दिवाळी अंक २०१५: आवाहन
नमस्कार मिपाकर हो,
गेल्या ३ वर्षातील यशस्वी दिवाळी अंकाप्रमाणे आपण याही वर्षी आपल्या मिपाचा दिवाळी अंक काढणार आहोत तेव्हा आपल्या कविता, व्यंगचित्र, कथा, दीर्घकथा, विडंबने, माहितीपूर्ण लेखन, मुलाखती, विनोदी लेखन, प्रवासवर्णने, पाककृती, इत्यादि सर्व प्रकारचे लेखन दिनांक १५/१०/२०१५ पर्यंत वर्ड फाईल असेल तर mipa.sampadak@gmail.com या स्वतंत्र ईमेल आयडीला ईमेलद्वार किंवा दिवाळी अंक या मिपावरच्या आयडीला व्यनिद्वारे पाठवा. जास्त चित्रे असतील तर शक्यतो gmail आयडीला पाठवावे ही विनंती. अन्यथा जणू धागाच प्रकाशित करतो आहोत अशा रितीने "लेखन करा" ऑप्शनखाली (इमेज टॅग्जसकट) लिहीलेली पोस्ट तशीच्यातशी एचटीएमएल टॅग्जसहित कॉपी पेस्ट करुन टेक्स्ट फाईल (नोटपॅड) जीमेलवर अटॅच करुन पाठवली तरी दिवाळी अंक संपादकांचे काम सोपे होईल.
१. कोणकोणत्या साहित्यप्रकारात लेखन अपेक्षित आहे.
कविता, व्यंगचित्र, कथा, दीर्घकथा, विडंबने, माहितीपूर्ण लेखन, मुलाखती, विनोदी लेखन, प्रवासवर्णने, पाककृती, इत्यादि सर्व प्रकारचे साहित्य पाठवावे. अंक पीडीएफ स्वरूपातही काढायचा आहे त्यामुळे मल्टिमिडिया फाईल्स असतील तर त्या पीडीएफ अंकात फक्त लिंक या स्वरूपात येतील आणि स्वतंत्रपणे प्रसिद्ध केल्या जातील.
यावर्षी विडंबने आणि कथा यावर भर असावा अशी सर्वसाधारण कल्पना आहे.
२. कोणत्या प्रकारचे साहित्य स्वीकारता येणार नाही (बंधने - विषय, आकार इत्यादिबाबतची)
नेहमीचे म्हणजे अगदी एकोळी दोनोळी साहित्य पाठवू नये, अन्यत्र पूर्वप्रकाशित असलेले साहित्य पाठवू नये, तसेच उत्सवी अंक असल्यामुळे दु:खी, सणाच्या दृष्टीने अप्रिय, किळसवाणे, मृत्यूशी संबंधित, थेट शोकांतिका असे प्रकार कृपया न पाठवल्यास बरे.
३. साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख : १५/१०/२०१५
४. इतर अटी:
साहित्य दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्याच्या बाबतीत दिवाळी अंक संपादक मंडळाचा निर्णय अंतिम राहील. दिवाळी अंकात समाविष्ट न होऊ शकलेलं साहित्य तुम्ही नेहमीप्रमाणे मुख्य बोर्डावर प्रसिद्ध करू शकताच! साहित्य स्वीकारल्याची पोच २५/१०/२०१५ पर्यंत दिली जाईल. त्यानंतर अस्वीकृत साहित्य तुम्ही इतरत्र प्रसिद्ध करू शकता. मात्र दिवाळी अंकासाठी म्हणून पाठवलेले साहित्य आधीच किंवा दिवाळी अंक प्रसिद्ध झाल्यानंतर ३ महिनेपर्यंत अन्य संस्थळावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.
५. साहित्य पाठवण्याचा ऑप्शन.
वर लिहिल्याप्रमाणे mipa.sampadak@gmail.com या जीमेल आयडीला पाठवल्यास उपकृत राहू. पण काही कारणाने ते शक्य नसेल तर दिवाळी अंक आयडीला मिपावर व्यनि करावा.
तुमचे सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. अजून साधारण दीड महिना आहे. तरी सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा ही विनंती! धन्यवाद!
-----------------------------
ता.क.: जास्तीत जास्त लोकांना सहभागी होता यावे म्हणून लिखाण पाठवण्याची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवून देत आहोत. कृपया आपले लिखाण लवकरात लवकर पाठवावे ही विनंती. लिखाण स्वीकारले आहे की नाही याबद्दल ५ नोव्हेंबरपर्यंत कळवू. धन्यवाद!
. . -----------------------------
वाचने
106702
वाचनखूण
प्रतिक्रिया
69
मी पयला... देणार देनार..
In reply to मी पयला... देणार देनार.. by अत्रुप्त आत्मा
फक्त मान मिळेल बर हो गुर्जी.
