9:16 pm | जव्हेरगंज

साधारण कधीपर्यंत प्रकाशित होणार आहे हा दिवाळी अंक?

संपादक मंडळ's picture

15 Oct 2015 - 9:23 am | संपादक मंडळ

ता.क.: जास्तीत जास्त लोकांना सहभागी होता यावे म्हणून लिखाण पाठवण्याची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवून देत आहोत. कृपया आपले लिखाण लवकरात लवकर पाठवावे ही विनंती. लिखाण स्वीकारले आहे की नाही याबद्दल ५ नोव्हेंबरपर्यंत कळवू. धन्यवाद!

सूड's picture

15 Oct 2015 - 7:48 pm | सूड

धन्यवाद!!

स्वाती दिनेश's picture

15 Oct 2015 - 10:55 pm | स्वाती दिनेश

मिळाल्यामुळे हुश्श.. झालेले आहे. लवकरच २/३ दिवसात लेख पाठवते

विशाल कुलकर्णी's picture

26 Oct 2015 - 11:43 am | विशाल कुलकर्णी

धन्यवाद संपादक मंडळ
एक कविता पाठवलीय आजच, एका लेखावर काम चालु आहे, एक-दोन दिवसात तोही पाठवतो आहे.

पैसा's picture

26 Oct 2015 - 11:54 am | पैसा

:)

चांदणे संदीप's picture

15 Oct 2015 - 10:48 am | चांदणे संदीप

हुर्रॆ….धतड ततड…!

मी आलोच! :)

माम्लेदारचा पन्खा's picture

15 Oct 2015 - 7:37 pm | माम्लेदारचा पन्खा


ता.क.: जास्तीत जास्त लोकांना सहभागी होता यावे म्हणून लिखाण पाठवण्याची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवून देत आहोत. कृपया आपले लिखाण लवकरात लवकर पाठवावे ही विनंती. लिखाण स्वीकारले आहे की नाही याबद्दल ५ नोव्हेंबरपर्यंत कळवू. धन्यवाद!

दंडवत स्वीकारावा ___/\___ !!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Oct 2015 - 11:38 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आठवण करुन द्यायसाठी धागा वर आणतो आहे. लवकर पाठवा साहित्य.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Oct 2015 - 5:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण अजूनही बरीच मंडळी लेखन पाठवायची बाकी आहे. काय लिहिताय ना मग ? :)

-दिलीप बिरुटे

शन्वारपर्यंत एक पाकृ पाठवतो.

चतुरंग's picture

26 Oct 2015 - 4:13 pm | चतुरंग

प्राडाँची पोचदेखील आली! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Oct 2015 - 8:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दिवाळी अंकासाठी भरभरुन लेखन आलं आहे, येत आहे. असाच मिपावर लोभ असु द्या मंडळी.
_/|_

-दिलीप बिरुटे

अर्र येवढ्यात नका निरोपाचं भाषण करु. रेशिपी इज अबौट टु फिनिश!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Oct 2015 - 9:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या रेशिपीमुळं मी थांबलोय. नै तर नीलकांतकडे फायनल ड्राफ्ट केव्हाच पाठवला असता.
अजून आपल्यासारखे मिपाकरांचे लेखन बाकी आहे, ते मी विसरलो नाही. वाट पाहतोय.

बाकी, मिपावर एकही व्यंगचित्रे काढणारा एक मिपाकर नै याचं वैट वाटलं. :(

-दिलीप बिरुटे

इमेल आणि व्यनि दोन्ही पाठवलं आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Oct 2015 - 7:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आभार.

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

31 Oct 2015 - 12:42 pm | सुबोध खरे

मिपावर एकही व्यंगचित्रे काढणारा एक मिपाकर नै याचं वैट वाटलं.
डॉक्टर साहेब
आम्ही चित्र काढलं तर त्या माणसाला व्यंग आहे असंच दिसतं.
अजून व्यंगचित्र काय काढणार?

वेल्लाभट's picture

2 Nov 2015 - 7:33 am | वेल्लाभट

हे बेस्ट होतं

चतुरंग's picture

8 Nov 2015 - 10:44 pm | चतुरंग

खल्लास कॉमेंट डॉक! ;)

(व्यंगकवी)चतुरंग

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Oct 2015 - 5:59 am | कैलासवासी सोन्याबापु

लिखाण निवडले गेले आहे किंवा रिजेक्ट झाले आहे ची सूचना कधीपर्यंत मिळेल?

हरीहर's picture

1 Nov 2015 - 12:13 am | हरीहर

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याची मुदत संपली (जर पुन्हा एकदा मुदतवाढ नसेल तर!) आता दिवाळी अंकाचे वेध लागले आहेत.. आमच्या सारख्या वाचनमात्र लोकांसाठी अंक प्रकाशीत होण्यापूर्वी या धाग्याव्र किंवा नवीन धाग्याच्या स्वरुपात या अंकाची वैशिस्ट्ये, लेख, लेखक यांचि माहिति दिलीत तर उत्सुकता आणखी वाढेल, येणा-या अंकासाठी वातावरण निर्मिती देखील होईल असे वाटते.

शिव कन्या's picture

2 Nov 2015 - 6:40 am | शिव कन्या

सहमत

दिपोटी's picture

8 Nov 2015 - 11:16 am | दिपोटी

आज रविवार, आठ नोव्हेंबर. मिपाचा दिवाळी अंक नेमका कोणत्या तारखेस प्रसिध्द होईल?

- दिपोटी

हरीहर's picture

9 Nov 2015 - 8:45 pm | हरीहर

खरच.. कधी येनार आपला दिवाळी अंक...

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Nov 2015 - 12:28 am | डॉ सुहास म्हात्रे

मिपाचा "दिवाळी अंक २०१५" प्रसिद्ध झाला आहे... उजव्या बाजूच्या कॉलममध्ये "मिसळपाववर स्वागत"च्या खाली असलेल्या दुव्याने त्याला उघडू शकाल.