In reply to फक्त मान मिळेल बर हो गुर्जी. by अन्या दातार
गुरुजींना गुढगा पण हवाय का
In reply to गुरुजींना गुढगा पण हवाय का by कॅप्टन जॅक स्पॅरो
हलकट चिमण....................
In reply to हलकट चिमण.................... by अत्रुप्त आत्मा
गुर्जीला जवळपास महिन्यानंतर
In reply to गुर्जीला जवळपास महिन्यानंतर by प्रचेतस
उगी दुसर्याला दिर्घद्वेषी
In reply to उगी दुसर्याला दिर्घद्वेषी by अभ्या..
=))
In reply to =)) by प्रचेतस
अन्या दातारने हे गाणे शिकवल
In reply to अन्या दातारने हे गाणे शिकवल by कॅप्टन जॅक स्पॅरो
खी खी खी ;)
In reply to हलकट चिमण.................... by अत्रुप्त आत्मा
हा नवीन बोका दिसतोय.
नक्की प्रयत्न करु
अंकाच्या
अनुवाद ?
In reply to अनुवाद ? by मितान
व्हय व्हय!
सूचना वजा विनंती
In reply to सूचना वजा विनंती by अमृत
खरंच एकच लेख पाठवता येऊ शकतो
In reply to खरंच एकच लेख पाठवता येऊ शकतो by रातराणी
पाठवू शकता.
In reply to पाठवू शकता. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद सर!
दिवाळी अंकाची वाट पाहत आहे.
विडंबन तर आताच रेड़ी आहे पण ते
जवळपास सवा महिना आधी
यावर्षीचा देखिल दिवाळी अंक
नक्की सहभागी होणार :) :)
इच्छुक...
In reply to इच्छुक... by जव्हेरगंज
इथे
मंडळी कुठपर्यंत आलंय लेखन.
दिवाळी अंकाची वाट बघत आहे...
सदस्यलोक्स दिवाळी जवळ यायला
अवश्य लिखाण केल्या जाइल. पण
In reply to अवश्य लिखाण केल्या जाइल. पण by द-बाहुबली
अशी शंका तरी आपल्या मनात का
In reply to अशी शंका तरी आपल्या मनात का by प्यारे१
शंका आल्यी कारण माझे
In reply to शंका आल्यी कारण माझे by द-बाहुबली
तुम्ही पाठवा. शुद्धलेखनाचं
ज्यांनी पाठवलं त्यांच्यासाठी
In reply to ज्यांनी पाठवलं त्यांच्यासाठी by समीर_happy go lucky
इमेल वर पाठवलं असाल तर इमेल
In reply to ज्यांनी पाठवलं त्यांच्यासाठी by समीर_happy go lucky
पोच देण्याची व्यवस्था करण्यात
तो acceptance किंवा
In reply to तो acceptance किंवा by समीर_happy go lucky
मी चौकशीचं उत्तर देतोय. जाब
मला एक पाकृ पाठवायची आहे,
In reply to मला एक पाकृ पाठवायची आहे, by रेवती
तू दे
In reply to तू दे by सस्नेह
काय चेष्टा करता का तै! जर
विडंबन मध्ये कविता/गाणे यांचे
In reply to विडंबन मध्ये कविता/गाणे यांचे by नीलमोहर
हो
उद्या अखेरची तारीख !
साधारण कधीपर्यंत प्रकाशित
मुदतवाढ
In reply to मुदतवाढ by संपादक मंडळ
धन्यवाद!!
In reply to मुदतवाढ by संपादक मंडळ
मुदतवाढ
In reply to मुदतवाढ by संपादक मंडळ
धन्यवाद संपादक मंडळ
In reply to धन्यवाद संपादक मंडळ by विशाल कुलकर्णी
:)
हुर्रॆ
हे अत्युत्तम केलंत......
आठवण करुन द्यायसाठी धागा वर
मंडळी बरंच लेखन पोहचलं आहे.
शन्वारपर्यंत एक पाकृ पाठवतो.
कालच लेख पाठवलाय!
मंडळी खूप लेखन आलं.
In reply to मंडळी खूप लेखन आलं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अर्र येवढ्यात नका निरोपाचं
In reply to अर्र येवढ्यात नका निरोपाचं by सूड
आरं आने दो.
In reply to आरं आने दो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इमेल आणि व्यनि दोन्ही पाठवलं
In reply to इमेल आणि व्यनि दोन्ही पाठवलं by सूड
लेखन पोहचले.
In reply to आरं आने दो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपावर एकही व्यंगचित्रे
In reply to मिपावर एकही व्यंगचित्रे by सुबोध खरे
ळॉळ
In reply to मिपावर एकही व्यंगचित्रे by सुबोध खरे
हा हा हा!
लिखाण निवडले गेले आहे किंवा
साहित्य..
In reply to साहित्य.. by हरीहर
सहमत
दिवाळी अंक २०१५
संपादक महोदय..
In reply to संपादक महोदय.. by हरीहर
मिपाचा "दिवाळी अंक २०१५"